समाज व लोकशाही

वाटाघाटीचा शिक्षणक्रम (Negotiations Seminar) असा एक कोर्स मी घेतला होता. त्यात ‘‘प्रतिवादीची मूल्ये समजून घेणे’ (Understanding your adversary’s values) असा एक चार तासांचा भाग होता. “यशस्वी वाटाघाटींसाठी दोन्ही बाजूंची व्यक्तिमत्त्वे व मूल्ये समजून वाटाघाटी करणे आवश्यक आहे”अशी ह्या शिक्षणाची धारणा होती.
या कोर्समध्ये व्यक्तींची व पर्यायाने सर्व समाजाची जी मूल्ये वथर (levels) सांगण्यात आले त्यांचासमाजाच्या उन्नतीशी, राजकारणाशीव देशाच्यासुव्यवस्थेशीही निकट संबंध आहे असेवाटते.
या शिक्षणानुसार जगातील सर्व समाजवव्यक्ती यांच्या मानसिक व वैचारिक पातळ्यांचेआठ थर आहेत.
१. बाल्यावस्था (Infantile). नुकते झालेले अर्भक अथवा बुद्धीने कमकुवत व्यक्ती ह्या पातळीचे असतात. त्यांना फक्त भूक, तहान अशा मूलभूत गरजा समजण्याएवढी बुद्धी असते. त्यांचे मन अविकसित असते.
२. टोळी वर्ग (Tribalistic). (अमेरिकेत २५ टक्के)
ही माणसे एका पुढार्याफची अथवा धर्मगुरूची, थोडक्यात एका व्यक्तीची आज्ञा पाळतात. ती आज्ञा योग्य का अयोग्य याचा फारसा विचार ती करत नाहीत. जगात अगदी सुरवातीला आदिमानव एकत्र राहू लागले तेव्हा असा समाज अस्तित्वात आला. आपला मानल्या गेलेल्या माणसाशी ह्या पातळीचा समाज इमान राखून असतो. मनाने तो भूतकाळात वावरतो. ह्या समाजाची अगदीआखलेली धर्मकायें अथवा इतर कार्ये (rituals) असतात.
आत्ताच्या जगात माफिया, गॅग्स्ही काही अशा समाजाची उदाहरणे.
३.स्वयंकेंद्री (Egocentric). (अमेरिकेत ५ टक्के) ही माणसे “हम करे सोकायदा’ म्हणणारी असतात. स्वतःचा हेतू साधण्यासाठी ती काहीही करायला तयार असतात. त्यांच्या सत्तालोलुपतेला आळा घालण्याला त्यांच्यापेक्षा जबरदस्त माणसाची जरूरी असते. कुठल्याही प्रकारच्या प्रबलतेलाही माणसे भिऊन असतात, उदा. पैसे, ज्ञान, शस्त्रास्त्रे. काही राजकीय पुढारी, काही धंदेवाईक, गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख, धर्मगुरू ह्या प्रवृत्तीचे असतात.
४. नियमपालक (Conformist). (अमेरिकेत ५० टक्के) ह्या व्यक्ती नियमांचे पालन करतात. समाजातील नीती, कायदे, कुटुंबात पाळायचे नियम, धार्मिक रूढी अथवा परंपरा ह्यांचे मनापासून पालन करणार्या, व्यक्ती या थरात असतात. आपण नियम पाळतो ह्याचा त्यांना अभिमान असतो. नियम निश्चित नसेल तर ह्या व्यक्ती गोंधळतात. शिपाई, धार्मिक माणूस, सरकारी नोकर, बर्या चशा स्त्रिया प्रामुख्याने ह्या पातळीच्या असतात.
५.कारस्थानी (Manipulative). (अमेरिकेत ५ ते १० टक्के) सरड्याप्रमाणे परिस्थितीनुसारही माणसे आपले व्यक्तिमत्त्व व वागणूक बदलतात. आपला हेतूसाधण्यासाठी ते कायदे वाकवतात, पण मोडत नाहीत. त्यांना यश हवे असते व त्यासाठी जरूर पडेल तसे ते वागतात. त्यांना स्वतःची अशीमूल्ये नसतात. धार्मिक माणसांबरोबर ते धार्मिकतेचा आव आणतील, लष्करात त्यांत्ते नियम पाळतील. ही माणसे नोकरीत टिकत नाहीत. बहुतेक धंदेवाईक, विक्रेते, राजकारणी या प्रवृत्तीचे असतात.
६. समाजकेंद्री (Sociocentric), (अमेरिकेत ५ ते १० टक्के) ही माणसे समाजाचे भले करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेली असतात. आपले ध्येय साध्य करायला खूप मोठा स्वार्थत्याग करायलाही ते तयार असतात. ही माणसे बहुतेक निसर्गप्रेमीवपशुप्रेमी असतात. पैशाचा किंवासत्तेचा त्यांना मोह नसतो. जगात महत्त्वाचे फरक व्हायला ह्या व्यक्ती कारणीभूत होतात. जगातले समाजसुधारक, क्रान्तिकारक ह्या प्रवृत्तीचे असतात. (उदा.समाजसुधारक आगरकर.)
७. अस्तित्ववादी (Existentialist). (अमेरिकेत ५ ते १०%) ह्या व्यक्तींना त्यांना जे ध्येय (goal) असेल त्याकडे पोचायच्या क्रियेत रस असतो. प्रसिद्धी, पैसा, सत्ता अशा धर्तीच्या त्यांच्या ध्येयसिद्धीमुळे होणार्या स्वतःच्या फायद्याची त्यांनाहावनसते. ते क्रियाशील व मुक्त मनाचे असतात. त्यांचे कार्य करताना आलेल्या अनुभवात व त्यामुळे झालेल्या मानसिक वाढीत व ज्ञानात त्यांना समाधान लाभते. प्रत्येकप्रश्नांचे अनेक पैलू लक्षातघेऊनजरूर पडल्यास तडजोड करून ही माणसेतो प्रश्न सोडवतात. ह्या व्यक्तींना नातेवाईकांची, मित्रमैत्रिणींची जरूरी नसते किंवा कमी जरूरी असते.
लेखक, कवी, शास्त्रज्ञ, काही दूरदृष्टी असलेले यशस्वीपुढारी,नवेधंदेवकारखाने सुरूकरणारे मालक या थराचे असतात. प्रेसिडेंट क्लिंटन (आत्ताचा अमेरिकेचा प्रेसिडेंट) असा असावा असे मला वाटते.
८. ह्या माणसांना योग्यासारख्या (सर्वसाधारण माणसांना नसलेल्या) शक्ती असतात (supermatural powers).तेभविष्यकाळ ओळखतात, स्वतःचेहृदयथांबवतात, एकमेकालाअंतरावरून संदेश पाठवतात.
अशा माणसांची संख्या जगात फारच थोडी असावी. दोन मुद्दे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
(१)खालच्या पातळीच्या व्यक्तीला वरच्या पातळीवरील माणसाची वृत्ती किंवा विचार समजून घेणे कठीण जाते.
उदा. धार्मिक वडील (conformist) वरच्या पातळीवरच्या धर्म न पाळणाच्या मुलाला म्हणतील, “पिढीजात चालत आलेले धर्माचे रीतिरिवाज पाळण्याऐवजी स्वतःचा शहाणपणा चालवतोय.”वडिलांच्या आज्ञेतराहणारी(Tribalistic) मुलगी वरच्यापातळीच्याबहिणीलाम्हणेल, “बाबा तुझ्या भल्यासाठी काय सांगतात ते मुकाट्याने ऐक”
देशासाठी किंवा समाजासाठी स्वार्थत्यागकरणाच्या पुढा-यांना (Sociocentric, existentialist) अथवा समाजसुधारकांना खालच्या पातळीची माणसे म्हणतील, “कुणी नसत्या भानगडी सांगितल्यात? चांगलं सुखात घरी राहावं.”
सर्वांच्याव्यक्तिमत्त्वात अनेक पातळ्यांच्याथोड्याफार छटा असतात.
उदा. घराबाहेर अगदी वाघ असणारा पुरुष (egocentric) बायकोपुढे नमून असू शकतो. तो घरात (tribalistic) वेगळ्या मूल्याचं पालन करतो.
लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. राजकीय (कायदे करणारे), प्रशासन व पोलीस (कायद्यांची अंमलबजावणी करणारे) वन्यायसंस्था.
पाश्चात्त्य देशात लोकशाहीने पाळेमुळे हळूहळू धरली. अमेरिकेला दूरदृष्टी असणारे पुढारी लाभण्याचे भाग्य लाभले. जॉर्ज वॉशिंग्टनला एम्परर म्हणून अभिषेक करायला जनता तयार होती. पण त्यांनी नकार दिला. बहुतेक जगात दुसन्या पातळीवरची राज्ये असतानाअमेरिकेत लोकशाही स्थापन झाली.
लोकशाहीनीट चालण्यासाठी कायदेपालन करणारी जनता आवश्यक आहे. तसेचनिःपक्षपाती न्यायसंस्था व जुलूम न करतास्वतःच्या सत्तेचा दुरुपयोग न करणारे पुढारी हवेत.
लाचलुचपतघेणारे पुढारी, पोलिसवन्यायाधीश हे लोकशाहीला विषासारखेआहेत.
प्रत्येक देशात धंदे चालवायला कारस्थानी पातळीचा (manipulative) वर्ग हा हवाच. मराठी लोक धंदा करीनात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मारवाड्यांना महाराष्ट्रात आणले. तसेच (समाजहितवादी व अस्तित्ववादी) शास्त्रज्ञ, लेखक, बातमीदार, नाटककार यांची जरूरी सर्व देशांना आहे. लोकशाहीत समाज बन्याच प्रमाणात मुक्त असतो. म्हणूनच लोकशाहीत समाजहितवादी व अस्तित्ववादी मुक्तपणे लिहू शकतात, समाजाच्याभल्यासाठी संस्थास्थापन करू शकतात, चळवळी व मोर्चेही काढू शकतात. पण लोकशाहीत मुक्त जीवनपद्धतीमुळे गुन्हेगारी काबूत ठेवणे कठीण जाते. त्यातल्या त्यात हुकूमशाही समाजजर (रशियासारखा) थोड्या काळात लोकशाहीकडे वळला तर त्या समाजातले स्वयकेंद्री व कारस्थानी मोकळे सुटून समाजाचे स्थैर्य धोक्यात आणतात. गुन्हेगारी प्रवृत्ती काबूत ठेवणे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या लोकशाही देशांनाही कठीण जाते.
अमेरिकेत मी परत परत पाहिले आहे. कुठल्याही प्रकारचा अन्यायसुरूझाला की लगेचकुणी ना कुणीतरी समाजकेंद्री व्यक्ती एखादी संस्था काढून अन्यायाविरुद्ध झगडा सुरू करते. (उदा. Mothers against drunk driving, many environmental groups, AIDS coalition).ETT संस्था अन्यायाला, अतिरेकी वागण्याला आळा घालतात.
ज्यू लोकांची पद्धतशीर हत्या करणार्याल जर्मन देशाचे बहुतेक सर्व नागरिक शिक्षित होते. जर्मनीतनाझींनाव हिटलरला विरोधझाला.पण विरोधालायशयेण्यासाठी लागतेतसेसहकार्य विरोध करणा-यांना जर्मन नागरिकांकडून मिळाले नाही.
तसेच वरवर अप्रगत आदिमानवाप्रमाणे राहणारे काही समाज राजकीय व सामाजिक दृष्ट्या प्रगतवसर्वमानवसमतावादी असलेले आढळून आले आहे.
सोमालिया, बॉस्निया, रशियावअन्य अफ्रिकेत जे काही चालले आहे ते पाहून मला वाटते की भारत स्वातंत्र्यानंतर एकत्र राहिलाहीच मोठी अभिमानाची बाब आहे. जातिभेद, प्रान्तीयभेद, भाषिक भेद व धार्मिक भेद यांवर भारतीयांनी कशी का होईना मात करून एकी टिकवली आहे हे भारतीयांच्या सहिष्णुतेचे द्योतक आहे असे म्हणायला हवे.
वशिले, लाचलुचपत हे सर्व आता कायद्याविरुद्ध असले तरी सरंजामशाही राज्यांत राजांना, सरदारांना देणग्या देणे, आपल्या नातेवाइकांना नोकर्याा देणे रूढच होते. तसेच राजाने जहागिरी देणे, बक्षीस देणे हेही सर्रास चालतअसे.इंग्रजांच्याराज्यातल्यासचोटीचे कौतुकमी माझ्या आजोबांकडून ऐकले आहे. पण दुसन्या ते चवथ्या पातळीवरच्या समाजालाहे कायदे कळतअसले तरीवळतील का?
लोकशाही देशात थोड्याफार प्रमाणात मतदानाच्या हक्कांमुळे प्रजेला राज्यकर्त्यांना लगाम घालायची शक्ती आहे. ही सुद्धा महत्त्वाची पायरी आहे. बहुजनांची मानसिक उत्क्रान्ती कायदे पाळणारे’ (conformist) या थरावर झाल्यास लोकशाही राज्यव्यवस्था सुव्यवस्थितव जास्त न्याय्य होईल.
अगदी तळागाळातल्या, दरिद्री व्यक्तीला मिळणारी वागणूक, न्यायवत्यांना स्वतःलाउच्चपदी नेण्याची संधी ही मी लोकशाही रामराज्याची कसोटी मानते.
एवढेच सांगते की दोनशे वर्षे झाली तरी अमेरिकेत (U.S.A.) अजूनही लोकशाही रामराज्य स्थापन व्हायचे आहे. पण त्या दिशेने धडपड मात्र चालू आहे.
मध्ययुगात समाज धार्मिक बाबतीत बराचसा चवथ्या पातळीचा (किंवा conformist) होता. पण धार्मिक समाजात समता नव्हती. सर्वच नागरिकांना न्याय्य वागणूक दिली जात नव्हती. उच्च दर्जाच्यालोकशाहीसाठी निवडून आलेल्या सरकारचेकायदेपाळणाच्या जनतेची बहुसंख्याआवश्यक आहे असे मला वाटते. थोडक्यात निदान ५० टक्के जनता कायदेपाळणारी (conformist) असली तर सुव्यस्थित लोकशाही या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशात स्थापन होईल.
संदर्भः
Negotiations Seminar.Center for Values Research, Inc. Dellas, Texas. U.S.A.
(छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ह्यालेखात उल्लेख आहे.त्यासाठी माझ्याकडे लेखी संदर्भ नाही. तो चुकीचा असल्यास क्षमस्व. वाचकांस ह्याबाबतीत माहिती असल्यास पाठवावी ही विनंती.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.