धर्म आणि धम्म

आधुनिक भारताचे नाव अख्ख्या जगात पसरविणारा एक महान प्रज्ञा-पुरुष (ओशो) म्हणतो, ‘बुद्ध हा भारतमातेचा सर्वोत्तम पुत्र असन त्याच्या विचाराची गंगोत्री ही जगातील बहतेक तत्त्वज्ञानांची जननी ठरली आहे’. आंग्लतत्त्वज्ञ बरटाँड रसेल म्हणतो. ‘माझा स्वतःचा कुठलाही अंगीकृत धर्म नाही. परंतु मला जर एखाद्या धर्माचा स्वीकारच करावयाचा झाला तर मी बुद्धाच्या धर्माचाच अंगीकार करेन. प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी तर आपल्या सापेक्षतावाद (रिलेटिव्हिटी) या सिद्धान्ताच्या संशोधनात बौद्धतत्त्वज्ञानाला बरेचसे श्रेय देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. जुंग(युग) नावाच्या मानसशास्त्रज्ञाने बौद्धधर्मातील तत्त्वांच्या आधारावर ‘अभि-धर्म पर्सनॅलिटी’ या शब्दांत व्यक्तिमत्त्व-विकासाचे वि लेषण केले आहे. पंडित नेहरूंसारखा इतिहासकार आपल्या निवासस्थानातील प्रत्येक खोलीत बुद्धमूर्ती ठेवायला विसरत नव्हता. धम्मपद त्यांची सतत सोबत करी.
बुद्धाबद्दल एवढे आकर्षण व आवड जगातील एक-तृतीयांश जनते-मध्ये आढळते. चीन, जपान, तिबेट व मंगोलियाचे बौद्ध भारतभूमीवर पाऊल टाकता-नाच येथील माती आपल्या कपाळावरच नव्हे तर जिभेवर ठेवतात. श्रीलंका, बर्मा, थायलंड व कंबोडियाचे उपासक साष्टांग दंडवत घालतात. जगात कुठल्याही बाजारात बुद्धमूर्ती विराजमान झालेली आढळते. संपूर्ण जगात आपल्या प्रज्ञा, करुणा व शांतीच्या बळावर पसरलेला हा बुद्धाचा धर्म एकमेव धर्म आहे. जगात नाना प्रकारची परिवर्तने घडली परंतु बुद्धाने उपदेशिलेली ही मानवी मूल्ये आजही जशीच्या तशी कायम आहेत.
धर्माचे प्रयोजन
धर्माचे प्रयोजन म्हटले की ईश्वरापासून त्याचा प्रारंभ होतो आणि आत्म्याच्या माध्यमातून स्वर्गात त्याचा शेवट होतो. स्वर्गाचे राज्य, पृथ्वीचे राज्य किंवा नरकातील राज्य अशा तीन अवस्थांमध्ये धर्म हेलकावत असतो. स्वर्गात ईश्वराचे राज्य तर नरकात सैतानाचे राज्य अबाधित असते. संघर्ष चालतो तो पृथ्वी-वरील राज्यासाठी. स्वर्गातील राज्य काहींच्या मते धर्मराज्यच असते. तथागत बुद्ध मात्र काल्पनिक स्वर्गाला धर्माचे किंवा मानवी जीवनाचे ध्येय न मानता ‘या पृथ्वीचाच स्वर्ग बनविण्याला धर्माचे राज्य असे मानतात आणि त्यासाठी व्रतवैकल्ये किंवा कर्म-कांडाचा आधार न घेता सद्धर्माचा व सदाचाराचा मार्ग अवलंबिण्याचा उपदेश देतात. स्वतःच्या दुःखाचा नाश करावयाचा असल्यास इतरांबरोबर न्यायाने व धर्माने वागले पाहिजे, तरच ही पृथ्वी ‘याचि देही याचि डोळा’ स्वर्ग किंवा धर्मराज्य बनू शकते याची ते ग्वाही देतात. त्यासाठी त्यांचा पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमितांवर अधिक भर आहे. यांच्याच अंमलबजावणीने मनुष्य सदाचारी बनतो. माणूस दुसऱ्या माणसाबरोबर जेव्हा अयोग्य वर्तन करतो तेव्हाच तो दुःखाला जन्म देतो. या परस्पर दुराचाराचा निःपात धर्मातूनच अर्थात धर्माचरणातूनच होऊ शकतो. म्हणून बुद्ध नुसता उपदेश देऊन थांबत नाहीत तर तो उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणायला प्रवृत्त करतात आणि त्याच्यासाठी मनाला पूर्णपणे शुद्ध करण्याचा आदेश देतात.
धर्म आणि धम्म
बुद्धाच्या धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे. परंपरागत रिलिजन म्हणवला जाणारा धर्म आणि बुद्धाचा धर्म, ज्याला पाली भाषेत धम्म म्हणतात, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच दृष्टिकोनातून फरक स्पष्ट केला आहे. दैवी शक्ती, नैसर्गिक संकटे, वादळ-वारा, भूकंप, अतिवर्षा, अतिउष्णता यापासून बचाव करण्यासाठी वापरावयाच्या मंत्रतंत्रादी जादू-विद्येला प्रारंभी याच अर्थाने महत्त्व होते. कालांतराने माणसाच्या श्रद्धा, विश्वास, कर्मकांड, रीतीरिवाज, प्रार्थना-अर्चना बलिदान करविणारे ही शक्ती प्रारंभी दानवी किंवा सैतानी स्पात जाणवत असे. जसजसा तो विकसित होत गेला तसतशी ती शुभ किंवा ‘शिव’स्वरूपी वाटू लागली. या शक्तीच्या तुष्टीकरणासाठी विविध कर्मकांडाचे आयोजन होते. कालांतराने हीच शक्ती ईश्वरस्वरूप झाली. हीच दैवीशक्ती नंतरच्या काळात या जगाची व माणसाची जन्मदात्री ठरली. त्यातूनच मानवी देहातील नित्यस्वस्पी आत्म्याचीसुद्धा सृष्टी झाल्याची मान्यता उदय पावली आणि हा आत्मा मग माणसाच्या पापपुण्याचा ईश्वराजवळ हिशेब देणारा जबाबदार दुवा ठरला. अशा प्रकारे ईश्वरावर भरवसा ठेवणे, आत्म्याला मान्यता देणे, ईश्वराची आराधना करणे, प्रार्थना व अर्चना कस्न ईश्वराला प्रसन्न करणे, हे कार्य धर्मात किंवा रिलिजन या संज्ञेत अभिप्रेत आहे.
बुद्धाचा धम्म
बुद्धाच्या उपदेशाचे सार ज्या शिकवणीत किंवा उपदेशात साठविले आहे त्याला स्ढ अर्थाने युरोपातील देववादी रिलिजन या शब्दाशी जोडले जात असते तरी दोहोंमध्ये महदन्तर आहे. म्हणूनच युरोपियन देववादी तथागत बुद्धाच्या धर्माला त्यांच्या निकषाप्रमाणे ‘रिलिजन’ मानायला तयार नसतात. म्हणून त्यांच्याच नकाराचा किंवा अस्वीकाराचा आधार घेऊन आपल्याला दोहोंमधील फरक समजावून घेतला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे रिलिजन ही व्यक्तिगत बाब आहे. ती आपल्या पुरतीच मर्यादित असली पाहिजे. सार्वजनिक जीवनात तिची दखलंदाजी होता कामा नये. याउलट बुद्धाचा जो धम्म वा धर्म आहे. ती ‘सामाजिक बाब’ आहे. प्राधान्याने तो सामाजिक आहे. व्यक्तिगत नाही. या धर्माचा अर्थ सदाचरण, म्हणजे जीवनातील सर्वच क्षेत्रात एका माणसाचा दुसऱ्या माणसाबरोबर सद्व्यवहार होय. अर्थात माणूस जर एकाकी अगदी एकटाच असला तर धम्माची गरज नाही. तेथे रिलिजन पुरेसा असतो. परंतु एकापेक्षा अधिक माणसे जवळ आली की मग इच्छा असो की नसो धम्म अटळ आहे. त्यातून मग सुटका अशक्य आहे, दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास धम्माशिवाय समाज चालू शकत नाही. समाजात शिस्त हवी असल्यास धम्म अत्यावश्यक आहे. शिस्तीविना धर्म म्हणजे अराजकाला आमंत्रण. धम्माचे आचरण केल्यास न्यायालये किंवा मॅजिस्ट्रेटची गरज नाही. म्हणून स्वातंत्र्यासाठी धम्म वा सद्धर्माची आवश्यकता आहे. अराजक किंवा न्यायाधीश दोघेही स्वातंत्र्याला पोषक नाहीत. धम्माच्या अस्तित्वातच पूर्ण स्वातंत्र्य अबाधित राहते. म्हणून बुद्ध तत्कालीन लोकांना विचारस्वातंत्र्याचा उपदेश देतात आणि आपली सदसदविवकबुद्धी व जनकल्याणकारी भावना सतत जागृत ठेवायला सांगतात.
नुसत्या अनुकरणाला किंवा साध्या क्रियेला कृती मानीत नाहीत. जाणीव-पूर्वक केलेल्या कृती किंवा कर्मालाच कर्म मानतात. अनवधानाने किंवा बेशुद्धावस्थेत झालेल्या कृतीला ते कर्म मानीत नाहीत. लाभाचे किंवा आमिषाचे उत्तराधिकारी व्हायला सांगत नाहीत. त्याच उद्देशाने ते ‘अत्तदीपाअत्तसरणा’चा किंवा ‘अत्तदीपो भव’चा संदेश देत म्हणतात. ‘मी मार्गदर्शक मार्गदाता आहे मोक्षदाता नाही. तुम्हाला तुमच्या मुक्तीसाठी स्वतःच प्रयत्न करावा लागेल, मी केवळ रस्ता दाखवीन.’
अनीश्वरवाद
या कसोटीला आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक हे सर्व उतरले तर ठीक, नाही तर ते सुद्धा नाकारणार. एखाद्या स्त्रीला न पाहता— तिचे नाव, गाव, वर्ण, उंची काहीच माहीत नसताना व तिला प्रत्यक्ष पाहिलेही नसताना—तिच्यावर प्रेम करण्याची भाषा उच्चारणारा जसा वेड्यात काढला जाईल, तशीच अवस्था ईश्वराचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार न होता त्याची आराधना करणाऱ्याची होईल. हेच उदाहरण निर्गुणनिराकार ईश्वराप्रमाणे आत्म्यालाही लागू पडणार. हीच अडचण स्वर्गाच्या बाबतीतही येणार. एखादा मनुष्य एका इमारतीवर चढण्यासाठी शिडी उभारतो आहे. परंतु ती इमारत कोठे आहे ? तिला किती मजले आहेत? किती खोल्या आहेत? किती दरवाजे व खिडक्या आहेत? काहीच माहीत नाही. परंतु त्या इमारतीत चढण्यासाठी शिडी बनवीत आहे. असा अट्टाहास करणे जसे वेडेपणाचे ठरते– -तसेच स्वर्ग कोठे आहे? कसा आहे? किती लोकांची राहण्याची सोय आहे? कोणी पाहिला का? याचे होकारार्थी उत्तर मिळाले नसताना तेथे जाण्यासाठी यज्ञयाग करणे, व्रतवैकल्ये करणे आणि पशुबळी देणेदेखील शहाणपणाचे ठरत नाही.
अनात्मवाद
तथागत बुद्ध आत्मादेखील अविनाशी असल्याचे मानीत नाहीत. म्हणून तर त्यांच्या धर्माला अनात्मवादी म्हणतात. आत्मा येतो कोठून, त्याचा व शरीराचा काय संबंध? मृत्यूनंतर त्याचे काय होते? शरीर नसतानाही परलोकात तो कसा राहतो? कधीपर्यंत तेथे राहतो? असे अनेक प्र न बुद्ध उपस्थित करतात. याउलट बुद्धाने नामरूपाच्या स्वस्पात मनुष्यप्राण्याचे वि लेषण केले आहे. भौतिक व मानसिक तत्त्वांच्या मिश्रणाला त्यांनी प्राणी मानून विवेचन केले. या मानसिक व भौतिक तत्त्वांना पंचस्कंध हे नाव दिले. पृथ्वी, पाणी, वायू व अग्नी ही चार भौतिक तत्त्वे म्हणजे शरीर स्प आणि चितचैतसिकांचा समूह म्हणजे ‘नाम’ होय. नाम-स्कंधाला चेतना अर्थात विज्ञान किंवा मनही म्हणतात. वेदना, संज्ञा व संस्कार हे तीन चैतसिक आणि विज्ञान म्हणजेच चित्त ह्यांच्या मिश्रणातून नाम-स्कंधाची निर्मिती होते. या चित्तातूनच हे चैतसिक जन्म घेतात. विज्ञान म्हणजे चित्त हेच सर्व प्राण्याचे केंद्रबिंदू आहे. चित्त किंवा चेतना हेच माणसाच्या जिवंतपणाला उदयास आणते. म्हणूनच विज्ञानाला येथे प्राधान्य आहे. हे चित्त किंवा विज्ञान जर सर्व क्रियाकलापाच्या मुळाशी असेल तर मग आत्म्याचे कोणते कार्य शिल्लक राहिले? आत्म्याचे सर्व काम चित्तच करून मोकळे होते, असा हा अनात्मवादी सिद्धान्त बुद्धाचा वैशिष्ट्यपूर्ण सिद्धान्त आहे.
पुनर्जन्म
बुद्धकाळात आत्मा शाश्वत मानणारे आत्मवादी किंवा शाश्वतवादी गणले जात. त्यांच्या मते आत्मा अविनाशी, चिरंजीव किंवा चिरंतन असतो. काहींच्या मते प्रत्येकच गोष्टीचा विनाश होतो. त्यांना आत्म्याचे नित्यत्व मान्य नव्हते म्हणून त्यांना उच्छेदवादी म्हटले जाई. बुद्ध आत्मा नित्य मानीत नसत. तरी स्वतःला नित्यतावादी किंवा उच्छेदवादी ठरवायला तयार नव्हते. यामुळे मोठाच पेच निर्माण होतो बुद्ध आत्मा नित्य असल्याचे अमान्य करीत परंतु पुनर्जन्म मात्र मान्य करीत. आत्मा मानणाऱ्या दर्शनात पुनर्जन्माची कल्पना उपरी वाटत नाही. परंतु अनात्मवादी दर्शनात ती काहीशी विचित्रच वाटते. यावर बुद्धाचे म्हणणे असे की अग्नी, पाणी, वायू व पृथ्वी या भौतिक तत्त्वांचे बनलेले शरीर नाश पावते परंतु ही चार तत्त्वे त्या त्या तत्त्वात विलीन होतात. वैज्ञानिकदृष्ट्या ‘मॅटर’ म्हणजे पदार्थ रूप परिवर्तित होत असते. तेच नंतर पुनर्जन्मात रूपांतरित होत असते. त्यातही विशिष्ट शरीराचेच पुनर्जन्मात रूपांतर होईल असे नाही. एका दिव्याने दुसरा दिवा लावावा किंवा एक गाथा गुरुकडून शिष्याच्या मुखात जावी तसे हे संसरण असते. सरतेशेवटी तथागत बुद्धाने आवश्यक वाटले तितक्यांदा आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक नित्यानित्यतेसंबंधीच्या प्र नांचे वि लेषण व विवेचन करून आपली भूमिका समजावून सांगितली. परंतु त्या प्र नांचा काथ्याकूट काही संपेना. तेव्हा मग बुद्धाने अमूल्य वेळ व्यर्थ दवडण्याची पाळी येऊ नये म्हणून या प्र नांना ‘अव्याकृत प्र न’ पुनः पुन्हा उत्तर न द्यावयाचे प्र न म्हणून जाहीर करून टाकले. या प्र नापेक्षाही दुःख आणि मृत्यू हे महत्त्वाचे प्र न आहेत. त्यांच्या नाशासाठी माणसाने प्रयत्न कस्न दुःखमुक्तिस्पी निर्वाण प्राप्त करून या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण केला पाहिजे. अन्यथा अंधवेणून्यायाने चालणाऱ्यांना खड्ड्यात पडण्या-ऐवजी गत्यंतर राहत नाही. कबीरांच्या भाषेत सांगायचे झाल्यास म्हणावे लागेल, ‘अंधे अंधा ठेलिया दोनो कूप पडत’. जसे आंधळेपणाने आंधळ्याचे अनुकरण करणे विनाशाला कारणीभूत होते, तसेच डोळस माणसालादेखील विवेकाच्या बळावर प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांच्या आधारावर विचार करता आला नाही तर जीवनाला डोळसपणे सामोरे जाता येत नाही. हा डोळसपणा आन्तरिक आणि व्याव-हारिक पातळीवर अखिल मानवाला दिव्यदृष्टीसारखा प्राप्त व्हावा म्हणून बुद्धाने चार आर्यसत्ये, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतीत्यसमुत्पाद, अनीश्वरवाद, अनात्मवाद, शून्यवाद आणि पारमितांचा पुरस्कार केला. त्याच्या आधारावरच मनाचा अंधकार नाश पावतो. त्यातूनच बुद्धाचा उजेड मानवी जीवनाला उजळून टाकेल.
६६४ वैशाली विहार, मॉडेल टाऊन, कामठी रोड, नागपूर – ४४० ०१४

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.