विज्ञानातील व्याधी (Diseases in Science) -प्रा. जॉन एकल्स यांचे काही विचार

. इतकेच नव्हे तर या व्याधींवर करण्याचे उपाय हे कार्ल पॉपर यांच्याच लेखनात व विचारांत मिळू शकतात हे एकल्स यांनी स्पष्ट केले आहे. विज्ञानक्षेत्रातील व्याधींबद्दल प्रा. एकल्स यांचे विचार वाचकांसमोर मांडावे असे वाटल्यावरून हे टिपण लिहिण्यास घेतले.
सुरुवातीलाच प्रा. एकल्स यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे, की त्यांना हे विचार ते स्वतः संशोधनकार्यातून निवृत्त झाल्यावर, मागील आयुष्यक्रमावर दृष्टिक्षेप करताना सुचले. ते स्वतः संशोधनात गुंतले असताना त्यांच्यातही या व्याधी व हे दोष अंशतः होतेच. विज्ञानांतील संशोधनकार्य ज्या रीतीने चालविले जाते, ज्या संस्थांचा या कार्याला पाठिंबा आहे, त्यांना विज्ञान तंत्रज्ञान यांतील प्रगतीमुळे काय अपेक्षित आहे, अशा तर्हेाच्या प्रश्नांशी त्यांनी निर्देश केलेल्या व्याधी व दोष निगडित आहेत. विज्ञान म्हणजेच वैज्ञानिक हे समीकरण जरी पूर्णत: बरोबर नसले तरी विज्ञानक्षेत्रातील व्याधींचा–दोषांचा वैज्ञानिकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होणारच. तेव्हा संशोधनकार्य करणार्या- शास्त्रज्ञांनी या विषयाकडे लक्ष देणे आवश्यकआहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा की प्रा. एकल्स यांनी निर्देश केलेल्या व्याधी या कोणत्याही विवक्षित राष्ट्राविषयी नाहीत. जगातील बहुतेक सर्व पुढारलेल्या देशांशी आणि त्यांत चालू असलेल्या सर्व तहेच्या विज्ञानशाखांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला होता. म्हणून त्यांचे या विषयाबद्दलचे विचार सार्वत्रिक स्वरूपाचे आहेत. प्रा. एकल्स हे अनेक देशांतील सायन्स अकॅडमीचे मानद सदस्य (Hon. Fellow) होते. बंगलोरच्या सी. व्ही. रामन यांनी स्थापनकेलेल्या अकॅडमीचेही ते fellow होते. अशी निवड त्यांच्याच संशोधनविषयात पारंगत असलेल्या या देशातील शास्त्रज्ञांच्या सूचनेवरून व इतर विषयांतील fellowsच्या संमतीनंतर होते. तेव्हा प्रा. एकल्स यांच्या कार्याविषयी या देशातील तज्ज्ञांना माहिती व आदर आहेच.
प्रा. एकल्स यांनी एडिंबरो येथे दिलेल्या व्याख्यानमालेचा व त्यावर आधारित “The Human Mystery” व “Facing Reality” या दोन पुस्तकांतील विषयाचा आशय (scope) फार मोठा आहे. निसर्गविषयक तत्त्वज्ञान विशद करणे हाच Gifford Lectures चा उद्देश आहे. त्या मानाने “विज्ञानातील व्यथा व दोष’ या विषयाला त्यांनी त्यांच्या पुस्तकात फार थोडी ७-८ पृष्ठे एवढीच जागा दिली आहे. तेव्हा स्वानुभवावरून सुचलेल्या विचारांना वाचकांसमोर मांडणे एवढाच त्यांचा हेतू असावा. पण या विषयाला आपल्या दृष्टीने महत्त्व यासाठी की विज्ञान व तंत्रज्ञान यांचा विकास करणे हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा आपला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. म्हणून त्यात उत्पन्न होऊ शकणाच्या व्याधी आपण कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. विज्ञानातील व्याधी कोणत्या व त्या का उत्पन्न होतात याबद्दलचे एकल्स यांचे विवेचन आता थोडक्यात पाहू.
एकल्स यांचे प्रतिपादन असे की विज्ञानातील व्याधी व दोष यांची मुख्यत: दोन कारणे आहेत. (१) Failure to understand the nature of the scientific method (वैज्ञानिक संशोधनपद्धतीविषयी गैरसमज) आणि (२) Failure of scientists to appreciate that science is a shared enterprise and adventure of mankind and not a means to achieve one’s personal advantage and fame (SITE सर्व मानवसमाजाचे, एकत्र येऊन केलेले, वैचारिक व बौद्धिक साहस आहे – याचा उद्देश वैयक्तिक फायदा व कीर्ती मिळविण्याचा नाही). याची हवी तशी जाणीव वैज्ञानिकांत नाही.
विज्ञानक्षेत्रात दिसून येणार्या. आणखी एका महत्त्वाच्या गैरसमजाविषयी प्रा. एकल्स यांनी काही विचार मांडले आहेत. हा गैरसमज असा की, “वैज्ञानिकतेचा दर्जा हा संशोधनासाठी वापरण्यात येणार्यास उपकरणांची किंमत आणि त्यांची भारदस्त गुंतागुंतीची रचना यांवर अवलंबून आहे.’ ६०-७० वर्षापूर्वी आधुनिक विज्ञानाचा मुख्य विषय भौतिकीतील अणुरचना व अणूतील सूक्ष्म घटक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व त्यापासून होणारी अणुकेंद्राची निर्मिती हा होता. Nuclear Physics या विषयातील संशोधनासाठी संवेगक म्हणजे accelerators तयार करणे आवश्यक होते. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. गरीब राष्ट्रांना हे न परवडणारे कार्य आहे. पण Nuclear Physics व Quantum Mechanics या क्षेत्रांत आता पुष्कळ प्रगती झाली आहे. बरेच कठीण प्रश्न सुटल्यासारखे झाले आहेत. त्या मानाने रसायनशास्त्र, Neuro-biology व प्राणिशास्त्र, गणितशास्त्र, सैद्धान्तिक भौतिकी (Theoretical Physics) हे अतिशय कमी खर्चाचे विज्ञानातील विषय असून मानवी प्रगतीसाठी त्यांतील प्रश्न सोडविणे फार महत्त्वाचे व आवश्यक असे कार्य आहे. तेव्हा संशोधनासाठी लागणार्याध” यंत्रसामग्रीला अवास्तव महत्त्व देणे योग्य नाही. कमी खर्चाच्या व सोप्या रचनेच्या उपकरणांचा वापर करूनसुद्धा निसर्गातील कठीण समस्या सोडविणे शक्य असते हे लक्षात घेणे आवश्यकआहे. याकडे दुर्लक्ष केल्यास प्रा. एकल्स यांच्या शब्दांत, “There can be a competition to spend beyond all reason and a display of equipment for its own sake, and not in relation to the requirements of scientific investigation. The enslavement to equipment brings in its train the disease in which the experiments being performed are chosen by the equipment and not by the investigator”.
आधुनिक विज्ञान हा आता मानवी संस्कृतीतील एकंदर ज्ञानसंचयाचा एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. त्याचा वापर करून मानवी व्यवहारात अनेक सुविधा, सुखसोयी निर्माण करणे शक्य होते. पण म्हणून विज्ञानाचे ज्ञान, स्वरूप व सुविधांचे तांत्रिक स्वरूप यांतील मौलिक भेद नाहीसा होत नाही.“Confusing Science with Technology” असे वर्णन प्रा. एकल्स यांनी विज्ञानक्षेत्रात दिसून येणार्याn या दोषाचे केले आहे.
प्रा. एकल्स यांनी म्हटले आहे की अहंकारी वृत्ती (arrogance) हा वैज्ञानिकांमध्ये ठळकपणे दिसून येणारा दोष आहे. एकाच विषयात संशोधन करणार्याa वैज्ञानिकांत सामोपचाराची, दुसन्याचेही संशोधन व निष्कर्ष खरे असू शकतील ही भावना दिसून येत नाही. हे हानिकारक आहे. शास्त्रीय संशोधनाचे एकमेव ध्येय निसर्गविषयक सत्य शोधून काढण्याचेआहे. शास्त्रज्ञांच्या अहंकारी वृत्तीमुळेच विज्ञानक्षेत्रात हेवेदावे, आधी शोध कोणी लावला (priority) याविषयी वादंग, मत्सरी वृत्ती इ. निर्माण होतात आणि एकंदर वातावरण दूषित होते. हेकेखोरपणा (dogmatism) हा पूर्वी धर्मशास्त्रज्ञांत (theologians) दिसून येणारा दोषआता वैज्ञानिकांत दिसून येतो. एकल्स यांच्या शब्दांत, “It is important to realize that dogmatism has now become a disease of scientists rather than of theologians. Popper would remind us that we have to be humble and recognize the limitations of our most penetrating efforts to understand nature. . .” पॉपर यांनी वैज्ञानिकांना सूचना दिली आहे की त्यांनी सामोपचाराची, विनम्रतेची व शालीनतेची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी विज्ञान-शाखेतील काही प्रश्नांची उत्तरे दिलेली असतात. ती पूर्णपणे निर्णायक स्वरूपाची असतीलच असे नाही. त्यांत पुढील संशोधनामुळे बदल होणे नेहमीच शक्य असते. पॉपर यांनी तीन शब्दांत खन्या वैज्ञानिकतेचे वर्णन केले आहे : Problems : Theories : Criticism, यांतील शेवटचा शब्द, criticism महत्त्वाचा आहे. साधक-बाधक चर्चा, निरीक्षण व प्रयोग, खुले मन ठेवून केल्यानंतरच निसर्गविषयक सत्य हाती लागते.
दुसर्यान एका महत्त्वाच्या व्याधीविषयी प्रा. एकल्स यांनी काही विचार मांडले आहेत. ती व्याधी म्हणजे, “Materialistic or Mechanistic Philosophy adopted by so many scientists, who reject or ignore all the phenomena of consciousexperience and thus display a complete misunderstanding of the working of the brain, which all must agree is essentially concerned in Science”. प्रा. एकल्स यांनी या शब्दांत त्यांच्या स्वत:च्याच संशोधनक्षेत्राचा – मानवाचा मेंदू – आणि वैज्ञानिकता यांमधील निकट संबंधाकडे लक्ष ओढले आहे. याविषयी लिहिताना त्यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. ते म्हणजे “I am reminded of some physical scientists who facetiously regard life as but a disease of matter and would restrict the scope of science to the inorganic world!” 379ft वैचारिक वृत्ति ठेवली तर सर्व इंद्रियगोचर अनुभव, त्यांबद्दलची मेंदूत कोरलेली स्मृती, तसेच कल्पनाशक्ती, सारासार विचार करण्याची पात्रता हे सर्व संज्ञेशी संबंधित कार्य (conscious activity) यांना विज्ञानक्षेत्रात स्थानच मिळणार नाही. हा विज्ञानक्षेत्रातील फारच मोठा दोष
आहे असे म्हणावे लागेल.
पण गेल्या दोन-तीन दशकांत अशी अतिरेकी वृत्ति (extremist attitude) विज्ञानक्षेत्रातून नाहीशी होत आहे. जैविक शास्त्रांचे (life sciences) महत्त्व वाढत आहे. Molecular Biology व Bio-Technology हे सध्या विज्ञानक्षेत्रातले फार महत्त्वाचे विषय समजले जातात. मानवी उत्क्रांति व उन्नतीसाठी या विषयांतील संशोधनाची फार गरज आहे हे आता सर्वमान्य होत आहे. भविष्यकाळातील आपल्या समस्या population explosionआणि environmental pollution या असणार, विज्ञानातूनच यांवर उपाययोजना करणे शक्य होईल.
ज्याला आपण आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान (Modern Science and Technology) म्हणतो त्याचा खरा प्रारंभ इंग्रजी अमदानीपासून व इतर पाश्चात्त्य पुढारलेल्या राष्ट्रांशी संबंध आल्यावर झाला हे मान्य करावे लागेल. म्हणून मानवी प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे ज्ञानाचे क्षेत्र नव्यानेच विकसित होत असताना, ते सर्व प्रकारच्या व्याधींपासून, दोषांपासून अलिप्त ठेवणे हे शासनाचे, शासकांचे, पण मुख्यत: वैज्ञानिकांचे कर्तव्य आहे. यासाठीच कार्ल पॉपर व जॉन एकल्स यांसारख्या अनुभवी, श्रेष्ठ विचारवंतांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करणे अगत्याचे असते.
संदर्भ :
१. K. Popper and J. Eccles : The Self and its Brain (1977) (Springer International)
२. J. Eccles : Facing Reality (Springer International)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.