आमच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट

काही दिवसापूर्वी आमच्या मुलीचेलग्नझाले. विवाहसमारंभअगदी सुटसुटीत घरगुती पद्धतीने केला. परंतु आप्तेष्टांना मुलामुलीची माहिती, लग्नाची खबर देऊन त्यांच्या शुभेच्छांची, आशीर्वादाची आवर्जून मागणी केली. हे विवाहसूचनेचे पत्र आमच्या एका स्नेहातल्या बाईंना इतके आवडले की त्यांनी त्याचा गोषवारा एका सांजदैनिकात प्रसिद्ध केला. परिणामी पाच-सहा फोन व चार-पाच पत्रे आली, काहींनी छापील पत्राची प्रतही मागितली. माझ्या एका मित्राने ही पत्रिकाच पुढे करून आपल्या मुलाचा विवाहही साधासुटसुटीत व्हावा यासाठी प्रयत्न केला! या सर्वांवरून लक्षात आले की आपल्या समाजात साधा सुटसुटीत विवाह हीसुद्धा समाजसुधारणा गणली जाते! विवाह ठरवितानाही आम्ही काही एक निश्चित विचारधारा डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला. ते अनुभवही कदाचित इतरांना उपयोगी पडतील म्हणून येथे देत आहे. शेवटी लग्न ही खाजगी बाब असली तरी विवाहसंस्थेला सामाजिक व कौटुंबिक महत्त्वाचे संदर्भ आहेतच.
हल्ली मुलींची लग्ने पूर्वीच्या मानाने उशीरा होतात. त्यातून मुलीने जर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडला, एखादे वर्ष नोकरीव्यवसाय करायचे ठरविले तर सव्वीस सत्तावीस वयही उजाडते. माझ्या मते शारीरिक क्षमता व विकास आणि आपल्या मुलाबाळांची शिक्षणे योग्यवेळी संपून त्या जबाबदा-यांतून सक्षम असताच मोकळे होण्यासाठी मुलींचे विवाह २२-२३ व्या वर्षी व मुलांचे २६-२७व्या वर्षी करणे योग्य होईल. परंतु लग्न केल्यानंतरही एकाने नोकरीव्यवसाय करून दुसन्याने आलटून पालटून शिक्षण घ्यावे अशी सामाजिक-मानसिक परिस्थिती आज नसल्यामुळे मुले, मुली काय जे शिकायचे ते पूर्ण करूनच लग्न करणे पसंत करतात. शिक्षण ही आयुष्यभरची प्रक्रिया असूनही लग्नापर्यंतचे शिक्षण व अभ्यास असा अनिष्ट प्रकार घडतो. या सर्व हो-नाच्या गडबडीत आमच्या मुलीचे निरनिराळे अभ्यासक्रम संपायला वयाची २६ वर्षे उलटली. शेवटी तुला विवाह करायचाच असेल तर आता लवकर कर, प्रौढ वयात केलेले विवाह, अपत्यहीन विवाह सुखकारक होत नाहीत असे मुलीला समजाविले. इतकेच नव्हे तर विवाह न करता राहायचे असेल तर आमच्याच घरोब्याच्या, पण लग्न न केलेल्या ३५ ते ७० वयाच्या दोघी-तिघींकडे आठ-दहा दिवस राहून ते आयुष्य जवळून पाहून घे, त्यांच्याशी विचार विनिमय कर असाही सल्ला दिला. (एक गोष्ट इथे नमूद केली पाहिजे की आमचे आमच्या मुला-मुलींशी मोकळेपणाचे संबंध अगदी लहानपणापासून आहेत व त्यांच्या आयुष्याचे निर्णय अंतिमतः ते घेतात.) शेवटी एकदाचा मुलीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. यात सहासात महिने गेले.
सुशिक्षित आणि वय वाढलेल्या मुलीचे लग्न ठरवायचे, अनुरूप जोडीदार निवडायचा तो अर्थातच तिच्या पसंतीनेच. पारंपारिक मुलीला “दाखविण्याची पद्धत आम्हा कुणालाच मान्य नव्हती. हल्लीच्या मुलांनाही त्यात फार अवघडल्यासारखे होते, मोकळेपणा वाटत नाही. प्रेमविवाहच व्हायचा असता तर एव्हाना तो व्हायला हवा होता. पण बहुधा मुलीला अशा प्रेमाचेइंद्रियच नसावे. तेव्हा आता निवड कशी करायची?
लहानपणापासून आम्ही आमच्या मुलांना त्यांचे मित्रमंडळ निवडण्याचे स्वातंत्र्य दिले, इतकेच नव्हे तर प्रोत्साहनही दिले. मुलीचे मित्रमैत्रिणी नेहमीच आमच्याकडे एकटे दुकटे अथवा गटागटाने येत. आमच्याशी थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मग स्वतंत्रपणे गप्पाटप्पा करत फिरायला जात. आज आम्हाला ५-६ तरी पुतणे, पुतण्या, भाच्या यातून मिळाले आहेत. अनुभव असा की मुलगे जरा संकोची असतात. मुली मात्र लागट आणि मनमोकळ्या. आम्हाला हा आनंदाचा ठेवाच मिळाला आहे. जाता जाता इथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. आमची मुले ज्या महाराष्ट्रातील अतिप्रख्यात सहशिक्षण देणान्या शाळेत जात त्या शाळेत मुलामुलींना एकमेकांशी बोलायलाही परवानगी नाही. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मुलामुलींचे जिने कटाक्षाने वेगवेगळे ठेवलेले व मुलगी मुलांशी बोलत असेल तर लगेच घरी पालकांना चिट्ठी पाठविली जाई. आमच्या मुलीसाठीही अशी चिट्ठी एकदा घरी आली होती. मुख्याध्यापकांना भेटून आभार मानून आमचे विचार स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यावेळी पदभ्रमणआणि गिर्यारोहणाच्या एका कार्यक्रमासाठी बर्या चवेळा शाळेत एकत्र भेटण्याची गरज पडे. या शाळेत गिर्यारोहण, पदभ्रमण, निसर्गमंडळे, एन.सी.सी., वीरबाला हे सर्व हळू हळू बंद करण्यात आले. फक्त १० वीला बोर्डात नंबर आणणे हेच ध्येय. शाळेचे विद्यार्थी बोर्डात चमकत, पण शाळेचा १० वीच्या परीक्षेचा निकाल १००% पास असा कधी आला नाही.
एकदा शाळा-कॉलेज संपले की नोकरीव्यवसायाची जागा सोडून तरुण तरुणींना एकत्र येण्याची संधी आपल्या समाजात जवळ जवळ नाही. त्यामुळे रूढ मार्गातून – विवाह मंडळे, जाहिरात व ओळखीच्यात सांगून ठेवणे,—जोडीदाराची निवड करणे भाग होते. आम्ही हे तीनही मार्गअनुसरले. मात्र आमच्या दोनअटी होत्या. पत्रिका पाहायची नाही, दाखवायची नाही आणि मुलीला परदेशीकायम वास्तव्य करणारा मुलगा नको होता. जात पात, धर्म, भाषा, प्रांत याला महत्त्व नव्हते. पण साधारण सांस्कृतिक व आर्थिक स्तर आणि जीवनशैली (जीवनमान नव्हे) समान असावी असे ठरले. प्रेमविवाहात याही मर्यादा राहात नाहीत. हुंडा देणे घेणे हेही आपोआपच बंद झाले.
पत्रिका पाहायची नाही म्हटल्यावर ९५ टक्के स्थळे गळाली! राहिलेल्यातली ९५ टक्के परदेशी वास्तव्य करणारा नको म्हणून गळाली. म्हणजे जवळ जवळ काहीच उरत नाही असे झाले. आम्ही साधारण मासिक रु. १०,०००-१२,००० उत्पन्न-गटातले. स्वतःची राहती उत्तम जागा असलेले, साहित्य, संगीत, कला यांत रस असलेले, सामाजिक बांधिलकी मानून यथाशक्ति झीज सोसून समाजकार्य करणारे अशा गटातले आहोत. त्या समाजाची ही परिस्थिती आहे. पत्रिकेवर तडजोड अशक्य होती. मी पाच सहा वर्षे परदेशात राहून उच्च शिक्षण घेऊन परत आलेला, याचेतर नकळत मुलांवर संस्कार झाले नसतील?मुलीला सांगितले की जी उ. अमेरिका तू पाहिलीचनाहीस ती केवळ ऐकीव माहितीवर स्वीकारणे अथवा नाकारणे दोन्ही बरोबर नाही. माणसाने मोकळ्या मनाचे असायला हवे. देशांतरे ही आर्यकाळापासून चालत आलेली आहेत आणि त्यावेळी मागेराहिलेल्या वृद्धांचे, अपंगांचे, काही प्रमाणात हालच झाले असणार. तेव्हा तिने आमचा विचार करू नये (एक या दोच्या जमान्यात आईबाप possessive होऊ शकतात, मुलेही भावनेच्या आहारी जाऊ शकतात) व इथे नाखुषीने मुलीने थोड़ी तडजोड करायचे मान्य केले. दाखविण्याचे रद्द केल्यामुळे प्रथम आम्ही तिघे योग्य वाटेल असा मुलगा ठरवत असू व फोनवरून वेळ ठरवून मुलगामुलगी भेटत. एक दोनदा घरीही पहिली भेट झाली. त्यानंतर चार-सहा वेळा एकमेकांना भेटून बोलून निर्णय मुलीवर सोपविला. आम्ही मार्गदर्शन करीत असू. मुलगीही मोकळेपणी भेटीनंतर आपले विचार सांगत असे. एका अर्थाने हे आधुनिक स्वयंवरच म्हणायचे, मुलीने माळ घातली नाही तर पुढचा राजकुमार!
या सर्वांत वेळ फार जाई. एकाचवेळी २-३ मुलगे बघणे हे मुलीच्या स्वभावात बसणारे नव्हते. तिचे वय २६-२७ असल्यामुळेही योग्य मुलांची संख्या रोडावली. तरी बरे, मुलगी दहाजणींत उठून दिसणारी, जवळ जवळगोरी व पाचफूट साडेचार इंच उंच, सडपातळ अशी. काळी, बुटकी आणि थोडी सुदृढ बांध्याची असती तर बाकी सर्व गुण, शिक्षण तेच असूनही त्रास वाढला असता. मुलीला आम्ही सतत एक गोष्ट सांगत होतो की चारपाच भेटींत विचार कळतील, घरच्या काही गोष्टी अधिक कळतील, पण स्वभाव मात्र कळणार नाही. तोच खरा महत्त्वाचा. तेव्हा उगीचच आणिक एकदा, आणिक एकदा अशा भेटी वाढविण्यात फार अर्थ नाही. अर्थात मुलगा पसंत करण्याची घाई किंवा त्यासाठी अवास्तव दबाव आम्ही मुलीवर आणला नाही. प्राप्त परिस्थितीत तिला आम्ही वास्तवाची जाणीव देत होतो इतकेच. अशावेळी दोघांनाही काही मानसिक ताणतणाव सहन करावेच लागले. पण जी गोष्ट विचारपूर्वक ठरविली तिच्यासाठी काही गोष्टी सहन करण्याची तयारी असायलाच हवी. आम्ही निवृत्त जीवन एका लहानशा गावात जगत असतो आणि मुलगामुलगी शहरात. त्यामुळे सख्खेशेजारी, काही नातेवाईक, यांचे कटाक्ष त्यांना सहन करावे लागले, अर्थात फार नाही.
हे सर्व आमचे विचार झाले. मुलगा आणि त्याच्याकडच्यांचेही साधारण असेच विचार असल्यासच हे सगळे शक्य होते. तसे ते झाले आणि मुलामुलींनी आपली पसंती कळविली. आता मुलाच्या आई-वडिलांचा विचार घेणे आवश्यक होते. त्यांना याची थोडीफार कल्पना होतीच. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन आलो. भेट छान झाली, पण “काय ते मुलगाच ठरवेल’ असे ते म्हणाले.“मी बघतोय की याचं खरंच विचारपूर्वक ठरलंय की नुसताच पागलपणा, infatuationआहे. त्याच्याशी नीट बोलतो. आम्ही थोडे अस्वस्थ. पण पुढचा अनुभव असा की त्यांनीही मुलाला खरोखरीच पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते. दरम्यान मुलगा एकदा आम्हालाही भेटून गेला.आणि लग्न निश्चित झाले. साखरपुडा वगैरे आम्ही काहीही केले नाही.
यानंतरची पायरी लग्न कोणत्या पद्धतीने करायचे? आम्ही निधर्मी व जवळ जवळ नास्तिक.तेव्हा लग्न नोंदणी पद्धतीने व्हावे असे आम्हाला वाटत होते. तथापि H.U.E. (Hindu Undivided Family, हिंदु एकत्र कुटुंबपद्धती)चा लाभ घ्यायचा तर लग्न नोंदणी पद्धतीने होऊन चालणार नव्हते. हिंदुपद्धतीप्रमाणेच म्हणजे कन्यादान, सप्तपदी वगैरे सर्व करणे आले. ही तडजोडच होती. H.U.F. मुळे प्राप्तीकरासाठी आणिक एकत्र स्वतंत्र entity तयार होते. व्यावसायिक लोक, व्यापारी वगैरे याचा फायदा घेतात. नोंदणीपद्धतीला एक महिन्याची जाहीर सूचना द्यावी लागते. त्यामुळे बरेच परदेशी वास्तव्य करणारे इथे येऊन झटपट लग्न करू इच्छिणारे वैदिक पद्धतीच्या विवाहविधीचा आश्रय घेतात. आम्हीही HUF च्या कारणासाठी वैदिक, सुटसुटीत पद्धतीनेच विवाह केला. निधर्मी राज्याचे कायदेच लोकांना धार्मिक व्हायला भाग पाडत आहेत. असा हा विरोधाभासआहे.
लग्न साधेपणाने करावे हा आमचा विचार. त्यात मुलगा स्वतःच्या लग्नाचा खर्च स्वतः करणार असा बाणेदार. त्यामुळे थाटमाट, डालडौल इ. ना फाटा देणे सहजच शक्य झाले. आम्ही एक कमीत कमी निमंत्रितांचा आकडा ठरविला. मग आमचे फक्त सख्खे भाऊ, बहिणी व त्यांची मुलेमुली, नेहमी हाकेला धावून येणारी ३-४ कुटुंबे (जी आता सख्खीच झाली आहेत) व मुलामुलींचे आम्हाला ओळखणारेच असे काही मित्र मैत्रिणी. मुलाकडच्यांनीही साधारण तसेच केले. मुलीला काही मित्रमैत्रिणींना गाळताना त्रास झाला, अवघडल्यासारखे झाले; पण मार्गदर्शक तत्त्वे पक्की व विचारपूर्वक ठरली असल्यामुळे सर्वांनीच हे स्वीकारले. जे आमच्या मुलीला ओळखत, तिच्या प्रगतीची अधूनमधून चौकशी करत, अशांनाच विवाह ठरविल्याचे कळले. त्याबरोबर विवाहाची तारीख, मुलामुलींची थोडक्यात महत्त्वाची माहितीही कळविली व आशीर्वाद/शुभेच्छा पाठविण्यास विनंती केली. दोनचार अपवाद वगळता सत्तर टक्के लोकांनी मनमोकळेपणाने शुभेच्छा पाठविल्या. त्या फोटोअल्बमबरोबर आठवण म्हणून मुलीला देऊन टाकल्या. विवाहाचा खर्च निम्मेनिम्मा वाटून घेतला.
इथे हॉलचा अनुभव लिहिण्यासारखाआहे. मुंबईसारख्या ठिकाणी १५०-२०० लोकांसाठी सोयिस्कर लग्नसमारंभासाठी हॉल नाहीत जे आहेत ते कंपनी-कॉन्फरन्स वगैरेसाठींचे. तिथे कमीत कमी दोनशे हा आकडा व दरडोई अमुक इतके रुपये असा भाव असतो. त्यातच भाडे वगैरे सर्व आले, नेहमीचे हॉल खूप मोठे, भाडी जास्त, पण पात्री अमुक इतके रुपये असे मिळतात. म्हणजे थाळी जेवण मागवा किंवा फार भूक नाही म्हणून नेमके दोनतीन पदार्थ (a la cartc) मागवा, खर्च साधारण तोच असा हा प्रकार होतो. इथे खर्चात बचत करणे शक्य असूनही यामुळे निदान शहरात तरी त्यावर मर्यादा पडतात, मांडव घालणे तर महागच होते.
आपण इतरांच्या लग्न, मुंजी कार्यांना जातोमगआपल्याकडे त्यांना बोलवायला नको का, असे एका सुधारक विचारांच्या बाईंनीच विचारले. असा विचार केला तर कोणताच बदल अशक्य होईल. माणसांत उत्सवप्रियता असते, तिची जरूरही आहे. प्रश्न खेळीमेळीच्या वातावरणाचा, मौजमजेचा नसून पैशाच्या उधळपट्टीचा, प्रथांमुळेनझेपणारा खर्च करावा लागण्याचा आहे. मागे एकदा मुंबईला एका हिन्याच्या व्यापार्या,ने मुंबईत ब्रेबोर्न स्टेडियमवर जयपूरचा राजवाडा उभारून दणदणीत लग्नसमारंभ केला. त्याचे म्हणणे असे की “मी तर माझ्या वार्षिक उत्पन्नाच्या फक्त दोन टक्केच खर्च केला. बहुतांश लोक वर्ष दोन वर्षाची मिळकत खर्ची घालतात, काही तर कर्जबाजारी होतात, तेव्हा उधळपट्टी खरे तर कोण करते?’ प्रश्नसाळसूदपणाचा असला तरी देखील विचार करायला लावणारा आहेच. समाजात स्वाभिमानाने जगणान्यांपेक्षा वरच्यांकडे बघून अंधानुकरण करण्याची, काहीशी लाचारीची, काहीशी प्रवाह-पतिताची वृत्ती असते. स्वतंत्र विचार करून जगणारे थोडे.
त्या दृष्टीने हा अल्पसा प्रयत्न आहे. ज्यांच्या मनात असे विचार येऊ लागत असतील त्यांना अगदीच एकाकी वाटू नये म्हणून त्याची जाहीर वाच्यता. काहीजण १०० च्यावर जिथे निमंत्रित असतील त्या लग्नाला जात नाहीत. काही आंतरजातीय विवाह नसेल तर जात नाहीत. इतकी कडक भूमिका आम्हाला जमेलसे वाटत नाही.
वर सतत “आम्ही’ असा उल्लेख आहे कारण मी व पत्नी यांनी दरवेळी विचारविनिमय करूनच प्रत्येक गोष्ट केली. मतभेद झाले, पण मार्ग काढला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.