विद्रोही विवेकवाद

दोन ईश्वरांतील विद्रोह हा माझा लेख एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित करून त्यावर संपादकीय स्पष्टीकरणही दिल्यामुळे आजचा सुधारक विषयीचा माझ्यातील आदर दुणावला. परंतु आपले (व वाचकांचेही) गैरसमज झालेले दिसतात. माझे स्पष्टीकरण प्रकाशित करावे ही नम्र प्रार्थना.
जगात दोन प्रकारचे ईश्वर अजून जिवंत आहेत (१) मानवहित केंद्री (२) पुरोहित-ब्राह्मण-हित केंद्री ह्या माझ्या वाक्यातील लाक्षणिक अर्थ लक्षात घ्यावा. (१) मानवहित केंद्री : साधुसंतांनी मानलेला ईश्वर. मध्यस्थ-पुरोहित-ब्राह्मणांना डावलून संतांनी सरळ आपापल्या ईश्वराशी (विठ्ठल, राम, कृष्ण) संवाद साधण्याचा सत्याग्रह, विद्रोह मांडला होता. त्यांचा ईश्वरसुद्धा भक्तांना अभिप्रेत असलेल्या रूपात येऊन चंदन घासणे, दळण दळणे, ढोरे ओढणे, वगैरे अति सामान्यांची कामे करीत होता. उप्टी बोरेही खात होता, चार हातांनी द्रोण धरून कण्याही ओरपत होता. सारांश, पहिला ईश्वर अति सामान्यांचा, रंजल्या गांजल्यांचा होता. संतांचे हे सर्व आभास असूनही कल्पनारम्य वाटतात. सर्वसत्तारूढ ब्राह्मण्यवादाच्या काळात बडवे पंडे, पुजारी ह्यांना नाकारणारे संत, नास्तिक, पाखंडी, धर्मबुडवे ठरले. म्हणून त्यांचा छळ झाला. परंतु अति सामान्य, असहाय्य, पिचलेल्या समाजास त्यांचा ईश्वर आणि ते संत मनोवल देणारे, दिलासा, नवी दिशा देणारे, आणि क्रांतिकारक वाटले. त्या काळाला धरून आज मी त्या संतांना विवेकवादी म्हणतो. त्यांचा ईश्वर कल्पनारम्य जरी असला तरी जवळचा वाटतो. (२) पुरोहित व्राह्मणहितकेंद्री : पुरोहित-पंडेपुजा-यांना पुरेशी खंडणी दिल्याशिवाय त्यांचा तो ईश्वर करंगळीचे नख देखील दाखवीत नाही. मन मानेल तशी खंडणी दिली की होमा-यज्ञावाटे तो हव्या त्या रूपात प्रगट होतो व श्रीमान भक्तांचे पापांचे रांजण घेऊन पुण्याचे रांजण देतो. आणि सांगतो ‘वाट्टेल तेवढे पाप कर. पण ह्या माझ्या एजंटांना खंडणी देत जा, म्हणजे झाले. काहीही कर पण सदा मला भजत जा.’
आजकाल तर दोन नंबरी ईश्वराने सुपर स्वामी वावा नेमले आहेत. त्यांचे लक्षाधीश, कोट्यधीश भक्त आहेत. अब्जाधीश होण्यासाठी, पापक्षालनासाठी, भ्रष्टाचार लपवण्यासाठी या भक्तांना ईश्वर आठवतो. वास्तविक तेही निरीश्वरवादीच आहेत. परंपरेने चालत आलेला किंचित ईश्वर, काडीचा आधार त्यांना हवा असतो. हा दोन नंबरी ईश्वर निर्माण करण्याचे महान यज्ञकुंड वैदिक काळापासून पुरोहितशाहीनेच आजवर सतत पेटत ठेवले आहे. हे म. फुले, स्वामी विवेकानंदांआधी चार्वाक भ. महावीर, भ. वुद्ध वगैरे निरीश्वरवाद्यांनी म्हटले आहे. तरीही आपण पुरोहितशाहीची वाजू सावरली व अज्ञानी लोकांची बाजू डावलली. हे म्हणजे नावडतीचे मीठ असे वाटते. हे कसे? कळले नाही.
‘दोन ईश्वरांतील विद्रोह’ ह्याचा अर्थ
संतानी पुरोहितांची मध्यस्थी, अधिकार, दक्षिणा वुडविण्याचा विद्रोह मांडला होता. म्हणूनच ना सत्ताधारी पुरोहितशाहीने संतांचा छळवाद मांडला होता? आजही तो छळवाद सुरूच आहे. पण त्याचे स्वरूप वेगळे आहे. विद्रोहही होता, आहे. हाच तो दोन ईश्वरांतील म्हणजे विचारांतील संघर्ष, विद्रोह. संत तुकारामाने व म. फुल्यांनी असाच विद्रोह, संघर्ष मांडला होता. आपण कोणाचा पक्ष घ्यावा?
दोन ईश्वर जिवंत आहेत, याचा अर्थ, हे असे ईश्वर जिवंत ठेवणारे अज्ञ आणि सुज्ञ अजूनही आहेत. ईश्वरवाद आहे, जगातील सर्व ईश्वरवादी धर्मात आहे. भारतातील सुसंस्कृत’ आणि असंस्कृत’ लोकांत अजूनही जोरदार प्रसार आहे. (गंगाजलयात्रा, रामरथयात्रा, यज्ञ-सत्र वगैरे) हजारो वर्षांपूर्वीपासून पराभूत गुलामांच्या मेंदूत अज्ञान कोंबून ठेवण्याचे कार्य पुरोहितशाहीने केले. वरून मनुस्मृती ठोसून भरली. त्यांना बौद्धिक गुलाम करून ठेवले व पुरोहितशाहीने आपल्या पोटप्रतिष्ठेची पिढ्यानुपिढ्यांची तरतूद करून ठेवली. ‘अज्ञ माणसे पुरोहित ब्राह्मणहित करतात. पुरोहितांच्या मध्यस्थीमुळे आपणावर परमेश्वराची कृपा होईल ह्या श्रद्धेमुळे ते (अज्ञ) करीत असतात. भूदेव प्रसन्न झाले की परमेश्वर प्रसन्न होईल अशा समजुतीने ते करतात.’ हे आपले म्हणणे योग्यच आहे. पण ही समजूत कोणी करून दिली? असे म्हणतात की अगदी सुरुवातीला ब्रुक बाँड चहा कंपनीने लोकांना फुकट चहा पाजून चटक लावली, व्यसन लावले व मग खुशाल धंदा प्रगतिपथावर नेला. पुरोहितशाहीने आम्हालाही असेच ड्रग अॅडिक्ट करून ठेवले. म्हणून म. फुल्यांनी लोकांच्या वौद्धिक गुलामीचे खापर पुरोहितशाहीवर, व्राह्मण्यवाद्यांवर, ज्ञानभांडाराच्या किल्ल्या आमच्याच कंवरेला आहेत असे म्हणणा-या श्रेष्ठतावाद्यांच्या कपाळावर फोडले होते. आणि आपल्या रूढिग्रस्त सहका-यांवर, अनुयायांवरही शब्दांचे आसूड ओढले होते. सुधारणावादी व्राह्मण मित्रांनाही जवळ केले होते. लो. टिळकांना, सुधारक आगरकरांना मदत व सत्कारही करणारे तेच पहिले होते. तरीही आगरकरांनी त्यांना रेव्हरंड संवोधून का हिणविले होते, हे मला कोणीतरी समजावून सांगावे. तुम्ही आणि वाचकांनी म. फुल्यांचा थोडा अधिक अभ्यास करावा म्हणजे त्यांच्याविषयीचे तुमचे व वाचकांचे गैरसमज दूर होतील. स्वामी विवेकानंद, सावरकर, आगरकरांपेक्षाही म. फुल्यांची भापा गावरान व विद्रोही आहे. तेवढे एक आणि तो काळा काळ लक्षात घेतल्यास म. फुले तुमच्याप्रमाणेच निरीश्वरवादी वाटू लागतील. त्या काळाला धरून ते, स्वामी विवेकानंद वगैरे संतांचा ईश्वर मानत होते. त्यांचा ईश्वर रंजल्या गांजल्यांच्या उपाशी खपाटी पोटात होता. म्हणून त्यांनी पुरोहितांच्या मतलवी ईश्वरावर विद्रोही आसूड ओढले होते. चिपळूणकरांची निबंधमाला किंवा डॉ. वाळ गांगल वाचून म. फुल्यांचे मूल्यमापन होऊच शकत नाही.
आपण स्वतः व संपादक मंडळ निरीश्वरवादी आहात-वाणी-लेखणीकरणीने. ते मला मान्य आहे. निरीश्वरवाद्यांचा ईश्वर असूच शकत नाही. त्या विपयावर मी अवाक्षरच काय पण स्वल्पविरामही लिहिला नाही. तरीही तसे समजून ‘मनावरील संस्कार, श्रद्धा, अंधश्रद्धा’ वगैरे बरेच लिहिले आहे. ते बरे केले म्हणा, माझ्या आणि वाचकांच्या ज्ञानात भर पडली. पण माझी अनवधानाने म्हणा एक चूक झाली. तुमच्यावर मी हलकासा शिंतोडा उडविला आहे. (म्हणून तसे लिहिले असावे) त्याला कारणही आहे. तुमचे संपादकमंडळ, लेखकवर्ग, वर्गणीदार, वाचकवर्ग बहुसंख्य प्रमाणात ब्राह्मणवर्गच का? असा प्रश्न, आरोपच म्हणा, मागे श्री. खिलारे, श्री. नानावटींनी केला होता. मलाही तसेच वाटते. पुरोहितशाहीची भीती का?
आपण ब्राह्मण पुरोहितांचे वर्चस्व, अधिकार, ईश्वरवाद मानत नाही तर मग त्यांना भिऊन लिहिण्याचे कारण काय? (तसा आ.सु. मधून सौम्यसा विद्रोह प्रकाशित होत असतो. नाही असे नाही. परंतु सौम्य, क्षीण) स्वा. सावरकरांनी ब्राह्मण्यवादी कर्मकांडावर झोड उठविली होती. पण त्यांच्या गुरुवर्यांनीच त्यांची लेखणी धरून ठेवली होती. ‘अरे बावा अशा लिहिण्याने ब्राह्मण्यच नष्ट होईल की!’ हिंदुत्व नष्ट झाले तरी चालेल पण ब्राह्मण्य नष्ट व्हायला नको. असे गुरुजींचे म्हणणे. आजचे सावरकरवादीही गुरुवर्यांचे शब्द पाळतात. स्वा. सावरकरांनी मृत्यूपूर्वी म्हटले होते, ‘वाटल्यास माझी सागरातील उडी विसरा. पण समाजसुधारणा विसरू नका’ आजचे सावरकरवादी नेमके तेच विसरून सागरात उड्या मारतात. फुले आंबेडकरवाद्यांचे, गांधीवाद्यांचेही असेच असते. आपण विवेकवाद्यांनी कसे असावे? पुरोहितांची वाजू सावरून इतरेजनांचा मूर्खपणा दाखविण्याकरिता आपण लिहिले – आपल्या भारतात असे अनेक प्रदेश आहेत की जेथे जुना (पूर्वीपासून) पुरोहित व्राह्मणवर्ग नाही. ईशान्य भारतामध्ये (अरुणाचल, मिझोराम वगैरे) पुरोहित ब्राह्मण पोचलाच नसावा. अशा खूप मोठ्या प्रदेशात (गडचिरोली, वस्तर) म्हणजे आदिवासीच्या प्रदेशात ब्राह्मण आधीपासून होते असा पुरावा नाही.
पुरावे आहेत. विश्वभ्रमण करून ‘वैदिक विश्वराष्ट्र का इतिहास’ चार खंडांत लिहिणारे वैदिक धर्माचे स्वाभिमानी डॉ. पु.ना. ओक यांनी सचित्र पुरावे दिले आहेत. पंडितप्रवर रघुनंदन शर्मा यांचे ‘वैदिक संस्कृती’ आचार्य चतुरसेन शास्त्रींचे ‘वयं रक्षामः’ डॉ. प. वि. वर्तकांचे वास्तव रामायण’ इत्यादि ग्रंथांत पुरावे दिले आहेत. ईशान्य पूर्व प्रदेशात वैदिक पुरोहितांनी यज्ञ, संस्कृत भाषा, रामायण महाभारत नेले होते. तिकडे पुरावे सापडतात. पण तिकडे पुरोहितांचे वस्तान वसले नाही. मग त्यांनी जमीनदारी, सावकारी सुरू केली. मूळ आदिवासींना भूमिहीन केले. ब्रिटिशकाळात कारखानदार शिरले. आदिम जमातींना असे काही छळले की त्यांना ख्रिश्चन मुस्लिम व्हावे लागले. ख्रिश्चन मिशनरी तर त्यांना संत किंवा देवमाणसेच वाटली असणार! दीनदलित-पीडितांचा धर्म, तत्त्वज्ञान, वेंवीच्या वर्तुळ प्रदेशातच असते. डोक्यात असते ती परंपरा. ईशान्य, पूर्व भारतात सुमारे ७५% लोक ख्रिश्चन, मुस्लिम, वौद्ध झाले आहेत. उर्वरित जनता स्वतःला हिंदू मानत नाही. ते कम्युनिस्ट विचारसरणीचे झाले आहेत. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व विहार वगैरे भागात वन्याच विद्रोही संघटना झाल्या आहेत. आपण त्यांना अतिरेकी म्हणतो. विहारमधील हत्याकांडे आपण वाचत असतो. ‘छत्तीसगड वस्तरच्या आदिवासी भागात व्राह्मण आधीपासून होते याला पुरावा नाही’ असे म्हणता, पुरावे आहेत. दंडकारण्यात अगस्ती, शरभंग, मतंग इत्यादी ऋपींचे आश्रम होते असे रामायणात उल्लेख आहेत. अगस्ति, भारद्वाज ऋपींनी तेथील जलाशय बुजवून (सागर पिऊन) नगरे वसविली होती. रक्ष, ऋक्ष, शवर, वानर इत्यादी अनार्य आदिम जनसमूहांच्या प्रखर विरोधामुळे त्यांचा जम बसला नाही. त्या भागात व दक्षिणेत रावणाचे राज्य होते. रावण व्राह्मण होता. नंतरच्या द्रविड, गोंड, नाग भिल्लांनी तेथे राज्य केले. १९५५ ते ६२ या काळात मी छत्तीसगड भागात नोकरीनिमित्त होतो. जिज्ञासेपोटी ऐकले, वाचले, पाहिले आणि लिहिलेसुद्धा. तेथील आदिवासी आपले कुळाचार आपल्या भगत, मांत्रिक, ओझा कडूनच करून घेतात हे खरे. परंतु वीस पंचवीस धनिक आदिवासी कुळांची एक ब्राह्मण देवता असते. ह्या देवता (भटजी) वहुधा विहार उत्तर प्रदेशातून चार पाच वर्षानंतर येतात. आपापल्या कुळात राहतात. आदिवासी स्त्री-पुरुष, लेकी-सुना त्यांची सर्व प्रकारे सेवा करतात. काही कुळांत ‘अपत्य प्रसाद’ ही देतात. (अशी उदाहरणे पुराणकथांत आहेत) अशा अपत्यांना ते गंगाजल म्हणतात. आज त्या भागात इतर प्रदेशातील लोकही वसल्यामुळे ब्राह्मण पुरोहितही भरपूर झाले आहेत. पण आदिवासी पूर्वीपेक्षा सुधारले. त्यांची अस्मिता जागृत होऊ लागली.
पाश्चात्त्य राष्ट्रांत येशू ख्रिस्ताच्या काळापूर्वीच वैदिक पुरोहित पोचले होते, वैदिक धर्माचा प्रसार झाला होता असे डॉ. ओक व इतर विद्वान सचित्र पुरावे देतात. इतर काही विद्वान म्हणतात, पश्चिमेकडील रानटी टोळ्या सप्तसिंधु प्रदेशात आल्या येथील आदिम प्रगत संस्कृती उद्ध्वस्त केली. नंतर आर्य अनार्याच्या सांस्कृतिक संमिलनातून वैदिक (यज्ञ वगैरे) संस्कृती निर्माण केली. हीच संस्कृती पश्चिमेत गेली. यावर एकमत आहे. ख्रिस्तपूर्व काळात पश्चिमेकडे (१) सर्वसत्ताधीश धर्मगुरु (२) भूधारक जमीनदार (३) त्यांचे सेवक भूमिहीन जनता (४) या सर्वांचे दास गुलाम. (जिंकून धरून आणलेले). ही पुरोहिती चातुर्वण्य-पद्धती तिकडेही होती. शब्द वेगळे. नंतर पोपशाही, इमामशाही. ईश्वरी सत्याला खोटे ठरविणा-या कोपर्निकसला प्राण गमावावे लागले. इस्लाम विरुद्ध वोलल्यास काय गत होते जगजाहीर आहे. तिकडेही धर्मक्रांती राज्यक्रांती झाली. मार्क्सवाद आला. पाश्चात्त्य म्हणून आपण त्यांची निर्भर्सना करतो. परंतु आपल्याही देशात ‘शिस्तवद्ध’ दुष्टशाही होती/आहे हे का लपवता? वैदिक काळापासून पेशवेकाळापर्यंत उदाहरणे देता येतील. पेशवेकाळानंतर या संपूर्ण देशात एकुलता एक क्रांतिकारक उदयास आला, ज्याने समाजाच्या शेंडीपासून तळपायाखालच्या मातीपर्यंत ढवळून काढण्याकरिता आयुष्य वेचले, तो म्हणजे जोतीराव फुले आणि त्यांची सहक्रांतिकारिणी सावित्रीबाई! त्यांनी धर्मांतर केले नाही. ब्राह्मणजातीचा तिरस्कार केला नाही. परंतु इतरेजनांस खोट्या ईश्वरी धर्माच्या नावाखाली मूढ करून ऐतखाऊपणा करणा-या दुप्टशाहीवर आघात केले, म्हणून त्यांनी पुरोहितशाहीला दोषी धरले. आपण विवेकवादी आहात ना? संत तुकारामाचा विठ्ठल आणि म. फुल्यांचा निर्मिक त्या त्या काळाच्या दृष्टीने विवेकवादच होता, विद्रोही होता.
‘लाच देणारा व घेणारा हे दोघेही सारखेच गुन्हेगार असतात’ हे आपले म्हणणे मान्य. परंतु ते कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतात. नैतिकतेच्या दृष्टीने लाच देणारा ‘अडला नारायण’ असतो. लाच घेणारा ‘वाघाचे कातडे पांघरलेला गाढव’ असतो. आपला पक्ष नीतीचा आहे. म. फुल्यांनी नेमके कातडे आरवाडण्याचा व मूढ डोकी विवेकवादाकडे नेण्याचा उद्योग केला. सु. आगरकरांनी उच्च वर्गीयात व डॉ. आंबेडकरांनी दलित वर्गीयात चेतना पेटविली. म. फुले सुवर्णमध्य होते. त्यांच्या काळात व नंतर दुष्ट रूढी सौम्य होऊ लागल्या. विवेकाला कंठ फुटू लागला. पुरोहितशाही, दुप्टरूढी नष्ट झाल्या नाहीत. पाळेमुळे रुतून बसली आहेत. कोणत्याही तीर्थक्षेत्रात जा, ईश्वरशाही पुरोहितशाही विरुद्ध वोला. तावडतोव ‘सद्गती मिळते. ही इमामशाहीच आहे. केंद्रात भाजपाचे शासन येणार अशा झुळुका लागल्यावरोवर विळांतील नाग फणा काढू लागले. आपले नापाक ढाचे झाकून त्यावर गंगाजल शिंपडले. दुस-यांच्या नापाक ढाच्यावर रामरथ चालविले. गत दोन तीन वर्षांतील इतिहासाची शाई अजून ओली आहे.
विद्रोही भाषाच का?
विद्रोही भाषा वापरावी असे मी माझे मत मांडले होते. वर्गणीदार म्हणून हट्टाग्रह नव्हे. विद्रोही भाषा म्हणजे शिवराळ, आक्रस्ताळी ऊरवड़वी भापा नव्हे. ममताळू भाषा वापणारे ज्ञानेश्वर म्हणतात, ‘संस्कृत भाषा देवाने केली. मराठी काय चोरांनी केली? राजहंसाने डौलात चालावे. आम्ही तसा प्रयत्न का करू नये?’ समर्थ रामदासांनीसुद्धा पढतमूर्खाच्या लक्षणांत विद्रोही भाषा वापरली आहे. कालच्या सुधारकांनी विद्रोही भाषा वापरली होती. आजच्या सुधारकांनी कशी वापरावी? सर्व आलबेल झाले की काय? स्वयंपाकगृहात अस्पृश्य स्वयंपाकीण भांडेवाली नको म्हणणारे आ. सु. चे वाचक वर्गणीदार आहेत. फुल्यांच्या काळात स्त्रियांना शिक्षणाची धर्मवंदी होती. आजच्या सुसंस्कृत’ झालेल्या स्त्रिया सुइंग्रजी’ झालेल्या स्त्रियांच्या मेळाव्यात पौरोहित्य, व्रतवैकल्याची उद्यापने, कीर्तने, प्रवचने करू लागल्या आहेत. या स्त्रीपुरुषवर्गातही आ. सु. चा वाचकवर्ग आहे. याचा अर्थ आ. सु. जवावदार आहे असा मुळीच नाही. आ. सु. आपले कार्य सुविद्य भापेत करीत असतो. परंतु परंपरेने आम्हाला अशी काही मानसिक व्यसने लावून ठेवली आहेत की आम्ही लाचार झालो आहोत. पिंडाला कावळे झोंवले काय किंवा न शिवले काय पितरांचे घास स्वर्गात पोचत नाही हे। आम्हास पक्केपणी ठाऊक असूनही आम्ही कावळ्यांची प्रतीक्षा करणारच. आदतसे लाचार! तापी नर्मदेच्या उत्तरेस ब्राह्मण्यशाही नाही हे आपले म्हणणे बरोबर आहे. सिंध-पंजाव-भागात गुरुनानकजी, गुरु गोविंदसिंगजी वगैरे गुरूंनी जातपात, उच्चनीचभाव मोडून एका हाती तलवार दुस-या हाती गुरुग्रंथसाहिव घेऊन पुरोहितशाही मोडून काढली आहे. असे तरवारवहाद्दर संत महाराष्ट्राला भारताला मिळाले नाहीत. आ. सु. ला लेखक मिळाले नाहीत. आमच्या हिंदू इमामशाहीने अलिखित पण कुजबूज तंत्राने शाही फर्मान काढले आहे, ‘ईश्वरशाही पुरोहितशाही विरुद्ध व्र काढाल तर याद राखा. ‘तस्लीमा करून टाकू’. व्यसनाने भ्यावे लागते. आ. सु. चे वव्हंशी लेखक वाचक ‘रामदासपेठी’ आहेत असे वोलले जाते ते खरे असावे. पुरोहितशाहीविरोधी लिहिणा-या लेखकांना साहित्यक्षेत्रातून खडे समजून फेकले आ. सु. निरीश्वरवादी आहे. निरीश्वरवादी डॉ. आंबेडकर, वुद्ध चार्वाक हे जवळचे असूनही आ. सु. त फारसे आढळत नाहीत. काय कारण?
मी स्वतः निरीश्वरवादी, विवेकवादी जातीचा आहे. थोडासा आचरणवादीही आहे. आ. सु. विपयी मला नितांत आदर आहे. चुकले माकले क्षमा करावी.
* * * * * * * * *
आपले २६-५ चे पत्र मिळाले. धन्यवाद,
माझा लेख तुम्ही म्हणता तेवढा मोठा नाही. ३ पृष्ठांतच छापला जाणारा आहे. यापूर्वी ४,५ पृष्ठांचे लेख आ. सु. मधून आले आहेत. माझ्या निष्कर्षांशी आपण सहमत नाही हे आपल्या या आधीच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट आहे. सहमत असणे नसणे यासाठीच विवेकवादी भूमिकेतून वादविवाद, चर्चा ही आ. सु. मधून दृष्टीस पडली आहे. मग हा लेख छापला जाऊ शकत नाही, हे कसे? प्रत्येकाचे अनुभव, वाचन, चिंतन वेगवेगळ्या माध्यमांतून झालेले असते. तेवढ्यावरूनच मी जे वाचले, अनुभवले त्यातूनच माझी विधाने आहेत. तुमच्या व्यापक अभ्यासातून (किंवा इतरांच्या) ती खोडून काढावी. आ. सु. मधून असा वैचारिक विधायक वाद होत असतो, होत राहावा असे वाटते.
ब्राह्मणेतरांच्या मानसिक गुलामगिरीला ब्राह्मणेतरच जवावदार होते/आहेत हे तुमचे मत मला तर मान्य नाहीच पण आ. सु. च्या काही वाचकांची मला पत्रे, फोन आले आहेत. त्यांनाही तुमचे मत मान्य नाही. वर्णवर्चस्ववाद, ईश्वरवाद वगैरे उच्चवर्णीयांनी (व्राह्मण पुरोहित, राजे महाराजे, श्रीमंत) इतर प्रजाजनांच्या मेंदूत चोंदून चोंदून भरलेत, हे आता उघड झालेले सूर्यप्रकाशी सत्य आपण नाकारता, म्हणजे काय? हा विवेकवाद नव्हे.
मनुस्मृती, इतर स्मृति-पुराणे, व्राह्मण्यवादी ह्यांनी सामान्य लोकांना देवदर्शनाचे भजनपूजनाचे अधिकारही नाकारले होते. ह्यातूनच वारकरी संप्रदाय क्रांती करून उठला हे आपल्याला माहीतच असेल. संतांनी ब्राह्मणांचा अधिकारच नाकारला म्हणून त्यांचा छळ झाला. कोणी केला? हेही तुम्हाला माहीत आहे. तो छळकाळ संपला. पण आजही तीर्थक्षेत्रात, मंदिरात पंडे, बडवे, पुजारी भाविकांच्या भावनेचा छळ करतात हे सत्य तुम्ही नाकारणार काय? संघपरिवार पंडे, वडवे, ऐतखाऊ साधूंवर काहीच वोलत नाही – उलट मंदिराचा धंदा तेजीत आणण्याचा आटापिटा करीत आहेत. या विरोधात आपण काही बोलणार-लिहिणार आहात काय? मला वाटते, नाही. कारण मी पर्यायाने त्यांच्यावरच टीका केली ती तुम्हास आवडलेली दिसत नाही. तुम्ही, आ. सु. संपादक परिवार विवेकवादी निरीश्वरवादी, विज्ञानवादी आहात ना? मग का आवडू नये? ईश्वरवाद, दैववाद ठसविणा-या व्राह्मण पुरोहितांची बाजू उचलून धरावी व बहुजनांनाच मूर्ख ठरवावे, असे का?
या तुमच्या विचारास विरोध करणारे आ. सु. चे बहुसंख्य वाचक सापडतील. हे माझे मत अजमावून पाहा. तुमच्यापेक्षा मी म. फुले जास्त अभ्यासला एवढे खास. धर्मसत्तारूढ व्राह्मण पुरोहितशाहीवर त्यांनी आसूड ओढले आणि बहुजनांच्या मूर्ख अज्ञानी बुद्धीवर घणाघातही केले होते. तसेच ज्या सुधारणावादी ब्राह्मणांशी त्यांचे विचारसूत्र थोडे जरी जुळत असले तरी म. फुले ब्राह्मणमित्रांचा आदरसत्कारही करीत असत. तेव्हापासूनच वहुजन समाज हळू हळू अज्ञानातून बाहेर येत आहे.
आपण व आ. सु. परिवार निरीश्वरवादी, विज्ञानवादी, वुद्धिप्रामाण्यवादी आहात म्हणून मला आपल्याविषयी आदर आहे, राहील. त्याच नात्याने माझ्या पहिल्या लेखात आ. सु. विषयी एक विचार मांडला होता. दुस-या लेखात मात्र तुमची स्वतःची विधाने मी खोडून काढली आहेत म्हणून तुम्हास तो लेख प्रकाशनीय वाटत नाही असेच मी गृहीत धरतो. लेख मोठा वगैरे झाला नाही. काही संदर्भ, विधाने तुमच्या, इतरांच्या दृष्टीने चूक असू शकतात. सध्या तरी वरोवर आहेत. संपूर्ण लेख प्रकाशित करावा.
आपण लेख छापा न छापा. तो तुमचा अधिकार आहे. न छापला गेल्यास मी फार फार तर एवढेच समजेन की तुम्ही कितीही विवेकवादी असाल तरी ब्राह्मण्यवादाशी तुमचे अदृश्य नाते आहे.
लेख छापणार नसाल तर बुकपोष्टाने परत पाठवावा. साभार परतीची मला सवय झाली आहे.
माझ्या दृष्टीने व्राह्मण, व्राह्मण्यवाद, व आजच्या ब्राह्मण जाती हे वेगवेगळे आहेत. ब्राह्मण हा पूजनीय, आदरणीय आहे. संत कबीर, गाडगेवावा हेसुद्धा खरे ब्राह्मण ठरतात. ब्राह्मण्यवाद खन्या ब्राह्मणाचा शत्रु आहे. आजच्या ब्राह्मणजाती हे परंपरेतील प्रवाह आहेत. माझ्यावर ब्राह्मण, आणि ब्राह्मणजातीचे संस्कार झाले आहेत. मला छळलेल्या ब्राह्मण्यवादाचा मी तिटकारा करतो. फुले आंबेडकर याच दृष्टीने पाहतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.