प्रेम हाच खरा देव आहे (२) आंद्रे पॅरी यांच्या फ्रेंच लेखावरून

धर्माच्या शृंखलांतून आपणांस मुक्त समजणाऱ्या लोकांत देखील बराच धार्मिक मूर्खपणा शिल्लक असतो. उदाहरणार्थ फ्रान्समध्ये जरी धर्माला सरकारी दृष्टीने अस्तित्व नाही, तरी तेथील कायदे पाहिले तर ते अजून धार्मिकच आहेत. ख्रिस्ती धर्मांत लैंगिक ज्ञान लील समजतात, यामुळेच लैंगिक शिक्षणाकडे कायदाहि लक्ष देत नाही आणि पालकहि देत नाहीत. यामुळेच मुलांच्या डोक्यांत याविषयी भलभलत्या कल्पना शिरतात. विवाहबाह्य समागमाला धर्माची आडकाठी, पण धर्मा पासून अलिप्त मानलेले कायदे देखील अनौरस मुलांना कमीपणा देतात, अविवाहित आयांचे हाल करतात आणि व्यभिचाराला गुन्हा समजतात. ही कायद्याची गोष्ट झाली. सामाजिक छळ तर कायद्याचेहि पलीकडे आहे आणि यामुळे इतर बाबतींत लोक कितीहि क्रांतिकारक मतांचे असले तरी लैंगिक बाबतीत मात्र त्यांना समाजाला भ्यावे लागते कारण समाजाविरुद्ध जाण्याचे धैर्य फार थोड्या लोकांत असते. माझ्या ओळखीच्या दोन क्रांतिकारकांपैकी एकाचा मुलगा व दुसऱ्याची मुलगी यांचे विशेष सख्य पाहून, लोकांना बोलायला जागा राहूं नये म्हणून, त्यांनी त्यांचा वाङ्-नि चय करून टाकला. यानंतर एकदा सुटीच्या दिवसांत मुलीने मुलाच्या घरी रहाण्यास जाण्याचा प्र न निघाला असतां, लोकांना विवाहपूर्व समागमाची शंका येऊ नये म्हणून, त्यांनी तो बेत रद्द केला! आणि विवाहापासून कोणत्याहि प्रकारचा फायदा नसून तोटे मात्र भरपूर आहेत असे त्यांचे मत असूनहि ते मुलांचे कायदेशीर लग्न लावून देतील हे मला उघड दिसते आहे.
घटस्फोट धर्माला पसंत नाही, म्हणून कायद्याने त्याला परवानगी असली तरी देखील तो सहज मिळत नाही. त्याला शक्य तितके अडथळे घातलेले आहेत आणि खर्चहि फार येतो. धर्माला सहशिक्षण पसंत नाही, म्हणून ते सरकारलाहि पसंत नाही आणि मुलांमुलींच्या शाळा वेगळ्या असतात. धर्माला संततिनियमन किंवा गर्भपात पसंत नाही, म्हणून संततिनियमनाचे मार्ग उघडपणे सांगणे किंवा गर्भपात करणे हे गन्हे आहेत. धर्मांत स्त्रियांचा दर्जा कमी आहे म्हणनच कायद्यांत देखील विवाहित स्त्री नवऱ्याच्या ताब्यात दिलेली असते. तो राहील तेथे तिला राहिले पाहिजे आणि तिच्या मालकीची इस्टेट असली तरी तिची व्यवस्था कायद्याने नवऱ्याकडे दिलेली असते. एकंदरीत स्वातंत्र्यवादी क्रांतिकारक लोक सुद्धा या बाबतींत कांही करीत नाहीत किंवा करण्याची इच्छाहि दर्शवीत नाहीत. या परिस्थितीचे परिणाम अत्यंत भयंकर आहेत. त्यापैकी काही येथे पाहूं.
लैंगिक गरजांचे बाबतींत तरुणांचे नेहमी हाल होतात. विवाह लवकर करणे शक्य नसते आणि त्यापूर्वी नैसर्गिक जीवन अशक्य असते. त्यांनी एक तर ब्रह्मचर्य पाळून शारीरिक आणि मानसिक हानि सोसली पाहिजे, किंवा चोस्न मास्न शक्य होईल तेव्हा आपली गरज भागवली पाहिजे. ती भागवण्याचे अनेक मार्ग त्यांना मोकळे असतात. यांत त्यांच्या प्रकृतीला अत्यंत धोका असतो व कधी भयंकर रोगहि होण्याचा संभव असतो. प्रथम समागम जर योग्य परिस्थितीत झाला नाही किंवा इतर कांही वाईट सवयी लागल्या तर याचा परिणाम त्यांच्या एकंदर आयुष्यावर होतो आणि या दिव्यांतून सहीसलामत सुटणारे लोक थोडे, आणि एकंदर सर्व तरुणांना ज्या नैसर्गिक जीवनाचा फायदा मिळाला पाहिजे तो तर कोणालाच मिळत नाही, आणि यामुळे व्यक्तिविकासाला मुळीच जागा मिळत नाही.
यानंतर विवाह होतो. वैवाहिक जीवन यशस्वी होण्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची त्यांना बिलकुल दाद नसते. स्वतःची व पतीची किंवा पत्नीची प्रकृति यांचा मेळ बसेल की नाही, शरीराला अपाय झाल्याशिवाय संतति-नियमन कसे करावें, फार काय, समागम तरी सुखकर कसा होईल, याची त्यांना बिलकुल माहिती नसते. या सर्वाचा परिणाम म्हणजे पतीने किंवा पत्नीने घर सोडून जाणे, मुलें रस्त्यांत टाकून देणे किंवा मारणे, गुप्त गर्भपात आणि त्या पासून दरवर्षी हजारो स्त्रियांची प्राणहानि, वगैरे.
या भयंकर स्थितीला एकच उपाय आहे. तो म्हणजे ज्यांचा धर्मावर विश्वास नसेल त्यांनी यासंबंधी तर्कशुद्ध विचार कस्न त्याप्रमाणे वागणे. तर्कशुद्ध विचार करूं गेल्यास आपल्याला प्रथम जी गोष्ट दिसते ती ही की जगांतील दु:ख कमी करणे आणि सुख वाढविणे, हेच आपल्या कोणत्याहि उद्योगाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. स्वर्गांतील काल्पनिक सुखावर भिस्त ठेवून स्वतःचे शक्य तितके हाल करून घेणे हा धार्मिक बावळटपणा आहे. समंजस मनुष्याला सुखाच्या शोधांत फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या सुखामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होतां नये. इतर कशाचाहि विचार करण्याचे कारण नाही.
अनुभवाने असे दिसते की कामवासनेचे समाधान केल्यापासून निर-तिशय आनंदाचा लाभ होतो. त्यापासून नुकसान तर होत नाहीच पण आरोग्याला त्याची जरूर असते आणि ब्रह्मचर्यापासून अनेक प्रकारचे नुकसान होते. लैंगिक गरजांचे समाधान झाल्यापासून जो शारीरिक व मानसिक फायदा होतो, त्याने व्यक्तिविकासाला मदत होते; कारण मनुष्याच्या सर्व गरजांचे योग्य समाधान होण्याने जीवनाला अधिक पूर्णत्व येते. अर्थात् ज्यांची प्रकृति ठीक नसेल त्यांचे समागमाने नुकसानहि होईल, परंतु आजारी मनुष्याला मोकळी हवा कदाचित् नये म्हणणे समंजस होईल काय? अन्नाच्या अतिरेका-प्रमाणेच समागमाच्या अतिरेकानेहि मनुष्य मरेल, परंतु अन्न मुळीच खाऊ नये म्हणणे जसें समंजस नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचा उपदेशही समंजस नाही. वस्तुतः नुकसान होणे तर बाजलाच. पण समागम नियमित रीतीने आणि वारंवार केल्यास एकंदर शरीराचा उत्साह वाढतो. प्रत्येक व्यक्तीचे बाबतींत कोणत्याहि वयांत समागमाची योग्य मर्यादा अनुभवावस्न ठरवतां येईल. आपल्या गरजा न ओळखल्याने किंवा दडपून टाकल्याने आरोग्य मिळत नसते, त्या गरजांचे योग्य समाधान केल्यानेच आरोग्य मिळते. तेव्हा संभोगसुख रास्त आणि इष्ट आहे हे सिद्ध झाले. त्यांत हेही लक्षात घेतले पाहिजे की पुष्कळांस योग्य प्रकारचे आणि दर्जाचे समागमसुख न मिळाल्यामुळेच ते अतिरेकाला प्रवृत्त होतात. ज्याचे योग्य समाधान होतें ते अतिरेक करीत नाहीत असाच सामान्य अनुभव आहे.
कामवासनेचे पूर्ण समाधान होण्याचे मार्गात दोनच अडचणी आहेत, त्या म्हणजे अवांच्छित संतति आणि रोगांच्या संसर्गाचे भय. परंतु रशियाचे अनुभवावरून असे दिसतें की संततिनियमन, आणि तेवढ्याने न भागल्यास शास्त्रीय रीतीने गर्भपात करतां आल्यास पहिली अडचण नाहीशी होते, व दयाळू परमेश्वराने उत्पन्न केलेल्या संसर्गजन्य रोगांचा देखील प्रतिबंध करता येतो. याकरता कांही रासायनिक मार्गहि आहेत आणि समागम कोणाशी करावा यासंबंधी काळजी घेतल्यास रोग होण्याचा संभव रहात नाही. म्हणजे पुरुषांनी वेश्यांकडे जाण्यापेक्षा मुदतीचा विवाह केल्यास बरें. या अडचणी नाहीशा झाल्या म्हणजे इतकाच प्र न राहिला की समाजाने सर्वांवर लादलेले कायदे न मोडता पुढारलेल्या लोकांना कामवासनेचे समाधान करण्याचा सर्वांत समंजस मार्ग कोणता?
बाट
लहान मुलांना कामवासना नसते, तरीहि त्यांना भिन्नलिंगी मुलांसंबंधी आकर्षण वाटते आणि मुले कशी होतात याबद्दल जिज्ञासा असते. तेव्हा त्यांच्या प्र नांची खरी उत्तरे देणे आणि मुलांमुलींना एकमेकांशी खेळू देणे हे पालकाचे कर्तव्य आहे. वयांत येण्याचे सुमाराला मुलांमुलींची मनःस्थिति फार चमत्कारिक होते आणि त्यांना तात्पुरत्या कांही सवयी लागतात. तिकडे दुर्लक्षहि करतां नये आणि त्यांना विनाकारण रागेंहि भरतां नये. त्यांना यासंबंधी जरूर तें ज्ञान द्यावे आणि काय केले असतां प्रकृति चांगली राहील हे सांगावें. स्वसंभोगाच्या सवयीपासून फारसे नुकसान होत नाही, तेव्हा त्यांना मनोनिग्रहाचा उपदेश करावा, पण घाबरवू नये. फ्रान्सच्या हवेतील मुलगी १५ वर्षांची आणि मुलगा १९ वर्षांचा झाल्यावर त्यांना समागमाची जरूर भासते. या वेळी पालकांनी हे ठरवणे जरूर आहे की त्यांना ब्रह्मचर्याचा उप देश करून त्यांनी तो शक्य तितक्या वेळां मोडावा हे बरें, की नैसर्गिक समागमाची कांही तजवीज केलेली बरी? अर्थात् प्रकृति बरी नसल्यामुळे समागमापासून नुकसान होईल असें डाक्तराने सांगितल्यास गोष्ट वेगळी.
त्यांत असाहि प्र न येतो की मुलीचे बाबतींत समागमाची व्यवस्था झाल्यास तिला या वयांत संतति होणे इष्ट आहे काय? या वयांत योग्य पति किंवा पत्नी कोण होऊ शकेल हे त्यांना समजणार नाही. अशा वेळी त्यांना कायदेशीर लग्नाच्या बंधनांत जन्माचें अडकवणे योग्य होईल काय? अशा वेळी समागम तर करता यावा परंतु संतति तर होऊ नये. अशीच कांही तरी सोय करणे योग्य होईल. अशा रीतीने एकमेकांचा सर्व प्रकारचा पूर्ण अनुभव आल्यानंतरच विवाहाचा विचार करणे योग्य होईल. आपण एकमेकांना सर्व प्रकारें योग्य आहों असा अनुभव आल्यावरच विवाह करणे हीच समाजाच्या प्रगतीची महत्त्वाची पायरी आहे, परंतु हल्लीच्या समाजांत काय करावें? हल्लीचे कायदे बदलून घेण्याचा प्रयत्न करावा हे ठीक आहे, परंतु तेवढ्यानेच पुढारलेल्या पालकांनी आपले कर्तव्य केलें असें होत नाही. स्वतः-पुरते आणि आपल्या मुलांपुरतें त्यांनी यापुढे गेले पाहिजे. संततिनियमनाचे मार्ग आता माहीत आहेत आणि रोगांचाहि प्रतिबंध करतां येतो, तेव्हां तरुणांची मुख्य अडचण पैशाची राहिली. त्यांना वेगळें बिहाड करणे शक्य नसते आणि पालकांना अशी व्यवस्था करणे शक्य नसेल तर सहवासोत्तर विवाहाच्या दृष्टीने मुलाच्या मैत्रिणीला किंवा मुलीच्या मित्राला घरी येण्याची किंवा रहाण्याची देखील पूर्ण मोकळीक देता येईल. किंवा याशिवाय सटीचे दिवसांत त्यांना सायकलवर किंवा इतर रीतींनी एकत्र प्रवास करण्यास मोकळीक द्यावी.
दुसरे असे की कायदेशीर विवाह करण्यांत कोणाचा काय फायदा होतो? विवाह करण्याने आपणावर काय काय जबाबदारी येते हे जर वधूवरांना कोणी स्पष्ट कस्न सांगेल तर फारच थोडे लोक विवाहाला तयार होतील. दोघांचे पटले तर ठीक, पण न पटल्यास हे बंधन तोडणे अत्यंत कठिण असते आणि ते शक्य झालेच तर तोडतांना अंगाचें साल जाण्याची वेळ येते. माझ्या एका मित्राला विवाहानंतर पत्नीची व तिच्या आईची गर्हणीय सलगी दिसून आल्यामुळे त्याने घटस्फोट घेण्याचा नि चय केला, परंतु त्याला हे कारण कोर्टात सांगणे किंवा सिद्ध करणे शक्य नव्हते. कांहीहि करून हे लग्न मोडायचेच असा त्याचा नि चय असल्यामुळे त्याला पुढील अटी कबूल कराव्या लागल्या. मुलाच्या खर्चांकरता म्हणून महिना ४०० फ्रैंक (म्हणजे त्याच्या पगाराचा चतुर्थांश) द्यायचे आणि त्याला महिन्यांतून एक दिवस भेटण्याकरता ४० मैलांवस्न स्वतःच्या खर्चाने आणायचा आणि परत पोचवायचा. इतकी भानगड करण्यापेक्षा विवाह करावयाचा कशाला? तसाच संबंध ठेवावा.
जेथे प्रीतिविवाह असेल तेथेहि प्रेम नेहमी टिकत नाही इतकेच नव्हे तर एकत्र रहाण्याचा अनुभव आल्याशिवाय वधूवर एकमेकांना अनुरूप आहेत की नाहीत हे कळणे शक्य नसते. स्वभाव जुळले पाहिजेत इतकेच नव्हे तर शरीराचे काही भाग देखील जुळणे अवश्य असते. एखाद्यांत असा एखादा दोष असेल की तो लवकर समजणार नाही, पण त्यामुळे दोघाचें पटणे अशक्य होतें, किंवा एखादे वेळी एखाद्या क्षुल्लक दिसणाऱ्या गोष्टीवरून देखील दोघांनी सलोख्याने रहाणे अशक्य होईल. एक बाई बाळंतपणांत अतोनात काफी पिऊ लागली आणि कोणी कितीही सांगितले तरी ती ऐकेना आणि परिणामी तिची प्रकृति बिघडली इतकेच नव्हे तर ती अत्यंत भांडकुदळ झाली. ही गोष्ट अगोदर कळणे शक्य नव्हते. तेव्हा न मोडता येण्या-सारखा साधाच करार करावा आणि त्यांत सुचतील तितक्या बारीकसारीक गोष्टी देखील नमूद कराव्या.
अर्थात् विवाहाशिवाय लोक उघड संबंध ठेवीत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे समाजाची भीति. लोक काय म्हणतील? परंतु सामान्यतः असे आढळतें की जो दडपून वाटेल तें करणारा असतो, त्याला समाज फारसा त्रास देत नाही. पुढारलेल्या लोकांनी अशा रीतीने वागण्याचा आणि जरूर पडल्यास उघडपणी आपली बाजू लोकांपुढे मांडण्याचा नि चय केल्यास आणि त्यांची वागणूक इतर दृष्टींनी निर्दोष असल्यास लोक त्यांना एवढ्यावरूनच तुच्छ लेखणार नाहीत. अशा त-हेचे विचार उघडपणे मांडण्यांत आमच्यावर जबाबदारी येते व ती आम्ही ओळखून आहो. परंतु हल्लीची स्थिति तशीच राहू देणे योग्य आहे काय? आमचे विचार अंमलात आणण्याचे धाडस फारच थोड्या आईबापांस होईल हे उघडच आहे, पण हे विचार पुढारलेल्या मासिकांत नव्हे तर दुसऱ्या कोठे मांडायचे?
या विचारांविरुद्ध एक आक्षेप येणे शक्य आहे आणि त्याला उत्तर देणे भाग आहे. कित्येकांना असे वाटते की राजकीय स्वातंत्र्य, भांडवलशाही, समाजसत्ता-वाद, युद्धाची भीति, फॅसिस्ट व नात्सी पक्षांच्या हालचाली, वगैरे सर्व महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून लैंगिक स्वातंत्र्यावर भर देणे योग्य आहे काय? या आक्षेपाला आमचे इतकेंच उत्तर आहे की इतर कोणत्याहि गोष्टीपेक्षा जगण्याचे महत्त्व जास्त आहे, कारण जगल्यासच कोणालाहि कांही कार्य करता येईल; आणि लैंगिक प्र न हा दररोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. तिकडे मुद्दाम डोळेझाक करून मजूर-वर्गाला फक्त भांडवलशाहीविरुद्ध चिथावणे म्हणजे त्यांची फसवणूक करणे आहे. हा लोकहिताचा प्र न आहे आणि या बाबतींत शक्य तितकें दु:ख कमी करणे आपले काम आहे, व या प्र नाकडे दुर्लक्ष करण्यांत नुकसान आहे. चळवळीचा उपयोग आहे हे निर्विवाद आहे, परंतु म्हणून शिक्षणाचा उपयोग नाही असे होत नाही. म्हणून चळवळीबरोबरच शिक्षण झाले पाहिजे, तरच चळवळीचा पाया भक्कम होईल. शिक्षण द्यावयाचे म्हणजे तें पुरे दिले पाहिजे, म्हणजे त्यांतून लैंगिक शिक्षण वगळतां नये. काही लोकांना कामवासनेपासून निवृत्त करून केवळ चळवळीकडे लावतां येईल, परंतु सामान्य लोकांना संपूर्ण जीवनाने नवशक्ति आल्याशिवाय चळवळीला जोर येणार नाही, आणि धार्मिक खुळाचे निर्मूलन करून धर्मगुंडांची तंगडी मोडल्याशिवाय कोणतीहि प्रगति जोराने होणार नाही. कामवासनेच्या योग्य समाधानाने विलक्षण उत्साह येतो हा सामान्य अनुभव आहे आणि या बाबती-तील नैसर्गिक जीवनाने तो उत्साह कायम टिकवता येतो. तेव्हा मजूरवर्गाचे शिक्षण करणारांनी हे ध्येय पुढे ठेवले पाहिजे. शारीरिक व मानसिक आरोग्य हा प्रगतीचा पाया आहे. विवाहाने एकमेकांवर हक्क उत्पन्न होतो या कल्पनेने पति-पत्नींचे प्रेम निर्जीव होते, परंतु विवाहाशिवाय स्त्रीपुरुष एकत्र राहिल्यास त्यांना एकमेकांचे प्रेम कायम राखण्याची खटपट करावी लागेल, कारण एरवी ती एकत्र रहाण्यास बांधलेली नाहीत. वधूवरें पुष्कळ वेळां अनुरूप नसतात आणि म्हणूनच त्यांना विवाहाने एकत्र बांधावे लागते, परंतु ती अनुस्प असावी अशीच आमची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्हाला विवाह नको आहे. अनुरूप व्यक्तीच्या प्रेमाने मनुष्याची शक्ति दसपट वाढते. प्रेम हाच खरा देव आहे, बाकीचे देव फुकट आहेत. परंतु ते प्रेम खरें पाहिजे, म्हणजे तें कर्तव्य होतां नये, हृदयांतून निघाले पाहिजे. हल्लीच्या विवाहांत प्रेमाची चेष्टा होते, तें कर्तव्य होतें. खऱ्या प्रेमाची शक्ति अद्वितीय आहे. ते सर्वांस मिळेल अशी खटपट करणे हे खऱ्या पुढाऱ्यांचे काम आहे. (इदे लीब्र, पॅरिस्)
समाजस्वास्थ्य
ऑगस्ट १९३५ पृष्ठ क्र. ३३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.