गतार्थ भारतीय वास्तुशास्त्र

भारतीय वास्तुशास्त्र शिल्पशास्त्राचे एक उपांग आहे. शिल्पशास्त्रात एकूण दहा विषय येतात व वास्तुशास्त्र हे त्यांतील एक. त्याचा विस्तार एकूण अठरा ऋषींनी अठरा संहितांत केलेला आढळतो. त्यातील कश्यप, भृगुव मय यांच्या संहिता जास्त प्रचलित आहेत. भौगोलिकदृष्ट्या दक्षिणेमध्ये त्या पुरातन काळापासून प्रचलित असल्याने आजही आपल्याला दक्षिणेकडील संहितांचाच प्रचार होतानाआढळतो.
शिल्पशास्त्राच्या विस्तारात वजने, मापे, पदार्थवत्यांचे गुणधर्म, त्यावर करावयाच्या प्रक्रियाव त्यापासूनचे फायदे तोटे हे विस्ताराने येतात, व वास्तुशास्त्राला पण ते लागू होतात. ह्या एका बाबतीत पुरातन वास्तुशास्त्र हे आजच्या बांधकामशास्त्राची जननी म्हणता येईल. दिशा निश्चितीच्या प्रक्रिया, मोजमापाच्या पद्धती व गणिते, ह्याचप्रमाणे बांधकामाच्या संबंधात करावयाचे करार, त्यातील अटी, मुख्यापासून ते कनिष्ठापर्यंतव्यक्तींनी करावयाची कामेव त्यातील सूत्रबद्धता, त्यांना द्यावयाची दक्षिणा इत्यादि गोष्टीआजच्यापुढारलेल्या पद्धतींशी आश्चर्यकारकरीत्याजुळतात. ह्याबाबतीत पुरातनशास्त्र हे अद्वितीयच म्हणावे लागेल.
हे शास्त्र साधारणतः इ.स.पूर्व ३००० ते ३२०० ह्या काळात अस्तित्वात आले व सुमारे इ.स. पूर्व १६०० पर्यंत त्याचा विकास झाला असे प्रचलित व विद्यमान ग्रंथांवरून आढळते. ह्याचवेळी जोतिषशास्त्र, संख्याशास्त्र वइतर अनेक शास्त्रे पण विकसित होत गेली, वसाहजिकच, वास्तुशास्त्राची व त्यांची सांगड घालण्याचा मोहतत्कालीन पुराणिकांना पडलेला दिसतो. नपेक्षा वास्तु-रेखाटनाचा मुहूर्त, चौकटी उभ्या करण्याचा मुहूर्त, इत्यादि गोष्टी, तसेच, भूखंडाच्या मालकाची कुंडली, जागेची कुंडली व त्यावरून काढलेले शुभ-अशुभ निष्कर्ष इत्यादि मूळ संहितांत नसून मागून घातलेल्या व उपन्या वाटतात. त्यामुळे मूळच्या योजनाबद्ध व शास्त्रशुद्ध संहितेत दैववाद, गुणावगुण इत्यादींचा प्रादुर्भाव होऊन ती अशुद्ध झालेली दिसते.
वास्तुपुरुषाची आकृती हा एक सर्वसाधारणपणे८१ चौकोनांत विस्तारलेला मानवीआकृतिबंध आहे. त्यातल्या प्रत्येक चौकोनात एक अधिष्ठात्री देवता कल्पिली आहे. तिथे गुणावगुण व मनुष्य आकृतीच्या अवयवांची स्थाने व कार्ये, उदा. मस्तिष्क, नाभि, बाहु इत्यादि ह्यांची अनुक्रमे, बुद्धि, उत्पत्ति व पोषणसामर्थ्य इत्यादींचा विचार करून व सांगड घालून ते ते गुण असणान्या देवतांची स्थाननिश्चिती त्या त्या चौकोनात केलेली आढळते. संपूर्ण मनुष्याकृति ही खरेतर समसमान विभागलेली आहे, त्यामुळे डावेवउजवेअवयव सुद्धा तसेचदाखवलेले आहेत. वस्तुतः प्रत्यक्षात प्रत्येक डावावउजवाअवयव क्षिप्त क्रिया एकसारख्याच करतो. उदा.डावे व उजवे फुफ्फुस एकच कार्य करते, परंतुप्रतिक्षिप्त क्रियांमध्ये फरक आढळूशकतोउदा. जेवताना उजवा हात जास्त वापरात येतोवडावा कमी. खरे पाहिले असता जेवण्यासारख्या क्रियेत डावे-उजवे हात वापरणे शुभ व अशुभ हे कसे काय ठरते हा एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. परंतु ह्या क्रिया जनमानसात जवळजवळ एकसारख्या विचाराने रुजलेल्या आढळतात. ह्यावरून वास्तुपुरुषाचेसर्वांगखरे पाहिले तरसमसमान विभागले असून देखील काही अंगे ही शुभ व काही अशुभ मानली गेली व त्यावर आधारलेले वास्तु विशेषव वास्तु विभाग (उदा. पूजाघर, स्वयंपाकघर, बैठकइत्यादि) हे त्यात्या चौकोनांच्या जागी योग्य म्हणून कल्पिले गेले.
दिशा व देश ह्या मूलभूत संकल्पनांचा गोंधळ झालेला दिसतो. पुरातन वास्तुशास्त्रामध्ये आग्नेय, वायव, ईशान, व तेजस हे देश येतात व ते जमिनींची प्रत, उंचसखलपणा, हवामान (उष्ण, समशीतोष्ण किंवा थंड), उपलब्ध वनस्पतीवप्राणी, पक्षी, फुलेवफळे ह्यानुसार त्यांचीस्थाननिश्चिती केलेली आढळते. कालांतराने देश व दिशा ह्यांचा भ्रम निर्माण होऊन देश हे दिशांच्या स्वरूपात म्हणजेच, आग्नेय, वायव्य, ईशान्य व नैऋत्य असे मानले जाऊ लागले. पंचमहाभूतांचा पण संबंध उदा. आग्नेय-अग्नीचा, वायव्य-वायूचा, इत्यादी लावला जाऊ लागला व मूळच्या वस्तुनिष्ठसंकल्पना मागे पडल्या. पुराणांनी नंतर त्यांना हातभार लावून व एकेका अधिष्ठात्री देवतेचे गुणावगुण त्या त्या दिशांना लावून कल्पना व वस्तुस्थिती ह्यामध्ये फारकत केली. एवढेच नव्हे तर त्या त्या देवतांना स्थानभ्रष्ट केले असता त्या कोप पावतात व त्यांचा उपसर्ग नुसते स्थानभ्रष्ट करणान्यांनाच नव्हे तर त्यांच्या विद्यमान वारसांना आणि भावी पिढ्यांनाही कसे भोगावे लागतात ते विस्ताराने सांगायला सुरवात केली. आजमितीला वास्तुशास्त्राचे तार्किक विवेचन कुणीच केलेले नसून ह्या पिढ्यान् पिढ्या चालत असलेल्या कपोलकल्पित पौराणिक गोष्टीच निष्ठेने सांगितल्या जात आहेत. दक्षिण-पश्चिम कोनात असलेली विहीर म्हणजे मृत्यूला निमंत्रण, स्वयंपाकघरात चुलीचे स्थान दक्षिण-पूर्व कोनात नसल्यास आरोग्याचा नाश, इत्यादी कथित गोष्टी ह्या पुराणांचा पगडा असल्याचेच द्योतक आहेत.
वास्तुशास्त्र विकसित होत असलेला कालखंड खरेतर सिंधु संस्कृतीशी मिळतो. परंतु मोहेंजोदारोव हरप्पा येथील वास्तुप्रकारांच्या रचनांमधून वास्तुशास्त्राचा निश्चित व निःसंदिग्धवापर झाल्याचे अनुमान काढता येत नाही. ज्याप्रमाणे-वास्तुनिष्कर्ष जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंतच वापरता येऊ शकतात असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे जरी ५० टक्क्यांपर्यंत हे निकष वापरले गेलेले आढळून आले असते तरी सुद्धा वास्तुशास्त्र वापरात होते असे म्हणताआले असते. पण तसे घडलेनाही हेच खरे.
देवळांबाबत वापरावयाचे वास्तुनियम घरांपेक्षा संपूर्ण भिन्न आहेत. ते सर्वसामान्य वास्तूंना लागू नसल्याने त्यांचा ऊहापोह येथे करीत नाही. धर्मनिष्ठा हा एका विशिष्ट सामाजिक घटकाचा दृष्टिकोन हे लक्षात ठेवल्यावर तर त्याचे सार्वजनिकीकरण करणे संपूर्ण अयोग्य ठरते. आजमितीला आपल्या देशात हिंद्रितर समाजघटक जवळजवळ ३५% आहे. त्यातही बौद्ध, जैन हे ईश्वराला न मानणारे व मूर्ती न पूजणारे घटक वगळले, तर निखालस हिंदू-धर्म-संहिता पाळणारे जास्तीत जास्त ३५%उरतील. त्यातही जाती-पडजाती, इत्यादि विभागणी लक्षात घेता साधारणतः ५% इतकेचलोक कायतेखण्याअर्थाने हिंदुधर्माचे निष्ठेनेसंपूर्ण पालन करणारे सापडतील. अशा परिस्थितीतवास्तुशास्त्र हे संपूर्ण धर्मावरील आधारित शास्त्र भारतातील सर्व जाति धर्माना कसे काय लागू पडते वा पचते वा सुचते हा खरोखरी प्रश्न आहे.
आतातर हे वास्तुशास्त्रसंपूर्ण जगाला कसे योग्यआहे ह्यावर हास्यास्पद चर्चासत्रे व परिसंवाद आयोजित केले जात असल्याचे दिसून येते. साधारणतःअशापरिसंवादात १००-१५० लोकजमतात. त्यातही वक्ते तेच तेच व धर्माध लोकही तसेच हेच जास्त दिसून येते. थोडक्यात बनारसच्या मूठभर पंड्यांनी अमेरिकेच्या प्रेसिडेंट बिल साहेबाला शिक्षा ठोठावल्याचा फतवा काढावा व आपले धर्मातील वर्चस्व संपूर्ण जगाला (?) कळलेच पाहिजे असा हास्यास्पद प्रकार करावा तसेच हे काहीसे होते. ह्या परिषदांच्या बातम्या मग छापून आणल्या जातात व ही मंडळी जणूकाय संपूर्ण मानव जातीच्या प्रगतीचा (?) मूलमंत्र वास्तुशास्त्रात दडला आहे असा प्रचारकी थाट आणतात.
ह्या सर्व प्रकारांमागे मूळ फक्त असते ती दक्षिणा. ही जर मिळत नसेल तर ही मंडळी ढुंकूनही फिरकत नाहीत. जगाच्या इतिहासात पैसा व सत्ता ह्यांनामिळवण्याचे मार्ग हे बहुधा अनीतीतूनच जातात असे आढळते. तेव्हा त्यांना पुण्यात बदलवून देण्याचे कार्य करणारी मंडळी ही ह्या मार्गातले अविभाज्य घटक म्हणायला हवीत. राजाला राज्यविस्ताराकरता व युद्धाकरता धन न देणान्या , सावकारांनाराखेचे तोबरे देणेवत्यांच्या कुटुंबीयांना हत्तीच्यापायी देणे अशी दहशतीची निषेधार्ह कृत्ये ही धर्माच्या आवरणाखाली योग्य व पुण्यकृत्ये कशी हे सांगणारे भाट पण राजाला आवश्यकच होते. हीचगोष्ट आजच्या काळात पण दिसून येते.नपेक्षापरदेशात झालेल्या पुत्राच्या अपघाती मृत्यूचे कारण दक्षिण-पश्चिमकोपर्याेतील हजारो किलोमिटर दूर भारतात असलेल्या घराच्या परसातली विहीरहे अतर्क्सकारण सांगणारे वास्तुशास्त्रीवत्यावर विश्वास ठेवून ती विहीर बुजवणारे महाभागआपल्याला आढळले नसते.
आता दिशांचा विचार करू. पृथ्वीच्यागोलाचाअभ्यास केल्यासत्यावर पूर्ववपश्चिम ह्यादिशा आढळत नाहीत. कारण सूर्य उगवणे व मावळणे ह्या कालबाह्य व संपूर्ण अवैज्ञानिक गोष्टीवर ह्या दिशा अवलंबून होत्या. वस्तुतः दिवसा कोणालाही उगवतीकडे किंवा मावळतीकडे जा हे सांगण्यापेक्षा पोस्टल-अॅड्रेसहेच, जास्तसयुक्तिक ठरते. इंग्रजांनी टपाल व्यवस्था विकसित करताना ह्याचगोष्टीचाप्रथम उपयोग केला व त्यानुसार त्यांनी इंग्लंडच्या पूर्वेस, दक्षिणेस, पश्चिमेस व उत्तरेस असे देश व दिशा ठरवल्या. त्यातील दक्षिण व उत्तर ह्या दिशा त्यांच्याकडे चुंबकीय दृष्ट्या ठरविल्या गेल्या तरआपल्याकडे त्याधुवीय म्हणून ठरविल्या गेल्या. तरीही आपण मध्यपूर्वेचे म्हणून गणले गेलेले, परंतु वस्तुतः आपल्या पश्चिमेचे असलेले देश म्हणून अरब राष्ट्रांना ओळखतो. फार कशाला उत्तर दिशेचे लोक दक्षिणेच्या बाजूकडे असलेल्या प्रांताला दाक्षिणात्य म्हणून हिणवतात. ह्यात सुद्धा उत्तर म्हणजे भरभराट समृद्धी व दक्षिण म्हणजे हासाची, हिणकस अशीच समजूत रूढ झालेली दिसून येते. तेव्हा तात्पर्य म्हणजे मूलतः चुकीच्या समजुतीवर आधारित पूर्व व पश्चिम दिशांना नंतर महत्त्व येऊन पूर्व-उत्तर, पश्चिम-उत्तर, पूर्व-दक्षिण व पश्चिम-दक्षिण असे उपभाग (कोन) हे भौगोलिकदृष्ट्या कितपत योग्य ठरतात? एखादा केंद्र-बिंदु कल्पून त्याभोवती ह्या दिशाठरवणे हे ब्रह्मांडाचा एककेंद्रबिंदू कल्पून केलेल्या उपपत्तींशी तार्किकदृष्ट्या युक्त असेलही. पण आजमितीला सुमारे २०० अब्ज आकाशगंगा अस्तित्वात आहेत हे कळल्यानंतरही एककेंद्री विश्वाची कल्पना नुसती संकुचितच नव्हे तर कालबाह्य पण ठरते. तेव्हा अनेक केंद्रबिंदू व त्यांच्या आजूबाजूच्या सापेक्ष दिशा व त्या अनेक केंद्रांचा एकमेकांशी संकर ह्या संकल्पनांत दिशांची कल्पना शून्यवत् ठरते; कारण त्या परस्परविरोधी होतात. कोणत्याही देशात एक वास्तुही फक्त एक केंद्रबिंदु होईल. पण साध्या लेआउटमध्ये असलेला प्रत्येक भूखंड हास्वतंत्र केंद्रबिंदू मानल्यावर होणारा दिशांचा गोंधळलक्षात येतो. मग एका मालकाला त्यांच्या घराची संपूर्णरचनाबदलवून (दिशेप्रमाणे) प्रश्न जास्तच बिकट होतील, कारणआजूबाजूच्या घरांचेमगकाय? प्रत्येक भूखंडालाजरउत्तर-पूर्वेकडे उतार पाहिजे तर ते सर्वांच्याबाबतीत कसे काय शक्य होईल? आणि जर ते नसेल आणि जर कोणी तसे करायचा प्रयत्न केलाचतर ते समाजविघातक ठरणार नाही काय?
वास्तु-विनिमय म्हणून जेकाही सध्याप्रचलित आहेत ते अशाचएककल्लीपणानेव केवळएक व्यक्ती किंवा कुटुंबह्यांना लागूअसल्याचे आढळते. संपूर्णसमाजाचा, जो एकजिनसी नाही व बहुधर्मीयआहे, त्याचा विचार त्यात आढळत नाही.
वास्तुशास्त्र हे विज्ञान आहे की नाही हाही एकप्रश्नचर्चिला जातो. संहिताम्हणजेचअधिनियम हे सूत्र लक्षात घेतले म्हणजे व वास्तुशास्त्र हे संहितांतगठित केलेले आहे हे पाहिल्यास वास्तुशास्त्र हे शास्त्र= विज्ञान ह्या सदरात मोडू शकत नाही. विज्ञान हे नियमांवर आधारित असते; अधिनियमांवर ” कला आधारित असतात. प्रत्येक नियम असंख्य वेळा पडताळून जर प्रत्येक वेळी निष्कर्ष एकच येत असेल तरच तो विज्ञानात समाविष्ट होतो व तो पुनः कालबाह्यवाअयोग्य ठरेपर्यंत तो तसाचराहातो हे आपण पाहतो. अधिनियम हे कालमान व परिस्थितिनुरूप बदलत असतात. त्यामुळे कलांमध्ये पण वृद्धीवघटहोत असते. वास्तुशास्त्र हे शास्त्र म्हणण्यामागचेकारण पूर्वीच्या काळी धर्मवविज्ञान हे वेगळे भाग नव्हते तर धमनि विज्ञानावर कुरघोडी सतत केलेली असायची. विज्ञान हे निश्चित पण धीम्यागतीने प्रगत होत गेले व धर्मावर आधारलेल्या निष्ठा व अधिनियमांचा स्वाभाविक हास होत गेला. साहजिकच, धर्माची डूब दिलेली शास्त्र नष्ट होत गेली. तरीसुद्धा ती कुठेना कुठे, प्लेगच्या विषाणूंप्रमाणे जतन केली गेली वथोड्याश्या राजकीय व सामाजिक स्थित्यंतराच्या व अस्थिरतेच्या काळात जोमाने प्रचारात आणली गेली. वास्तुशास्त्राचा वस्तुतः व्हास फार पूर्वीच झालेला होता. मोठमोठ्या इमारतींच्या बांधकामाचा इतिहास आजही सापडतो, पण त्यामध्ये पुरातन वास्तुशास्त्र वापरले गेले, अथवा कोणता वास्तुपंडित उपस्थित होता हे आढळत नाही. रुपये-आणे-पै, बलुतेदार-सामानाची मोजमापे-इत्यादि तपशील नोंदवणान्यांना जर ही माहिती नोंदवावयाची वाटली नसेल तर एकतर ती अतिशय गौण असावी अथवा मुळातच नसावी.
सर्वसाधारणपणेप्रत्येक व्यक्ती दोन प्रकारे आचरण करते. एक म्हणजे व्यवहार्यव दुसरे म्हणजे नैष्ठिक. पहिले आचरण अनुभवांवर आधारलेले असते तर दुसरे शास्त्राधारांवर असते. म्हणूनच सत्यनारायणाच्या पूजेचे व्यवहार्य म्हणजेधन मिळवण्याचेसाधन म्हणून ते सांगणारी व्यक्ती आचरण करते तर नैष्ठिक म्हणून यजमान ते करवून घेतो. एकाला धन मिळते, दुसर्या ला आत्मिक समाधान. हीचगोष्ट वास्तुशास्त्राच्या आचरणावरून दिसून येते. हे शास्त्रसांगणारीव्यक्ती धनलोभानेते करते तर यजमान ते धार्मिक व नैष्ठिक म्हणून करतो. अर्थात पैसा व वेळ (म्हणजेच पैशाचे दुसरे रूप!) वाया गेलेला लक्षात आल्यावर यजमानाचे आत्मिक समाधान पण बरेचसे हिरावले जाते.
पुरातन वास्तुशास्त्राच्या पुनरुज्जीवनाचे बरेचसे प्रयत्न सध्या चालू आहेत. संस्कृत ही राष्ट्रभाषा करण्याचे स्वप्न बाळगणारी मंडळी पूर्वीही होती व आजही आहेत. तेव्हा तसेच स्वप्न बाळगायला हरकत नाही! प्रश्न आहे तो मूळ वास्तुशास्त्राचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याचा, आजमितीला असलेले व माजलेले दैववादी तण उपटून टाकण्याचा व शुद्ध स्वरूपात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते पारखण्याचा. ह्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. कै. रावसाहेब वझे ह्यांनी १९२० मध्ये ह्याच विषयावर सखोल अभ्यास करून प्रबंध छापला होता. गेल्या ५ वर्षात असंख्य पुस्तके छापली जाऊ लागली. मूळवास्तुशास्त्र हे फक्त पूजाघर, बैठक, स्वयंपाकगृह, न्हाणीघर, कोठार घरव भांडार घर, निजायची खोली व शस्त्रागार ह्या आठच प्रकारांच्यारचनांना लागू होते. ते आता काऊचा भाऊ आते भाऊ ह्या न्यायाने अर्थ व तर्कटे लढवून, ऑफिसेस, कारखाने, शाळा, फार काय वैज्ञानिक प्रयोगशाळांनासुद्धा लावण्यात अहमहमिका दिसते.हे म्हणजे शास्त्री आडनाव लावणाच्या प्रत्येकाला ‘वैज्ञानिक’ असे संबोधण्यासारखे झाले. अशी तर्कटे लढवण्यात फारच चढाओढ लागलेली आहे. तसेच बांधकामांच्या प्रकारांवरून व नियमांवरून पण म्हणता येईल. मूळ वास्तुशास्त्र हे वजनभारित नियमांवर आधारलेले होते.काँक्रीट वपोलादाच्यावापरानंतर ताण-भारित नियमअस्तित्वात आले व आजची प्रत्येक वास्तू त्यावरच आधारलेली आढळते. तरी सुद्धा खांब कोणत्या अंतरावर असावेत किंवा कुठेनसावेत (म्हणजे ब्रह्मयाच्या स्थानावर!) बांधकाम कोणत्या प्रकारे करावे, कसेसुरू करावेव । कसे करूनये हे वास्तुपंडित पुराणांचा तथाकथित आधार घेऊन सांगतात. ह्यामध्ये कोणत्या देवतांचा कोपववरदान हेच महत्त्वाचे असते. पण आजच्याबांधकामाच्या नियमांशी त्याचा दूरान्वयानेहीसंबंध दिसून येत नाही.
वैज्ञानिक शब्दभांडार वापरून वास्तुशास्त्र कसे संपूर्ण वैज्ञानिक आहे हे पण सांगण्याचा प्रयत्न केला जातो. अपुरे संदर्भ, हेतुपुरस्सर टाळलेले नियमांचे उल्लेख, संस्कृत श्लोकांचा सामान्य जनमानसावर होणारा प्रभाव इत्यादि गोष्टी चलाखीने वापरल्या जातात व वास्तुशास्त्र वैज्ञानिक असल्याचा भास निर्माण केला जातो. मूळची संहिता ही त्या काळात प्रचलित वैज्ञानिक संज्ञेप्रमाणे वैज्ञानिकचहोती हे खरेच आहे. पण आजचे तिचे स्वरूप हे संपूर्णआंधळेव दिशाभूल करणारे म्हणूनच कालबाह्य आहे. अल्ट्रा-व्हायोलेट-किरणसूर्यकिरणांत असतातवते पाणी शुद्ध करतात हे एकदा सिद्ध झाल्यानंतर हेच विज्ञान जेव्हा ‘सूर्य’ पश्चिमेच्या व दक्षिणेच्या कोपर्या त दूषित-अल्ट्रा-व्हायोलेट किरण टाकतो म्हटले की सर्व साधारण माणूस फसतोच. कारण दूषित ह्या शब्दाचा त्याला धसका असतो, अल्ट्रा-व्हॉयोलेट किरण त्याला वैज्ञानिक परिभाषेतले म्हणून प्रागतिक वाटतात व दक्षिणपश्चिम ह्या दिशा निश्चितीमुळे त्याला एक जणू वैज्ञानिक सूत्र गवसते. म्हणूनच ह्याच विहिरीच्या अवघ्या ८-१० फुटांवर असलेल्या दुसन्या (म्हणजे दुसर्याेच्या मालकीच्या) भूखंडावर असलेल्या उत्तर-पूर्व म्हणून ‘शुभ’ गणल्या गेलेल्या विहिरीत हाचसूर्य-चांगले अल्ट्रॉ-व्हायोलेट किरण टाकतो हे कसे काय शक्य आहे?सूर्य जर देव, तर तो असा भेदभाव का करेल? असले प्रश्न त्यांना पडत नाहीत! जवळ जवळ सर्वच वास्तुनियम ह्या सदरात मांडले जातात.
शेवटी प्रश्न उपस्थित होतो की केवळ काही मंडळींनी प्रचारकी थाटानेवलोभाने हेपुरातनशास्त्र अवलंबिले म्हणून ते टाकावे काय?निश्चितच नव्हे. वास्तुशास्त्र ही काही कोणा एकाची मक्तेदारी होऊच शकत नाही. परंतु ज्यांचा व्यवसाय म्हणून सुद्धा ह्याच्याशी काडीचाही संबंध नाही, मुख्य म्हणजे आजच्या युगातल्या बांधकामाचेवप्लॅनिंगचेज्याला काडीमात्रज्ञान नाही, त्यालाओळखणेव वेळीच दूरसारणेहे ह्याशास्त्राला वरदानचठरेल.संस्कृत-पाली प्रमाणे ह्याचा अभ्यासपणहोऊशकेल. कदाचित आजच्या प्रगत अवस्थेतही अनुत्तरित असलेले प्रश्न सोडवायला मदतपण होईल. पण फक्त जुने तेच सोने हा विचार सोडावा हेच उत्तम.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.