‘सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी’

उडत्या तबकड्यांमधून परग्रहांवरले जीव पृथ्वीवर येतात. इथल्या जीवजातींचे नमुने गोळा करून अभ्यासासाठी न्यायच्या हेतूने ही मोहीम असते. कुत्रे, झाडे वगैरेंना पकडून नेण्यात येते, तसेच माणसांनाही. पण त्या ‘परक्यांना इथल्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नसते, म्हणून सर्व ‘नमुन्यांच्या तपासण्या झाल्यावर त्यांना परत स्वगृही पोचवले जाते. मांजरे, गुलाबाची रोपे वगैरेंना या प्रकारांचे स्मरण राहत नाही, व ते जीव आपल्या भाईबंदांना सावध करू शकत नाहीत. माणसांना मात्र स्मरण राहते व ती इतर माणसांना सजग करण्यासाठी अशा अनुभवांची वर्णन करतात. कधीकधी या घटनांचे स्मरण सहजपणे मनाच्या पृष्ठभागावर येत नाही. मग संमोहनविद्या वापरून या आठवणी बाहेर काढाव्या लागतात.
पश्चिमी देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेत, काही वृत्तपत्रे वरील परिच्छेदांत सांगितलेली ‘मते’ वेदवाक्ये मानतात. सतत अशा पकडून सोडून दिलेल्या माणसांच्या कहाण्या छापणे, हा त्या वृत्तपत्रांचा स्थायिभाव असतो. पण आजवर वैज्ञानिकांना अशा एकाही घटनेबाबत विश्वासार्ह पुरावा मिळालेला नाही, किंवा उडत्या तबकड्याही सापडलेल्या नाहीत. या उलट ‘सेटी’ (SETI-Search for Extra-Terestial Intelligence) या वैज्ञानिक प्रकल्पाला आजवर कोणत्याही परग्रहावरील जीवांशी संपर्क साधता आलेला नाही.
पकडून सोडून दिलेल्या अनेक माणसांच्या कहाण्यांमध्ये काही गोष्टी वारंवार आढळतात. परके जीव माणसांना तपासतात, तेव्हा लैंगिक अवयवांची तपासणी सर्वात कसून केली जाते. कधीकधी ‘प्रयोग’ म्हणून परके जीव माणसांशी संभोगही करतात. अधूनमधून अशा संभोगातून घडलेली प्रजाही पाहिल्याची वर्णने येतात. नमुन्यांना ‘घरी जाण्याआधी एक व्याख्यानही दिले जाते. त्यात विश्वबंधुत्वाची भावना ठेवा, पर्यावरणाचा व्हास रोखा, ‘ए’चा प्रसार होईल असे वागू नका वगैरे सूचना दिल्या जातात. स्थळकाळ आणि संबंधित माणसांनुरूप या व्याख्यानात जुजबी बदलही होतात.
विमानोड्डाण ‘कला’ प्रस्थापित होण्याआधी, युरोपात मध्ययुगीन काळात जरा वेगळे दैवी चमत्कार घडत असत. निर्जन भागात प्रवास करणान्यांना एखादा मृत संत किंवा कुमारी मेरी भेटत. ती भेट विस्मयकारक अशा घटनांनी खचाखच भरलेली असते. इथेही शेवटी एक सूचनांची यादी दिली जाई. चांगले वागा’ हा या सूचनांचा गाभा असे. सोबत चर्चची वर्गणी नियमितपणे द्या, भेट झाली तिथे संताचे किंवा मेरीचे मंदिर उभारा, वगैरे सूचनाही असत. पण त्या काळी उडत्या तबकड्या भेटत नसत. आज मात्र शहरांशी संपर्क न येणार्या, अतिदुर्गम भागांमध्ये अधूनमधून मेरी किंवा संत भेटतात.
आता उडत्या तबकड्या, परग्रहांवरचे जीवन, मेलेल्या व्यक्तींनी पुन्हा जिवंत होणे, ‘पुनर्जन्म’ नव्हे, तर तसेच्या तसे जिवंत होणे, वगैरे बाबी कोणाच्याही आढळात आजवर आलेल्या नाहित, तर अनेक माणसे अशा बाबी पुन्हा पुन्हा सांगतात कशी?
आधी आपण संमोहनाने ‘जागवलेल्या आठवणींबद्दल उपलब्ध माहिती पाहू. एका व्यक्तीने दुसरीला संमोहित करण्यात नेहमीच एक उच्च पातळीवरची सूचनावशता (suggestability) कार्यरत असते. संमोहित होणारी व्यक्ती संमोहित करणार्यात व्यक्तीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुचवलेल्या गोष्टी उत्साहाने सांगू लागते. अमेरिकन मेडिकल असोसिएशन सांगते की संमोहनाने जागवलेल्या आठवणी साध्या आठवणींपेक्षा कमी भरवंशाच्या समजाव्या. अमेरिकन न्यायालये संमोहनावस्थेत जागलेल्या आठवणींना कायदेशीर पुराव्यात धरत नाहीत. संमोहकाचे पूर्वग्रह व विश्वास संमोहित व्यक्तीकडे फारच सहजपणे जाऊ शकतात, आणि त्यातून ‘ठाम आठवणी’, ‘स्पष्ट आठवणी वगैरेंमध्ये संमोहकाचे पूर्वग्रह घुसू शकतात. अशा ‘घुसखोर’ आठवणी सहजशक्य नसल्याने त्यांना ‘सांभाळून’, शंकास्पद समजून वागावे, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. याबाबत लौंग बीच येथीलकॅलिफोर्निया राज्य विद्यापीठाच्या अॅल्विन लॉसनने एक प्रयोग केला.
आठ व्यक्तींना संमोहित केले, व त्यांना सुचवले की परग्रहांच्या रहिवाशांनी त्यांना पकडूननेले होते, व आता सोडून दिले. त्यांना या अनुभवाचे वर्णन करायला सांगितले असता त्यांनी अत्यंत तपशिलाने ‘वृत्तपत्री’ आठवणी सांगितल्या ! आज अमेरिकेतल्या साक्षर माणसाने कुठेतरी, कधीतरी एखादी ‘पकड-सोड’ कथा ऐकली-वाचली नसेल हे अशक्य आहे. भारतात दूरदर्शनवरही पूर्वी उडत्या तबकड्यांबद्दल ‘द यूफो स्टोरी’ नावाची मालिका दाखवली गेली आहे. इथे एक महत्त्वाची बाब ही, की या आठही व्यक्तींनी याआधी कधीच आपल्याला परग्रहवासी यांनी पकडले वगैरे काहीही सांगितले नव्हते. संमोहनकाराने सुचवल्यानंतरच या साच्या प्रकारच्या आठवणी उत्पन्न झाल्या.
पण माणसे संमोहनावस्थेतच सूचनाक्षम किंवा सूचनावश असतात असे नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील एलिझबेथ लॉफ्टसने एक प्रयोग केला. एका अपघाताचा चित्रपट काही व्यक्तींना दाखवला. नंतर प्रयोग करणान्याने संभाषणातून ‘सहज’ काही चुकीची माहिती दिली, जसे अपघातस्थळाजवळ ‘थांबा’ अशी पाटी असल्याचा ओझरता उल्लेख, चित्रपट पाहणा-यांना नंतर प्रश्न विचारले असता सगळ्यांना ही पाटी आठवू लागली. चित्रपट दाखवल्यानंतर जितक्या जास्त वेळाने ही चुकीची माहिती दिली, तितके त्या चुकीचे स्मरण ‘घट्ट होत गेले. पुन्हा पाटी नसलेला चित्रपट दाखवेपर्यंत कुणाला चूक उमगलीच नाही, उलट ‘‘नाही कशी?होतीच पाटी!” असा सूर लागला.
लॉफ्टस व कॉर्नेल विद्यापीठातील स्टीफन सेसी यांनी ‘खोट्या आठवणी रुजवणे या क्रियेची बरीच अंगे तपासली आहेत. शाळेत जायच्या वयाच्या आधीची मुले याबाबतीत फार सहजपणे ‘फसवली जाऊ शकतात, हे एक अंग. (एकदा माझी मुले व ‘भाचरे’ त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत होते. तो सारा काळ जवळून पाहिलेल्या मला व माझ्या पत्नीला अनेक थेट चुकीच्या ‘आठवणी’ पाहून आश्चर्य वाटले होते.)
पण याबाबतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन यांची कहाणी सर्वांत मजेदार आहे. दुसर्याह महायुद्धाचा सर्व काळ रेगन हॉलिवुडलाच होते. पण त्यांनी नाझी काँसेन्ट्रेशन कॅपांमधून लोकांची सुटका केल्याचे आठवते. कार्ल सेगन सांगतो की प्रचारमोहिमेत अनेकदा रेगन ही शौर्य आणि त्यागाची गोष्ट सांगायचे. सेगनलाही ती आठवते, कारण तोही वयाच्या नवव्या वर्षी ‘अ विंग अँड प्रेअर’ हा चिपत्रट पाहून खूपच ‘प्रभावित झाला होता !
न्यायालयीन खटल्याआधी वकील जे वारंवार साक्षीदाराला साक्षीची रंगीत तालीम करायला लावतात, त्यातही सूचनावशतेचा भाग बराच असतो. खन्या-खोट्या आठवणींचे कंगोरे घासले जाऊन त्यांचा चपखल मेळ जुळणे या तालमीतून घडत असते.
याबाबतीत एक ‘भीषण’ कहाणी वाचल्याचे आठवते. एका मुलीच्या लहानपणी तिच्या एका मैत्रिणीवर बलात्कार करून पुढे तिचा खून केला गेला. मुलीचे वडलांशी संबंध चांगले नव्हते. दहाबारा वर्षे वयात मैत्रिणीचा खून झाला, व पुढे ‘मुलगी’ तिशीत असताना तिने ‘आठवून सांगितले की मैत्रिणीचा खून आपल्या बापानेच केला ! उपलब्ध पुराव्याशी सुसंगत अशी एक पूर्ण कहाणी वीसेक वर्षानंतर ‘आठवली. ती कोर्टात सिद्ध झाली नाही, पण बाप मात्र माणसांतून उठला.
‘नटसम्राट’ नाटकाचा नायक म्हातारपणी सहजगत्या कधी स्वतःच्या आयुष्यातल्या, तर कधी रंगभूमीवरच्या पात्रांच्या भूमिकेत वावरतो,तेही अशा आयुष्यभरातल्या सूचनांचे फलित नव्हे काय?
* * * * *
कार्ल सेगनच्या ‘द डीमन-हाँटेड वर्ल्ड’ या पुस्तकात (उपशीर्षक: सायन्स अॅज अ कँडल इन द डार्क) वरील बराचसा मजकूर आहे. संमोहकाने किंवा इतर मागनि माणसांच्या आठवणी, धारणा, विश्वास, श्रद्धा, पूर्वग्रह वगैरेंना ‘दूषित’ करणे किती सोपे आहे, हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत राहते.
आणि या पार्श्वभूमीवर ‘गुरूने शिष्याची अनुभूती घेण्यासाठी तयारी करून घेणे’ ही। संकल्पना नजरेसमोर आली. अशी तयारी करून घेणारा गुरू ती तयारी व्यक्तिसापेक्ष रीतीने म्हणजे शिष्याचा स्वभाव समजून-उमजून) करून घेत असतो. बरे, या मार्गोपदेशक गुरूची अनुभूती (जी ‘त्याच्या गुरूने कधी काळी करवून घेतलेली असते) महत्त्वाची मानली जातेच. या सर्व तयारीत आसने, प्राणायम वगैरेही उपयुक्त ठरतात. शरीराला विशिष्ट ताण देणारी आसने, श्वसन नियंत्रित करणारे प्राणायामाचे प्रयोग, या सान्यांचा सूचनावशतेशी संबंध असणार, असे जावते. संमोहन सहज व्हावे यासाठीही ‘खोल श्वसन, ‘वृत्ती एकाग्र करणे वगैरे करणे उपयुक्त मानले जाते. (इथे आसने, प्राणायाम यांच्या आरोग्यशास्त्रीय अंगांबद्दल दूरान्वयानेही टीका करायचा हेतू नाही.) कुणी मानसशास्त्रज्ञाने यावर मार्गदर्शन (मार्गोपदेश नव्हे) केले तर मला ते हवेच आहे.
वरील परिच्छेदाच्या शेवटी प्रथमच ‘मला’ हा शब्द वापरला आहे. अंतिमतः ‘ज्ञान हे मलाच होते. इतरांना कोणत्याही गोष्टीचे ज्ञान आहे की नाही हे मला ठामपणे कधीच कळत नाही. ते लोक मला संदर्भ सांगतात, बहुधा पुस्तकांमधून किंवा इतर व्यक्तींच्या संभाषणांमधून सापडलेले. यापैकी पुस्तकी संदर्भ पुस्तकांमध्ये वर्णन केलेले प्रयोगांचे संदर्भ, हे मी विश्वासार्ह मानतो- जरी मला प्रत्येक अन् प्रत्येक प्रयोग करून पाहणे शक्य नाही. मी असे समजतो की काही लेखकांची पुस्तके, त्यांत नोंदलेली काही व्यक्तींच्या प्रयोगांची वर्णने, ही ‘खरी’ असणार – मला फसवण्यासाठी घडवलेली नसणार, ही माझी श्रद्धा नाही, तर अशा प्रयोगांची, अशा व्यक्तींच्या लिखाणाची वृत्ती आणि निष्कर्ष मला माझ्या अनुभवाशी, तशी, वृत्तींशी जुळते वाटतात, जसे मला लॉफ्टसु-सेसी यांचे लहान मुलांवरचे प्रयोग ‘माझे’ वाटले. त्या प्रयोगाबद्दलचे माझे निरीक्षण नोंदताना मी ‘मला’ हा शब्द वापरला होता, पण पुढे मात्र नोंदले की मी ‘मला’ प्रथमच वापरतो आहे! मी स्वतःला फसवू शकतो, आठवणी ‘बिघडवू शकतो, हेही मला पटते.
पण माझी अशी वृत्ती की हे माझे मला करू द्यावे. माझ्या गुरुस्थानी कोणी येऊन त्याचे तसल्याच परंपरेने आलेले भ्रम माझ्यावर लादू नये. अमेरिकन उडत्या तबकड्या आणि पाश्चात्त्य कुमारी मेरीच्या साक्षात्कारांना’ हसण्याचा आणि नाकारण्याचा हक्की मी स्वतःकडे ठेवतो, तसाच भाव कर्मसिद्धान्ताबद्दलही ठेवतो, तसाच भाव ‘अपौरुषेय’ ज्ञानाबद्दलही ठेवतो- मग ते वेदांचे ज्ञान असो की कुराणाचे. याला मी विवेकी वागणे समजतो.
हा माझा हक्क सोडून देण्याचा आग्रह मला व्यभिचाराशी ‘समकक्ष’ वाटतो. हा हट्ट आहे, पण साधार आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.