अळीमिळी गुपचिळी

मी एक सामान्य उद्योजक. अर्थातच, एका उद्योगप्रधान घराण्यात जन्मल्या-मुळे पिढ्यान् पिढ्या वारसातून आणि संस्कारांतूनच उद्यमशीलता जोपासली गेलेली, त्यामुळे प्रथितयश! पण तरीही समाधानी मात्र नाही! सतत समोर प्र न असतात आणि त्यांची उत्तरे सुचत नाहीत त्यामुळे बेचैन असतो. आपण कोण आहोत? कशासाठी हे सारे करत आहोत? यातून नेमके साध्य काय करणार आहोत? नाहीतरी एक दिवस आपण मरणारच आणि त्यानंतर आपण जे काही, ज्या कशासाठी करत होतो, त्या कशाकशाला काही अर्थच उरणार नाही. मग हे सारे आपण करायचे तरी कशासाठी? या प्र नांचा भडिमार स्वतःवरच स्वतःहून करून घेत असतो. आणि उत्तरे सापडत नाहीत म्हणून अस्वस्थ होतो.
मध्यंतरी, माझे वडील गेले तेव्हा या फोलपणाची जाणीव तर फारच तीव्रतेने झाली. खचलोच होतो! परंतु त्या काळात मी शहराबाहेर असल्याचा फायदा घेऊन माझ्या भावाने सगळी मालमत्ता, जमीनजुमला, गिळंकृत करण्याचा घाट घातला तेव्हा वडिलांच्या मृत्यूचे दुःख, फोलपणाची जाणीव वगैरे सारे बाजूला ठेवून आपला वाटा मिळवण्याची धडपड सुरू करावी लागली ती मालमत्ता, जमीनजुमला मिळवून तरी काय करणार? हा प्र न समोर आलाच! पण आजूबाजूचे लोक – नातेवाईक यायचे आणि मला पेटवायचे! पुन्हा भाऊही अधूनमधून वाटाघाटींच्या वेळी अपमान करायचा ते सहन व्हायचे नाही, त्यामुळे, फोल असली तरी बेहत्तर, पण ती ‘प्रॉपर्टी’ मिळवलीच पाहिजे असं वाटून मी त्या भांडणांत सहभागी व्हायचो.
भांडणं काही कमी होईनात. उलट, वरचेवर हातघाईचे प्रसंग घडू लागले. याच काळात एकदा, एका ठिकाणच्या जमिनीचा कब्जा घेण्यावस्न मारामारी सुरू झाल्याचे कळले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी देखील ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून त्याच्याबरोबर त्या कब्ज्याच्या ठिकाणी गेलो. बघतो, तर तिथे अक्षरश: रणधुमाळी सुरू होती. आ चर्य म्हणजे, माझे अगदी जवळचे नातेवाईकदेखील माझ्या त्या कपटी भावाच्या बाजूने मारामारीत सामील झाले होते. त्यांना त्याच्या बाजूने मारामारी करताना पाहून तर मी संपलोच! काय करावे हेच सुचेना! इतके दिवस कशीबशी थोपवून धरलेली फोलपणाची जाणीव दाटून, उफाळून, आली. हातापायां-तली शक्तीच नाहीशी झाल्यासारखे वाटायला लागले. ही भांडणे–मारामारी कस्न, वैर धस्न जमीनजुमला मिळवण्यात काय अर्थ आहे? मी मेल्यावर निदान नातेवाईक माझी आठवण तरी काढतील. मी नसलो तरी! मी मेल्यावर माझ्या जमीनजुमल्याचे मी काय करणार आहे? मग, त्या निर्जीव –तथ्यहीन जमिनीसाठी नातेवाईकांना का मारायचे?? । मला अक्षरश: गरगरायला लागले. मी गाडीचा आधार घेऊन कसाबसा उभा राहिलो. आणि तिथून निघावे असा विचार करून गाडीत पाहिले तर, ड्रायव्हरच्या ठिकाणी साक्षात् ‘ईश्वर’ असल्याचा भास झाला. डोळे फाडफाडून पाहिले. अगदी स्वतःला चिमटा घेतला! तरीही ‘ईश्वराचा’ भास काही दूर होईना. न राहवून त्याच्याकडे रोखून पाहात विचारले,
“तू . . . तू ईश्वर आहेस की काय?’
त्याने शांतपणे स्मित करत म्हटले, “बरोबर ओळखलेस तू! पण शूऽऽऽ! अजिबात कुणाला आता कळवू नकोस की मी ईश्वर आहे.” मी थक्क झालो! आयुष्यभर जे जाणून घेण्यासाठी मी ध्यास घेतला होता, झुरत होतो, जे मी ध्येय समजत होतो, तो ‘ईश्वर’ असा अचानक समोर!! तोही ड्रायव्हरच्या स्यात?? मी बधिरच झालो! काय बोलावे हे सुचेना म्हणून काहीतरी बरळलो, “पण . . . पण . . . तू तर ड्रायव्हर? . . .” त्याने यावर नुसते स्मित करून मान डोलावली. तोपर्यंत मी सावरलो आणि म्हणालो, “बरे झाले तू भेटलास. अरे, मला खूप प्र न विचारायचे आहेत तुला.”
“तुझ्या सगळ्या प्र नांची उत्तरे मी देईन. पण एका अटीवर, माझी उत्तरे कधीही कोणालाही सांगायची नाहीत.”
“पण मग उपयोग काय? माझ्यासारखे इतर अनेकांना प्र न पडले आहेत, असतील, अरे, जगात लाखो लोक तुला जाणून घेण्यासाठी आयुष्य वाया घालवतात. त्यांचे काय?”
“इतरांबद्दल तुला काय करायचे आहे? तू तुझ्यापुरते बोल!”
मला यावर काय सांगावे हे सुचेना म्हणून गप्प बसलो. तेवढ्यात, “हे बघ, मला फार वेळ नाही. तुला जे काही विचारायचे असेल ते लवकर विचार, नाहीतर मी आपला परत ड्रायव्हर होतो’ तो म्हणाला. “अरे, थांब,थांब, अरे तुझ्या ख्याबद्दल, आकाराबद्दल बरेच वाद आहेत. आणि मला खूप उत्सुकता आहे. तू नेमका आहेस कसा? ते तर दाखवशील.” कुठला का असेना, पण मला प्र न सुचल्याबद्दल हायसे वाटले. तो शांतपणे म्हणाला, “हो ! पण पुन्हा माझी अट लक्षात ठेव. तुझ्या या प्र नाचे माझे उत्तरदेखील तुला कोणाला सांगता येणार नाही.” मी नाइलाजास्तव त्याची अट मान्य केली. आणि . . . आणि त्याने मला ‘दर्शन’ दिले. त्या ‘दर्शना’चे काय वर्णन करू? फारच उच्च, म्हणजे श्रेष्ठच . . . म्हणजे खूपच . . . म्हणजे अतिशयच . . . म्हणजे जाऊ दे! नाहीतरी मला त्या ‘दर्शना’बद्दल काही सांगायची परवानगी नाहीच, त्यामुळे ‘अवर्णनीय’ असे म्हटले तर पुरेसे होईल !!”
पण, त्या दर्शनाने मी दिङ्मूढ झालो. पुन्हा एकदा गरगस्न पडायची पाळी आली. तेवढ्यात त्याच्या प्र नाने भानावर आलो. “झाले तुझे समाधान? आणखी काही विचारायचे आहे की होऊ मी परत ड्रायव्हर?’ “नको, नको! अरे, तुझ्या दर्शनामुळे मी भांबावून गेलो होतो रे! त्यामुळे मुख्य प्र न राहूनच गेले. पहिल्यांदा हे सांग, की, माणूस आयुष्य जगून काय साधतो? कशासाठी जगतो? थोडक्यात म्हणजे माणसाच्या जगण्याचा हेतू काय? आणि दुसरे म्हणजे, हे जग तूच चालवतोस का?” तो छद्मीपणे हसत म्हणाला. “असे, तुझ्या पहिल्या प्र नाचे उत्तर दुसऱ्या प्र नाच्या उत्तरात आहे. हे सारे जग ‘मी’च चालवतो. माणूस फक्त जगत असतो ! . . . आणि त्याला वाटत असते की त्याच्या मुळे काहीतरी घडत आहे. म्हणून तो काहीतरी करत राहतो!”
“म्हणजे? माणसाच्या जगण्याला — काही करण्याला काहीच अर्थ नाही?”
“असं कसं? अरे, त्याला असे वाटतेच की, ‘त्याने’ झोपडी बांधली, ‘त्याने’ नोकरी मिळवली, ‘त्याने’ अभ्यास केला, ‘त्याने’ पहिला क्रमांक मिळवला, ‘त्याने’ शोध लावला, .इथपासून ‘त्याने’ कोणावर तरी उपकार केले, ‘त्याने’ कोणाला तरी धडा शिकवला, . . . एवढेच काय त्याला असेही वाटते की ‘त्याने’च पंतप्रधानपद मिळवले, ‘त्याने’च अणुबाँब बनवला वगैरे!! माणसाला त्यातच ‘अर्थ’ वाटतो की ‘तो’ काहीतरी करतोय आणि ‘त्याच्या’मुळेच ‘काहीतरी’ घडतेय!” —- तो शांतपणे म्हणाला. “ठीक आहे! म्हणजे, तूच सारे ठरवतोस आणि करवतोस! आम्ही माणसे फक्त जगतो! आमच्या त्या करण्यात, साधण्यात, मिळवण्यात ‘आमचे’ असे काहीच नाही. पण मग यात लोकांना न सांगण्यासारखे काय आहे? हे सगळे इतके जर साधे–सरळ–सोपे आहे, तर मग सर्वांना ते सांगण्याला तुझी हरकत का?”
“अरे, आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्र नांची उत्तरे सापडल्यानंतरचे आयुष्य माणसाला अधिक निरर्थक वाटते. हे सारे मी चालवतो हे जर माणसांना खरोखरच कळले तर त्यापुढे काहीही करण्यात त्यांना स्वारस्यच राहणार नाही. माणसे वेडी होऊन जातील.”
“पण मग त्यांना तू अस्तित्वातच नाहीस असे सांगितले तर?”
“बापरे! मग तर फारच गोंधळ उडेल! एक तर तसे सांगितलेस तर लोक तुझ्यावर विश्वासच ठेवणार नाहीत. ते तुला वेडा ठरवतील. आणि समजा तू त्यांना हे पटवले असे गृहीत धरले तर . . . तर ते माझा शोध थांबवतील. पण मग त्यांना स्वतःबाबत फार मोठे प्र न पडतील! आपण हे का करत आहोत? कशासाठी करत आहोत? जगणे– मरणे म्हणजे काय? मेल्यानंतर काय? जन्मापूर्वी काय? हे प्र न त्याला पोखस्न टाकतील! आज त्यांना निचित असे काहीच माहीत नाही. नुसतेच प्र न पडलेले आहेत आणि ते कधी तरी सुटतील अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे आयुष्यभर ‘आपण’ काहीतरी ‘करत’ आहोत अशा भ्रमात राहून पडलेल्या प्र नांची उत्तरे शोधत, उत्तरांबद्दल एकमेकांशी वाद घालत, निदान सुखाने जगत तरी आहेत! अरे, स्वतःच्या मागे कोणती शक्ती आहे हे पाहणे म्हणजे स्वतःची शेपटी धरू पाहणाऱ्या कुत्र्यासारखे गरगर फिरणे आहे आणि एका अर्थी तसे करणारा कुत्रादेखील स्वतःच्या
‘मागची’ शक्तीच पाहत असतो. पण त्याने वेळ तरी जातो की नाही?” —- तो डोळे मिचकावत म्हणाला “अरे, पण मग मी लोकांना सांगू तरी काय? आता लोकांनी मला तुझ्याशी बोलताना पाहिलं आहे. त्यांनी आपल्या बोलण्याबद्दल जर मला विचारले तर त्यांना मी काय उत्तर द्यायचे?”
“पहिली गोष्ट म्हणजे, ते ‘मला’ पाहूच शकत नाहीत. त्यांना असेच वाटेल की तू ड्रायव्हरशीच बोलत आहेस. तरी त्यांनी आग्रह केलाच तर त्यांना एवढेच सांग की ‘मी’ तुला ‘दर्शन’ दिले. ते ‘दर्शन’ नेमके कसे होते ते मात्र काही केल्या सांगायचे नाही आणि मी काय बोललो यावर सांग की ‘अळीमिळी गुपचिळी — ठामठुम चूप!!” “अळीमिळी गुपचिळी — ठामठुम चूप? हे काय भलतेच?” मी खलासच झालो. “या मंत्राला “नीता’ म्हणतात. लोकांना सांगायचे की मी तुला ‘नीता’ सांगितली. आणि तपशील विचारला, तर ‘अळीमिळी’ सांगून टाकायचे!” —- यात काहीही विशेष नसल्यासारखे तो म्हणाला.
“अरे, पण याचा लोकांना काय अर्थ कळणार?” —- मी हट्टाने पेटून विचारले.
“त्याची काळजी तू करू नकोस! माणसे काहीही करू शकतात. ते ‘दर्शन’ म्हणजे कसे असेल? . . . ‘नीता’ म्हणजे काय? . . . ‘अळीमिळी’चा अर्थ काय? यावर पुढली हजारो वर्षे माणसे संशोधन करत बसतील . . . लाखो अर्थ काढतील. त्या मंत्रात स्वतःची वाक्ये घुसडतील. काय वाट्टेल ते करतील. हजार वर्षांनंतर जर तू परत जन्म घेतलास तर तुला या एवढ्याश्या वाक्याचे ‘नीता’ नावाच्या मोठ्या ग्रंथात रूपांतर झालेले दिसेल!! त्या वाक्यात माणसांनी भर टाकून टाकून त्याचे २२-२४ अध्याय झालेले दिसतील. अरे, ते असे काही झालेले असेल की त्यातले तू त्यांना सांगितलेले मूळ वाक्य शोधणे तुलाच अवघड होऊन बसेल. पुन्हा, त्या भर टाकलेल्या ग्रंथाचे पाठांतर पारायण वगैरे चालू असेल. अगदी स्वतःला विद्वान समजणारी मंडळीदेखील त्या माणसांनीच भर टाकलेल्या ग्रंथाचे आणखी अर्थ काढण्यात —- विवेचनात मग्न झालेली असतील. त्याचे अर्थ त्यांनी इतके काही काढले असतील की त्यातले काही अर्थ खरेसुद्धा असतील! बोल!’ —- तो अगदी अधिकारवाणीने बोलत होता. मी हताशपणे म्हणालो. “ठीक आहे. लोकांना मी ‘नीता’ सांगेन. दुसरे काय?”
“मग झाले तुझे समाधान? होऊ मी परत ड्रायव्हर?” —- त्याने विचारले.
“अरे, नको–नको! आम्हा माणसांच्या जगण्यामागे काहीही अर्थ किंवा कार्यकारणभाव नाही हे कळले. पण तरीही एक प्र न येतोच की, मग तुझ्या जग चालवण्यामागे कार्यकारण-भाव काय? तू तरी हे जग का चालवतोस? आम्हाला ‘चालवून’ तुला काय मिळते? का करतोस हे सारे? कशासाठी?’ माझ्या प्र नांवर तो खिन्नपणे हसत म्हणाला,
“अरे, मी हे सारे कशासाठी करतोय हे जर मला कळले तर मग काय उरले मला कळण्यासारखे? मी हे का करतो, कशासाठी हे जग चालवायचे? हे जग चालवून मला मिळणार तरी काय? या प्र नांची उत्तरे शोधण्यासाठी उभे आयुष्य वेचले मी ! तरीही, उत्तरे काही सापडलीच नाहीत ! शेवटी, करायला बाकी काही नाही म्हणून जगच चालवत बसतो. झालेच तर अधूनमधून पृथ्वीवर देखरेखीसाठी जातो. दर्शने-बिर्शने देतो. लोक त्या दर्शनाने भांबावतात — गडबडतात. तेवढाच मला विरंगुळा! आणखी काय?” त्याच्या बोलण्यातली हतबलता, खिन्नपणा ऐकून मी हबकून विचारले, “म्हणजे, पुन्हा आणखी एक प्र न येतोच की आमच्यामागे जसा तू आहेस तसा तुझ्याही मागे कोणी आहे की काय?” “हुषार आहेस!” तो मंदपणे हसत म्हणाला, “इतक्या माणसांना आजवर दर्शन दिले, पण एकानेही आजतागायत हा प्र न विचारला नाही. सगळे मूर्खासारखे त्यांच्याच जगातल्या वर्तुळामधले प्र न विचारायचे. अर्थात, त्यांना तेवढेच प्र न विचारावेसे वाटवणाराही मीच आणि तुला हुषार करणारा आणि हा प्र न विचारायला लावणाराही मीच !! सगळी गंमत आहे, झाले! म्हणूनच तर कळत नाही की मी हे सारे कशासाठी करायचे? असो.” त्याने खिन्नपणे एक उसासा टाकला आणि पुन्हा सांगू लागला, “अरे, आमच्यामागे एखादा कर्ता करविता किंवा एखादी शक्ती आहे का हे जाणण्यासाठी मलाच नव्हे तर तमाम ईश्वरांना ध्यास आहे. लाखो ईश्वर . . . आम्हाला कोणी चालवतोय का हे शोधण्यासाठी वर्षानुवर्षं वणवण भटकत असतात!”
मी आ चर्याने विचारले “म्हणजे? तुमच्यातही अध्यात्म आहे?”
“असणारच ! अरे, आपल्यापेक्षा प्रबळ अशा शक्तीचा शोध काहीही कारण नसताना घेत राहणे आणि हताश होणे, ही खोड सार्वत्रिक आहे. काहीही कारण नसताना सुखी आयुष्याच्या अध्यातमध्यात येणारी गोष्ट म्हणजे ‘अध्यात्म’!” —- तो हसत म्हणाला.
“पण शेवटी तुझ्या मागे कोणी आणखी मोठी शक्ती आहे की नाही. ते कळले का?’ —- मी न राहवून आतुरतेने विचारले.
“वाऽवाऽवा! म्हणजे, तुला सांगायला काही हरकत नाही. कारण तुला मी हुषार बनवलेय. आमचे लोक त्या शक्तीला ‘परमेश्वर’ म्हणतात. मीदेखील त्याला आयुष्यभर शोधत होतो. एकदा माझ्या भावाने माझे जग हडप करण्याचा प्रयत्न केला म्हणून आमची भांडणे चालली होती त्यावेळी अचानक मला तो आमचा कर्ता करविता म्हणजे ‘परम-ईश्वर’ भेटला.” अंतिम शक्तीबद्दल आता माहिती होणार या आनंदात उडी मास्न मी त्याला विचारले, “कसा दिसतो तो? त्याने काय सांगितले तुला?”
“त्याने मला ‘दर्शन’ दिले पण ते कसे होते हे कोणालाही न सांगायची त्याने मला अट घातली आहे. आणि नंतर त्याने मला ‘मीता’ सांगितली!!!” —- तो निर्विकारपणे म्हणाला. “अरे, पण तरीही मग एक प्र न येतोच. तो तरी हे सारे तुझ्याकडून का करवून घेतो? त्याला हे करून काय मिळते? त्याच्याही मागे आणखी एखादी मोठी शक्ती किंवा कर्ता-करविता आहे का?’ “हा प्र न मी त्याला विचारला कारण त्यानेच मला हुषार बनवलेय तो म्हणाला की ह्या आणखी मोठ्या शक्तीला ते परमेश्वर लोक ‘परम-परमेश्वर’ म्हणतात. त्या ‘परम-परमेश्वराने’ आपल्या परमेश्वराला ‘दर्शन’ दिले म्हणे ! पण ते कसे होते हे कोणालाही न सांगायची त्याने परमेश्वराला अट घातली होती. आणि पुढे त्याने परमेश्वराला ‘गीता’ सांगितली.” तो गप्प झाला. आता मात्र मला अनावर झाले. डोके गरम व्हायला लागले आणि पुन्हा गरगरायला लागले. मी असह्य झाल्यामुळे जवळ जवळ ओरडून त्याला विचारले, ‘अरे एवढे कळूनही एक प्र न येतोच, की शेवटी फायनल शक्ती कोणी आहे की नाही?’ आता तो हसायला लागला, “असणारच! पण त्या मागे त्या शक्तीचा कर्ता करविता असणारी एक आणखी मोठी शक्ती असणार!!” मी हतबुद्ध होत कोसळत त्याला विचारले,
“तरीही, हे सर्व कळल्यावर आता मी काय करावे? . . . हा प्र न आहेच.” त्यावर उत्तर आहे, “उचल तुझा हात आणि फोड भावाचे मुस्काट!” . . . हे ऐकून मी गडबडलो. आणि नकळत प्र न गेला. “म्हणजे? ते कशासाठी?’ “अरे, नाहीतर तो तुझे मुस्काट फोडेल!” तो उत्तरला. कुठेतरी,
दातेनगर, मते नर्सरी रोड, गंगापूर रोड जवळ, नाशिक — ४२२ ००५

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.