श्री. भाट्यांचे म्हणणे पटले नाही

श्री अनिलकुमार भाटे यांचा लेख,(आ. सु. जुलै १९९९) मला आवडला नाही व पटलाही नाही. श्री. दि. य. देशपांडे यांना तत्त्वज्ञानातले आणि अध्यात्मातले काही कळलेले नाही, आणि भाटे यांना खूप काही कळले आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. कर्मसिद्धान्तावद्दल भाटे यांनी असे म्हटले आहे:-कर्मसिद्धान्त हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. ईश्वर माना किंवा न माना, हा सिद्धान्त अवाधित असतो. या सिद्धान्ताचे implementation कोणत्या agency मार्फत होते या प्रश्नाचे उत्तर त्यांनी असे दिले आहे की, आपण स्वतःच हे काम करीत असतो. पूर्वीच्या अनेक जन्मांत केलेल्या कृतींचा व विचारांचा साठा आपल्यावरोवर वागवीत असतो, … वगैरे. माझा आक्षेप ह्या विधानावर आहे. या विधानात हे गृहीत धरले आहे की प्रत्येक माणसाचा आत्मा हा जणू काही एखाद्या पुरचुंडीत बांधून ठेवलेला असतो. ही पुरचुंडी माणसाच्या मृत्यूनंतरही आपले स्वतंत्र अस्तित्व सांभाळत राहते, आणि केव्हातरी पुढच्या जन्मासाठी देह शोधून त्यात मुक्काम करते. ही पुरचुंडी म्हणजेच जीवात्मा. तो या जन्मी आपले प्रारब्ध भोगता-भोगता क्रियमाण निर्माण करतो. हे गृहीत कृत्य हा आपल्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. याच्या उलट, जीवशास्त्र असे सांगते की, आईकडून आणि बापाकडून येणारे जीन्स अपत्याच्या पिंडाचे गुणधर्म निश्चित करतात व त्या गुणधर्मानुसार व्यक्तीचे आयुष्य मुख्यतः घडते. अर्थात आजूबाजूच्या परिस्थितीचाही त्या घडणीत मोठा वाटा असतो, पण तिच्यावर नियंत्रण ठेवणे माणसाला फारच अल्प प्रमाणात शक्य असते. भाटे ज्या प्रचंड डेटा-वेसचा उल्लेख करतात तो दोन व्यक्तींच्याकडून आलेल्या जीन्समध्ये साठवलेला असतो, तो कोठल्या एका पुरचुंडीत साठवलेला नसतो. या जीन्समध्ये पूर्वीच्या लाखो वर्षांतले संस्कार साठवलेले असतात. म्हणून मला येथे त्या तथाकथित जीवात्म्याचे – किंवा पुरचुंडीचे काहीही प्रयोजन आढळत नाही.
माझा दुसरा मुद्दा असाः-आत्मे फक्त मनुष्यांनाच असतात की सर्वच सजीवांना असतात? ते सर्वच सजीवांना असतात असे मानायला पाहिजे, कारण ८४•• लक्ष योनींची कल्पना आपल्या तत्त्वज्ञानात आहे. इतक्या योनीत फिरल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो असे हे तत्त्वज्ञान म्हणते. मानवेतर प्राण्यांना चांगले-वाईट कळण्याची बुद्धी नसते. केवळ नैसर्गिक प्रेरणांनुसार ते वागत असतात. ते प्राणीसुद्धा आपल्या वर्तमान आयुप्यात क्रियमाण निर्माण करतात असे कसे म्हणता येईल? म्हणून, आधीचे हजारो जन्म कोणत्या ना कोणत्या प्राण्याच्या देहात घालवलेला एखादा वैल जेव्हा मनुष्यजन्म घेतो, तेव्हा त्याला प्रारब्ध ते काय असणार? तिसरा मुद्दा असा की जर आत्मे फक्त मनुष्यांनाच असतील तर दहा-वीस हजार वर्षांपूर्वी – जगाची लोकसंख्या जेवढी होती। तेवढेच आत्मे अस्तित्वात असले पाहिजेत. आजची लोकसंख्या निदान दसपटीने वाढलेली आहे. मग एवढ्या प्रमाणात आत्म्यांच्या संख्येतही वाढ झाली असे म्हणायला पाहिजे. पण आत्मे जन्मत नाहीत (आणि मरत नाहीत) असे हे तत्त्वज्ञान म्हणते. मग हा हिशोव कसा घालायचा? सारांश, ही प्रारब्धाची आणि पूर्वजन्मांची कल्पना म्हणजे केवळ मनाचा खेळ आहे. कर्मसिद्धान्ताचा डोलाराच येथे कोसळून पडतो. भाटे निसर्गातल्या कारण-कार्य नियमालाच जर कर्मसिद्धान्त समजत असतील तर ते चुकीचे आहे कारण त्या नियमांत चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक या कल्पनांचा काही संबंध नसतो, पण कर्मसिद्धान्तात मात्र तो जरूर असतो, हा फरक ते ध्यानात घेत नाहीत.
पुढे ते म्हणतात की, व्रह्म, जीवात्मा वगैरेसारख्या अत्यंत गहन संकल्पनांचे विवेचन करण्याकरिता प्राथमिक स्वरूपाच्या लॉजिकल मॉडेलचा उपयोग नाही. ठीक आहे. पण मग कुठच्या मॉडेलचा उपयोग होईल हे ते का सांगत नाहीत? दुस-यांचे अज्ञान दाखवतानाच स्वतःचे ज्ञान प्रकट करायला पाहिजे. मोठमोठ्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञांची नावे वाचून दिपून गेलेल्या वाचकांच्या ज्ञानात जर काही भर पडली नसेल तर त्या लेखनाचा उपयोग काय?
* * * * * * * *
श्री ढाकुलकरांच्या लेखावरची (जुलै ९९) माझी प्रतिक्रिया शक्य तितक्या संयत शब्दांत कळवीत आहे. मी ब्राह्मण आहे याचा मला खेद नाही आणि अभिमानही नाही. माझ्या पूर्वजांनी जी काय पापे केली, त्यांचे प्रायश्चित्त आजच्या ब्राह्मणसमाजाने घेतले पाहिजे असे मला वाटत नाही. ते प्रायश्चित्त घेण्यासाठी आजच्या ब्राह्मणांनी कुठल्याही क्षेत्रात पुढाकार घेऊ नये, नेहमी मागे-मागेच राहावे, अशी जर कुणाची । अपेक्षा असेल तर ती पुरी करण्याची जवाबदारी तो समाज घेणार नाही हे स्वच्छ सांगितलेले बरे. इतिहास-काळात वहुजन समाजाला अज्ञानात ठेवल्याची जबाबदारी फक्त मूठभर ब्राह्मणांची नव्हती. तत्कालीन दंडसत्तेचा पाठिंबा असल्यामुळेच त्यांना हे शक्य झाले, आणि दंडसत्ता ज्यांच्या ताव्यांत होती ते काही ब्राह्मण नव्हते हे ध्यानात घेतले पाहिजे. आजची दंडसत्ता बहुजनसमाजातील वरच्या थरांत आहे. पुरोहितशाहीचे जोखड तो समाज का फेकून देत नाही? पुरोहितशाहीचा बागुलबुवा कशासाठी दाखवायचा? आज जेमतेम तीन साडेतीन टक्के संख्या असलेला व्राह्मण समाज, त्याला दंडसत्तेचा पाठिंबा नसताना बाकीच्या ९७ टक्के समाजावर अन्याय करूच शकत नाही. उलट, १९४८ साली शेकडो निरपराध ब्राह्मणांची घरे बहुजनसमाजाने जाळली, तेव्हा तो समाज काय करू शकला? म्हणून मी म्हणतो की, माझ्या पूर्वजांनी जी काय पापे केली त्यांचा पाढा आज कुणी कितीही वेळा वाचला तरी, त्यामुळे आजच्या व्राह्मणसमाजाने नेमके काय करायला हवे ह्याचा बोध होत नाही.
नऊ वर्षांपूर्वी एका व्राह्मण प्राध्यापकांनी एक वैचारिक मासिक काढावयाचे ठरवले. आगरकरांचे कार्य पुढे चालवणे हे त्यांचे ध्येय होते. एप्रिल १९९० मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अंकात त्यांनी संपादकीय लिहिले आहे त्यात दलित आणि स्त्रिया यांच्यावरील अत्याचारांचा उल्लेख आहे. जातिभेद व विशेषतः अस्पृश्यता यांची चर्चा या मासिकात होईल असे त्यांनी म्हटले आहे. हा अंक काही गुपचूपपणे फक्त ब्राह्मण वाचकांना पाठवला नव्हता. “फक्त ब्राह्मणांसाठी” असा शिक्का त्यावर नव्हता. ऑगस्ट ९० अंकात श्री. आ. ह. साळुखे यांचा ‘धर्म की धर्मापलीकडे’ या नावाचा लेख आलेला आहे. यावरून हे मासिक फक्त ब्राह्मण लेखकांसाठी नव्हते हे। ध्यानात येईल. श्री देशपांडे यांना सहकारी मिळाले ते सगळे ब्राह्मणच; पण ते काही मुद्दाम ठरवून झाले नव्हते. जर कुणा ब्राह्मणेतर विचारवंताचे सहकार्य मिळाले असेल तर ते त्यांनी आनंदाने घेतले असते. वाचकवर्ग व वर्गणीदार बहुसंख्य ब्राह्मण का, याचे उत्तर हेच की हा समाज वैचारिकदृष्ट्या प्रगत आहे, पण तो तसा आहे हा काही आ. सु. चा अपराध नव्हे. वरे, अशा व्राह्मणी मासिकामुळे ब्राह्मणेतर समाजावर काही अन्याय झाला असेल तर तसे ढाकुलकरांनी स्पष्ट सागांवे, आणि मगच खिलारेनानावटींच्या आरोपाची वी ओढावी. उगाच काहीतरी आरोप करण्यात काय हशील आहे?
विद्रोही लेख कसा असावा याचा नमुना दाखवण्यासाठी ढाकुलकरांनी स्वतःच एक लेख लिहावा व तो आ. सु. कडे पाठवावा. संपादक तो अवश्य प्रसिद्ध करतील. “तस्लीमा” वगैरे काही व्हायचे नाही. मी तर म्हणतो की अशा लेखांना आ. सु. ने काही मानधन द्यावे, आणि प्रत्येक अंकाची तीन चार पाने त्यांच्यासाठी राखून ठेवावीत. एक वर्षभर हा प्रयोग करून पहावा. कदाचित त्यातूनच आ. सु. वरील आरोपांना जवाव मिळेल. वैचारिक परिवर्तन हे समाजसुधारणेचे खरे अधिष्ठान आहे. त्वेष आणि जळफळाट ह्यांच्यामुळे परिवर्तनाच्या ऐवजी कडवटपणा निर्माण होतो अशी आ. सु. ची भूमिका आहे असे मला वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.