स्फुट लेख

एक शहाणा प्रयोग
क) शेतमालाच्या किंमती १९७७ ते १९९८
ज्वारी ‘स्वस्तावली
१९७० १९९८
१०० किलो ज्वारी = १,००० किलो सीमेंट २०० किलो सीमेंट
= २०० किलो लोखंड ४० किलो लोखंड
= ४०० लिटर डीझेल ५० लिटर डीझेल
= ११ ग्रॅम सोने १.५ ग्रॅम सोने
= १,००० किलो ऊस १,००० किलो ऊस
= २० किलो द्राक्षे ५० किलो द्राक्षे
म्हणजे ज्वारी, ऊस यांची किंमत तर घटलीच, पण द्राक्षांची किंमत थेट कोसळली. भाजीपाला दूध यांचेही असेच झाले.
ख) ज्वारी पिकवणारा तगला कसा? घरातल्या बायकापोरांना, गाईबैलांना, जमिनीला, भूगर्भातल्या पाण्याला आणि द्रव्यांना लुटून कारण हे घटक शेतक-यापेक्षाही कमकुवत!
ग) ही वाट कुठे जाते? पर्यावरणीय संकटे, ऊर्जा संपुष्टात येणे, औद्योगिक मंदी, बेकारीत वाढ, असंतोषात वाढ, ‘कठोर’ हुकूमशाही ‘प्रहार-छाप’ उत्तरे शोधण्यात वाढ, अराजक,
(वरील घटनाक्रमाची उदाहरणे शोधणे कठीण नाही – रोजची वर्तमानपत्रे अशी उदाहरणे वाढत्या संख्येने पुरवीत आहेत — दोष सरकारचे अस्थैर्य, भ्रष्टाचार, विरोधी पक्ष वगैरे घटकांवर ढकलीत.)
उपाय
प्रयोग परिवार, सोलापूर–हरित वसाहत मु. पो. अंकोली (भैरोबाची), ता. मोहोळ, जि. सोलापूर पिन कोड ४१३२५३ (फोन ०२१८९-४०२४४)
किंवा : प्रा. बी. के. धोडे, तुळपुळे बिल्डिंग, नंदादीप हॉस्पिटलजवळ, फयुसन कॉलेज रोड, पुणे ४११ ००५ (फोन ०२१२-२२५८२१)
वरील पत्त्यांवर ज्यांच्याशी संपर्क साधता येईल असे लोक १२ ते १८ वर्षे वयाच्या मुलांसाठी वर्षातून ५० दिवस असा ४ वर्षांचा अभ्यासक्रम आयोजित करीत आहेत. या अभ्यासातून मुले हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, संपर्क, दळणवळण, संरक्षण या विषयांमध्ये वैज्ञानिक साक्षरता कमावतील. यासाठी पहिली दोन वर्षे विद्यार्थ्यांकाठी. वर्षाकाठी रु. ३,०००/- शुल्क आहे. नंतर ‘कमवा आणि शिका’ तत्त्वावर शुल्क आकारणी थांबेल.
हा कार्यक्रम १ मे १९९८ ला सुरू झाला.
आम्ही आयोजकांना सुयश चिंतितो आणि आजच्या सुधारकाच्या वाचकांना आवाहन करतो, की विद्यार्थी उभे करावे, विद्यार्थ्यांचे पालकत्व घ्यावे, मूळ संस्थेचे परिपत्रक मागवून त्याच्या प्रती काढून प्रसार-प्रचार करावा.

रेकी-टी.टी.
माणसांच्या शरीरांभोवती काहीतरी ‘ऊर्जा क्षेत्र असते, ही कल्पना तशी जुनी आहे. थिऑसोफिस्ट अशा ‘ऑरा’ (aura), त्यांचे रंग आणि आकार, या रंगांचा आणि आकारांचा माणसांच्या स्वभावांशी आणि आरोग्याशी संबंध वगैरे बॉबींमध्ये बराच रस घेत असत. काही विशिष्ट तंत्रे वापरून या ऊर्जा क्षेत्रांची छायाचित्रे घेता येतात, असेही दावे केले जात असत.
याचीच एक जपानी आवृत्ती रेकी’ किंवा ‘रीकी (Reiki) या नावाने आजकाल गाजते आहे. या रेकीच्या तंत्राने आजारी माणसाच्या शरीराभोवती ऊर्जा क्षेत्र ‘हाताळून मानसिक व शारीरिक व्याधी बया करता येतात, असे ‘रेकीवादी सांगतात. कोणत्याही व्यक्तीस ही तंत्रे शिकता येतात, व अशी तंत्रे शिकविण्यासाठी ‘फी घेणारे अभ्यासवर्ग सगळीकडे फोफावत आहेत.
“ऊर्जा” (एनर्जी energy), क्षेत्र (फील्ड, field) या काटेकोर भौतिकीतल्या संज्ञा वापरून या प्रकारामागे काही विज्ञान आहे, असा अभ्यास उत्पन्न केला जातो. पण भौतिकीत माहीत असलेली क्षेत्रे व ऊर्जा उपकरणांनी मोजता-तपासता येतात. माणसांभोवतीची ही ऊर्जा क्षेत्रे मात्र अशी मोजता, पाहता येत नाहीत. यावर रेकीवादी म्हणतात, “तुमच्या क्षीण वैज्ञानिक व्याख्या-उपकरणांना ‘दिसत नाही, म्हणून एखादी गोष्ट अस्तित्वातच नाही, हे कशावरून ? असे मानणे हे अत्यंत कोत्या विचारसरणीचेच निदर्शक आहे. आमची तंत्रे वापरणारे ऊर्जा क्षेत्रे ओळखू शकतात, येवढेच नव्हे तर त्यांच्यात बदल करून मनाचे, शरीराचे ‘प्रश्न सोडवू शकतात. हवे तर अनुभव घेऊन पहा!
इथे दावा दोन भागांत आहे-रेकीवादी व्यक्तीलाच ऊर्जा क्षेत्र समजणारे उपकरण मानावे, हा पहिला भाग. अशी उपकरणे जखमा लवकर भरून येणे, वेदना कमी करणे, ताप ‘उतरवणे व इतरही गोष्टी करू शकतात. हा दुसरा भाग.
रेकीची एक मवाळ अमेरिकन आवृत्ती आहे. स्पर्शोपचार’ किंवा ‘थेरप्यूटिक टच (Therapeutic Touch) उर्फ ‘टी टी’. या तंत्राचे उपासक शस्त्रक्रियांच्या वेळीसुद्धा आपले तंत्र खूप उपयुक्त असल्याचे सांगतात. उपचार करणारे सुमारे सत्तर डॉलर (रु. २,८००) प्रति तास, या दराने फी आकारतात.
एका अकरा वर्षाच्या एमिली रोजा (Emily Rosa) नावाच्या शाळकरी मुलीने या टीटीचा फुगा नुकताच फोडला आहे. हिची आई ‘नर्स’ आणि वडील सांख्यिकी जाणणारे आहेत. शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून एमिलीने एक विज्ञान प्रकल्प केला. टीटी-तज्ज्ञ व्यक्तीला एका पडद्याआड बसवले. पडद्यात दोन छिद्रे होती, ज्यातून या व्यक्तीने आपले दोन्ही हात पलिकडच्या बाजूकडे न्यायचे असतात. मग या दोन हातांपैकी एका हाताजवळ एमिली आपला हात नेत असे, सुमारे इंचभर अंतरापर्यंत. मग ‘टीटी’ व्यक्तीने कोणत्या हाताजवळ दस-या व्यक्तीचे ‘ऊर्जा क्षेत्र आल्याचे जाणवले, ते सांगायचे, असा हा प्रयोग रचलेला आहे. आपण कोणत्या हाताजवळ आपला हात न्यायचा, हे एमिली स्वैर निर्णय प्रणालीने ठरवीत असे (उदा. नाणे उडवून).
टीटीवाल्यांची उत्तरे तपासली असता स्वैरपणाने जितक्या वेळा त्यांना योग्य उत्तर समजणे शक्य होते. तितक्या वेळा त्यांची उत्तरे बरोबर आली. याचा अर्थ असा की कोणीही टीटी-अनभिज्ञ व्यक्तीने पडद्याआड नाणी उडवून उजवे-डावे ठरवले असते, तरीही टीटीवाल्याइतक्याच वेळा उत्तरे बरोबर आली असती! आता जिथे ऊर्जा क्षेत्रे ओळखण्यातच इतका कमकुवतपणा आहे. तिथे त्या क्षेत्रांना ‘दुरुस्त करणे वगैरे दावे तर फोलच मानायला हवेत.
एमिलीच्या आईवडलांनी तिला प्रयोग रचणे, त्याच्या निष्कर्षांचे अर्थ काढणे, वगैरे बाबतीत मदत केली असेल, याचे भांडवल करून या प्रयोगाबद्दल शंका व्यक्त केली जात
आहे. आता प्रयोग, त्याचे निष्कर्ष वगैरेंना शंकास्पदच ठरवायचे, तर हा हल्ला सर्वात निरर्थक आहे. प्रयोग रचणे, करणे, त्याचे अर्थ लावणे. यातला कोणताच भाग व्यक्तिनिष्ठ नाही. जर कुठे व्यक्तींमुळे दोष उद्भवत असेल, तर दोष हटवणेही सहज शक्य आहे. पण जर टीटी-तज्ज्ञांची उत्तरे स्वैर निर्णय प्रक्रियेइतकीच बरोबर असतील, तर ताशी सत्तर डॉलर्स कोण देणार?
‘गणिताच्या क्षेत्रातील आश्चर्य म्हणून स्वतःची जाहिरात करणा-या शकुंतलादेवीही त्यांच्या अर्थार्जनाच्या तंत्राला आव्हान दिले तेव्हा नागपूर सोडून पळाल्या होत्या. विद्युत् वेगाने ‘हिशोब करता येणे फार नवलाचे नाही. कान हलवू शकणे, जीभ तोंडातून बाहेर काढताना उभी करणे, यासारखाच तो प्रकार आहे. त्याचे कौतुक करणे, तसल्या ‘शो’ ना तिकीट काढून जाणे, हेही करायला हरकत नाही. पण शकुंतलादेवी कुंडलीच्या अभ्यासासाठी पैसे घेतात यावरून फिर्याद करण्याची धमकी देताच त्या पळाल्या. जर टीटीचे उपासक ‘दिलेल्या सेवेचा मोबदला मागत असतील, तर तो थेट फौजदारी गुन्हा होऊ शकतो.
रेकी, टीटी वगैरे तंत्रे वापरणान्यांनी तंत्रे शिकविण्याकरता पैसे घ्यावे —-
वापरण्याकरता नव्हे. पण वापरण्याच्या पातळीवर नापास होणारे तंत्र शिकवायला पैसे घेणेही गुन्हा या सदरात येते काय ? कोण्या वकिलाने यावर कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.