मासिक संग्रह: मे, 2000

प्रिय वाचक

सुधारकात काय यावे आणि काय येऊ नये याबद्दल बरेच वाचक सल्ला देत असतात. अनेक विषयांवर साहित्य आम्हाला हवे असते, परंतु ते हाती येतेच असे नाही. तसेच काही विषयांवर आम्ही जे लिखाण देतो ते अनेकांना स्चत नाही. सर्वांना संतुष्ट राखणे आणि तेही सर्वदा, शक्य नसते. ‘आमच्या प्राचीन धर्मग्रंथांतले शेण तेवढे तुम्हाला दिसते, सोने मात्र दिसत नाही’ असा एका वाचकाने संतापाने टोमणा मारला. त्यावर आम्हाला प्र न इतकाच पडतो की अमुक एक पूर्वमत सोने आहे हे कसे ठरवावे? आणि कोणी? एक साधे उत्तर असे की सोने किंवा शेण ठरविण्याची कसोटी ही शेवटी आपल्या बुद्धीला अनुसरून आपण लावणार.

पुढे वाचा

मनुष्यनिर्मित दुःखे आणि मी

. . . . ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो. त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपला गेलो असतो तर? किंवा कामाठीपुऱ्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो तर? या समूहांमध्ये जन्मणाऱ्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! … .
एखाद्या भीषण खुनाची बातमी वाचल्यावर आपण किती हादरतो! पण असे या परिस्थितीच्या दडपणाखाली चिरडून होणारे माणूसपणाचे खून किती सहजपणे आपण पाहू शकतो, किंवा पाहायचे नाकारू शकतो.

पुढे वाचा