महर्षी ते गौरी

मंगला आठलेकर यांनी स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल दाखविणारे ‘महर्षी ते गौरी’ हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तावनेतील पहिलेच वाक्य, “महर्षी कर्त्यांचं सारं घराणं स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारं!” असे आहे. यावरून लेखनाचा शिथिलपणा, लक्षात यावा. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाचे मोठेच काम केले. त्यांचा मोठा मुलगा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी विवेकवादाचा प्रसार आणि संततिनियमनाचा प्रचारच नव्हे तर प्रत्यक्ष कामही केले. त्या अर्थाने ते दोघे समाजसेवक आहेत. र. धों. चे दुसरे बंधू दिनकर धोंडो कर्वे आणि त्यांच्या पत्नी इरावती कर्वे यांचे स्त्रियांच्या उन्नतीचे काम प्रसिद्ध नाही. इरावतीबाई तर पक्क्या सनातनी होत्या. त्यांची कन्या म्हणजे तिसरी पिढी. त्या पिढीतल्या गौरी देशपांडे या ललित-लेखिका आहेत. कथाकादंब-यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्री-स्वातंत्र्यावरची मते व्यक्त केली आहेत. ही ‘समाजसेवा’ किंवा ‘स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम’ आहे असे म्हणणे थोडे ढगळपणाचे आहे. प्रस्तावनेतच महर्षी कर्त्यांची चौथी पिढी, म्हणजे गौरी देशपांड्यांची मुलगी ऊर्मिला जाहिरात व्यवसायात मॉडेल म्हणून काम करते, असे लेखिका सांगतात. ही चौथी पिढी कर्यांचं ‘सारं घराणं’ यात येते की नाही? आणि रधोंचे आणखी दोघे बंधू? तेही स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारे होते?
‘पुरुषप्रधान संस्कृती मानणारे आर्य भारतात आले. त्यांनी बालविवाह, बहुपत्नीकत्व, विधवांचा छळ, सती जाणे अशा भयानक व स्त्री-विटंबना करणा-या चालीरिती सुरू केल्या.’ (पान २) असे लेखिका सांगतात. याचे प्रमाण काय? आम्हाला माहीत असलेल्या इतिहासात आर्यांमध्ये स्वयंवरपद्धती होती. त्याही आधी श्वेतकेतूने केव्हातरी प्राचीनकाळी विवाहसंस्था सुरू केली आणि त्यापूर्वी जेथे विवाहच नव्हते तेथे बालविवाह, विधवांचा छळ आणि सतीची चाल कशी येणार? श्वेतकेतूचा काळ हा उपनिषदांचा. त्यापूर्वी हजारो वर्षे, (निदान २ हजार वर्षे) वैदिक काळ मानला जातो. वेद ही आर्यांचीच निर्मिती असेल तर लेखिकेचे म्हणणे लंगडे पडते. यावरून लेखिकेच्या लिखाणाचा कस आणि मांडणीचा चोखपणा दिसून यावा. सुमारे १७० पानांच्या या पुस्तकात जागोजागी अशी भोंगळ विधाने आहेत.
(महर्षी ते गौरी : लेखिका मंगला आठलेकर, राजहंस प्रकाशन पुणे, किंमत रु. १२५, पहिली आवृत्ती १९९९.)
पुस्तकाचे उघडच तीन मुख्य विभाग आहेत. थोंडो केशव, रघुनाथ धोंडो आणि गौरी. गौरी देशपांडे यांची मुलाखत ही या पुस्तकाची जमेची बाजू. र. धों. कर्वे यांचे विचार गौरी देशपांड्यांच्या लेखनात येतात. हे जाणवणा-या वयाच जागा असल्या तरी त्यात अधिक प्रगल्भता आहे.’ (१६५) असे लेखिका म्हणतात. ती तशी असली तरी लेखिकेने सप्रमाण दाखविली आहे असा ठसा हे पुस्तक वाचून मनावर उमटत नाही. र. धों. कर्वे यांना आपल्या एकूण कामाच्या संदर्भात वडिलांनी धारण केलेल्या मौनाचा खूप त्रास झाला. (१६६) असे समारोपात त्या म्हणतात. पण त्यासाठी कुठलाही समर्थ पुरावा देत नाहीत. गौरींची मुलाखत त्या बाबतीत कुचकामी आहे. गौरी म्हणतात, “र. धों. शी माझं बोलणं असं काही झालं नाही. मी तेव्हा फार लहान होते. मी त्यांना पाहिलं होतं, पण ते फार मितभाषी होते.” (१६०) र. धों. कर्त्यांनी लैंगिक स्वातंत्र्याच्या संदर्भात जे विचार मांडले ते स्वातंत्र्य त्यांनी घेतल्याचे संदर्भ सापडत नाहीत. (१४६) असे म्हणणाच्या लेखिकेला सांगोवांगी पुरावा विश्वसनीय वाटत नाही हे ठीकच आहे. म. वा. धोंडांनी कर्वेवंधूंची मुलाखत घेऊन लिहिलेल्या लेखात ‘हे कामस्वातंत्र्य र. धों. नी कधी घेतले नाही,’ असे लिहिले आहे. आपल्याला मूल व्हायला हवे होते अशी खंत र. धों. ची पत्नी मालतीबाई दीर डॉ. शंकर कर्वे यांच्याकडे व्यक्त करतात. ही धोंडांची हकीकत लेखिकेला पटत नाही हे रास्तच आहे. कारण मनातलं इतकं आतलं दुःख दिराकडे सांगावं याचा पुरावा कुठल्याच लेखनात मिळत नाही असे त्या म्हणतात. मग वडिलांच्या मौनाचा र. धों. ना त्रास झाला याचा पुरावा? आणि कर्त्यांच्या कामस्वातंत्र्याचा लिखित पुरावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे का?
र. धों. चे आठलेकरांना झालेले आकलन आणि त्यांनी केलेले विश्लेषण अपुरे आहे आणि अनेकदा चूक आहे. र. धों. चे मत होते की, वैयक्तिक हिताकरिताच झाले, तर लोक संततिनियमनासाठी तयार होतील. त्यामुळे संततिनियमनांचा प्रचार करणे म्हणजे वैयक्तिक हिताच्या चार गोष्टी त्यांना सांगणे होय.’ (६५) या बाबतीत र. धों. च्या विचारांची व्याप्ती लेखिकेने लक्षात घेतली आहे; पण “स्त्रीचे आरोग्य, कुटुंवाचा प्रश्न, राष्ट्रहित, कुमारी, विधवा यांना पुरुषसहवासाची असलेली गरज आणि त्यावर संततीने येणारे बंधन या विचारांपैकी एकही विचार र. धों. समाजाला पटवून देऊ शकले नाहीत.” (पान ६६) असे त्या म्हणतात आणि त्याला र. धों. ची वाद घालण्याची पद्धत कारण असल्याचे त्या सुचवतात. “ज्या साच्यात कित्येक शतकं हे समाजमन घडत गेले त्याला हळूहळू आणि कौशल्याने खिंडार पाडण्याची आवश्यकता होती.” (पान ७०). हे आणि र. धों. नी पत्रांना उत्तरे देताना पत्रलेखकांचा आदर केला नाही असेही त्यांचे निरीक्षण आहे. (पान. ७१) “एखाद्याचं मत अडाणीपणाचं आहे हे त्याला पटवून द्यावं लागतं, नुसतंच मूर्खात काढून चालत नाही” असा सरसकट शेरा त्यांनी मारला तो अन्यायकारक आहे. वानगीदाखल सांगता येईल की, सप्टेंबर १९३४ च्या अंकात पृष्ठ ७० वर र. धों. लिहितात, “जगांत काय चालले आहे, त्यामुळे मतांतर कसे होत आहे, हे सामान्य बुद्धीच्या मनुष्यास कळणे कठिण नाही. त्याने एकदम त्याप्रमाणे वागावे हे शक्यही नाही आणि आमची तशी अपेक्षाही माही, पण म्हणून अशा मतांचा पुरस्कार करू नये असे थोडेच होते?”
डॉ. लेले (जादूचे अभ्यासक), चिखले, इत्यादी पत्रलेखकांशी त्यांनी अनेकदा सहमती व्यक्त केली आहे. मार्च १९३४ च्या समाजस्वास्थ्याच्या अंकात एका पत्रलेखकाला ते लिहितात, “आपण लिहिलेल्या बहुतेक बाबी विचार करण्यासारख्या आहेत यात शंका नाही. (पृ. २४२-४३), प्रस्तुत पत्रात र. धों. च्या मताविरुद्ध घेता येण्यासारखे काही आक्षेप पत्रलेखकाने युक्तिवाद देऊन मांडले होते. ‘सुधारणेची’ आपली भूमिका मांडताना र. धो. नी भावना, मन यांचा कधी विचार केला नाही.” (पान. ६३) हेही असेच ठोक विधान आहे. र. धों. प्रणीत व्यक्तिस्वातंत्र्य घेतले तर समाज ही कल्पनाच संपुष्टात येईल असे लेखिका म्हणतात. (पान. ७३) याला उत्तर, युरोप-अमेरिकेत असे घडले नाही, एवढे म्हणणे पुरे व्हावे. व्यक्तिस्वातंत्र्य “समाजाची जी एक स्वास्थ्यपूर्ण चौकट असते, व्यवस्था असते तिचा विचार न करणारं स्वातंत्र्य आहे.” (७६)असं म्हणणा-या लेखिकेला र. धों. तर समजले नाहीतच उलट गौरी देशपांडे यांच्या तशाच विचारांना अधिक प्रगल्भ’ म्हणून गौरविण्यात आपण आत्मविसंगती करतो हेही तिच्या लक्षात आले नाही. समागम-स्वातंत्र्याचं समर्थन करण्याची आवश्यकता होती का? असा प्रश्न त्या करतात. स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक. मोकळीक असली म्हणजे मनुष्य तारतम्य सोडूनच वागतो असे होत नाही. स्त्री-पुरुषसंबंधाची आवश्यकता लक्षात घेऊनच विवाहसंस्था निर्माण झाल्या असतील, तर समागमवैचित्र्याची इच्छा लक्षात घेऊन त्या मोडू पाहणं वेडेपणा ठरेल.” (७९) हे म्हणणा-या लेखिकेला र. धों. समजले नाहीत. विवाहसंस्था मोडल्याने सध्याच्या कुटुंबसंस्थेत बदल होईल पण ती मोडणार नाही आणि त्यात समाजाची हानी नाही असे इतिहासाने आणि वर्तमानाने सिद्ध केले आहे, हे समाजस्वास्थ्यात र. धों. जागोजागी दाखवितात. तसेच, पुरुष आपल्या शारीरिक बळाचा वापर करून जशा अनेक गोष्टी मिळवतो तसे स्त्रियांनी सौंदर्याच्या बळावर जे जे मिळविता येईल ते खुशाल मिळवावे असे र. धों. नी म्हटल्याचा उल्लेख त्या करतात. परंतु येथे मूळ लिखाणाचा आधार त्यांनी सांगितला असता तर बरे झाले असते. य. दि. फडक्यांनी र. धों. समजून घेण्यात जी जूक केली त्याला त्या ‘पूर्ण अनभिज्ञता’ म्हणतात. (९०) परंतु य. दिं. च्या प्रतिपादनातील तर्कदोष किंवा उणिवा त्यांनी सयुक्तिकपणे दाखवल्या नाहीत. याचा अर्थ य. दि. म्हणतात ते खरे आहे असा नाही. त्याचे खंडन नीट झाले नाही असा आहे. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रीचे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन यावर आपले लक्ष केंद्रित केले. रघुनाथ धोंडोंनी स्त्रीच्या नव्हे तर माणसाच्या जगण्याला आपल्या विचारात केंद्रस्थानी ठेवले आणि दूरदर्शीपणाने संततिनियमनाच्या कार्याची मुहूर्तमेढ १९२१ साली भारतात रोवली आणि एक अमेरिका सोडली तर जगात दुसरीकडे कोठेही तोवर सुरू न झालेले काम सुरू केले. या दोघांच्या तुलनेत गौरी देशपांडे यांनी आपल्याला ‘बायकांना जे सांगायचं, ते मी कथेतून सांगते.’ (१६१) असे म्हटले. त्यामुळे पहिल्या दोन कर्त्यांच्या मालिकेत त्यांना बसवणे तितकेसे पटत नाही. स्त्रीस्वातंत्र्याच्या वाटचालीत त्यांचे पाऊल पुढे पडले असे कृतीतून दिसत नाही आणि विचारांतूनही. त्यामुळे लेखिकेचे प्रतिपादन परिणामकारक होत नाही. .

विवेकाच्या गोठी
संपादक, आजचा सुधारक, यांस
संपादक कोणते लिखाण छापतात व कोणते छापत नाहीत याबद्दल कायम संदेह असतो. म्हणून मी अलीकडे त्या त्या विद्वानास अथवा विचारवंतास माझ्या मतांची प्रत पाठवितो, ज्यायोगे त्या विद्वानांच्या लेखांवर मी काय आक्षेप घेतले हे त्यांना कळेल. माझे लिखाण गेली तीस वर्षे छापले जात आहे.
मी माझ्या तारुण्यांत ज्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या किंवा पाहिल्या त्या अशा आहेत की, विद्वान लोक त्यावेळी निडरपणे स्वतःची मते सांगत असत. राजवाडे यांनी एका संस्थानिकाला भर दरवारात सुनावले की, “राजा, रांडांच्यावरचा खर्च कमी कर आणि इतिहास संशोधनकार्यास मदत कर.” वि. म. दांडेकरांनी यशवंतराव चव्हाणांना व्यासपीठावर चव्हाणांच्या चुका बोलून दाखविल्या होत्या. अण्णासाहेब कर्वे व दुर्गा भागवत यांनीसुद्धा चुका तोंडावर सांगितल्या होत्या.
आज काळ पालटला आहे. विद्वानसुद्धा स्पष्टपणे न लिहिता गुळमुळीतपणे लिहीत आहेत व व्यासपीठावर स्तुतीपर भाषणे करीत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्यांना चीड येते. मला स. ह. देशपांडे, य. दि. फडके आणि दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याबद्दल आजही संपूर्ण आदर आहे. परंतु आज ज्ञानाचा विस्फोट इतक्या प्रचंड प्रकारे होत आहे की, कोणीही एक विद्वान सर्व वाचू शकणार नाही. त्यामुळे सर्व संपादकांना माझी अशी नम्र विनंती आहे की, ज्या पत्रात काही माहिती असेल ती पत्रे किंवा माहिती त्यांनी आवर्जून छापावी.
स. ह. देशपांडे यांनी ‘नवभारत’ (वाई) जुलै ९८ च्या अंकात संधाची भलामण करणारा लेख लिहिला आहे. त्याला मी उत्तर पाठविले ते संपादकांनी छापले नाही व कळवले की मी युक्तिवाद करून स. ह. देशपांड्यांना उत्तर द्यावे. इ. मला अशी मुळीच इच्छा नाही की स. ह. देशपांडेंचा अथवा कोणाही विद्वानाचा पराभव व्हावा. पण स. ह. देशपांडे ज्यावेळी गोहत्याबंदीचा आग्रह धरतात त्यावेळी त्यांना भारतातून दीड लाख मेट्रिक टन मांस परदेशी जाते व तरीही भारतातील पशुधन सहा कोटींचे आठ कोटी झाले आहे हे माहीत नसावे असे मला जाणवते. तसेच स. ह. देशपांडे यांनी श्री. राजेश्वर दयाळ जेष्ठ आय. सी. एस अधिकारी यांचे ए लाईफ ऑफ अवर टाईम्स हे पुस्तक वाचले नसणार असे जाणवते. श्री. दयाळ यांनी लिहिले आहे की, ४८ साली उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात मुस्लिमांविरुद्ध प्रत्येक खेडेगावात कसे दंगे घडवून आणावेत त्याचे आराखडे श्री. दयाळ यांच्या हाती आले होते इ. त्याला संघाचे गोळवलकर जवावदार होते.
दुसरी एक गोष्ट भारतीयांत प्रचलित आहे की, गेलेल्या माणसाबद्दल सहसा ते वाईट बोलू इच्छित नाहीत व त्यांच्या चुका काढत नाहीत. वास्तविक १९४९ सालापर्यंत अयोध्या विवाद अस्तित्वातच नव्हता आणि २२ डिसेंबर ४९ ला ज्यादिवशी रामाची मूर्ती मशिदीत ठेवण्यात आली त्यावेळी पडित पंत मुख्यमंत्री, आणि लालवहादूर शास्त्री गृहमंत्री होते. त्यांना अनेक पत्रे पाठवूनही त्या दोघांनी योग्य ती कारवाई केली नाही, ही गोष्ट स्पष्टपणे कोणीही लिहीत नाही. त्यांना पं. नेहरू व पटेल यांनी पत्रे पाठवली होती.
आज बिहारमध्ये ७ लाख एकर जमीन अतिरिक्त आहे. ३६ जमीनदारांकडे प्रत्येकी दहा हजार एकर जमीन आहे. ५३५ जमीनदारांकडे प्रत्येकी एक हजार एकर जमीन आहे. आज बिहारमध्ये ज्या दुर्घटना होत आहेत. त्याला वास्तविक कारण राजेंद्रप्रसाद, जयप्रकाश नारायण, केसरी, जगजीवनराम, चंद्रशेखर, नीतीशकुमार इ. सर्व पुढारी आहेत. महाराष्ट्र किंवा तामिळनाडूप्रमाणे बिहारमध्ये म. फुले किंवा अण्णादुराई झालेच नाहीत.
श्री. दत्तप्रसन्न दाभोळकर यांनी अल्लाउद्दीन खिल्जीच्या संबंधात ‘द लाईफ अॅण्ड वर्ल्स ऑफ सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी’ या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. (डिसेंबर ‘९८) परंतु माहिती दिली नाही. कृपया वाचकांसाठी या पुस्तकाची माहिती व पुस्तकात काय लिहिले आहे ते कळवावे.
श्री. दाभोळकरांना औरंगजेबाबद्दल मात्र राग आहे. औरंगजेबाने चिंचडवच्या मोरयास करमाफ केले होते. त्याच्या तुरुंगात १७ वर्षे असणा-या तरुण येसूबाईस काहीही त्रास दिला नाही : शिवाजीला पकडण्यासाठी राजा जयसिंग अनुष्ठाने करून गेला होता. तसेच औरंगजेबाच्या पदरी ११० हिंदू सरदार होते इ. माहिती नसावी असे मला वाटते. म्हणून त्यांनी ‘औरंगजेबाने सर्वांना मुसलमान केले असते’ असे लिहिले आहे.
म. गांधींचे उपोषण १३ जाने ते १८ जाने १९४८ पर्यंत दिल्लीत शांतताप्रस्थापनासाठी होते. ५५ कोटी रु. देण्याचा निर्णय १५ जाने. ला झाला. तरी उपोषण सुरू होते. खोट्या हकीगतीवर आधारलेले नाटक चालू देणे योग्य नाही.
ज्या दलित व्यासंगी विद्वानाचे अभ्यासपूर्ण काढलेले निष्कर्ष एखाद्या विषयाच्या परीक्षेसाठी प्रमाण मानता येतील; अशा दलित विद्वानांची नावे आजचा सुधारकने वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावीत.
माझा पहिला लेख स. ह. देशपांडे यांनी छापला व मला मानधन दिले.
कळावे,
केशवराव जोशी
तत्त्वबोध, चेकनाक्याजवळ,
नेरळ – ४१० १०१

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!
१. परलोकविद्या
एका आधुनिक साधूची परलोकविद्येवद्दल ख्याती ऐकून फ्रान्समधील एक वकील त्यांच्याकडे गेला. आणि म्हणाला, ‘मला आपल्या बापाच्या आत्म्याशी बोलायचे आहे’. साधूने वरे म्हणून ताबडतोब त्याच्या बापाचा आत्मा हजर केला आणि त्याला वोलायला सांगितले. वापाचा आत्मा साधूच्या मुखातूनच वोलत होता हे आलेच. काही वेळ त्याच्या थापा ऐकून वकील म्हणाला, ‘पण माझा बाप तर अजून जिवंत आहे. याची काय वाट?’ त्यावर साधू म्हणाला, “ज्याला तू आपला वाप समजतोस तो असेल जिवंत पण तुझा खरा वाप मात्र मेलेला आहे.’
२. सर्ग लोकांतील शाळेचे टाइम टेबल
ज्योतिषापेक्षाही परलोकविद्येच्या नावाने वनवाबनवी सुरक्षित असावी. १९३० नंतरच्या दशकात ऋषी नावाचे मध्यम दर्जाचे वकील दरवर्षी बोटीने विलायतच्या वाया करीत. सोबत त्यांची पत्नी असे. ती त्यांच्यासाठी उपयुक्त अशा प्रवाशांच्या वातम्या काढून त्यांना पुरवी. तसेच त्यांच्या अलौकिक सामथ्र्यांच्या कथा पसरवी. श्री. ऋषींना एकदा एका उतारूने शाळेत शिकत असता मृत्यू पावलेल्या आपल्या मुलीचे परलोकात कसे चालले आहे ते विचारले. ऋषींनी दिलेल्या उत्तरावरून ते एकतर वेडे असावेत किंवा बुद्धिहीन असा आपला समज होईल. पण त्यांना गि-हाईक मिळेच. तुमची कन्या स्वर्गलोकात वरच्या वर्गात शिकत आहे इतकेच सांगून ते थांबले नाहीत तर त्यांनी तिचा टाइम टेबल ही सांगितला. ह्या वृत्तावद्दल समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांनी त्यांना विचारणा केली की त्यांनी दिलेला टाइमटेबल इंडियन स्टैंडर्ड टाइमप्रमाणे आहे की ग्रीनिच-मीन टाइम प्रमाणे? त्यातली खोच तरी ऋषींच्या लक्षात आली की नाही कोण जाणे!
३. दुनिया झुकती है
वैदू. न्यू यार्क येथील प्रोफेसर शोल्डर् नांवाचे एक गृहस्थ टक्कल पडलेल्यांना केस आणण्याची युक्ति आपणास सांपडली आहे असे ढोंग करून लोकांस फसवीत असत. डॉ. कॅप नांवाच्या एका डाक्तराने त्यांची फजिती करण्याचा विचार करून प्रथम माहिती मागवण्याकरता एक पत्र लिहिले. त्याचे उत्तर आलें की सूक्ष्म दर्शक यंत्रांतून तपासण्याकरता कांही केस पाठवून द्या म्हणजे चिकित्सा करण्यास ठीक पडेल. तेव्हां डॉ. कॅप यांनी एका पांढ-या कोल्ह्याच्या लोकरीचे कांही केस पाठवले. काही दिवसांनी उत्तर आले की “आपले केस फार वाईट स्थितीत असून ते अधिकाधिक पडत जाण्याचा संभव दिसतो, पण ताबडतोब उपाय केल्यास अजूनही ते वाचवतां येतील आणि केस उत्तम स्थितीत येतील.’ डॉ. कॅप यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून निरनिराळ्या प्राण्यांचे केस आणि एकदा कमरेपर्यंत लांब केस असलेल्या एका स्त्रीचेही केस पाठवले आणि सर्वांस वरीलप्रमाणे ठराविक उत्तर आले, की केस गळून जाण्याचा धोका आहे, तावडतोव उपचार केला पाहिजे. नंतर डॉ. कँप यांनी एक सुतळी घेऊन तिचा पीळ सोडवून केसाप्रमाणे निरनिराळे रंग देऊन त्याच्याकडे केसाचे नमुने म्हणून
पाठवले. तरीही उत्तर तेच! (मेडिकल रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूज)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.