चर्चा

हिन्दु कोण?
आपल्या में ९९ च्या संपादकीयामध्ये “ज्याने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले त्याला आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. हिंदुत्वाचे मुख्य लक्षण ह्या भूमीवरची निष्ठा आहे” अशा धर्तीची विधाने आहेत. मला संपादकांना पुढील प्रश्न विचारावयाचे आहेत.
१. भारताचा नकाशा कायम वदलत आलेला आहे. (उदा. वांगला देश, पाकिस्तान) असे झाले तर भारतावाहेर राहिलेले हिंदू अहिंदू होणार का?
२. जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी भारतात पाऊलही ठेवलेले नाही पण ते स्वतःला हिंदू मानतात. अगदी छोट्या कॉस्टारिका ह्या देशात स्वतःला हिंदू मानणारी माणस मला भेटलेली आहेत. त्यांना भारतातील हिंदू स्वीकारणार नाहीत का? (हे हिंदू जन्माच्या अपघाताने हिंदू झालेले नाहीत. त्यांनी तो धर्म कुणी जवरदस्ती केली म्हणून स्वीकारलेला नाही. तर स्वेच्छेने हिंदुधर्माची पुस्तके वाचून स्वीकारलेला आहे.)
३. एका काळी वैदिक धर्म वाली, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी पसरलेल होता. वालीत तर अजूनही तो अस्तित्वात आहे. त्यावेळच्या हिंदुधर्मीयांना हिंदुत् भारतभूमीशी निगडित करण्याची जरुरी भासली नाही. मग आत्ताच ती जरुरी का आहे?
४. धर्म देशाशी निगडित करण्याची गरज इतर कुठल्याही धर्मीयांना वाटलेली नाही. मग हिंदुधर्माच्या वावतीतच असे नियम का?
५. त्रिनिदादसारख्या वेटात मजुरी करायला गेलेले भारतीय परत येण्याच्या हेतूने गेले होते. पण ते तेथेच अडकले. ते सुद्धा अहिंदू झाले का?
६. ह्या धोरणाने जगातील हिंदूंची संख्या कमी होणार नाही काय?
७. जवरदस्तीने धर्म वदलण्यास भाग पाडलेल्या हिंदूंना एका काळी हिंदूनी परत स्वीकारले नाही. म्हणून भारतात हिंदूंचे नुकसान झाले आहे. संपादक आता विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर तेच धोरण चालू राहावे असे म्हणत आहेत का?
संपादकांनी दुसरे एक विधान केलेले आहे. जे लोक केठल्याही ऐहिक लाभासाठी कायम परदेशी जातात ते मनोमन त्या देशाचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व मान्य करीत असतात.”
त्याबद्दल त्यांना एवढेच लिहिते की, देशत्याग करणा-या वयाच व्यक्तींना जो देश ते स्वीकारतात त्याची संस्कृती काय असते हे माहीत नसते. एवढेच नव्हे तर भारताची संस्कृती काय आहे ह्याचाही पत्ता नसतो. ते “परदेशी संस्कृती स्वतःच्या नकळत स्वीकारून तिचे श्रेष्ठत्व मान्य करीत असतील” असे संपादकांना म्हणावयाचे असेल तर मी वाद घालणार नाही. पण संस्कृतीचा विचार परदेशात सुस्थितीत स्थिरस्थावर झाल्यावरच लोकांना सुचतो.
या क्षणी न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवणारे अनेक भारतीय आहेत. ते फक्त स्थिरस्थावर कसे व्हायचे ह्याचाच विचार करतात. संस्कृतीचा विचार त्यांना सुचून त्यावद्दल काळजी करायला त्यांना वेळच नसतो.
मुले, (त्यातल्या त्यात मुलगी) वारा तेरा वर्षांची झाली की ही काही आईवडील संस्कृतीबद्दल विचार करू लागतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.