सामाजिक कार्यकर्ता-परस्पर-संवाद

[आमचे मित्र श्री. तारक ,काटे ह्यांनी चार महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीचा अहवाल आमच्याकडे पाठविला. अहवाल वाचल्यानंतर अशी कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची प्रेरणा त्यांना कशी काय झाली असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्याला त्यांनी जे उत्तर दिले ते, आणि त्यांच्या बैठकीचा निष्कर्ष आजचा सुधारक च्या वाचकांसाठी पुढे देत आहोत. त्यांच्या निवेदनात काही व्यक्तिगत तपशील आलेला आहे पण त्यामुळे त्यांच्या कार्यकलापाचे यथायोग्य आकलन होण्यास साह्य होईल, त्याचप्रमाणे त्यांनी काढलेले निष्कर्प योग्य आहेत वा नाहीत याची चर्चा करण्यास मदत होऊ शकेल असे वाटल्यामुळे तो समग्र वृत्तान्त येथे प्रकाशित करीत आहोत.] संपादक

मी तारक काटे. वय ५१ वर्षे. वैज्ञानिक. पर्यावरणाशी सुसंगत व ग्रामीण क्षेत्राच्या दृष्टीने उपयुक्त अशा सुयोग्य (appropriate) तंत्रज्ञानाची निर्मिती, प्रशिक्षण व प्रसार ह्या संदर्भात गेली १९ वर्षे कार्यरत. हे कार्य प्रथम ‘ग्रामोपयोगी विज्ञान केन्द्र’ व नंतर ‘धरामित्र’ या वर्ध्यातील दोन संस्थांशी संलग्न राहून केले. पर्यावरण, अपरंपरागत (रूढिविरुद्ध) ऊर्जा-स्रोत, शाश्वत शेती, जैवभार उत्पादन व वापर हे आवडीचे विषय.

लहानपणी व महाविद्यालयीन काळात प्रथम साने गुरुजी व वि. स. खांडेकर यांच्या साहित्यातून आणि नंतर साधनेतून समाजवादी संस्कार, सामाजिक जीवनात प्रत्यक्ष काम करण्याची प्रेरणा लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून. १९७५ ते १९८० या काळात नागपूर विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र विषयात पीएच्. डी. करीत असताना आणिबाणीच्या काळात प्रा. सुरेश पांढरीपांडे तरुणांसाठी अभ्यासवर्ग चालवीत. त्या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून जे. पी. च्या विचारांनी भारलेल्या नागपुरातील व विदर्भातील अन्य तरुणांशी ओळख झाली.

१९८० ते १९९४ या काळात ग्रामोपयोगी विज्ञान केन्द्रात वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत असताना देखील विदर्भातील सामाजिक कार्यात गुंतलेल्या या पिढीतील सर्व मित्रांशी सतत संपर्क. किंबहुना या पिढीतील सर्व मित्रांचे परस्परांशी अतिशय अनौपचारिक व हार्दिक संबंध. यातून त्यांच्या जीवनातील चढउतार समजत, सामाजिक कामातील यशापयशाबद्दलही चर्चा होई.

१९९५ पासून वर्थ्यांच्याच ‘धरामित्र’ नावाच्या संस्थेशी जोडून घेतल्यानंतर या संस्थेच्या कार्याचा एक भाग म्हणून विदर्भातील ग्रामीण पातळीवर कार्य करणा-या व विशेषतः लहान आणि नवीन संस्थांना जोडण्याचा प्रयत्न केला. जवळपास २० संस्था या अनौपचारिक साखळीत जोडल्या गेल्या.

वांमध्ये जनजागरणाचे कार्य करणाच्या संस्थांना ‘विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या अंगाने मदत व्हावी हा त्यामागील उद्देश. हे करीत असताना नव्या पिढीतील तरुणांची ओळख झाली. आमच्या पिढीतील तरुणांना या क्षेत्रात येण्यामागे योग्य शैक्षणिक, सामाजिक व शहरी पार्श्वभूमी होती. ह्याउलट या नव्या पिढीतील बरेच तरुण ग्रामीण भागातून आलेले होते, गरिबीची झळ सोसलेले, फार न शिकलेले होते तरीही ग्रामीण भागाच्या विकासाची त्यांना तळमळ होती. माझ्यासारखेच विदर्भातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्री. मधुकर खडसे, हे देखील ह्या तरुणांशी सतत संपर्क ठेवून होते व त्यांच्या कार्यात आपल्या परीने हातभार लावीत होते.

सामाजिक कार्यकर्त्यांचे आर्थिक जीवन तसे असुरक्षितच. परंतु या नव्या पिढीची आर्थिक स्थिती खूपच ओढघस्तीची वाटते. आमची पिढी बरीच उच्च शिक्षित. त्यामुळे आर्थिक मदत देणार्‍या संस्थांच्या मदतीने ग्रामीण विकासाचे विविध प्रकल्प रावविताना त्यांना आपला आर्थिक स्तर मध्यमवर्गीय जीवन जगण्याइतपत ठेवण्यासाठी विशेष सायास पडले नाहीत. परंतु नवीन पिढी कमी शिकलेली असल्यामुळे प्रकल्पलिखाण, देणगीदार संस्थांशी संपर्क या दृष्टीने त्यांचे प्रयत्न तोकडे पडत. त्यामुळे त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचे खूपच हाल होत आणि होतात.
हे सगळे बघत असताना मला प्रश्न पडला की देशात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वाहत असताना व त्यामध्ये अनुस्यूत असलेल्या भोगवादी संस्कृतीकडे समाज वळलेला असताना आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रेरणादायी वातावरण नसताना या तरुणांमध्ये तळाच्या वर्गातील जनसामान्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या उत्थानासाठी कार्य करण्याची ऊर्मी आली कोठून? हे नीट समजून घेण्याची मला गरज जाणवली. या पिढीशी संवाद साधताना तळच्या समाजाचे भले व्हावे हीच त्यांची अंतःप्रेरणा आहे परंतु त्यामागे कुठलेही वैचारिक अधिष्ठान नाही हे जाणवले.

गेल्या काही वर्षांत काही संस्था विदर्भात आपले जाळे पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. देणगीदार संस्थांकडून मोठ्या देणग्या मिळवून त्यांच्या आधाराने सतत बैठका आणि चर्चासत्रे आयोजित करून विशिष्ट प्रश्नांवर जनजागरण केल्याचे त्यांना दाखवावयाचे असावे. समग्र दृष्टीने करावयाच्या सघन कामावर त्यांचा भर नसतो असे म्हणावयाला जागा आहे. केवळ कामाचा प्रसार केल्याचेच समाधान त्यांना मिळवायचे असल्यामुळे त्यांच्या कामाचे स्वरूप व-याच प्रमाणात वरवरचे असते. एका वाजूला त्यांच्या कामाच्या प्रसारासाठी स्थानिक पातळीवर काम करणा-या अशा नव्या कार्यकर्त्यांच्या मदतीची त्यांना गरज असलेली दिसते तर दुस-या बाजूला या तरुणांना देखील आर्थिक विंचनेपोटी व अन्य मार्ग माहीत नसल्यामुळे अशा संस्थांचा आधार घेण्याशिवाय तरणोपाय नसतो. आपल्या कार्याचा मूलभूत उद्देश नीट समजून न घेता, वैचारिक अधिष्ठान पक्के न करता, ही तरुण मंडळी जर आर्थिक प्रलोभनापायी अशा वरवरच्या कार्यात गुंतून राहिली तर त्यांचे नैतिक स्खलन होण्यास वेळ लागणार नाही हेही जाणवून गेले.

विदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांची अशी नवी पिढी उभी राहत असताना आमच्या पिढीतील ब-याच कार्यकर्त्यांना मात्र या नव्या कार्यकर्त्यांची पुरेशी ओळख आहे असे जाणवले नाही. त्यामुळे या दोन्ही पिढ्यांमध्ये संवाद साधणे गरजेचे वाटले. अशा संवादातून परस्परांची ओळख तर होईलच परंतु आपण या क्षेत्रात नेमके का आलो; हे कार्य सुरू करताना आपल्याला नेमके काय अभिप्रेत होते; त्याप्रमाणे किती वाटचाल करू शकलो; सामाजिक कार्यकर्ता व जनसमूह यांचे परस्पर संबंध कसे असावेत; आपल्या कामाचे नेमके स्वरूप कसे असावे; समाज-जीवनाला भेडसावणारे स्थानिक प्रश्न व जागतिक प्रश्न यांचा परस्परसंबंध कशा प्रकारचा असेल वगैरे अनेक प्रश्नांचा मागोवा सामूहिक चिंतनातून व्हावा असे वाटले. एवढेच नव्हे तर समाजपरिवर्तनाची व समाजविकासाची आस बाळगणा-या विरादरीची ही कार्यकर्तामंडळी विखुरलेली न राहता एक समूह म्हणून पुढील वाटचाल करू शकतील काय, त्यासाठी कोणते उपक्रम राववावयास हवेत, त्यांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी या दृष्टीने काय प्रयत्न करावयास हवेत यावरही विचार व्हावा असे वाटले. त्यासाठी विदर्भातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र बैठक घेऊन विचार करावा असे जाणवत होते.

गेले वर्षभर मी मनात आलेल्या या विचारांच्या संदर्भात विदर्भातील नव्याजुन्या कार्यकर्ता मित्रांशी चर्चा करीत होतो. प्रत्येकालाच अशा प्रकारच्या सहचिंतनाची गरज वाटते हे जाणवले. त्यातूनच या बैठकीचे प्रयोजन सिद्ध झाले.

विदर्भ सामाजिक कार्यकर्ता परस्पर संवाद बैठक अहवाल
१.० प्रास्ताविक :
विदर्भातील ग्रामीण भागात लोकजागरणाचे व सामाजिक परिवर्तनाचे काम करणार्‍या मधल्या पिढीतील व तरुण पिढीतील अशा निवडक सामाजिक कार्यकर्त्यांची एक बैठक दिनांक १० ते १२ फेब्रुवारी १९९९ या काळात रवाळा येथे वसंत व करुणा फुटाणे यांच्या कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आली होती. दोन पिढ्यांमधील कार्यकर्त्यांचा परस्पर संवाद व्हावा, अनुभवांची – विचारांची – देवाणघेवाण व्हावी व आतापर्यंत या क्षेत्रात केलेल्या वाटचालीतून पुढील दिशा ठरावी असा ह्या बैठकीचा उद्देश होता.

जवळपास वर्षभरापासून या विषयावर कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू होती व सगळ्यांनाच अशा प्रकारच्या संवादाची गरज वाटल्यावरून ही बैठक आयोजिली गेली. जवळपास ४५ मित्रांना या बैठकीची निमंत्रणे गेली होती. त्यापैकी विदर्भातील २३ कार्यकर्ते या बैठकीस आवर्जून उपस्थित राहिले. श्री. मधुकर खडसे व श्री. दत्ता सावळे हे दोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेदेखील या बैठकीत मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

प्रवासखर्च ज्याचा त्याने करावा व भोजनखर्च सगळ्यांनी वाटून घ्यावा असे ठरले होते. त्याप्रमाणे या बैठकीची व्यवस्था साध्या पद्धतीने, खेळीमेळीच्या वातावरणात, अतिशय उत्तम झाली व कोणा एका व्यक्तीवर यासाठी जादा भार पडला नाही अथवा वारून बैठकीच्या आयोजनासाठी आर्थिक मदतीची याचना करावी लागली नाही.

२.० बैठकीतील चर्चेचे स्वरूप :
प्रारंभी प्रत्येकाच्या मनोगतात आपला वालपणापासूनचा सामाजिक कार्यात सहभागी होण्यापर्यंत प्रवास कसा झाला? प्रेरणा कशी व कुठून मिळली? कार्य करताना काय अडचणी आल्या? आतापर्यंतच्या कामावद्दल काय वाटते? यापुील कामाची दिशा काय असावीं? या मुद्द्यांचा अंतर्भाव असावा असे ठरले. मनोगतांच्या आणि त्यावरील प्रश्नोत्तरांच्या आधारे सगळ्यांच्या वैचारिक प्रवासाचे व लोकमंमधील प्रत्यक्ष कामाचे सार काढून त्यावर चर्चा व्हावी व परस्पर सहकार्याच्या दृष्टीने पुल दिशा ठरविली जावी असे सुचविले गेले.

३.० मनोगतांचे सार :
प्रत्येक कार्यकर्त्याने आपले मनोगत अतिशय मोकळ्या मनाने व्यक्त केले. कार्ड्स मनोगते खूपच ह्य व मनोज्ञ होती. या मनोगतांद्वारे खया अर्थाने परस्परांची ओळख झाली. या मनोगतांचे सार पुढीलप्रमाणे:
i) सध्या ४० ते ५० वर्षे या वयोगटात असलेली मध्यमवयीन कार्यकर्त्यांची फी वयाच प्रमाणात उच्चशिक्षित, वैचारिक पाठवळ घेऊन व काही व्यापक जन आंदोलन वा राजकीय-सामाजिक संदर्भाच्या प्रेरणा घेऊन या क्षेत्रात उतरलेली होती. त्यामुळे त्यांच्या कामाची दिशाझे विचारपूर्वक आखलेली होती. अंगीकारलेले कार्य करताना देखील त्यांना त्यांच्या शैक्षणिक, सांमाजिक व मध्यमवर्गीय पार्श्वभूमीचा लाभ झाला.
ii) ह्या उलट ह्या क्षेत्रात उतरलेली कार्यकर्त्यांची नवी तरुण पिये कमी शिकलेली परंतु अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून व ग्रामीण जीवनातून वर आलेली आहे. त्यांनी गरिवीचे चटके मोठ्या प्रमाणावर सोसलेले आहेत. यामुळेच त्यांना ग्रामीण भागातील परिस्थितीची अतिशय उत्तम जाण आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रेरणादायी वातावरण सभोवती नसताना देखील जनसामान्यंविषयीच्या कळवळ्याने व त्यांचे जीवनमान उंचावण्यास आपला हातभार लागावा या सद्धेतूने त्यांनी या कार्यास वाहून घेतले आहे. सामाजिक कार्य करीत असताना त्यांना आर्थिक अडचणी व असुरक्षिततेची जाणीव या प्रश्नांशी सतत झुनावे लागत आहे.

४.० सहचिंतन :
सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या मित्रांचा प्रवास समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपावर, लोकसहभागावर व जनसामान्यांसोबत काम करताना येणा-या अडचणींवर चर्चा करण्यास आली. यातून काले व्यापक मुद्दे समोर आले. त्यांचे स्वरूप खालीलप्रमाणे:
i) बहुतेक ठिकाणी सेवाभावी संस्थांद्वारे चाललेले ग्रामीण विकासाचे कार्य हे प्रकल्पाधारित आहे. ठराविककायत व विशिष्ट उद्देशाने ते करावयाचे असल्यामुळे अशा कार्याला खूप मर्यादा येतात. संस्थाप्रमुखांच्या व अनुदान देणा-या संस्थांच्या मर्जीवर हे कार्य अवलंबून असल्यामुळे आणि पुष्कळदा या घटकांना गावातील प्रत्यक्ष परिस्थितीचे भान नसल्यामुळेअपेक्षित परिणाम साधला जात नाह्म. सेवाभावी संस्थांच्या स्वतःच्या गरजेपाटी जनकल्याणाचे कार्यक्रम देखील लोकांवर व कार्यकर्त्यांवर, लोकांना त्यांची गरज व त्यांचा सहभाग हे विचारात न घेता लादले जातात.
ii) सेवाभावी संस्थांद्वारे चालविण्यात येणारेग्रामीण उत्थानाचे कार्य एक प्रकारे दानस्वरूप (charitable) असल्यामुळेही या कामास खूप मर्यादा येतात. ग्रामस्थांच्या जाणिवा विस्तृत करून त्यांना स्वयंविकासाची प्रेरणा देण्याऐवजी त्यांचा विकास साधण्याची जवावदारी संस्थांनीच घेतल्याचे रूप त्यास येते. त्यामुळे अपेक्षित लोकसहभाग साधला जात तर नाहीच, परंतु काही प्रमाणात राहणीमानाच्या व साधनसामुग्रीच्या अंगाने विकास साधला गेला तरी लोकांचे संस्थांवरील परावलंबन वाढतच जाते. शेवटी या कामास दातायाचक असेच स्वरूप येते.
iii) संस्थांमध्ये देखील अंतर्गत ताणतणाव असतात व त्यांचा विपरीत परिणाम प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने कार्यक्षेत्रातील सामाजिक कामावर होतो. सुरुवातीला संस्था लह्मन असते तेव्स बंधुभाव व सहकारिता जास्त असते. संस्था जशी मोठी होत जाते तसे संस्थाप्रमुख, वरिष्ठ सहकारी व इतर कार्यकर्ते यामधील अंतर वाढत जाते. परस्पर वेदावे सुरू होतात.
iv) बदललेले, सहानुभूतिशून्य लोकमानस, सामाजिक कार्यास वाहून घेताना घराकडे झालेले दुर्लक्ष व त्यामुळे निर्माण झालेले कौटुंविक ताणतणाव आणि आर्थिक असुरक्षितता अशा तिहेरी गुंत्यात कार्यकर्ता सापडलेला दिसतो.
v) एकूणच आतापर्यंतच्या कार्यांचा भार ह्य ग्रामीण भागासाठी कार्य करण्यावर राहिला. लोकांचे मानस वदलण्यावर व त्यांना परिवर्तनशील करण्यावर राहिलेला नाह्म.
vi) हाती घेतलेल्या कामाच्या स्वरूपामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाचनास, स्वाध्यायास व परिवर्तनाच्या जागतिक संदर्भाशी जोडून घेण्यास वाव मिळत नाही. त्यामुळे स्वतःची जीवनदृष्टी घडविण्यास व त्याआधारे स्वतःच्या कामाचे मूल्यमापन करण्यास वाव मिळत नाही.

५.० काही मुद्द्यांवरील सखोल चर्चा :
सह्मचिंतनातून काही विशेष मुद्दे पुढे आले व त्यांवर सखोल चर्चा व्हावी असे ठरले. झालेल्या चर्चेचे सार पुढीलप्रमाणेः
५.१ लोकसहभाग व पारदर्शकता :
– कार्यकर्ता प्रकल्पाशिवाय कसा उभा राहील यावर भर असावा.
– स्थानिक तरुणांना गावाच्या विकासासाठ तयार करण्याच्या प्रक्रियेवर भर असावा. – शासकीय योजनांची माहिती लोकांना देऊन अशा प्रकारच्या योजना सेवाभावी संस्थांनी राबविण्यापेक्षा अशा योजनांची अंमलबजावणी करताना ती योजना लोकांना खरोखर हवी काय याविषयीची निर्णयप्रक्रिया व त्या योजनेच्या अंमलबजावणीतील लोकांच्या सक्रिय सहभागाचे स्वस्थ ह्यांवर त्या योजनेचे यश अवलंबून असते.
– प्रकल्प तयार करून लोकांकडे जाण्यापेक्षा लोकांमध्ये प्रत्यक्ष काम करून, त्यांच्या आशाआकांक्षा, गरजा व प्रश्न याआधारे काम व्हावेत. मुख्यतः संघटनात्मक कामावर भर असावा, लोकांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या दृष्टीने प्रयत्न व्हावेत.
– गावाशी चर्चा करून गावाच्या विकासासाठी योजना व वजेट तयार करून त्यावर प्रकल्प उभा राहिला तर तो यशस्वी होऊ शकतो.
– जेथे वारून येणारा पैसा व वस्तू स्वरूपातील साधनांची फर गरज नाही अशा प्रकारचे प्रकल्प राबवावेत.
– गावाचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे व ही प्रक्रियाले लांवचीच.
– ग्रामसभा सक्रिय असली तरी सभेला ५०-६०% च्या वर लोक उपस्थित राह्त नावेत असा अनुभव. त्यामुळे लोकसहभाग याच पातळीवरचा समजावा. अशा उपस्थितीमुळेकार्यकर्त्यांनी निराश झेऊ नये. सभेला ७५% उपस्थिती राहत असेल तर ती १००% च समजावी व ग्रामसभा उत्तम सहभागाने चालली असे समजावे.
– लोकांचे मानस बदलणे देखील सोपे नाही. जेथे चांगला प्रतिसाद मिळतो ते गाव, तो लोकसमूह निवडणे आणि तेथील लोकांचा प्रतिसाद कसा वाढेल असा प्रयत्न करणे महत्त्वाचे. ज्या ठिकाणी गावाच्या स्वतःच्या क्षमता असतात अशा गावांचा शोध व त्यांना पूरक काम असे स्वरूप चांगले.
– अशा गावाशी शक्य हेईल तेवढेपारदर्शी राहणे गरजेचे. गावाचा विश्वास मिळवण्यासाठी गावाच्या प्रश्नांशी, भावजीवनाशी एकरूप होणे आवश्यक असते. त्यासाठी कार्यकर्त्याला योग्य वेळ देता आला पाहिजे.
– संस्थेच्या कार्यात, निर्णयप्रक्रियेत कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
– कार्यकर्त्यांचे वैयक्तिक जीवनवे पारदर्शी असावयास हवे. त्याच्या आचारविचारात योग्य नीतिमूल्यांचे प्रतिबिंब दिसावयास हवे. ही पारदर्शकता संस्था-संचालकांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वत्र दिसावयास हवी.
५.२ कौटुंबिक ताणतणाव :
सामान्यपणे कार्यकर्ता सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करतो. केळकाळचे वंधन न पाळता समर्पित भावनेने हे काम करीत असल्यामुळे त्याचे घराकडे व कुटुंबसदस्यांकडे खूप दुर्लक्ष होते. सार्वजनिक कामापायी कुटुंबाची आर्थिक ओद्यताण व भावनिक कुचंबणा होते. विशेषतः सहचारिणीला याचे खूप चटके भोगावे लागतात. विघडलेल्या भावनिक स्वंदाचा सार्वजनिक कार्यावर निश्चितच विपरीत परिणाम होतो. टुवक ताणतणाव असतील तर वैयक्तिक, चैटुंविक वा सामाजिक असा कुठलाच विकास साधला जाऊ शकणार नाह्म. म्हणून सार्वजनिक कार्य करताना देखील कुटुंब व बाहेरचे काम ह्यांत संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
– यासाठी सामाजिक कामासोवतच आपल्या जोडीदारास योग्य वेळ देणे, त्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यास समाजात काम करताना देखील ताण सोसावे लागतात. त्याचे भावजीवन समृद्ध असेल तर त्याच्या कार्यात कुटुंबीयांचा व विशेषतः सहचर / सहचारिणीचा खंबीर पाठिंबा असेल तर हे ताण सोसणे सहज शक्य होते. अन्यथा कार्यकर्ता देखील भावनिकदृष्ट्या खचतो व वैफल्यग्रस्त होतो.
– सार्वजनिक कार्यास वाहिलेल्या कार्यकर्त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असते. आहेत्या परिस्थितीत योग्य काटकसर करून त्याला दिवस काढवे लागत असतात. त्यासाठी पूर्ण कुटुंबाला विश्वासात घेणे व कुटुंबीयांच्या सामूहिक निर्णयातून खर्चाचे व गरजांचे नियोजन करणेह्न आवश्यक असते.
५.३ आर्थिक स्वावलंबन :
या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळे मुद्दे पुढे आले.
– लोकमानसात बदल घडविणे, हा आपला उद्देश असेल तर ही मुळतच सावकाश होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे सामाजिक कार्य कोणत्या अर्थाने पूर्णवेळ कार्य असावे काय? त्यामुळेच समाजसेवा हेअर्थार्जनाचे साधन असावे काय? पूर्णवेळ सामाजिक कार्य यापेक्षा अर्धवेळ सामाजिक कार्य ही संकल्पना का स्वीकारू नये?
– कौशल्याच्या आधारे व्यवसाय करून आर्थिक स्वावलंबन साधणे हे पूर्ण वेळचे बम आहे. त्यामुळे सामाजिक कार्य सांभाळता सांभाळता अर्थाजन करून पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे कठीण आहे.
– अर्थार्जनासाठी ज्याला जी आवड आहे, त्यातूनच गरजेपुरते अर्थाजन व्ह्मवे लागेल. आवड नसली तरी काही गोप्टी अर्थार्जनासाठी मूल्यांशी तडजोड न करता स्वीकाराव्या लागतील.
– व्यक्तीचे प्रश्न व युगप्रश्न जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ख-या अर्थाने आपण पर्याय शोधू पाहतो. त्यांतून नवी जीवनशैली पुढे येते. युगप्रश्नांना सामोरे जाण्याचे जे काम हाती घेऊ त्यातूनच अर्थार्जनाची र्ती घेण्याची साधने सापडतील. उदा. पर्यायी वाजारपेठेची निर्मिती.
– आपण अंगीकारलेले सामाजिक कार्य देखील पुनःपुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. आपण आपली शक्ती आपल्या कामात घालतो. परंतु त्यासाठीचे आर्थिक नियोजन दुसरीकडून होते व आर्थिक स्रोत जेथून येतो त्यांच्या तालासुरावर आपल्या कामाचे स्वरूप ठरते. एक प्रकारे आपले शक्तिसाधनरूपी भांडवल मृतप्रायच (dead investment) होते. यावर उपाय म्हणून आपल्या शक्तिसाधनरूपी भांडवलातूनच आपले अर्थाजनसुद्धा साधले जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
– युगप्रश्नांच्या संदर्भात नवी नवी स्फुरणे पुढे आलेली दिसतात. त्या आधारे आपले सामाजिक कार्य पुनः पुन्ह्य तपासून वघण्याची व आपल्या कामाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. मनुष्य व निसर्ग’ आणि ‘मनुष्य व मनुष्य’ परस्परसंबंध हे आजचे खरे युगप्रश्न आहेत.
– उत्पादनप्रक्रियेत देखील जसा बदल होत आहे तसा आजच्या बाजारव्यवस्थेतद्धा बदल होत जाईल. देशात या संदर्भात होणारे प्रयोग बघावेत व त्या अनुषंगाने आपल्या व सहका-यांच्या कामाचे मूल्यांकन दरवर्षी झवे.
– केवळ चर्चा करूनच मार्ग दिसत नसतो. त्या अनुपंगाने काही पावले पुढे चालण्याची गरज आहे.

६.० काही संकल्प व कार्यदिशा :
आतापर्यंतच्या चर्चेच्या संदर्भात काही विशेष कार्यसंकल्पाचा विचार झाला. त्याचे सार पुर्यलप्रमाणे:
६.१ पर्यायी बाजारपेठ व चळवळ:
बचतगटाच्या माध्यमातून बऱ्याच आदिवासी व ग्रामीण भागात सेवाभावी कार्यकर्त्यांच्या मदतीने स्त्रियांचे, युवकांचे बचतगट सुरू आहेत. कार्ड्स बचतगटमार्फत व्यवसाय म्हणून विक्रीयोग्य वस्तूंची निर्मितीही होणे, तसेच विदर्भात शाश्वत शेतीची चळवळही हळूहळूमूळ धरू लागली आहे. उत्पादकांना योग्य भाव मिळावयाचा असल्यास मधल्या दलालांना या उत्पादक-ग्राहक सरळसारखी बांधण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्त मधील दवा म्हणून कार्य करू शकतील व त्या अनुषंगाने कमी प्रमाणात अर्थार्जनी करू शकतील. शहरी सहानुभूतिदार ग्राहक आणि शेतकरी व आदिवासी हे प्राथमिक उत्पादक यामध्ये स्त्रियांचे बचतगट प्रक्रिया व्यवसायक म्हणून तर युवकांचे बचतगट मालाचे वहन व पुरवठा या अंगाने सहायक होऊ शकतील. त्या दृष्टीने पर्यायी वाजारपेठ उभी राहू शकल्यास उत्पादकांचे शोषण थांबेल व ग्रामीण अर्थव्यवस्था ख-या अर्थाने मजबूत लेण्यास सतभार लागू शकेल. या दृष्टीने वर्थ्यांची ‘धरामित्र’ मधविक्री व सेंद्रिय धान्यविक्री या क्षेत्रात प्रयत्नशील आहे.
– खूप मोठ्या प्रमाणात शहरी माल गरजेच्या स्वरूपात ग्रामीण भागात ओतला जातो व त्याच्या खरेदीपोटी बराच पैसा गावाबाहेर जातो. ग्रामीण भागात लागणा-या साबण-कापड ह्यांसारख्या वस्तूंचा विचार केला तरी ग्रामीण भागाची मोठ्या प्रमाणावर लूट होताना दिसते. या वस्तूंच्या उत्पादनात, खरेदी-विक्रीत लेणारी लूट थांवण्यासाठी ग्रामपातळेवर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कर्म ठिकाणी अशा प्रयत्नांसाठी अनुकूल वातावरणी आहे. त्याचा लाभ घ्यावा.
– सर्वसामान्यपणे जास्त मागणी असणा-या दैनंदिन गरजेच्या वस्तूंची सूची तयार करून त्या वस्तू आदिवासी / ग्रामीण भागात तयार करण्यासारख्या असल्यास त्यांच्या निर्मितीस, प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देऊन त्यांना शहरी बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने संघटित प्रयत्न व्हावेत.
– या कार्यात सहानुभूती असणा-या व्यावसायिक तज्ज्ञ व्यक्तीची / संस्थांचीसुद्धा या उपक्रमात मदत घ्यावी.
– प्रचलित बाजारव्यवस्थेतील उणीवा हुडकून त्यांच्या निवारणार्थ पर्यायी बाजारपेठेचा उपयोग व्ह्मवा.
– पर्यायी बैठक/सभा/प्रदर्शने ह्यांमधून ग्रामीण विक्रीयोग्य वस्तूंच्या प्रसारप्रचाराचा प्रयत्न झवा.
– कार्यकर्त्यांमध्ये देखील वस्तुनिर्मिति-कौशल्य, व्यावसायिक कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्यक्त.
६.२ अभ्यास व वाचनः
सामान्यपणे कार्यकर्त्यांचे वाचनाकडे व स्वाध्यायाकडे दुर्लक्ष घेते. परंतु सामाजिक प्रश्नांची जाण अधिक सखोल होण्यासाठी अभ्यासवाचनाच्या संदर्भात विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्याविषयी आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
– स्थानिक लोकांवरोवरची निरीक्षणे, त्यांच्या वरेवरची देवाणघेवाण, ग्रामीण शह्मणपण यांच्या नोंदी व्हाव्यात.
– आपल्या कामाचे व्यापक संदर्भ मिळवण्यासाठी जागतिक प्रश्नांची जाण असणे गरजेचे आहे. आपल्या कामाच्या पद्धतीत वाचनासाठी जसजसा वेळ काढता येईल त्याप्रमाणे कामाच्या गुणवत्तेत देखील सुधारणा होईल. वाचन हे जीवनपद्धतीचे अंग मानावयास हवे. – चांगल्या ग्रंथांची सूची करणे, निवडक पुस्तके व वृत्तपत्रांमधील चांगल्या पुस्तकांवरील परीक्षणे उपलब्ध करून देणे यांसारखे उपक्रम हाती घेता येतील. कार्यकर्त्यांनी वाचावयास हवीतच अशा पुस्तकांची सूची करावयाची जबाबदारी श्री. वसंत फुयणे यांनी स्वेच्छेने घेतली. – स्थानिक पातळीवर वाचनालये व्ह्मवीत व स्थानिक लोकधारावर ती चालावीत. आपली मैखिक संस्कृती असल्यामुळेवाचन सामुदायिकसुद्धा असू शकेल. सामुदायिक वाचन करताना ते समजून घेणे देखील सर्जनशील असते. ग्रामीण भागातील निरक्षरांची अनुभवसमृद्ध तोंडी निरीक्षणे लिहून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
– काय व कसे वाचावे हेही महत्त्वाचे आहे. अकाली फर गंभीर वाचू नये. सामाजिक विचार असलेल्या ललित साहित्याच्या वाचनापासून देखील सुरुवात करता येईल.
– सामाजिक कार्य करताना जे प्रश्न पडतात त्या अनुषंगाने योग्य पुस्तकांचा शोध घेतला पाहिजे.
– शासकीय राजपत्रांतून आपल्या कामाच्या संदर्भात बरीच उपयुक्त माहिती दरमह्म प्रसिद्ध स्रेत असते. अशा माहितीच्या संकलनाची जवाबदारी श्री. अजय डोळ्यांनी उचलली.
– कार्यकर्त्यांची स्वाध्यायवृत्ती वाद्यवयास हवी व रोज कसै काळ आपण केलेल्या वाचनाविषयी, आपल्या कार्यविषयी व आपण स्वीकारलेल्या जीवनपद्धतीविषयीच्या चिंतनासाठी द्यावयास हवा.
६.३ कार्यकर्ता आधार गट :
विदर्भातील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रवोधन, प्रशिक्षण, संसाधनविपयक माहिती, वैचारिक जागरण या दृष्टीने मदत करण्यासाठी एक मदत गटाच्या बांधणीची व त्या अनुषंगाने प्रयत्न होण्याची गरज जाणवली. विदर्भात ‘विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘धरामित्र’, शाश्वत शेतीच्या क्षेत्रात विदर्भ शाश्वत शेती चळवळ’ आणि वचत गटांच्या क्षेत्रात ‘विदर्भ लोकविकास मंच’ या प्रकारचे कार्य करीत आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या वैचारिक प्रबोधनाच्या, त्यांच्यासाठी आवश्यक संसाधनांचा व मदतीचा शोध घेण्याच्या संदर्भात अजून प्रयत्न झाले नाहीत. या दृष्येने श्री. मोहन हिरावाई हिरालाल व श्री. अविनाश शिर्के यांनी संयोजनाची जवावदारी स्वीकारावी असे ठरले.
६.४ कार्यकर्ता मदत निधीः
सुरक्षित जीवनाचे सारे दोर कापून लष्करच्या भाकरी भाजण्याचे काम कार्यकर्त्याने सामाजिक कार्याच्या प्रेमापोटी अंगीकारलेले असते. वेळप्रसंगी त्याला अत्यंत विक्ट आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. अशा प्रसंगी कार्यकर्ता अत्यंत निराश व वैफल्यग्रस्त होण्याची भीती असते, वेळेच मदतीचा हात पुढे झाला तर कार्यकर्ता त्यातून सावरू शकतो. मानसिक आधारासोवतच प्रासंगिक आर्थिक मदतीच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न होण्याची गरज आहे. या दृष्टीने पुढलप्रमाणे विचार झाला.
-व्यक्तिगत पातळीवर मदत करू शकणारे सह्मनुभूतिदार शोधावेत. पर्यायी बाजारपेठेतून मिळणार्‍या नफ्यातून काही भाग वेगळ्या ठेवावा. घरातील लग्नकार्य, वाढदिवस यांसारख्या विशिष्ट प्रसंगी सामाजिक ऋण मानून की देणगी देण्याचा विचार जनमानसात रुजवावा, गुंतवणुकीतून आर्थिक आधाराचा विचार झवा. याशिवाय काह्म वेगळ्ये संसाधने असू शकतात काय ह्यावर विचार व्हावा.
– केवळ आणीबाणीच्या काळच अशा प्रकारची मदत देण्यात यावी. असा कार्यकर्ता आपल्या जवळच्या परिसरातला असावा. मदत करणा-यांना त्याच्या कार्याची व त्याच्या आर्थिक गरजेचा परिचय असावा/व्हावा.
– हे पैसे कार्यकर्त्याने सोयीनुसार परत करावे.
– व्यक्तिगत पातळीवर मिळू शकणार्‍या फेलोशिप्सची सूची तयार करून या अशा प्रकारे ‘फेलोशिप्स’ देणार्‍या संस्थांविषयीची माहिती देण्याचे प्रयत्न व्हावेत.
– गरजू कार्यकर्त्यांना सहानुभूतिदारांकडून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न व्ह्मक्त.
अशा प्रकारचे सहचिंतन व कार्यमूल्यांकन वर्षा – दोन वर्षांमधून नियमितपणे व्हावे व सामाजिक-वैचारिक प्रबोधनास वाहून घेतलेल्या ज्येठ मित्रांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवा असा मनोदय बैठकीच्या अखेरीस व्यक्त करण्यात आला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.