सर्वच त्या वातावरणाचे कैदी

… अॅबे दुब्वाने* म्हैसूर व दक्षिण भारत यांवरील आपली नजर काढून जवळच उत्तरेकडे जर ती लावली असती तर त्याच्या ज्ञानात जास्त भर पडली असती. व्यक्तीप्रमाणे एखादा समाजदेखील आपल्या जीवनप्रवासात पुष्कळ वेळा आगंतुक कारणाने देखील वाट चुकून आडमार्गास लागतो. एकदा आडमार्गास लागला म्हणजे कालांतराने त्या समाजाभोवती त्या परिस्थितीस अनुरूप असे पारंपरिक मानसिक वातावरण अस्तित्वात येते. मग वैयक्तिक व सामाजिक जवाबदारी यांचा भेद लयास जाऊन सर्वच त्या वातावरणाचे कैदी होऊन वसतात याचा पुरावा महाराष्ट्राच्या इतिहासात चांगलाच प्रत्ययास येतो. एका युगपुरुषाच्या नेतृत्वामुळे मराठी समाजात एकोपा व स्वातंत्र्य यांचे अननुभूत वारे खेळू लागले. एक-दीड शतकभर त्यांनी उल्लेखनीय कर्तृत्व व मर्दुमकी गाजविली. .

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.