तत्त्वबोध

श्री. प्रकाश अकोलकर यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. एस. एस. गिल यांच्या पुस्तकाचे भाषांतर छान केले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. “ख्रि चन न्यायशास्त्राच्या गाभ्यात पाप ही संकल्पना एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे सदैव जळत राहिलेली असते’ हे पटण्यासारखे आहे. हिंदू किंवा मुस्लिम धर्मसंस्थापक निष्कलंक चारित्र्याची संकल्पना मांडत नाहीत हे सुद्धा खरे आहे. ख्रिस्ताच्या चारित्र्यात कपटनीती नाही. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणात गुंतविले गेले. जे. आर. डी. टाटा म्हणाले होते की “राजीव गांधी पोरकट आहेत” (टाईम्स १४/४/९१). ते श्री. गिलच्या पुस्तकाचे भाषांतर करीत असल्यामुळे त्यांना त्यात काही भर घालण्याचा प्र नच नव्हता तरी सर्वसाधारपणे जनमानसात “काँग्रेसवालेच भ्रष्ट आहेत’ असा समज असतो आणि वृद्ध लोक तर याबाबतीत ब्रिटिशांचे राज्य चांगले होते असे समजतात. काही लोकांच्या मनात मुरारजी देसाई आणि बाळ ठाकरे निष्कलंक असावेत असा समज असतो. श्री. ठाकरे तर सुधीर गाडगीळ आणि अनुराधा प्रसाद यांना टी. व्ही. वर मुलाखत देताना ते स्वतः (ठाकरे) निष्कलंक असल्याची ग्वाही देतात. म्हणून मला असे वाटते की खालील गोष्टींचा ‘अनुवादकाचे चार शब्द’ यामध्ये उल्लेख हवा होता म्हणजे भ्रष्टाचाराच्या विषयाबाबत हे पुस्तक परिपूर्ण झाले असते. पत्रकार असल्यामुळे खालील संदर्भ उपलब्ध होतील.
१. टाईम्स ३/११/८८ लॉर्ड क्लाईव्ह, सर सिकंदर हयात खान इत्यादी सुद्धा भ्रष्टाचारी होते. पंडित नेहरूंनी ताया झिंकीनला मुलाखत देताना असे म्हटले की “किती भ्रष्टाचारी मंत्र्यांविरुद्ध मी कारवाई करू शकतो?”
२. पुण्यातील एक विद्वान श्री. म. वि. सोवनी यांनी महाराष्ट्राच्या कालमुद्रा हे पुस्तक लिहिले आहे. त्यात पान ३०४ वर ते । म्हणतात. “क्रॉफर्ड सुद्धा भ्रष्टाचारी होता.”
३. टाईम्स — १४/३/९० विश्व हिन्दू परिषदेच्या आयकर प्रकरणी विश्वबंधु गुप्ता यांनी चौकशी केली आणि त्यात विश्व हिन्दू परिषदेचे नेते दोषी आढळले तेव्हा त्यावेळचे मंत्री श्री. मधु दंडवते यांनी विश्वबंधु गुप्ता यांची बदली केली आणि ते प्रकरण मिटले.
४. टाईम्स ८/२/९५ गुन्नार मिर्दाल म्हणतात की “जागतिकीकरणामुळे भ्रष्टाचारात वाढ झाली आहे कारण फ्रेंच, अमेरिकन, जर्मनी आणि जपानच्या परदेशी कंपन्या लाच देण्यास सदैव तत्पर असतात.” चंगळवादामुळे आजची तरुण पिढी “पैसा हाच देव समजते.”
५. महाराष्ट्र टाईम्स — दिवाळी अंक १९९६. सी. बी. आय.चे अधिकारी मोहन कात्रे लिहितात, “बोइंग विमाने खरेदी प्रकरणी मोरारजींचे स्वीय सहाय्यक टोणपे यांना दरमहा ठराविक रक्कम दिली जात असे.”
६. लोकसत्ता — दिवाळी अंक १९९७. श्री. पंढरीनाथ रेगे लिहितात. “१९४४ मध्ये सुद्धा मुंबईच्या गोदीमध्ये भ्रष्टाचार चालत असे.”
७. साप्ताहिक सकाळ — दिवाळी अंक १९९७. “गुंडांना सोडविण्यासाठी एक/एक लाख रुपये लाच मागितली जात असे.”
८. लोकप्रभा २०/१/९५. श्री. माधव देशपांडे लिहितात, “श्री अरुण गुजराथी व दत्ताजी साळवी कामगार सेनेचे प्रमुख असताना त्यांना मातोश्री बंगल्यावर दोन डब्लू (वुमन अॅण्ड वाईन) आणि नोटांची पुडकी पाठवावी लागत. ते म्हणत पुडकी किती पाठवावयाची? हे काय नोटाच खातात की काय?” वास्तविक शासनाने श्री. माधव देशपांडे यांना संरक्षण दिले पाहिजे आणि त्यांच्याकडून सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे.
तत्त्वबोध, चेकनाक्याजवळ, नेरळ — ४१० १०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.