विक्रम, वेताळ आणि अप्रिय उत्तरे

राजा, आता तू मला गोंधळवण्यात पटाईत व्हायला लागला आहेस. पण अजून या ‘असली घी’ खाल्लेल्या ‘पुरान्या हड्डीत’ तुला बांधून ठेवण्याइतकी अक्कल आहे!” वेताळ म्हणाला. राजा मिशीतल्या मिशीत हसत वाट चालत राहिला.
‘राजा, माझ्या घराजवळ एक बंगला आहे. त्याच्या आवारात नोकरांसाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत. बंगल्यात एक सुखवस्तू, सुस्वभावी कुटुंब गेली तीसेक वर्षे राहात आहे. ते बंगल्यात आले तेव्हा त्यांनी एक महादेव नावाचा नोकर ठेवला. अशिक्षित, पण कामसू. मुळात महादेव एकटाच होता, पण यथावकाश त्याने पार्वती नावाच्या बाईशी लग्न केले. साताठ वर्षांत त्यांना मुलगा, मुलगी, मुलगा, मुलगी अशा क्रमाने चार मुले झाली. बंगल्यातील बाईंनी दुसन्या अपत्यानंतर महादेवास नसबंदी करून घेण्याचे सुचवले, पण ‘मर्दानगीच्या काही भ्रामक समजुतीपोटी महादेवाने तो सल्ला झिडकारला. चौथ्या अपत्याच्या वेळी मात्र त्याने पार्वतीवर नसबंदीपेक्षा जास्त त्रासदायक अशी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करवून घेतली!
“कुटुंबीयांची संख्या एकापासून सहावर जात असताना महादेवाचा पगार मात्र सहापट झाला नाही, कारण पगार हा गरजांवर अवलंबून ठरवायची पद्धत नसते”. पण महादेव एक जबाबदार कुटुंबप्रमुख होता. बागेला पाणी घालणे, आवारातील केरवारे करणे, किरकोळ डागडुजीची कामे करणे, असे करत त्याने उत्पन्न वाढवायचा आटोकाट प्रयत्न केला. पण तरी त्याच्या कुटुंबाचे दरडोई उत्पन्न खालावतच गेले.”
विक्रमाच्या मनात ‘माल्थस’ हा एक शब्द आला आणि गेला.
“उत्पन्न वाढवायचे वैध मार्ग चोखाळल्यावर महादेवाने किरकोळ अफरातफर करणे सुरू केले. बाजारातून सामान आणताना बाईंचे आठ-बारा आणे ‘मारणे, रद्दी व डबे-बाटल्या परस्पर विकणे, असे या अफरातफरीचे रूप होते. एकदा हे बाईंच्या लक्षात आले व त्या महादेवास बरेच अपशब्द बोलल्या. पण महादेवाची नोकरी मात्र टिकली, कारण तो घरकाम, थोडेसे बागकाम, थोडेसे सफाईकाम, अशी तिहेरी कामे करीत होता.”
“बाईंच्या नवर्या.ला रागावण्याने पार्वती कष्टी झाली व तिने महादेवास सुचवले की आपणही कामे शोधतो, पण येथे पुन्हा एकदा महादेवाची ‘मर्दानगी’ आड आली, व माझे हातपाय चालतात तोवर माझी लक्ष्मी धुणेभांडी करणार नाही”, असे त्याने ठामपणे पार्वतीस सांगितले.
राजाने एक दीर्घ नि:श्वास टाकला.
अशिक्षित आईबापांची मुले सहजपणे शिक्षणात यशस्वी होत नाहीत, या अनुभवाला” महादेव-पार्वतींची मुले अपवाद नव्हती. मोठी दोन मुले दहावीपर्यंत तर सरळपणे पोहोचली, पण ती परीक्षा मात्र पास होईनात. शेजारच्या बंगल्यांमधील मुलांच्या प्रभावाने या मुलांच्या कपडे वगैरें बाबतच्या आवडीनिवडी मात्र महागड्या होऊ लागल्या.”
राजा मनात ही कथा पुढे नेऊ लागला. मोठ्या मुलीचे ‘अकाली’ लग्न, मोठ्या मुलाने काळाबाजार करायला लागणे, वगैरे.
“पण राजा, याच वेळी दारिद्रय, कुपोषण, ताण वगैरेंच्या परिणामांची परिसीमा होऊ लागली. धाकटी दोन मुले तर रोगट, दुर्बल होतीच, पण महादेवावर कामाचा असह्य ताण येऊ लागला. वयाच्या चाळीस-पंचेचाळीस या टप्प्यावर महादेव लहानशा आजारानंतर मरण पावला.”
राजाच्या मनातील गोष्ट जराशी बदलली. मोठ्या मुलीचे लग्न होण्याऐवजी तिला गुंडांनी पळवून नेले, मुंबईतील वेश्यावस्तीत.
“जर ही हिंदी सिनेमाची कथा असती, तर महादेवाचा मोठा मुलगा सिनेमा-तिकिटांचा काळाबाजार करणारा व मोठी मुलगी वेश्या झाली असती”, हे वेताळाचे वाक्य ऐकून राजाने जीभ चावली!
पण झाले वेगळेच. महादेव घरात करीत असे ती सर्व कामे पार्वतीकडे त्याच पगारावर आली. धुणीभांडी करण्यासाठी बाई मोठ्या मुलीला पगार तर देऊ लागल्याच, पण तिच्या शिवणाच्या वर्गाची फी देखील भरू लागल्या. मोठ्या मुलाकडे बागेला पाणी घालण्याचे काम पगारदारीने आले, व सोबतच त्याच्या माळी कामाच्या प्रशिक्षणाचा खर्च बाई देऊ लागल्या. पार्वती व तिची मुले निर्व्यसनी व कौटुंबिक जबाबदारी ओळखणारी तर होतीच, पण मानीही होती. त्यांनी शिवणकाम-माळीकाम या शिक्षणाचे खर्च बाईकडून घेतलेली ‘उचल’समजावी असे ठरवले”!
राजाच्या डोळ्यांत पाणी तरळले.
मोठी दोन मुले शिक्षणाच्या नावाखाली जो वेळ वाया घालवीत होती, तो आता “उत्पादक’ झाला. एका माणसाची कामे तीन जणांमध्ये विभागली गेल्याने कामाचा ताण कोणावरच नव्हता. उलट ज्यादा वेळेचा वापर करून तिघेही जण शेजारील बंगल्यांमध्ये कामे करू लागले. पाहता पाहता कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट झाले, ज्यातून बाईची उचल सहजी फेडली गेली. सर्वात आश्चर्य म्हणजे स्वत: पैसे कमावणे, वापरणे याची सवय झाल्यावर दोन्ही मोठी मुले काठावर का होईना, दहावी पास झाली!”
“राजा, तुला वाटेल की या सुखात्म टप्प्यावर गोष्ट संपेल, पण तसे नव्हे, आता घरातील लोकांस पोटभर अन्न मिळत होते”. महादेवाच्या काळातले कुपोषण संपले होते. पण सर्वांत धाकट्या मुलीबाबत मात्र उशीर झाला होता. तिचे आरोग्य इतके खालावले होते कीगोक्रासारख्या बालसुलभ आजाराने ती मरण पावली. आता उत्पन्न दुप्पट तर माणसे सहाऐवजी चारच उरल्याने दरडोई उत्पन्न थेट तिप्पट झाले. घरात ‘गॅस’ आला. सध्या ‘किमान गरज मानला जात असलेला ‘कृष्ण-धवल’ दूरदर्शन संच आला. मोठ्या मुलीचे लग्न ठरले आहे. व पैसेही कर्ज किंवा उचल न घेता ते पार पडणार आहे. ती मुलगी घराबाहेर पडल्यावर ती करत असे ती कामे तिचा धाकटा भाऊ करणार आहे. राजा विक्रमा! जागा आहेस ना?की अनपेक्षित सुखान्त भावाने बेशुद्ध झालास?”
राजाने वेताळाला धक्का देऊन आपल्या जागेपणीची ग्वाही दिली.“तर आता प्रश्न असा, की मी हे तुला काय सांगत आहे”?
तू मला रूपकात्मक पद्धतीने जपान, कोरिया, तायवान, सिंगापूर वगैरे देशांच्या सध्याच्या सुस्थितीचा इतिहास सांगून डिवचले आहेस.” राजा विक्रमादित्य उत्साहाने म्हणाला.
वेताळ त्यांचे ‘पेटंट’ हसू हसला व म्हणाला, “पण तू माझ्या प्रश्नाचा एकच भाग ऐकलास, बरे! आता पुढचा भाग ऐक. तुला पार्वतीचे कुटुंब आणि जपानादि ‘आशियाई वाघ यांच्यात कोणकोणती साम्यस्थळे दिसतात?”
राजा बोटे मोजीत म्हणाला, “लोकसंख्या-नियंत्रण, स्त्रियांना उत्पादक कामासाठी योजणे, म्हणजे ‘घरची लक्ष्मी’ न म्हणता ‘कैकेयी’ म्हणणे! शिक्षणात व्यावहारिक-व्यावसायिक अंगांना प्राधान्य देणे.” राजाचा मोजण्याचा वेग कमी होऊ लागला.“आपल्या उत्पादकतेला घराबाहेरची, निर्यात करायची सोय करणे”. उलट स्वत: मात्र आवश्यक ती उत्पादक ‘कॅपिटल गुइजच’ घेणे. राजाची मोजणी बंद पडली.
वेताळाने घोड्याला मारावी तशी राजाला टाच मारली!“हं! पुढे! पुढे!’ राजा मात्र गप्पच राहिला.
“हे उदारमतवादी, मानवतावादी, स्वाभिमानी, लोकतांत्रिक राजा, बोल!, बाईंनी दिलेल्या उचलीबद्दल आणि संरक्षणाबद्दल बोल. बाईच्या सुशिक्षित सल्ल्याला नाकारणाच्या ‘महादेवी वृत्तीच्या नाहीसे होण्याबद्दल बोल. हे सारे जर न बोलशील, तर राजा, तुझे उत्तर अपुरे
ठरेल!”
राजाची जीभ रेटेना, हे सर्व निघृण घटक मोजायला. त्याला एक तृतीयांश माणसे मरूनच उरलेली समृद्ध होतील असे म्हणवेना. घरच्या लक्ष्मीच्या हातात केरसुणी देतानाही त्याची जीभ आक्रसत होतीच. कैकेयीत सद्गुण होते हे माहीत असूनही तिचा उल्लेख करताना तो अडखळला होता. घरी मौजमजा न करता आपल्या ‘सेवा’ बाहेर विकणेही त्याला आवडले नव्हते.
“सॉरी, मिस्टर वेताळ. माझे उत्तर आहे तिथेच संपव, जर तुला ते अपूर्ण वाटले, तर परत झाडावर जाऊन उलटा लटकत रहा. हा मी आलोच तुला न्यायला!”, राजा म्हणाला.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.