संग्राह्य पुस्तके

संग्राह्य पुस्तके
संपादक, आजचा सुधारक
खालील दोन पुस्तके संग्रही असावयास हवीत. .
(१) राजेश्वर दयाळ A Life of Our Times प्रकाशक – Orient Longmans
(२) अनिल अवचट – अमेरिका, प्रकाशक – कोठावळे
तसेच खालील दोन लेख वाचकांनी जरूर संग्रही ठेवावेत. दहा रु. पाठविल्यास मी त्या लेखाच्या झेरॉक्स पाठवीन.
(१) शिवाजीच्या स्वराज्य-चळवळीमागील ऐतिहासिक प्रेरणा धार्मिक होत्या काय? लेखक – वा. द. दिवेकर – नवभारत – एप्रिल १९८६.
(२)न झालेल्या (तळपद्यांच्या) विमानोड्डाणाची सुरस विद्वत्-कथा लेखक श्री. गो.ग. जोशी – लोकसत्ता – ता. १८-६-१९७८.
सर्वसाधारणपणे हल्लीच्या राजकीय पुढान्यांची मते ग्राह्य धरण्याऐवजी एखाद्या विषयाला समर्पित करून त्या विषयाचा अभ्यास करणा-यांचे विचार जास्त विश्वासार्ह असतात. उदा. शिवशाहीर पुरंदन्यांपेक्षा सेतुमाधवराव पगडींचे वाङ्मय वाचावे. जगमोहनच्या काश्मीरपेक्षा पगडींचे काश्मीर वाचावे.
आपला
केशवराव जोशी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.