स्वातंत्र्याच्या जबाबदार्याश

“समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रुजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रिया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणान्यांच्या बाबत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रद्धांवर आघात करणाच्या लिखाणांच्याविषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणीच कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रद्धा जपायच्या, या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असतो! मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रद्धा कितीही दुखावोत, सहिष्णुतेने वागायचे – या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे. देशातील धार्मिक अंधश्रद्धा असणान्यांच्या कोणत्याही श्रद्धेय भूमिकेची चिकित्सा होताच जिथे निषेधमोर्चे निघतात तिथे फारसे स्वातंत्र्य अस्तित्वात असू शकत नाही.
“आणि स्वातंत्र्याचा प्रश्न एका बाजूने जबादारीशीही निगडित आहे, विचार मांडणान्याने मी विडंबन करणार नाही, विपर्यास करणार नाही, सत्यापलाप करणार नाही, सत्य नाकारणार नाही, खंडन विचारांचे करीन, व्यक्तीचे करणार नाही – अशा काही जबाबदार्यां मान्य कराव्या लागतात. एका बाजूने सहिष्णुता असली व दुसर्या् बाजूने जबादारीची जाणीव असली, तरच स्वातंत्र्याचा निकोप विकास होत असतो”.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.