पोपप्रणीत धर्मविस्तार

भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना पायांनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली. इ.स. १४७८ मध्ये पोप (चवथा) सिक्स्टस् ह्यांनी स्पॅनिश इन्क्विझिशनला अधिकृतपणे मान्यता दिली. ह्या स्पॅनिश इन्क्विझिशनने आपल्या कारकिर्दीत सुमारे चार लाख लोकांचा अमानुष छळ करून वध केला! आमच्या धर्मशास्त्राचा हजारो पानांचा अनेक खंडी इंग्रजी इतिहास लिहिणा-या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे ह्यांनी हे लिहिले आहे! त्यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासाचा पहिला खंड १९३० साली निघाला व शेवटचा १९६२ साली! १९६३ साली त्यांना ‘भारतरत्न’ पदवी लाभली. संशोधन व ग्रंथलेखन ह्यांसाठी भारतरल मिळाल्याचे हे एकमात्र उदाहरण आहे. राजकीय लाभासाठी, मेलेल्यांनाही भारतरत्न देण्याचा प्रघात जेव्हा सुरू झालेला नव्हता त्या काळी डॉ. काणे ‘भारतरत्न’ झाले हे विशेष! डॉ. काणे ह्यांनी असेही दाखविले आहे की, ख्रिस्ती-स्पॅनिश लोक अमेरिकेत गेले तेव्हा त्यांच्या घोडेस्वारांना पाहून हे कोणी देवच होत, असे वाटून रेड इंडियन हे तिथले मूळचे लोक हजारोंनी त्यांना नमस्कार करावयास आले; तेव्हा बंदूकवाल्या दोनशे ख्रिस्ती स्पॅनिश लोकांनी पटापट गोळ्या झाडून ‘त्या’ रेड इंडियनांना मारून टाकले! असे लाखो मारले टॉमस डी टॅकिंमाडा हा डोमिनिकन पहिला ‘अँड इन्क्विझिटर’ होता. त्याने निदान दोन हजार माणसे जिवंत जाळली! पोप पाचवे पायस ह्यांनी पाखंड, असत्य व चुकीची धर्ममते ह्यांचा बीमोड करणे हे आपले कर्तव्य असल्याचे जाहीर केले; आणि इन्क्विझिशनच्या अनेक कार्यक्रमांत स्वतः भाग घेतला! रोमन कॅथॉलिक चर्चने जोन ऑफ आर्कला पाखंडी म्हणून जिवंत जाळले! जिआडनो ब्रूनो ह्या वैज्ञानिकाला चर्चने जिवंत जाळले! कारण त्याने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री विश्वरचना या सिद्धांताचे समर्थन केले होते. ख्रिस्ती धर्मात कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे पंथ झाले, तेव्हा आरंभी ह्या दोन्ही पंथांच्या लोकांनी संधी मिळाली त्याप्रमाणे एकमेकांना जाळून टाकण्यास कमी केले नाही! लॅटिमर, रिडले ह्यांना कॅथॉलिकांनी जाळून मारल्याचे इंग्लंडच्या इतिहासात प्रसिद्धच आहे! ख्रिश्चन व इस्लामी धर्मावरून झालेली क्रूसेड्स नावाची घनघोर युद्धे काय वर्णावी? ।
रोमन कॅथॉलिक लोक देवाला आईसारखा मानतात. (गाँड अॅज मदर). प्रोटेस्टंट त्याच्याकडे पिता म्हणून पाहतात. (गॉड अॅज फादर). त्याच्यावरून भांडण! आम्ही पूजेत “देवा! तू माझी आई आहेस, बाप आहेस, बंधु आहेस, मित्र आहेस, विद्या आहेस, द्रव्य आहेस; फार काय, माझे सर्वस्व तूच आहेस!” (“त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ।”) अशी त्याची प्रार्थना करतो, तो आई आहे की बाप आहे ह्यावरून एकमेकांचे गळे घोटीत नाही! हिंदुधर्मात एक देव मानतात, तसे अनेकही मानता येतात. पण त्या अनेकांत एकच अनुस्यूत आहे. “मम वर्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः (गीता, ४,११)” म्हणजे सर्व माणसे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात, असे खुद्द भगवंताने गीतेत म्हटले. तेच कालिदासाने “बहुधाप्यागमैर्भिन्नाः पंथानः सिद्धिहेतवः । त्वय्येवनिपतन्त्योघाः जान्हवीया इवार्णवे” (रघुवंश, १०.२६) ह्या सुंदर श्लोकात सांगितले. भिन्न भिन्न आगमानुसार ईश्वरप्राप्तीचे मार्ग भिन्न वाटले तरी, गंगेचे विविध ओघ जसे शेवटी समुद्रातच पडतात, तसे ते सर्व मार्ग हे ईश्वरा! तुलाच येऊन मिळतात, अशी सहिष्णुतेची ही मांडणी हिंदुधर्मात आहे. सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात ब्राह्मण व श्रमण (म्हणजे बौद्ध भिक्षु) ह्यांना सारखाच मान द्या, अशी आज्ञा केलेली प्रसिद्धच आहे. (अशोकाचे ३ रे, ८ वे व ११ वे शैलशासन.)
गोव्यात पाद्र्यांनी केलेला कहर काय वर्णावा? सुप्रसिद्ध संशोधक प्रा. अनंत काकवा प्रियोळकर ह्यांचे ह्या विषयावरील ‘इन्क्विझिशन इन गोवा’ हे प्रसिद्ध पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावे. डोमिनिकन, फ्रान्सिस्कन, जेसुईट व अगस्टीन ह्या कॅथॉलिक मंडळींनी गोव्यात हिंदूचा अनन्वित छळ केला! त्यातही जेसुईट फारच अमानुष! त्यातही गोवा बेट, बारदेस व सासष्टी येथे विशेष अत्याचार झाले. हिंदूंची देवळे पाडून तेथे चर्चेस केली व त्या देवळांच्या जमिनी चरितार्थासाठी त्या चर्चेसला लावून दिल्या. हिंदूचे धर्मग्रंथ जाळले. रायतूरचा किल्लेदार असलेल्या दियोगु रुद्रीगिश ह्या फिरंग्याने एका रात्रीत सासष्टी तालुक्यातली २८० देवळे पाडली, असे फिरंग्यांच्याच इतिहासात नमूद आहे. शेंडी व जानवे यांवर गोव्यात कर होता. शेंडी राखणा-याला वर्षाला ८ रु. शेंडीचा कर द्यावा लागे! क्रूर इस्लामी राजवटीतही असा कर नव्हता! त्या काळातले ८ रु. म्हणजे फार झाले; कारण त्याच काळात अकबराच्या सैन्यातल्या शिपायाला ८ आणे म्हणजे अर्धा रुपया पगार असे! (अकबराचा मृत्यू इ.स. १६०५)
२५ नोव्हेंबर १५१० रोजी अल्बुकर्कने गोवा शहर जिंकले. त्याच्यासोबत पायांचाही एक तांडा पोर्तुगालच्या बादशहाने पाठविला होता. आल्बुकर्कने गोवा शहर जिंकताच आधी तिथल्या मुसलमान शिपायांची कत्तल करून त्यांच्या विधवा स्त्रियांना बाटवून पोर्तुगीज शिपायांशी त्यांची लग्ने लावून दिली! १५६० साली गोव्यात इन्क्विझिशनची स्थापना झाली. लगोलग ब्राह्मणांनी व सोनारांनी आपल्या इस्टेटी ख्रिस्त्यांना विकून गोवे सोडून जावे (इ.स. १५६०), इतरही सर्व हिंदूंनी गोव्यातून निघून जावे (इ.स. १५६३), हिंदूंनी आपले धर्मग्रंथ नष्ट करावे (इ.स. १५६७), नव्याने बाटलेले प्रार्थनेस हजर न राहिल्यास त्यांना शारीरिक शिक्षा करावी (१५६७), ख्रिस्त्यांनी ख्रिस्ती नसलेल्यांशी संबंध ठेवू नयेत, हिंदूंना हाकलून द्यावे (इ.स. १५७३), हिंदूनी कोणतेही वाहन वापरू नये (इ.स. १५७४), गोवा सोडून गेलेले हिंदू गोव्यात परत आल्यास त्यांना ठार मारावे, असे हुकूम निघून त्यांची कडक अंमलबजावणी सुरू झाली! सेंट फ्रान्सिस झेवियर हा जेसुईट पाद्री १५४२ साली गोव्यात आला. त्याच्या नावाने मुंबईला प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेज आहे. त्याने आपल्या हयातीत ६० हजार माणसे बाटविली! बाटविण्याचा विधी करताना आकाशातल्या बापाच्या नावाने एवढ्या माणसांना पवित्र पाणी देता देता त्याचा एक हात जन्माचा अधू झाला! सुमारे २ हजार माणसे त्याने जिवंत जाळली! जुन्या गोव्यात बोंजेझुस चर्चमध्ये त्याचे प्रेत मसाला भरून ठेवले आहे. पाद्री त्याला गोव्याची संरक्षक देवता मानीत व गोव्यावर काही संकट, आक्रमण इत्यादी आल्यास कवरीतून त्याचे प्रेत बाहेर काढून त्याचेपुढे व चर्चेसमध्ये प्रार्थना करीत.
डिचोलीजवळ नार्वे गावी सप्तकोटीश्वराचे मंदिर आहे. मुसलमानांनी ते उद्ध्वस्त केले होते; तेव्हा विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचे मंत्री माधवाचार्य (हेच पुढे स्वामी विद्यारण्य नावाने महायोगी व शृंगेरीचे शंकराचार्य ‘पंचदशी’कार म्हणून विख्यात झाले!) ह्यांनी गोवा जिंकून मुसलमानांना पिटाळून सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार केला. पुढे पोर्तुगीज पात्र्यांनी ते पुनः उद्ध्वस्त केले, तेव्हा स्वतः शिवाजी महाराजांनी तेथे जाऊन पायांना पिटाळून त्याचा जीर्णोद्धार केला. इ.स.चे चौथे ते चौदावे शतक अशी हजार वर्षे गोव्याला नांदलेले गोव्यातले प्रसिद्ध राजकुल कदंबांचे आहे. सप्तकोटीश्वर त्यांचे कुलदैवत! नवीन गोवा शहराच्या उभारणीसाठी फिरंग्यांनी या देवळाचे दगड उखडून नेले असे आंद्रे कोर्साली ह्या तेव्हाच्या इटालियन प्रवाशाने लिहून ठेवले आहे. शिवाजीने फिरंग्यांना पिटाळून ह्या देवळाचा चौक नव्याने बांधला, शिखराची शिल्परचना उत्तम केली व देवाच्या पूजेसाठी कायम व्यवस्था लावून दिली. ह्याविषयीचा इ.स. १६६८ मधला शिवाजी महाराजांचा ‘श्री सप्तकोटीश शके १५९० कीलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभः’ असा संस्कृत शिलालेख त्या देवळाच्या महाद्वारावर आहे.
पाद्त्रांच्या छळापासून गोव्यातल्या हिंदूंना सोडविण्यासाठी शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी ह्यानेही इ.स. १६८३ साली गोव्यावर स्वारी करून तिथल्या फोंड्याच्या मर्दनगड किल्ल्यातून पोर्तुगीजांना हाकून साष्टी, बारदेश प्रांत जिंकून गोवे शहराला वेढा घातला! संभाजीचे आक्रमण एवढे तीव्र होते की गोव्याला तेव्हाचा पोर्तुगीज गव्हर्नर काँदिद आल्योर ह्याने आपला राजदंड झेवियरच्या थडग्यावर फेकून दिला व झेवियरचे प्रेत (तो गोव्याची संरक्षक देवता म्हणून) त्याच्या थडग्यातून बाहेर काढून त्याच्यापुढे व सर्व चर्चेसमध्ये प्रार्थना सुरू करण्यात आल्या. अलीकडे डिसेंबर १९६१ मध्ये स्वतंत्र भारत सरकारच्या फौजांनी गोव्यावर गोवामुक्तीसाठी हल्ला चढविला, तेव्हाही झेवियरचे प्रेत असेच थडग्यातून बाहेर काढून त्याचेपुढे व सर्व चर्चेसमध्ये प्रार्थना करण्यात आल्या होत्या. संभाजीचे आक्रमण पोर्तुगीजांच्या व पात्र्यांच्या उरात धडकी भरविणारे, किती तीव्र असेल ह्याची कल्पना ह्यावरून सहज येईल.
खरे म्हणजे गोवा त्याच वेळी संभाजीच्या स्वराज्यात म्हणजे महाराष्ट्रात विलीन व्हावयाचा. पण इतिहासातही काही नियती असते! नेमक्या त्याच वेळी औरंगजेबाचा मुलगा महंमद मुअज्जम प्रचंड फौज घेऊन रायगड भागात उतरल्याने संभाजीला पायांवरची आपली मोहीम आवरती घेत पोर्तुगीजांशी (मिळेल तेवढे पदरात पाडून घेणारा) तह करून घाईघाईने स्वराज्यात परतावे लागले! (इ.स. १६८३) गोव्यात पात्र्यांच्या भीतीने त्या काळी देवतांची स्थलांतरे झाली. वेर्णे येथील म्हाळसामंदिर पोर्तुगीजांनी पाडल्याने ती देवी म्हार्दोळला आली; कोलवे येथील महालक्ष्मी बांदिवड्याला आणली!
पाद्रांच्या छळाने त्रस्त झालेल्या हिंदूंनी प्रौढप्रतापनिधी पहिले बाजीराव पेशवे ह्यांना पत्र पाठविले की आमचे ह्या धर्मच्छलापासून रक्षण करा. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा ह्याला सेनासंभार देऊन वसईवर रवाना केले. गुजरातेचा सुभेदार बहादुरशहा ह्याने इ.स. १५३४ मध्ये वसई व आसपासचा प्रदेश पोर्तुगीजांना दिला होता. तेथे त्यांनी प्रथम १५३६ साली व नंतर इ.स. १५९० ते १६०० ह्या काळात मोठा किल्ला बांधला. त्याला ११ बुरुज होते व त्यांवर ९० तोफा होत्या. किल्ल्याभोवती तीन बाजूंनी समुद्र असल्याने किल्ला निसर्गतःच अजेय होता. चिमाजीने आपल्या सैनिकांना आवाहन केले की ‘तोफेच्या तोंडाला माझे मुंडके बांधून ती डागा म्हणजे निदान माझे मस्तक तरी किल्ल्यात पडेल!’ शर्थीने लढून चिमाजीने किल्ला जिंकला (इ.स. १७३९) व पायांचा आणि पोर्तुगीजांचा बंदोबस्त केला. चिमाजीने तेथे बांधलेले देऊळ अद्याप आहे. किल्ल्यातील मंदिरे उध्वस्त करून पाठ्यांनी तेथे चर्चेस् उभारली होती. अलिकडे तेथे झालेल्या उत्खननात त्या मंदिरांचे अवशेष, काही मूर्ती व शिलालेख मिळाले. तो पोर्तुगीजपूर्वकालीन प्राचीन शिलालेख डॉ. वि. भि. कोलते ह्यांनी संपादून प्रसिद्ध केला आहे! बाटविल्या गेलेल्या हिंदूंनी काट्याचमच्यांनी न जेवता जुन्या सवयीनुसार हातांनी जेवण केले, हातांनी हिंदू असताना सारखा नमस्कार केला अथवा हिंदू राहिलेल्या म्हणजे ख्रिस्ती न झालेल्या आपल्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांना नमस्कार केला तर त्यांचे ते हात जेथे कापले जात तो ‘हातकतोरे’ नावाचा काळा खांब गोव्यात अनेक ठिकाणी आजही पाहायला मिळतो. एकापरी मिशन-यांच्या काळ्या अंतःकरणाची ती जणू साक्षच! बा. भ. बोरकरांच्या बोरीजवळचा असा खांब आमचे ज्येष्ठ सन्मित्र श्री. मा. गो. वैद्य नुकतेच स्वतः बघून आले!
अमेरिकेत तिथल्या मूळच्या लाल भारतीयांसाठी म्हणजे रेड इंडियन्ससाठी १८३० साली इंडियन रिमूव्हल अॅक्ट करून त्यांच्या राहण्याच्या परंपरागत प्रदेशातून त्यांना हाकलण्यात आले. १८४८ मध्ये कॅलिफोर्नियात सोन्याचा शोध लागला तेव्हा ह्या रेड इंडियन्सच्या जमिनी हिरावून घेऊन त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. १८५३ मध्ये कॅलिफोर्नियात १ लाख रेड इंडियन होते, ते १८६४ मध्ये ३० हजार राहिले व १९०६ मध्ये फक्त १९ हजार उरले! दक्षिण अमेरिकेतले इंका लोक हे आपल्या मयासुराच्या वंशातले महान शिल्पी होत. या संदर्भात चमनलाल यांचे हिंदू अमेरिका हे पुस्तक प्रसिद्धच आहे. दक्षिण अमेरिकेतला पेरू देश जिंकणा-या पिझारोने तिथल्या इंका राजाला भेटीसाठी बोलावले. इंका आपल्या माणसांसह भेटायला आला तेव्हा पिझारोने आपले सैन्य तोफा बंदुकांसह तयारच ठेवले होते. फादर व्हिन्सेन्ट व्हालवर्दै ह्या कॅथॉलिक धर्मगुरूने इंकाला ख्रिस्ती धर्म व पोपचे आधिपत्य पत्करण्यास सांगितले. ते स्पॅनिश भाषेतले बोलणे इंकाला न कळल्याने त्याने, ‘तुम्ही मला सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कशा कळल्या,’ असे त्या पाढ्याला विचारले. तेव्हा व्हालवर्देने इंकाला बायबलची प्रत देऊन ‘ह्यात हे सर्व आहे’ असे सांगितले. हे पुस्तक मला काही सांगत नाही’ असे म्हणून इंकाने ते जमिनीवर फेकले. त्याबरोबर ‘ईश्वराच्या शब्दाचा अपमान झाला आहे, ख्रिश्चनांनो शस्त्रे चालवा’ असे तो धर्मगुरू ओरडला. लगेच इंकाच्या माणसांना कापून काढून इंकाला कैद करण्यात आले. २२’x१६’ एवढ्या क्षेत्रफळाची आपली कोठडी आपण सोन्याने भरून देऊ, त्या बदल्यात आपल्यास सोडावे ही इंकाची मागणी पिझारोने कबूल केली. इंकाच्या प्रजेने तेवढे सोने आणून दिले, तरीही त्याला न सोडता जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठवण्यात आली. धर्मगुरू व्हालवर्देने सही करून शिक्षेला मान्यता दिली व इंकाला सांगितले की तू ख्रिस्ती झालास तर तुला जिवंत जाळण्याऐवजी गळा दाबून मारू! तेव्हा इंका ख्रिस्ती झाला व त्याला गळा दाबून मारण्यात आले!
कॅथॉलिक चर्च धार्मिक व नैतिक क्षेत्रांत विचार-स्वातंत्र्य नाकारते. पोप धर्मासनावर बसल्यावर देवशास्त्र (थिऑलॉजी) व नीती (मॉरल्स) याविषयी जे आदेश देतो ते सर्व कॅथॉलिकांना निर्दोष म्हणून स्वीकारावेच लागतात. तेथे चर्चेला जागा नाही.
प्राचीन काळी गुलामगिरीची पद्धती काही समाजात होती. उदाहरणार्थ, ग्रीक समाज. आधुनिक काळात ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांनी तिला पुनः जिवंत केले! पश्चिम आफ्रिकेतून काळ्या आफ्रिकी लोकांना पकडून जहाजातून ब्राझीलला आणले जाई. तेथे त्यांचा लिलाव होत असे! इस्लाम व ख्रिस्ती धर्म हे दोन्ही गुलामगिरीला मान्यता देतात. गंमत म्हणजे इस्लामची गुलामांविषयीची दृष्टी त्यातल्या त्यात थोडी उदार होती, म्हणजे असे की सहा वर्षांच्या गुलामीनंतर गुलामाची तिच्यातून मोकळीक होत असे! गुलामाशी कनवाळूपणे वागावे असे कुराण सांगते. नव्या करारात अशी सवलत नाही. चर्चचा धार्मिक कायदा (चर्च लॉ) गुलामगिरीचे प्रामाण्य स्वीकारतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.