संवेदनशैथिल्य आणि सामाजिक आरोग्य

मनुष्यजातीच्या वृत्तीतला थंडपणा, जाणिवांचा बोथटपणा वा कोडगेपणा याला मी संवदेनशैथिल्य असे म्हणते.
संवदेनशील असणे, संवेदनांना सचेतन करणे किंवा उत्तेजना देणे (stimulation) हे माणसाच्या विकासासाठी व वाढीसाठी अत्यावश्यक असते. अशी उत्तेजना (Stimulation) जर वातावरणामधून मिळाली नाही तर माणसात मानसिक व शारीरिक गोंधळ निर्माण होतो. त्यातून विकृती निर्माण होऊ शकते. या उत्तेजनाही विविध प्रकारच्या असल्या तरच माणसाचे कुतूहल, काहीतरी करण्याची आस व इच्छा व निरनिराळे शोध लावण्यासाठी लागणार्याह ऊर्मी जागृत होऊ शकतात, अन्यथा नाही. अशा ऊर्मी जागृत होणे, ही आजच्या समाजात एक दुरापास्त गोष्ट होत चालली आहे.
मी जर कोणाला म्हटले की, २००० सालापासून AIDS चा फैलाव व प्रसार अतिवेगाने वय १५ ते २४ वयोगटातील तरुणतरुणींची लोकसंख्या नष्ट करणार आहे, अतिशय हादरवणारी घटना। भवितव्यात होणार आहे – तर सहजी उत्तर मिळते, “बरे आहे ना, तेवढीच लोकसंख्या कमी होईल’! यामध्ये स्वतःला वगळून किती झट्कन बोलले जाते. जर या व्यक्तीवरही AIDS च्या मृत्युयज्ञात जळण्याची वेळ आली तर हीच व्यक्ती असे बोलायला धजावेल काय?
हरघडी घडणाच्या छोट्या छोट्या घटनांमध्ये, गोष्टींमध्ये या संवेदनशिथिलतेचा परिणाम कितीकदाच दिसतो.
आमच्या लहानपणी मुलाला शिकवणी लावावी लागली तर ते इतरांना सांगण्याची लाज वाटायची, कमीपणा वाटायचा. जास्त अभ्यास करणे किंवा घोटणे म्हणजे कमी बुद्धीचे लक्षण समजले जायचे. आता tuition classes ना जाणे ही एक अत्यावश्यक बाब, अभिमानाची गोष्ट आणि रटणे आणि घोटणे हे गृहीत आणि गरजेचे समजले जाते, अगदी पहिलीपासून ते फायनल संपेपर्यंतसुद्धा. आणि मेडिकल, इंजिनियरिंग शिकणारेही सर्रास tuition ने शिकतात. Tuition असण्यात शहाणपणा समजला जातो. इतका पराकोटीचा की एखाद्या अतिबुद्धिमान विद्याथ्र्याला tuition चा कंटाळा असला, अजिबात गरज नसली व कमी अभ्यास पुरत असला तर आईबाप त्याची काळजी करतात, कसे होणार, आणि त्यायोगे त्याच्या बुद्धिमत्तेचा, कल्पकतेचा सहजतेने अनादर करतात. तो विद्यार्थीही साचेबंद उत्तरांपेक्षा वेगळे काही लिहिण्यास किंवा सोडवण्यास सहजी तयार होत नाही कारण मार्कोनी बांधलेला असतो, तसे वेगळेपण दाखवल्यास वेड्यांत काढला जातो. त्याची संवेदनशीलता कमी करण्यात किंवा मारून टाकण्यात, सर्व समाज, (व आजचीपरीक्षापद्धती) सहजतेने यशस्वी होतात.
आग्रह केला नाही तर कोणी पानात अन्न टाकणार नाही म्हणून आपण खास बफे पद्धत सुरू केली तर त्यातही काय दिसते?सर्रास लहान-मोठे, बायका-पुरुष वचावचा खूप घेतात (गर्दीमुळे पुन्हा घ्यायला मिळेल, नाही मिळेल!) आणि खुशाल टाकतात, वाया घालवतात. इथे कुणी बघणारेही नसते. जाब विचारणारे नसते. पण टाकणार्या लाच लाज नसते. टाकण्याची लाज नसते (आपल्या देशातली अर्धपोटी जनता त्यांना कधीच आठवत नाही.) कोणीही आग्रह न करता खाण्याची, जास्त घेण्याची आणि सहज टाकून देण्याची जणू चढाओढच असते. मुंजी, लग्ने असोत, डोहाळजेवण, मंगळागौर, वाढदिवस, बारसे किंवा १३वीचे श्राद्धाचे जेवण असो, हे सर्व समारंभ सारख्याच थाटात, जागेअभावी हॉल घेऊन साजरे केले जातात. यातली काही व्रते आहेत, काही विधी आहेत तर काही आनंदोत्सव आहेत, पण साजरे करताना आपण फक्त समारंभोत्सवच करतो!का करतो, कशासाठी करतो याचा विचार करायची कितींना गरज भासते?
डॉक्टर्स-वैद्य पूर्वी फी घेणेही कमीपणाचे समजत. नंतर फी सर्रास सुरू झाली. इलाजासाठी फक्त. त्यानंतर खन्या-खोट्या सर्टिफिकेट्सचे पैसे घेणे सर्रास झाले. मेडिकल सर्टिफिकेट मिळणेमिळवणे सोपे झाले. सरकारी नोकरीत असूनही छुपी practice ही नित्याची झाली. स्वतःच्याजाहिराती करणे, तोंडाने, लिहून, पत्राद्वारे, स्वतःचीच स्तुती करणे, हेही आजकाल एक सहज दिसणारे दृश्य होऊ लागले आहे. खोटे reports आणि वैदूगिरीची (quackery ची) डॉक्टरांनाही लाज वाटेनाशी झालीआहे. Cut-practice न करणारा डॉक्टर दुर्मिळ होत चालला आहे. दारू पिण्याला प्रतिष्ठा आणण्यात डॉक्टरमंडळींचा मोठा सहभाग आहे. एकमेकांचे पाय ओढणे, द्वेष, राजकारणे कधी कधी एवढ्या पराकोटीला पोचतात की भांडणे व मारामान्यांपर्यंत वेळ येऊन पोलिसांना मध्ये पडायची वेळ येऊ शकते.
ही झाली आमच्या नोब्लेस्ट प्रोफेशनची कहाणी! जर नोब्लेस्ट मानल्या जाणार्यार व्यक्तींची ही स्थिती तर मग कमी नोबल मानल्या जाणार्याज व्यावसायिकांबद्दल काय बोलायचे? थोड्याफार फरकाने सगळीकडेच असा कोडगेपणा समाजभर पसरला आहे नाही का?
शिक्षण देण्याचा व्यवसाय झाला आहे. शिक्षक शाळेत काहीही न शिकवता बाहेर भरपूर पैसे घेऊन शिकवणी करताना फक्त चांगले शिकवू शकतात. शाळेचा पगार मिळतोच. कधी कधी त्याच वर्गात शाळेच्या वेळेआधी किंवा नंतर, सर्रास हे प्रकार होत असतात. हा कुठला बिनदिक्कतआलेला कोडगेपणा?
जेव्हापासून Business Management चे शिक्षण आपल्या देशात आले आणि फोफावले तेव्हापासून या कोडगेपणाची भरभराट होत आहे. त्यातली नीतिमत्ता (ethics) पाळणाच्या किती कंपन्या? Unethical, unfair business च फोफावतो फक्त. मग शाळा काढण्याचे (धंदे) बिझिनेस, मेडिकल व इंजिनियरिंग कॉलेज काढण्याचे धंदे, B.Ed. D.Ed. कॉलेज काढण्याचे धंदे, कॉम्प्युटर क्लासेसचे व्यापार, हॉटेलिंगचे व्यापार, पंचतारांकित हॉस्पिटल्स काढण्याचे व्यापार वगैरे अनेक व्यापार सुरू होतात. T. V. Serials चे व्यापार, चॅनल्सचे व्यापार, धडाकून चालतात.
क्रिकेटसारख्या खेळांचेही व्यापार केले जातात. या सगळ्या व्यापार्यांकच्या व्यापात, सामान्य माणूसचक्रावतो. त्याचे मनोव्यापार मग शिथिल कसे नाही होणार?
व्यक्तिमत्त्वविकासासाठी मुलांना classes मध्ये पैसे देऊन घातले जाते, कारण घरी असा विकास होणार नाही याची पालकांना खात्री असते.
जळगाव-सावंतवाडीसारखी वासनाकडे होण्यामागे त्या मुलींच्या संवेदना पैशापुढे मारून टाकणारे, पैशासाठीच त्या मुलींच्या शरीराचा वाटेल तसा वापर करणारे, छळणारे आपल्याला दिसतात. घरातल्या पालकांच्या संवेदना मुलीवर काहीही अत्याचार झाले तरी १०-१० वर्षे गप्प बसण्यामध्ये बधिर होतात – होऊ शकतात हे आपण अनुभवले आहेच. हे सर्व कांड होणे कोणासाठी? तर – ज्या डोळ्यांच्या व मनांच्या संवेदना सर्वसाधारण शृंगाराने किंवा प्रियाराधनाने उत्तेजित होऊ शकत नाहीत त्या विकृत पुरुषवर्गाला अत्युत्तेजित करण्यासाठी खुशाल वापरता याव्यात यासाठीच ना!
सध्या मनोरंजनाचा भडिमार, साधनांचा अतिरेक इतका झाला की मनासाठी फक्त रंजन करवून गेणे हा एकच उद्योग उरला आहे की काय असे वाटावे?रोजच २४-२४ तास दिवसाचे
– आणि ४०-४० चॅनल्स आणि नाचवणारा remote control हातात. त्याला नाचवण्यात कोणाकोणाचे खरेच मनोरंजन होत असेल का या प्रश्नाला कितपत अर्थ उरतो?सर्वसाधारण मनोरंजनाचे कार्यक्रम फालतू व ‘बोअर’ म्हणून टाकाऊ ठरतात. तर अतिभडक, अतिरंजित, अतिरंगीत, अतिखाजगी, अतिजवळील, अतिविकृत, अतिश्रीमंत, अतिव्यभिचारी – हिस्टेरिक प्रकारचे कार्यक्रम डोळ्यांना सुखवू शकतात, आवडू शकतात, चर्चिले जाऊ शकतात आणि सहजपणे censor पण डालवून छोट्या-मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालू शकतात, इथे कोणाकोणाच्या संवेदनशैथिल्याबद्दल बोलायचे?
यापुढे Internet वर, – E-mail ने, cyberspace – cybersex, cyberpom पुढे येण्याची जय्यत तयारी झालेलीच आहे. कारण मग विकृतींचाही कंटाळा यायला लागेल.
कोणीतरी म्हटले आहे –
“Cause and effect of degeneration are one and the same and enter a vicious cycle.”
किती खरे आहे ते!
चार पाच वर्षांपूर्वी एका राष्ट्रीय दैनिकात एक अस्वस्थ करणारी बातमी वाचायला मिळाली. मद्रासमधील ९ वी ते १२ वीतील मुलामुलींमध्ये वाढणारे AIDS रोगाचे प्रमाण. वाहवलेली मुलेमुली बरीच प्रयोगशील निघाली. त्यायोगे जवळपास ३० ते ३५ टक्के पार्टनर्स ची तपासणी ADS चे विषाणू असणारी – पॉझिटिव्ह निघाली. चिंतित झालेला मुख्याध्यापकवर्ग. तातडीने मीटिंग बोलावण्यात आली. अध्यक्षबाईनी निष्कर्ष काय काढावे – “आता मुलांना निरोध देणे व वापरण्याचे शिक्षण देणे जरूरी!”
(“म्हणजे मुलांनो, कसेही वागलात तरी चालेल पण AIDS ला बळी पडू नका’)
मुख्याध्यापक वर्ग एवढा संवेदनहीन होऊ शकतो?का तोच एक शेवटचा उपाय सुचू शकला?
निरोधच्या वाटेल तशा येणार्या जाहिराती, अधिक स्वैर वागायला उत्तेजन देत आहेत. नको त्या वयांना नको ते शिकवत आहेत, अवाजवी कुतूहल वाढवत आहेत. पण निरोध AIDS ला रोखण्यास १०० टक्के यशस्वी ठरू शकत नाही हे कोण, कोणाला आणि कसे सांगणार?
वेश्यांना निरोध वाटून काय उपयोग? या अतिदुर्दैवी स्त्रीला–पुरुषाला काही सांगण्याचा, कधी हक्क मिळू शकेल का? तो तिला बजावता येऊ शकेल का?मग ती वेश्याच कशाला बनेल?वेश्याव्यवसायाबद्दल आपल्या देशात कधी कोणी विरोध दर्शवणार आहे की नाही?त्यावर बंदी घालणे हा एड्सला आळा घालण्याचा चांगला उपाय ठरू शकतो.
२००० सालापर्यंत आपल्या देशातल्या सर्व दवाखान्यांतील ७५ टक्के बेड्स AIDS च्या रोग्यांनी भरलेली असतील असे एक भाकित आहे. जागतिक आरोग्य संघटना गेली १७ वर्षे २००० सालापर्यंत सर्वांना आरोग्य’ या घोषवाक्याचा (Health for All by 2000 A.D.) मारा जगात करीत आहे. त्या दृष्टीने पोलियो, मलेरिया वगैरे रोगांवर मोठ्या प्रमाणात कामही करीत आहे. पण गेल्या १६ वर्षापासून नव्याने, झपाट्याने पसरणारा एड्स हा रोग या घोषवाक्याला “Dealth for All by 2000 A.D.” असा चॅलेंज देतो आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
एड्स हा आरोग्याचा प्रश्न तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त मोठा तो एक सामाजिक प्रश्न आहे. एड्सच्या प्रसाराचे सर्व वेगवेगळे मार्ग माणसांच्या वागणुकीशी निगडित आहेत. एखाद्या व्यक्तीची वागणूक ही जशी त्याच्या वृत्तीमुळे ठरते तेवढीच ती त्या व्यक्तीवर प्रभाव पाडणाच्या सामाजिक घटकांमुळेही ठरते. विशेषतः माणसाचे लैंगिक जीवन व त्यातील सुरक्षितता यावर अनेक सामाजिक घटकांचा परिणाम असतो. लागण झालेल्या व्यक्तीचे जबाबदारीचे वागणे हे अतिशय महत्त्वाचे असते. वैयक्तिक जबाबदार वागणूक ही आजूबाजूच्या बेजबाबदार सामाजिक वातावरणातअवघड असते.
एड्सच्या साथीला रोखण्यासाठी ही माणसाची जबाबदार वागणूक सर्वांत महत्त्वाची. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय सर्व स्तरांवर प्रगल्भतेने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. हे विधान मी करते- पण आहे त्याचा काही उपयोग?आपल्या २००० हून जास्ती वर्षे नांदणाच्या patriarchal society चा वेश्याव्यवसायाला समाजाचे आवश्यक अंग म्हणण्याचा प्रघात हाच एक संवेदनशिथिलतेचा तीव्र परिणाम पहातो आपण! आपल्या पिढ्यानु-पिढ्यास्त्रियासुद्धा – थंड मनाने पाहातो आहोत – आणि खुश्शाल त्याची समर्थन करतो आहोत. कशामुळे? कशासाठी?एडस् नव्हता तेव्हा आपण गप्प बसलो. पण आताही तशाच राहणार?जाणून बुजूनच – माहिती असूनही?वेश्याव्यवसाय बंद करून तो AIDS पासून वाचवून, या दुर्दैवी स्त्रीजातीला प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपण केव्हा घेणार?२००० साल आता जवळ येत आहे. त्याआधी आपण जागे होणे जरूर आहे.
वेश्या पुरेनाश्या झाल्या म्हणून पुरुषातल्या विकृती कोवळ्या बालकबालिकांचे बळीपाडायला मागेपुढे पाहत नाहीत, उलट अशा लैंगिक शोषणाचे कित्येक हजार बळी भारतात आहेत. मलेशियात आहेत. या संवेदनशैथिल्याला कुठल्या श्रेणीत गणायचे?
हिजड्यांच्या विकृत मानसिकतेला ज्या अमेरिकन समाजात ‘ह्यूमन राइट्स’ च्या गोड अधिकाराखाली प्रतिष्ठा मिळू शकते त्या समाजाचे- शैथिल्य कसे मोजायचे?आणि ‘मी gay आहे. त्यात काय?’ असे सांगणाच्या मोठ्या-छोट्या-स्त्री-पुरुषांचे इंटरव्ह्यूज खुशाल प्रतिष्ठित मासिकांत छापून येणे हा कुठल्या प्रकारचा कोडगेपणा?
वर चर्चिलेल्या अनेकविध कारणांमुळे लैंगिक संबंधांचे वाढते प्रमाण, लहान मुलांचे वाढते लैंगिक शोषण, मादक द्रव्ये टोचण्याची व्यसने फोफावण्याने पसरणारा एडस् मणिपूर, अरुणाचल मध्ये ६० ते ६५ टक्के तरुण-तरुणी एड्स्चे बळी आहेत.
मुंबईतल्या ५०% वेश्या एइस्ने ग्रासलेल्या आहेत. ट्रक चालक व इतर प्रवासी कामकन्यांमुळे तो खेड्यांमध्ये आणि गावामध्ये जातो आहे. चीनमध्ये २ वर्षांत १०,००० वरून १ लाखांवर एड्स रुग्णांची संख्या गेली आहे. आफ्रिकेत ६३% जनता एड्सूने बाधित आहे. इतर सर्व देशांमध्येही थोड्याफार फरकाने एड्स् पसरण्याची संख्या वाढते आहे. मलेशिया, थायलंड, म्यानमार (ब्रह्मदेश) दक्षिण आफ्रिका, व्हियेतनाम, अमेरिका,
एड्स् पसरण्यामध्ये ७० ते ७५% रोग्यांचे प्रमाण हे असुरक्षित स्त्रीपुरुषसंबंध ह्यामुळेच आहे. उरलेले ३० टक्के समलिंगी व्यक्ती – ५ ते १०%, मादक द्रव्ये टोचणान्यांमध्ये ५ ते १० टक्के, दूषित रक्त दिले गेल्याने ३ ते ५%, आईमुळे गर्भाला झालेले व इतर.
डॉ. डेव्हिड हो (David Ho) ह्या न्यूयॉर्कमधील डॉक्टरने ४-५ औषधे मिळून या रोगावर उपचाराचा प्रयत्न केला त्याला थोडे यश मिळाल्याची शक्यता असू शकते. पण मध्ये औषधे थांबवल्यास HIV-1, – HIV-II बरोबर HIV-III Virus म्यूटेशनने निर्माण होऊन पुन्हा औषधे निरुपयोगी ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व उपायांना खर्च २०,००० डॉलर्स असा प्रतिवर्षाला येतो. फक्त निरोध, निर्जंतुक केलेली उपकरणे, नवीन औषधे, प्रतिबंधक लशी अशा तंत्रवैज्ञानिक उपायांनी एइस्ला आळा घालता येणार नाही हे लक्षात घेणे फार जरूरी आहे.“टाळू शकू अशा कोणत्याही कारणाने येणारा मृत्यू ही एक सामाजिक शोकांतिका असते.” लागण झालेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक वर्तणुकीला दोष देणे सोपे असते. आपल्या वागण्यावर आसपासच्या परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव असतो. म्हणून ही परिस्थिती बदलणे हाच एक एड्सला आळा घालण्याचा दूरगामी मार्ग ठरणार आहे.
स्त्रियांमधील एइस्चे प्रमाण सुरुवातीला जरी शरीरविक्रय करणार्याा स्त्रियांत जास्त असले तरी लवकरच तो विषाणू घराघरांतील स्त्रियांत शिरकाव करतो. संसर्गग्रस्त पुरुषांची सेवा स्त्रिया करतील, पण उलटपक्षी स्त्रीला संसर्ग झाल्यास तातडीने घराबाहेर तिला हाकलून देणारे नवरे आपल्या देशात कमी मिळणार नाहीत. नवर्या्ला अकाली मृत्यू आल्यामुळे होणार्याा विधवा व परित्यक्ता स्त्रियांबरोबर दोघाही पालकांच्या मृत्यूने येणारा अनाथ मुलांचा प्रश्न वाढीस लागेल. त्यांना रस्त्यावर यावे लागेल. त्यामुळे विकृती, गुन्हेगारी व व्यसने यांत वाढ होईल. अमेरिकेतसुद्धा १०लाख मुले रस्त्यांवर आहेत. भारतातील प्रत्येक शहरात सुमारे १ लाख मुले बेघर आहेत. भारतात गरिबीमुळे तर अमेरिकेत कुटुंबांच्या विस्कटल्यामुळे. कारणे वेगळी असली तरी प्रश्न सारखेच. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आधी एइस् रोखण्यासाठी प्रभावी उपाय लोकशिक्षणाचा असू शकतो. योग्य माहिती मिळाल्यास – वृत्तीमध्ये बदल होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणूनच कठीण.
योग्य माहिती—–>वृत्तीबदल—–>बदलणारी वागणूक—->सततची जाणीव जागृती
हाच एकमेव पर्याय आपल्या हातात आहे. त्याचा उपयोग संवेदनशिथिल समाजात आपण कसा आणि किती करू शकू आणि करू शकू काय हा खरा प्रश्न ठरतो.
तत्त्वज्ञान जगण्यासाठी – बोलण्यासाठी पोट भरलेले असावे लागते हे जर खरे आहे, तर ज्या आपल्या देशात ४०% हून जास्त जनता दारिद्रयरेषेखाली जीवन जगते तिथे काय
होणार? उरलेले ५० टक्के लोक – आपल्या लोक – (?) शाहीत स्वातंत्र्याच्या असीम अनुभवातसुखोपभोगात, “आहार-निद्रा-भय-मैथुनम्” – या चक्रात, पैशामागे आणि पैशासाठी जगत लोळत आहेत. उरलेले १० टक्के creative minority (कृतिशील मूठभर) या सर्वांना सावरायला अपुरी ठरले तर नवल ते काय?
आपल्याच देशात महात्मा गांधी होऊन गेले ना! आफ्रिकेतली गुलामगिरी त्यांना बोचली. बिनकपड्यांची आपली गरीब प्रजा पाहून त्यांनी अंगभर कपडे वापरणे सोडून दिले. असा तीव्र संवेदनशील नेता कुठे?आणि आज करोडोंची संपत्ती स्वतःसाठी लपवून, संग्रह करून १०,००० पेक्षा जास्त साड्यांचा व तत्सम वस्तूंचा हावरटपणाने संग्रह करणारी जयललिता कुठे?दोघेही
जनतेचे पुढारी ना!
वाढणारा चंगळवाद, आत्मकेंद्री वृत्तीची वाढ व या सर्वांबरोबर आपोआपच येणारे संवेदनशैथिल्य – हे संवेदनशैथिल्य आत्मघातकी व समाजघातकी आहे.
शारीरिक संबंध इतर प्राणिमात्रांमध्ये केवळ प्रजननासाठी होते हे जर खरे आहे तर मग मनुष्यप्राण्यांमध्ये त्याचा अतिरेक व त्यातून निर्माण होणार्या विकृती त्यामुळे हे जे काय आज निर्माण होत आहे ते कशामुळे, संवेदनशैथिल्यामुळेच नव्हे काय?
Air-conditioner मध्ये राहून माणसाचे मनही सुखी-conditioned व्हायला बघतेय. थोडेही दुःख (स्वतःला) झालेले त्याला सहन होत नाही, मग त्याला भरपूर औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स, T.V., Video, मादकद्रव्ये-दारू वगैरेचा आश्रय घेण्यात काही वाटत नाही. दुःख सहन करायचे असते. ते केल्यावर आपली सहनशक्ती वाढतेर्हे कोणी शिकवलेलच नसते. स्वतःची सहनशक्ती वाढवण्यासाठी सहन करायलाही शिकावे लागते, वेळ जाऊ द्यावा लागतो. दुःख झेलावे लागते. आज आपल्याच दुःखाचे आपल्याला इतके ओझे वाटते की ते नकोच आपल्याला. Instant relief देणारे उपचार असतातच. दुसन्याच्या वेदना, दुःख मात्र कोरडेपणाने, सहजतेने,कोडगेपणाने घेतली जातात.
अनवाणी पायांनी चालवत नाही. सूर्याचे ऊन सहन होत नाही. दुसर्याेला अन्न मिळाले नाही तर मात्र माझ्या पोटात जराही तुटत नाही, कारण माझे भरलेले असते. असा माणूस आज कुठे जाणार आहे?
उघड्या डोळ्यांनी आणि संवेदनशील मनांनी वावरणारी माणसे भेटणेही एक दुर्मिळ
योग! अशा संवेदनशिथिल समाजात आपले संवेदनशील असणे आणि टिकून राहणे हीही एक कठीण गोष्ट आहे. त्यात काय झाले?फारच विचार करतेस हं तु, असंच चालायचं’ असे म्हणणार्यांशची संख्या अतीच आसपास वावरत असते.
प्रवाहाविरुद्ध न पोहण्यात आराम असतो, शांतता असते, कष्ट करावे लागत नाहीत, वाहत जाता येते-मग कशाला प्रवाहाविरुद्ध जावे?मी म्हणते जेव्हा प्रवाहच निसर्गाच्या विरुद्ध दिशेने जातो आहे, मनुष्याची हानी करणारा आहे, तेव्हा प्रवाहाविरुद्ध जाणेच निसर्गाच्या जवळ जाणे नव्हे काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.