जिज्ञासा

सत्यदर्शनातील अडथळ : उदाहरणे द्यावी.
संपादक, आजचा सुधारक, यांस –
जानेवारी ९९ च्या अंकात “जिज्ञासा” ह्या शीर्षकाखाली ‘हेमलेखा’ ह्यांनी “सत्यदर्शनातील खरा अडथळा कोणता?” ह्या विपयावर “हिरण्यमयेन पात्रेण – – ” ह्या पंक्तींच्या आधारे काही विचार मांडले आहेत. त्यात शेवटी “- – – आज व्यवहारात वस्तूच्या यथार्थज्ञानासाठी पूर्वसंस्कारांचा पडदा (मनाचे conditioning) दूर करणे अत्यावश्यक आहे” असे त्यांना वाटत असल्याचे लिहिले आहे. व त्यानंतर त्या लिखाणासंबंधी आलेल्या दोन पत्रांना उत्तरे देताना जून ९९ च्या अंकात, “दैनंदिन जीवनातील अनुभव घेत असताना त्याचा (म्हणजे मनावरील पूर्व संस्कार (conditioning of mind) हाच सत्यदर्शनातील खरा अडथळा आहे याचा) सतत प्रत्यय येत असतो” असे म्हटले आहे. परन्तु त्यावरून मला पुरेसा वोध झाला नाही.
मला स्वतःला “हिरण्मयेन पात्रेण – – -” ह्याचा नीट अर्थ समजत नाही व त्यासंबंधीच्या तात्त्विक चर्चेत मला मुळीच रसही नाही. तथापि त्याचा व्यवहाराशी, आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांशी काहीतरी संबंध आहे हे वाचल्यापासून त्याविषयी अधिक जाणण्याची, समजून घेण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली आहे. तरी ह्या विपयासंबंधी काही उदाहरणे देऊन स्पष्टीकरण दिले तर मी आभारी होईन

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.