अकादमीय विद्वज्जन आणि युटोपिया

विसाव्या शतकातील सर्वांत दूरगामी परिणाम घडवणारी वौद्धिक क्रांती घडली मात्र संथ, शांत गावांमध्ये. केंब्रिज, कोपनहेगन, म्युनिक, पॅरिस, गॉटिंगेन, अशी ही, गावे. गॉटिंगेन हे गाव हे भौतिकीतज्ज्ञांचे खरे केंद्र. गावाचा आत्मा म्हणजे तिथले प्राचीन जॉर्जिया ऑगस्टा विद्यापीठ. इतर गावांना त्यांच्या नरवीरांचा, त्यांच्या पदकांचा गर्व असायचा. गॉटिंगेनकरांना विद्यापीठातल्या विद्यार्थांच्या आणि अध्यापकांच्या पदव्यांचा आणि जगभरातल्या वैज्ञानिक संघटनांच्या सभासदत्वाचा गर्व वाटायचा. १९२० साली रात्री घरी परतणा-या विद्यार्थ्यांनी ‘करमणूक’ जास्त झाल्याने केलेला दंगा गावक-यांच्या सवयीचा होता – तसेच याच विद्यार्थ्यांनी वौद्धिक उत्तेजनेतून रात्री उशीरापर्यंत रस्त्यामध्ये उभे राहून चर्चा करणेही सवयीचे होते. विद्यार्थ्यांना घरे भाड्याने देणा-या यजमानिणींना सबुरीची आणि त्यागाची सवय होती. पिढ्यानपिढ्या त्यांचे विद्यार्थी-भाडेकरू त्यांच्याकडून उसनवारी करीत – आणि उशीराने का होईना, शेवटी कशीवशी परतफेड करीत.
निवृत्त प्राध्यापक महाविद्यालयांत व्याख्याने देत नसत, पण तरीही त्यांचा गावाच्या वौद्धिक व्यवहारांमध्ये महत्त्वाचा सहभाग असे. नावाजलेले भापाशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि कायदेपंडित मिळून गावाची पताका जगभर फडकवीत. कार्ल फ्राइडरिक गॉसने येथे गणिताचे केंद्र घडवले. फेलिक्स क्लाईनने शुद्ध आणि उपयोजित विज्ञानातली भिंत पाडायचा प्रयत्न केला. त्याने गणिताला व्यवहारी केले आणि अनेक खगोलशास्त्रीय, भौतिकीय, यांत्रिकीय आणि तांत्रिक संस्थाना गॉटिंगेनमध्ये रुजवले. या संस्थांभोवती त्यांना उपकरणे पुरवणा-या खाजगी उद्योगांची प्रभावळ उभी झाली. नेमक्या मोजमापाची साधने आणि प्रकाशाशी संबंधित तंत्रज्ञानाचे उद्योग या जुनाट गावात जन्मून मग वाहेर पसरू लागले.
हिल्वर्ट, मिंकॉकी वगैरे गॉटिंगेनला भेट देणारे प्राध्यापक खरे तर क्लाईनशी घोर वौद्धिक मतभेद वाळगून असत – पण त्यांच्या भाषणांना जगभरचे विद्यार्थी गर्दी करीत. आपल्या टेबलावरील अजस्र स्लाईड-रूलजवळ उभा राहून जेव्हा हिल्वर्ट गणितातल्या अजून न सुटलेल्या प्रश्नांवर भाष्य करी तेव्हा सर्व श्रोत्यांना ते ज्ञानाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आत्मसात करीत आहेत, हे पटे. ते भाषणांहून परतताना पूर्वीच सिद्ध झालेले मृत ज्ञान नेत नसत, तर धगधगीत जिवंत प्रश्न नेत असत.
क्लाईनच्या संघटन-कौशल्यातून सर्व अद्ययावत नियतकालिके जेथे वाचता येतील अशी एक ‘रीडिंग रूम’ उभी झाली होती आणि एक सर्वांसाठी खुला चर्चाकक्षही. निसर्गविज्ञानाच्या आधुनिक रूपाने आपली विश्वावद्दलची निरीक्षणे नोंदायला गणित वापरायला सुरुवात केली तेव्हापासून गणिती आणि भौतिकी तज्ज्ञांमधले वाद सुरूच होते. हिल्वर्ट तर एकदा म्हणाला होता, “भौतिकी ही भौतिकशास्त्रज्ञांकरता वरीच अवघड आहे, हे उघड आहे.”
अणुविज्ञान इतके नवे आणि चाचपडत पुढे सरकणारे होते की विद्यार्थांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये दरी नसायची. इतर शास्त्रांमध्ये अनुभवाला आणि मागील शिक्षणाला महत्त्व असे – इथे फक्त ताजे संशोधनच महत्त्वाचे असे. जेम्स फ्रांक हा नोवेल-विजेता शिकवताना एखादे अवघड समीकरण सोडवताना थांबायचा, आणि विद्यार्थांना म्हणायचा, “तुम्हाला काही सुचते आहे का, पुढे कसे जायचे ते?” प्राध्यापक आपल्या चुकांवद्दल आणि शंकाकुशकांबद्दल कोणतीच गुप्तता पाळत नसत.
गणिताच्या आणि भौतिकीच्या अमेरिकन विद्यार्थि-अध्यापकांचे तर गॉटिंगेनवर फारच प्रेम होते. त्यांच्यामुळे पहिल्या महायुद्धाने कंगाल झालेल्या जर्मनीत फोर्ड फाउंडेशन आणि तेल कंपन्या ह्यांच्या परकी चलनाचा नद वाहत असे. असाच एक अमेरिकन विद्यार्थी होता रॉवर्ट ऑपेनहायमर. अमेरिकन विद्यार्थ्यांना जर्मन विद्यापीठांमधील नोकरशाही औपचारिकतांशी कधीच जुळवून घेता येत नसे. ऑपेनहायमर कधीच औपचारिक शालान्त परीक्षा पास झाला नव्हता! ह्या कारणामुळे त्याचा आचार्यपदासाठीचा (Ph.D.) अर्ज नाकारला गेला. पण या, भविष्यात ‘अणु-वॉम्बचा जनक’ ठरलेल्या, विद्यार्थ्याला त्याच्या प्राध्यापकांनी हात दिला. मॅक्स वॉनेच्या मते या पदवीसाठी ऑपेनहायमरने केलेले काम खूपच ‘उठून दिसणारे होते.
१९२०-३३ या काळात गॉटिंगेनला शिष्यवृत्ती किंवा दरमहा घरून येणारा लठ्ठ चेक नसतानाही शिकता-राहता येत असे. क्षिरेलमन हा रशियन गणिती फक्त एक टूथब्रश आणि स्वतः लिहिलेल्या मूळ संख्यांवरच्या पुस्तकाची एक प्रत घेऊन गॉटिंगेनला पोचला. पण याआधी लँडाऊचे ‘क्षिरेलमन प्रॉपोझिशनवर’ भाषण होऊन गेले होते. धडके कपडेही न घेता गावात आलेल्या विद्याथ्र्याची लवकरच विद्यापीठाने आणि गावक-यांनी सोय केली. बरेचदा तो मुख्य रस्त्यांवरून चालताना दिसत असे. बुटांच्या नाड्या बांधलेल्या नसत आणि दृष्टी शून्यात कोणत्यातरी. संख्या-संचांवर खिळलेली असे. लोकांना असल्या विक्षिप्तपणाची सवय होती.
नील्स बोरची भापणे ऐकायला हायसेनवर्ग आपल्या शिक्षकावरोवर (सॉमरफेल्ड) गॉटिंगेनला आला. त्या थोर शास्त्रज्ञाची भाषणे केवळ भक्तिभावाने न ऐकता हायसेनवर्गने वोर वरोवर फिरायला जाऊन चर्चा केली व वाद घातले. या संभापणांमुळे खूप होऊन हायसेनवर्गने भौतिकी शिकायचे ठरवले. पुढे एखाद्या कणाचे स्थान आणि वेग एकाच वेळी नेमकेपणाने ठरवता येत नाही, हे हायसेनवर्गने सिद्ध केले. स्थान आणि वेग यांच्या मापनात एक घटक जितक्या नेमकेपणाने ठरवला जाईल तितके दुस-या घटकाचे मापन अनिश्चित होते, हे तत्त्व शोधल्यावद्दल हायसेनवर्गला पुढे नोवेल पारितोषिक मिळाले.
हाउटरमन्स आणि अॅटकिन्सन सूर्याच्या गाभ्यातल्या अणु-औष्णिक क्रियांवर संशोधन करत होते. सूर्याची उष्णता अणुभंजनापासून नव्हे तर अणुमिलनातून उपजते, हे त्यांनी प्रथम दाखवून दिले. या संकल्पनेच्या पाठपुराव्यातून पुढे हायड्रोजन बॉवची निर्मिती झाली–ज्याची टांगती तलवार आज सर्व जगावर आहे. प्रवंध लिहिणे संपल्यावर हाउटरमन्स आपल्या मैत्रिणीवरोबर फिरायला गेला. जसे तारे त्यांच्या पूर्ण चमकदमकीने आकाशात दिसू लागले तसे मैत्रीण म्हणाली, “छान चमकतात, नाही ते!” छाती फुगवीत हाउटरमन्स म्हणाला, “आणि कालपासून मला ते का चमकतात, हेही माहीत आहे.”
भौतिकी-तज्ज्ञांनी तयार केलेले असे हे सुंदर जग होते. रशियन शास्त्रज्ञांना त्यांचे संशोधन प्रसिद्ध करण्याला, त्याचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन वगैरे भाषांमध्ये भाषांतर करवून घ्यायला अडथळा नसे. त्या काळच्या त्या हुकूमशाही देशातही गुप्ततेचे व सेन्सॉरशिपचे कोणतेही नियम नव्हते.
गॉटिंगेनची कीर्ती सातत्याने यशस्वी होणा-या चिकाटीने केलेल्या संशोधनावर आधारलेली होती. जगभर पसरलेली ही कीर्ती काही आठवड्यांतच नष्ट झाली. हिटलरच्या जर्मनीतून शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले. गणिती हिल्बर्टला एकदा ‘थर्ड राईशचा’ शिक्षणमंत्री असलेल्या रूस्टने विचारले, “प्रोफेसर, ज्यू व त्यांचे मित्र सोडून जाण्याने तुमच्या संस्थेला खरेच त्रास झाला का?” हिल्बर्ट नेहेमीच्या शांतपणे म्हणाला, “त्रास? त्रास कसला, मंत्री महोदय, संस्था उरली आहे कोठे!”
हिरोशिमा-नागासाकीनंतर शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांची पूर्ण माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवायची चळवळ तीव्र केली. सोबतच सर्वांना आवाहनही केले की अणुऊर्जेचा युद्धात वापर पूर्णपणे टाळावा.
१९४७-५५ या काळापासून अमेरिकेचे युद्धखाते अनेक विद्यापीठांना भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व तंत्रविद्या यांच्यातील संशोधनासाठी पैसे पुरवू लागले. सोवत विधान केले जाई, “आम्हाला संशोधनाच्या क्षेत्रात भरभराट होऊन हवी आहे, म्हणून या रकमा दिल्या जात आहेत. या शतकात एखाद्या देशाचे सामर्थ्य त्याच्या शस्त्रागारांवरूनच नव्हे, तर प्रयोगशाळांवरूनही जोखले जाते. ही स्थिती अयोग्य आणि धोकादायक आहे, हे शास्त्रज्ञांना समजत होते. आज सौम्य वाटणारे करार हळूहळू कठोर होणार, आणि बारीक ठशातील अटींमुळे संशोधनाच्या आणि विशिष्ट शस्त्रांच्या चर्चेवर वंधने येणार, हे दिसत होते. युद्धखोरी हप्त्याच्या सवलतीने विज्ञानाला विकत घेत होती. पूर्वी मुक्त चर्चासाठी ख्यातनाम असलेली विद्यापीठे आता गुप्ततेच्या विळख्यात अडकत होती. संशोधनाचा काही भाग (तरी) सैनिकी कायद्याच्या आणि विचारांच्या कक्षेत जात होता. हद्दपारी आणि देश सोडणे, आत्महत्येपर्यंत नेणारे दुःखी आणि लज्जास्पद भाव यांचा जमाना आला होता – गॉटिंगेनच्या सुंदर वातावरणाच्या काळापेक्षा फारच वेगळा.
१९२०-३३ या काळात गॉटिंगेनच्या विद्वानांनी स्वर्गवत् युटोपिया(Utopia) उभा करण्यात बरेच यश मिळवले होते. गॉटिंगेनवासी यांचे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी व अभ्यासकांशी असलेले पूरक संबंध इतर जगाने धडा घ्यावा असे होते.
जर वेगवेगळ्या देशांच्या संरक्षणखर्चाच्या अंदाजपत्रकांची छाननी केली तर असे दिसते की उत्कृष्ट बुद्धिमत्ता व जगातील खूपशी संसाधने ही माणसांच्या विनाशासाठीच वापरली जातात! विज्ञान स्वतःत तटस्थ आहे. माणसांचे राहणीमान सुधारायला ते वापरता येते – जसे, ऊर्जा-वापराने श्रमाची बचत करणे, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य वगैरे. पण ते अण्वस्त्रे, रासायनिक व जैविक हत्यारे, असल्या उपयोगांनाही जुंपता येते. यातून मानवजातच नष्ट होण्याचा धोका उद्भवतो.
आजही अमेरिकेतील अग्रगण्य संशोधन-अध्ययन संस्था संरक्षणखात्याकडूनच पोसल्या जात आहेत का? जर व्हिएतनाम, इराक आणि आता युगोस्लाव्हिया यांच्या संदर्भातील अमेरिकेची आक्रमक वृत्ती तपासली तर संशोधनात राजकीय हस्तक्षेप असणारच असे जाणवते. कोणतीही मदत कोणत्यातरी रूपात परतफेडीच्या अटीवरच केली जाते. म्हणून वैज्ञानिकांना स्वातंत्र्य नाही – आणि ज्ञानावर निर्वध आहेत – असेच म्हणावे लागते.
पण इतिहास सांगतो – भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान, युगोस्लाव्हिया – की माणसांची दुर्दम्य इच्छाशक्ती कधीच विज्ञानतंत्रज्ञानाने पराभूत होत नाही. तरी आपल्या राजकारण्यांनी त्यांचा हात लावीन तिथे माती ‘करणारा’ हस्तक्षेप शैक्षणिक क्षेत्रात करू नये. ज्ञानाच्या वेड्या तोडाव्या. म्हणजे अनेक गॉटिंगेन्ज भरभराटील येऊ शकतील.
(हा लेख रॉवर्ट जंक [Robert Jungk] याच्या “ब्रायटर मॅन अ थाऊजंड सन्ज” या पुस्तकावर आधारित आहे.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.