स्फुट लेख

हिंदु कोण
१. हिंदुधर्माचे कोणतेही एक पुस्तक, एक देव, समान संस्कार, धार्मिक विधी असे काहीच नसल्यामुळे हिंदु कोण हा प्रश्न निर्माण होतो. आणि हा एक तांत्रिक प्रश्न आहे. हिंदूची सर्वमान्य व्याख्या नसल्यामुळे भारतशासनाने हिंदूंसाठी केलेले कायदे ज्याला लागतात तो हिंदु अशी भारतात सध्या परिस्थिती आहे. ईशान्येकडे अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणीपूरपासून नैर्ऋत्येकडे लक्षद्वीपापर्यंत आणि वायव्येतील राजस्थानपासून आग्नेयेकडील अंदमान, निकोवारपर्यंत भारत पसरला आहे. ह्या इतक्या विस्तृत प्रदेशात राहणा-या ज्यांच्या निष्ठा एका पुस्तकावर (वायबल/कुराण, वेद/गुरुग्रंथ साहेव इ.) वर नाहीत अशा लोकांच्या देवता समान नाहीत, त्यांच्या भापा सारख्या नाहीत इतकेच नव्हे तर पौराणिक कथादेखील समान नाहीत, त्यामुळे त्यांना एकत्र बांधणारे सूत्रच नाही. हा धागा नसल्यामुळे हिंदु कोणास म्हणावे हा प्रश्न निर्माण होतो. परदेशात राहणा-यांना भारताचे कायदे लागू होत नसल्यामुळे आणि सगळ्या हिंदूंना एकत्र वांधणारा धागा नसल्यामुळे त्यांना हिंदु म्हणणे कठीण आहे असे मत आम्ही मांडले आहे. निदान ह्या भूमीवर निष्ठा हा धागा मानावा असे आम्ही सुचविले आहे. हिंदूंचे दुसरे लक्षण जातिसंस्था हे आहे. एखादी भारताच्या बाहेर राहणारी व्यक्ती भारताच्या कोणत्याच जातीत पडणारी नसेल तर तिला हिंदु कशाच्या बळावर म्हणावे, असे मनात घेऊन हा प्रश्न आम्ही विचारला आहे. दुसरीकडे जे लोक स्वतःला हिंदु म्हणवत नाहीत असे अनेक लोक कायद्याच्या दृष्टीने हिंदु मानले जातात, उदा. जैन, बौद्ध, वसवानुयायी लिंगायत वगैरे आणि काही आदिवासीसुद्धा.
२. कॉस्टारिकामध्ये स्वतःला हिंदु म्हणविणा-या काही व्यक्ती श्रीमती गंडभीरांना भेटल्या, त्यांना भारतातल्या कोणत्या जातीचे हिंदु आपले म्हणून स्वीकारणार असा आमच्यापुढे प्रश्न आहे. कारण जातीशिवाय असलेले हिंदु फारच थोडे आहेत. त्यांची संख्या वाढावी असा आपण प्रयत्न करीत आहोत पण आम्हाला यश येत नाही हे श्रीमती गंडभीरांना माहीत आहे.
३. वैदिक धर्म बाली, इंडोनेशियामध्ये होता असे त्या म्हणतात. तो तिकडे पसरला तेव्हा हिंदु धर्माची व्याख्या करण्याची गरज कोणालाच वाटली नव्हती. आपल्या देशातल्या मंडळींबरोवर हिंदूंचे आचार, आपल्या देवता तिकडे गेल्या हे खरे आहे, अशा सगळ्या देव-देवतांची यादी करून त्याचप्रमाणे विवेकवाद्यांसारख्या नास्तिक म्हणविणा-यांना समाविष्ट करवून घेऊन हिंदूंची एक नवीन व्याख्या केल्यासच ते आजही हिंदु आहेत असे म्हणता येईल.
४. हिंदु धर्म सोडून इतर धर्मीयांना त्यांचे संस्थापक आहेत. पुस्तके आहेत. वौद्ध, ख्रिस्ती, मुसलमान अशा अनेक धर्मांना कोणी ना कोणी संस्थापक आहे. त्या संस्थापकाने मांडलेली तत्त्वे ज्यांना मान्य आहेत ते कोणत्याही देशात राहणारे असोत ते त्या-त्या देशात आपापल्या धर्मातले मानले जातात. याउलट हिंदु धर्म. त्यामध्ये शैवांनी वैष्णवांची किंवा वैष्णवांनी शैवांची मंदिरे पाडली आहेत अथवा मंदिरे पाडली नसतील तरी आतल्या मूर्ति वदलल्या आहेत. दिगंबर आणि श्वेतांवर जैन मंडळी स्वतःला अहिंसक म्हणवत असली तरी काही मंदिरांवर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठलेले आहेत. (हिंदु कायदा जैनांना लागू होतो म्हणून हा उल्लेख.) इतके परस्परविरोधी (धार्मिक) विचारसरणीचे लोक हिंदु म्हणवतात म्हणून हे प्रश्न निर्माण होतात.
५. मॉरिशस, त्रिनिदाद, वाली वगैरे सारख्या वेटांत काही भारतीय परंपरा असलेले लोक अजून शिल्लक आहेत. नव्हे तेथे गेलेल्या भारतीयांच्या परंपरा अद्याप टिकून आहेत. तेवढ्यामुळे त्यांना हिंदु ठरविणे, वर उल्लेखिलेल्या अनेक कारणांस्तव कठीण होऊन बसले आहे.
६. सहाव्या प्रश्नात श्रीमती गंडभीर यांनी हिंदूंच्या संख्येचा उल्लेख केला आहे. ज्यांनी आपल्या मनातून धर्म आणि जात दोन्ही काढून टाकली आहेत ते विवेकवादी असे आम्ही म्हणतो त्यामुळे आम्ही स्वतः हिंदु आहोत की नाही असा
आम्हालाच प्रश्न पडतो. त्यामुळे ह्या जगातली हिंदूंची संख्या कमी झाल्याने आम्हाला फरक पडत नाही.
७. ज्यांनी जाणूनबुजून ख्रिस्तीधर्म स्वीकारला त्यांची गोष्ट तर सोडाच परंतु ज्यांच्या गावांत पाठ्यांनी विहिरीत पाव टाकून गावेच्या गावे बाटवली त्यांनाही हिंदूंनी परत घेतले नव्हते. तो इतिहास झाला. आज आम्हाला हिंदूंचे, मुसलमानांचे, ख्रिश्चनांचे नुकसान अशा शब्दांत विचार करायचा नाही. धर्मभावना जोपासल्यामुळे मानव-जातीचे नुकसान कसे होते ह्याकडे आपले लक्ष केंद्रित करावयाचे आहे.
ऐहिक लाभासाठी परदेशी जाणा-या लोकांनी त्या देशाचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व मनोमन स्वीकारले असते ह्या आमच्या विधानात संस्कृती हा शब्द बराच व्यापक अर्थाने योजला आहे. सिव्हिलिझेशन ह्या अर्थानेसुद्धा संस्कृती हा शब्द वापरण्याचा प्रघात आहे. ते वाक्य लिहिताना जास्त पैसे देणारी म्हणून श्रेष्ठ सिव्हिलिझेशन हा अर्थ मनामध्ये ठेवून तो वापरला गेला आहे असे आता मागे वळून पाहता वाटते, त्यावेळी लिहिण्याच्या ओघात हे विधान केले गेले आहे. आम्ही वापरलेला शब्द वरोवरच आहे हा आग्रह नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.