झोपडपट्टी संस्कृती : उत्तर प्रदेशची व तामिळनाडूची

दिल्लीमध्ये पावणेदोन लक्ष वस्तीची एक वसाहत स्थापलेली होती. त्यात भारतामधील सर्व राज्यांतील पोटापाण्यासाठी तेथे गेलेले लोक राहत होते. हे लोक मोलमजुरी करणारे, किंवा निश्चित स्वरूपाचे मासिक उत्पन्न असलेले असे नव्हते. त्यांचा एक सर्वसमावेशी गुण म्हणजे गरिबी. त्यातल्या प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून ५ यार्ड x ५ यार्ड असा जमिनीचा तुकडा मिळालेला होता. त्यावर घर बांधण्यासाठी दोन हजार रुपये कर्ज मिळालेले होते. ज्याचे त्याने आपल्या कुवतीने घर उभे करावयाचे होते. ह्या वसाहतीला वैद्यकीय सुविधा देणारे सात दवाखाने होते. अर्थात त्यांच्या कामाच्या वेळा मजूर वर्गाला सोयीच्या नव्हत्या. त्यामुळे तेथे खाजगी वैद्यकी करणारे बरेच लोक, तेथील लोकांच्या सोयी पाहून उगवलेले होते. ते रोजी पाचदहा रुपयांत वैद्यकीय सुविधा म्हणजे बहुधा लोकांना इंजेक्शने देत. ह्या वसाहतीत बाळंतपणात मदतीसाठी दर ५०० कुटुंबामागे एक सुईण दिलेली होती. लोकांना पाण्याची किंवा संडासाची खाजगी व्यवस्था नव्हती. परंतु शासनाने ह्याबाबत काही कमीत कमी सार्वजनिक सुविधा दिलेल्या होत्या. बाजारहाटासाठी सोय व रुग्णालयाची व्यवस्थाही करून दिलेली होती. रुग्णालयात २८ खाटा होत्या. रस्ते होते. दिल्लीमध्ये मध्यवस्तीत जाण्यासाठी बससुविधाही उपलब्ध होत्या. केर टाकण्यासाठी जागोजाग केरपेट्याही उभ्या केलेल्या होत्या.
शिक्षणाच्या व्यवस्थेत दर हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी दिलेली होती. प्राथमिक शाळा उभारलेल्या होत्या. दुपारचे जेवण लहान मुलांना विनामूल्य देण्याची व्यवस्था होती. परंतु ह्या सुविधा पुरेशा प्रमाणात वापरल्या जात नव्हत्या. मोलमजुरीसाठी स्त्रिया बाहेर पडल्या की मुले आपापल्या पायांवर असत. हे विशेषतः तामिळी घरांतून होई.
अशी ही झोपडपट्टीवजा वस्ती म्हणजे सुरवातीस वैभवशील वस्ती वाटली. परंतु तिचा वापर त्यात राहणार्याट लोकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे – संस्कृतीप्रमाणे केला. ह्या वस्तीत राहणारे लोक आर्थिक दृष्ट्या एकाच दर्जाचे असले तरी ते ज्या ज्याराज्यातून पोटापाण्यासाठी आलेले होते,त्या राज्याचा सांस्कृतिक ठसा त्यांच्या हालचालींत होता. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, राहण्याची पद्धत, स्वच्छता, टापटीप, केर टाकण्याची पद्धत, शौचाला किंवा लघवीला बसण्याची जागा ह्यांत त्यांच्यात बराच फरक होता. त्यामुळे अशा वस्तीच्या निरीक्षकांना भारतातील राज्याराज्यांच्या संस्कृतीतील फरक जाणवे व त्याचा परिणाम ह्या दिल्लीत आलेल्या उपन्या लोकांच्या जीवनावर झालेला त्यांना पाहता येई. अशा वस्तीतील दोन राज्ये अलका बसू-माळवदे ह्या लेखिकेने निवडली. त्यात उत्तर भारतातील उत्तर प्रदेश व दक्षिण भारतातील तामिळनाडू ह्या राज्यांच्या संस्कृतीचा परिणाम ह्या लोकांच्या जीवनावर कसा झालेला दिसतो ते पाहणे लेखिकेला शक्य झाले. एकच आर्थिक परिस्थिती, त्याच सुविधा किंवा गैरसोयी, असे असूनही ह्या राज्यातील लोक वेगळे वागताना पाहून त्यांच्या पाठीशी असलेल्या सांस्कृतिक शिदोरीबद्दल बरीच माहिती मिळू शकली. अशा तर्हे्ने पाहता तामिळनाडू व उत्तर प्रदेश कसे दिसले ह्याचे वर्णन ह्या लेखात आहे.
जेव्हा पुरुष आपापली राज्ये सोडून दिल्लीसारख्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांच्या राज्यातील इतर लोकांपेक्षा ते नक्कीच वेगळे असतात. परंतु त्यांच्या स्त्रिया तशा असण्याचे कारण नसते. त्यामुळे त्या आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व जास्त चांगल्या तर्हेयने करतात. अशा कारणाकरिता त्या लेखात ह्या स्त्रियांची वागणूक बन्याच बाबतींत जवळून पाहिली आहे. त्या स्त्रियांच्या संस्कृतीचा परिणाम त्यांच्या कुटुंबांच्या राहणीवर, मुलामुलींच्या आरोग्यावर, जन्ममृत्यू मर्यादित करण्याच्या सामर्थ्यावर व अखेरी लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी कितपत होऊ शकेल हे लेखिकेला पाहावयाचे होते.
उत्तर प्रदेश व तामिळनाडू ह्यांची संस्कृती पाहिली गेली ती तीन तन्हांनी. एक म्हणजे ह्या स्त्रियांना घराशिवाय बाहेरच्या जगाचे वारे लागत होते का? दुसरे, ह्या स्त्रियांची बाहेरच्या जगाशी प्रतिक्रिया कशा तर्हे ची होती?तिसरे, आपले घर चालवीत असताना स्वतंत्रपणे विचार करून कुटुंबासाठी ह्या स्त्रिया काही करीत होत्या का?किंवा ह्याबाबतीत त्यांच्यात काही फरक दिसत होते का? हे पाहण्यासाठी दोनही राज्यातील कुटुंबांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायात्मक परिस्थितीची माहिती गोळा केली. बारा वर्षांच्या आतील मुलांचे दिनक्रम, शाळेत जाणे न जाणे, इतर उद्योग करणे, आरोग्य, आजारपणाने शाळेचे फुकट गेलेले दिवस, तसेच शौचाच्या व लघवीच्या सवयी, कचरा टाकण्याच्या पद्धती, ह्यांचे निरीक्षण केले व ह्यात आढळलेला फरक हा आर्थिक-शैक्षणिक परिस्थितीशी संबंधितन समजता, सांस्कृतिक फरकाशी जोडला. ह्या अभ्यासाचे हेच तर वैशिष्ट्य आहे.
उत्तर प्रदेशातील कुटुंबे दिल्लीत नेहमीच सबंध आलेली नव्हती. एक तर्हेनने ती मोडकी होती. त्यामुळे त्यांच्या पुरुषांचे प्रमाण स्त्रियांशी तुलना करता १०० स्त्रियांमागे १४० पुरुषअसे होते. तामिळनाडूतील कुटुंबे सबंध आलेली असल्याने स्त्रीपुरुषसमप्रमाणात होते म्हणजे १०० स्त्रियांमागे १०३ पुरुष होते. तामिळनाडूतील ४६ टक्के स्त्रिया बेकार होत्या. उत्तर प्रदेशातील ९५ टक्के स्त्रिया काम करीत नव्हत्या. तामिळनाडूतून आलेले स्त्रीपुरुषसाठी ओलांडली तरी दिल्लीतच राहत होते. तसेच त्यांच्यातील स्त्रिया विधवा झाल्या, टाकल्या गेल्या किंवा घटस्फोटित असल्या तरी त्या दिल्लीतच राहून पोट भरीत. अशा एकट्या राहणार्या, स्त्रिया ४१ टक्के होत्या. उलट उत्तर प्रदेशवसाहतीत त्या केवळ १४ टक्के होत्या. कारण नवरा जाताक्षणीच त्या सामान्यपणे गाशा गुंडाळून आपल्या राज्यामध्ये परत जात व कोणावर तरी अवलंबून राहात. तामिळनाडूतील स्त्रिया पुरुषांप्रमाणेच कुटुंबाची आर्थिक बाजू सावरायला मदत करीत. तामिळी कुटुंबात सरासरी महिना ८३२ रुपये मिळकत होती तर उत्तर प्रदेशींमध्ये ९२६ रुपये. तामिळींमध्ये गरिबी जास्त, कर्ज जास्त, विजेचा वापर कमीं, पाण्याच्या सोयी कमी, घरे जास्त कच्ची व ही परिस्थिती घरटी दोन कमाविते लोक असूनही. उत्तरी कुटुंबांत सरासरी १-३ माणसे मिळवती होती.
अशाच तर्हेोचेफरक या दक्षिणीवउत्तरी कुटुंबांतून होते.दक्षिणी स्त्रियांत शिक्षण जास्तम्हणजे २३ टक्क्यांना होते तर उत्तरीय स्त्रियांत ११ टक्क्यांना होते. उत्तर प्रदेशातल्या फक्त ६ टक्के स्त्रिया काम करीत होत्या, तर तामिळी ६५ टक्के काम करीत. दक्षिणीतल्या निम्म्याहून अधिक दुस-यांकडे घरकाम करीत पणउत्तरी स्त्रियांनी असले काम कधीच केले नसते. त्यांच्या नवव्यांचे४.४ वर्षे शिक्षण झालेले होते तर तामिळी नवन्यांचे ३.२ वर्षे, उत्तरी स्त्रियांचे लग्नाचे सरासरी वय९ वर्षे होते. तामिळी स्त्रियांचे लग्न सोळाव्या वर्षी झालेले होते. म्हणजे दोन समाज हरतर्हेचने भिन्न होते.
तामिळी स्त्रिया जेव्हा बाहेर घरकामाला जात तेव्हा त्यांचा संबंध सुसंस्कृत किंवा सुशिक्षित लोकांशी येई. त्यांच्यापैकी काही वडे किंवा दोसे करून विकीत तेव्हा आत्मविश्वासाने बाहेर जाऊन त्या अर्थार्जन करीत. मुलांना झोपडपट्टीतील शाळेत मात्र त्या कमी पाठवीत. कदाचित भाषेचा प्रश्न त्यांच्या आड येत असेल. मात्र त्यामुळे तामिळी स्त्रिया आपल्या मुलांना खाजगी शाळेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवीत.
लग्नपद्धतीतही दोनही समाज वेगळे होते. उत्तरी लोकांत एखाद्या खेड्यात मुलगी दिली की पुढच्या दोन पिढ्यांत त्या गावात परत मुलगी देता येत नसे. त्यामुळे लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाई तेव्हा तिला तेथे एकही ओळखीचा चेहरा दिसत नसे व ती अगदी एकाकी पडे. ह्या कारणाकरिता नव्या घरी रुळायला तिला वेळ लागे. ह्या उलट तामिळींमध्ये जवळपासच्या नात्यांतही विवाह होत. सहाजिकच सासरी गेल्यावरसुद्धा बरेच परिचयाचे चेहरे दिसत. सासरच्या माणसांशी आधीची ओळखही असे. त्याचा परिणाम सासरी गेल्यावरही स्त्रियांच्या बोलण्यावागण्यात दिसे व त्या आत्मविश्वासाने वावरत.
उत्तर प्रदेश राज्याच्या शिरगणतीतही (१९८१) केवळ५ टक्के स्त्रिया मुख्य व्यवसाय म्हणून काम करीत, तर तामिळनाडूत अशा २२ टक्के स्त्रिया आढळल्या. त्यामुळे दिल्लीतील उत्तरी स्त्रिया घराबाहेर काम करायला लाजत व बाहेरच्या जगाशी संबंध न येणारे व्यवसाय करीत. उदाहरणार्थ त्यांच्यात शिवणकाम करणार्याह बर्या च स्त्रिया आढळत. त्या स्त्रियांचे कपडे शिवीत. साहजिकच उत्तरी २२ टक्के घरातून शिवण्याचे मशीन होते. तामिळ्यात फक्त आठ टक्क्यांजवळ असे मशीन होते.
उत्तरी स्त्रीपुरुषांत किंवा मुलामुलींत हरतर्हे्ने भेद होई. तामिळी पुरुष स्त्रियांना घरकामातही मदत करीत, तशी मदत उत्तरी पुरुष कधी करीत नव्हते. तामिळी घरांतून मुलगे मुली दोघेही काम करीत. पण उत्तरी मुलगे मुलींपेक्षा बरेच कमी काम करीत. अशा एकूण स्त्रीपुरुषांतील फरकाने स्त्रियांना स्वतःलाच आपण कवडी किमतीच्या आहो तसे वाटून त्या आपल्या मुलींनाही कमी लेखत.त्यांची हेळसांडही करीत. मुलींचे मृत्यू त्यामुळे मुलग्यांच्या आठपट होते. तामिळ्यांत ते समप्रमाणात होते.
बाळंतपणातील बर्याुचशा सवयीही दोन समाजांत वेगळ्या होत्या. मूल जन्मताच त्याला तासाभरात अंगावर पाजावे असा डॉक्टरी सल्ला असताही उत्तरी स्त्रिया मुलांना तीन तीन दिवसही अंगावर घेत नसत. तामिळी स्त्रिया असा सल्ला ताबडतोब अमलात आणीत. ह्या फरकाने उत्तरी मुलांचे जन्मल्याबरोबर बरेच हाल होत. त्यांना दिले जाणारे पाणीही तामिळी स्त्रिया उकळवून देत तसे उत्तरी स्त्रिया देत नसत. अशाने उत्तरी लोकांत रोगाला निमंत्रण मिळे. एकूण तामिळी लोकांत १०० मृत्यूझाले तर उत्तरी लोकांत १११ होत व ह्यापेक्षाही खरोखर ते जास्त असावे, कारण मुलींचे बरेचसे मृत्यू लपविले जात.
स्वच्छतेच्या कल्पना दोन्ही समाजांत वेगळ्या होत्या. कचरा टाकण्यासाठी पेट्या ठेवल्या असूनही ८० टक्के तामिळी त्यांचा उपयोग करीत, तर ६६ टक्के उत्तरी ते करीत. दहाबारा वर्षांच्या मुलीसुद्धा घराबाहेरच्या जागेत लघवीला किंवा शौच्याला बसत. उदाहरणार्थ उत्तरी मुली ५१ टक्के लघवीला व २५ टक्के शौच्याला घराबाहेरच बसत. तामिळ्यात हे प्रमाण अनुक्रमे ३६ व १५ होते. अशा सवयींना उत्तरी परिसर दक्षिणी परिसरापेक्षा घाणेरडा राही व रोगांना साथ मिळे.
एकंदरीत पाहता ह्या दोन राज्यांतील दिल्लीत राहणार्याळ लोकांत सामाजिक किंवा आर्थिक फरक विशेष नव्हता. जो होता तो सांस्कृतिक होता. त्यात त्यांच्या राज्यांचा पूर्ण ठसा होता. त्याचा परिणाम ह्या स्त्रियांच्या कुटुंबरचनेवरही दिसून आला. उत्तरी स्त्रियांना मुलगे जास्त हवे होते. ते मिळवायसाठी मुले बरीच व्हावी लागत. कारण होणार्या. मुलीही पत्करावयास लागत. लोकसंख्याशास्त्राचा नियमच असा आहे की ज्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद करून मुलांना वागविले जाते त्यात मुले जास्त होतात किंवा हवी असतात. उत्तरी स्त्रियांना सरासरी २.१६ मुलगे हवे होते. तामिळीमध्ये १.६९ मुलगे पुरेसे होते. थोडक्यात उत्तरींना तामिळीपेक्षा मुलगे जास्त हवे होते. क्षणभर आपण जर कल्पना केली की उत्तरींना २ मुलगे हवे होते व दक्षिणींना १ मुलगा तरी हवा होता तर ह्या दोन्ही समाजांत शस्त्रक्रिया करून किंवा एरवी कोणत्यातरी मागनि मूले होणे थांबवायचे झाल्यास ते केव्हा थांबले असते व किती प्रमाणात ह्याचा हिशेब लोकसंख्या शास्त्राने करता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ १ मूल झाल्यावर मुले थांबविणे उत्तरींना शक्यच झाले नसते. दक्षिण्यांनी मात्र ५१ टक्के ह्या प्रमाणात मुले होणे बंद केले असते. दोन मुले झाल्यावर २८ टक्के उत्तरींनी व ८० टक्के तामिळींनी आणखी मुलांची आशा धरली नसती. तसेच तीन मुलानंतर ५८ टक्के उत्तरींनी व९१ टक्के दक्षिणींनी मुले होणे बंद केले असते. ह्याचा अर्थ, जेव्हा एखाद्या समाजाला मुलगेच हवे असतात तेव्हा लोक संततिनियमन करण्यास तेवढे तयार नसतात. म्हणजेच उत्तरी राज्याची संस्कृती अशी आहे की मर्यादित मुले होणे त्यांच्या हिशेबात बसत नाही. तामिळींची गोष्ट वेगळी आहे. म्हणूनच आज भारतात तामिळनाडूत लोकसंख्यावाढीचा प्रश्न जवळजवळ सुटलेलाआहे व उत्तरप्रदेशात तो सुटणे अतिशय कठीण असल्याचे दिसते आहे. उत्तरप्रदेशात जन्ममृत्यूवर व विशेषतः जन्मावर मर्यादा पडणे त्यांच्या संस्कृतीमुळे कठीण जाते आहे. ही संस्कृती बदलणे सोपे काम नाही. त्यांच्या कलाने गेली ४५ वर्षे घेऊन आज त्याचाभार न सोसण्याएवढा झालेला आहे. त्याचे राजकीय परिणामही वेडेवाकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.