आडनाव हवेच कशाला?

नावाच्या आड येणारे ‘आडनावच नको’ हे म्हणणे आडमुठेपणाचे वाटेल; परंतु सखोल विचारांती ते आपणास पटेल. ‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ या लेखात सुरेखा बापट यांनी स्त्री-पुरुष समानतेत येणारे अडथळे यांची चर्चा केली आहे. परंतु ‘आडनाव हवेच कशाला?’ याचे विवेचन पुढीलप्रमाणे देत आहे.
आडनावामुळे येणारे अडथळे खालीलप्रमाणे —-
१. भारतीयांच्यात असलेला धर्मभेद, जातिभेद आडनावामुळे चटकन लक्षात येतो. उदा. कांबळे—मागासवर्गीय, पाटील—मराठा इ.
२. आडनावात प्राणी, पक्षी, यांची नावे येतात. तेव्हा माणसांनासुद्धा नावात प्राणिमात्रांची गरज आहे हे दिसून येते. परंतु गाढवे, विंचू, कोल्हे, लांडगे इ. सारखी आडनावे उगीचच वर्णभेद दाखवितात.
३. ‘विवाह’ हा मानवी जीवनाचे सरळ सरळ दोन भाग करतो. दोन आडनावे एकत्र येतात. ती फक्त लग्नपत्रिकेत. नंतर मात्र वधूला पहिल्या आडनावाचा त्याग करायला शिकवले जाते. माहेरच्या आडनावाच्या त्याग कस्न सासरचे आङ-नाव धारण करावे लागते. हा सरळ सरळ स्त्रीवर अन्याय होत आहे. स्त्रीने लग्नानंतर दोन, दोन आडनावे लिहणे हे सुद्धा सयुक्तिक वाटत नाही. कारण नाव लांबलचक भले मोठे लिहावे लागते. स्त्री-पुरुष समानता आणण्यास प्रथम आड-नावांचाच अडथळा येतो.
४. आडनावाला समाजात उगीचच जास्त प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. स्वतःच्या नावानंतर वडिलांचे नाव न लिहिता, नाव आणि आडनाव लिहिण्याची प्रथा (फॅशन) स्ढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण नाव समजू शकत नाही. उलट वडिलांचे नाव लावण्यात काय कमीपणा वाटतो हेही समजत नाही!
आडनावामुळे व्यक्तिगत, सामाजिक तोटे वरील विवेचनावरून आपल्या सहज लक्षात येतील. आता आडनावाचा अडथळा दूर केला तर होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
१. आडनावे ही परंपरागत घराण्यानुसार चालत आलेली असतात. त्यात बदल करावयाचा असेल तर सरकारी गॅझेटमध्ये नवीन आडनाव प्रसिद्ध करावे लागते. म्हणजेच सरकारी बारसे घालावे लागते. या कटकटीऐवजी आडनावच नावा-तून काढून टाकल्यास सोपे होईल. महाराष्ट्र सरकारने नुकतेच शाळेत मुलाचे नाव नोंदविताना वडिलांच्या नावाबरोबर आईचेसुद्धा नाव लिहिणे सक्तीचे केले आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकारने आदेश काढले तर आडनाव लिहिणे सुद्धा रद्द करता येईल. मुलाचे, आईचे व शेवटी वडिलांचे नाव असे लिहिलेले नाव संपूर्ण नाव समजण्यात यावे. उदा. चि. नचिकेत वर्षा विजय. त्यास ‘त्रिनाम’ पद्धती म्हणावे.
२. आडनावावरून घराणेशाही दिसून येते. उदा. पाटील-पाटीलकी, देशमुख-देशमुखी, आडनावच नसल्यामुळे घराणेशाहीची खोटी प्रतिष्ठा जपण्याचा प्र नच निर्माण होणार नाही.
३. भारत हा विविध जातिधर्मांनी बनलेला देश आहे. त्यामुळे भारतात धर्मभेद, जातिभेद, मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आडनावेच काढून टाकल्यास हिंदू-धर्मातील तरी जातिभेद संपुष्टात येण्यास मदत होईल असे मला वाटते. पाटील, कांबळे इ. आडनावावरून सरळ सरळ लक्षात येणारा जातिभेद आडनाव नसल्यामुळे संपुष्टात येण्यास मदत होईल.
४. मुलीचे विवाहानंतर आडनावच बदलते असे नाही, तर स्वतःचे नाव-सुद्धा सासरच्याकडून त्यांच्या आवडी निवडीनुसार बदलले जाते. इथे मुलीच्या इच्छेशिवाय नाव बदलते जाते. त्यामुळे एक प्रकारे स्त्रीवर अन्याय होतो असे वाटते. स्त्री-पुरुष समानतेत आडनावाचा मोठा अडथळा वाटतो. विवाहानंतर स्त्री-पुरुष सहजीवनात आडनावांचे
अडथळे कशासाठी? तेव्हा विवाहानंतर पतीने आपल्या स्वतःच्या नावानंतर पत्नीचे नाव लावावे. व पत्नीने स्वतःच्या नावानंतर पत्नीचे नाव लावावे. दोघांनीही आडनावे लावू नयेत. उदा. १. श्री. विजय वर्षा २. सौ. वर्षा विजय असे लिहिणे फार सोयीस्कर व सुटसुटीत वाटते. व्यवहारातही लांबलचक नाव योग्य वाटत नाही. तसेच आडनाव न लिहिल्यामुळे स्त्री-पुरुष समानता साधली जाते. स्त्री-पुरुष समानता, सामाजिक समरसता; धर्मभेद, जातिभेद नष्ट करणे हे आडनाव रद्द केल्यामुळे सहज शक्य होईल. असे मला वाटते. तेव्हा सर्वच विचारवंत, बुद्धिमंत राजकीय व्यक्तींनी याचा विचार करावा. ‘आडनाव हवेच कशाला?’ यावर विचारमंथन व्हावे हीच अपेक्षा! चार्वाक
अमृत कॉलनी, भू-विकास बँकेमागे, करंजे, सातारा — ४१५ ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.