“AIDS”! : एडसची भयावहता

आज आपण २००१ च्या—-नव्या वर्षाच्या, नव्या शतकाच्या—-नव्या सहस्रकाच्या जानेवारी महिन्यात पोचले आहोत. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. त्यात Information & Technology Industry च्या बरोबर Genetic Engineering पासून क्लोनिंग आणि मानवी Genome पर्यंत पोचलो आहोत. अनेक रोगांचा नायनाट करण्याचे सामर्थ्यही आपल्यात आज आहे. आपण बऱ्याच रोगांपासून बचाव करू शकतो. मनुष्याच्या आयुष्याची लांबी वाढत जाते आहे. लांबी बरोबरच व्याप्तीही वाढते आहे का? असा प्र न मला पडतो. या वैज्ञानिक प्रगतीच्या बरोबरीने मानवी संस्कृती, मानवी वर्तन यातही प्रगती झाली असती तर समाजाचा खऱ्या अर्थाने विकासही झाला असता. परन्तु आपल्या देशात तरी तो अभावानेच आढळतो. जगातून देवी रोगाचे उच्चाटन केले गेले. पोलियो नाहीसा करण्याचेही जागतिक पातळीवर प्रयत्न आज आपण करीत आहोत. टी. बी. ला, मलेरियाला अजून आपल्याला थांबवता आलेले नाही. पण सध्या आपल्याला जिकडे तिकडे ऐकू येणारा एड्स रोगाबद्दलचा ‘माहोल’ समजल्यावर असे वाटू लागते की बाकी सगळ्या रोगांमुळे, अपघातांमुळे कोणी मरत नाही. फक्त एड्सच सगळ्यांना मारायला आलेला साथीचा रोग उरला आहे. जे राजकारण एड्स रोगामध्ये चालू आहे ते समजल्यावर तर फारच धक्का बसतो. जागतिक आरोग्य संघटना जसा हुकूम सोडेल त्याप्रमाणे आपले सरकार कार्यक्रम बनवते. त्यासाठी हजारो लाखो डॉलर्समध्ये पैसाही ओतला जातो. नव्या नव्या स्वयंसेवी संस्था उदयाला येतात. एकट्या दिल्लीत ३०० पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांनी ९९ च्या फेब्रू. मध्ये स्टेट एड्स सोसायटीला अर्ज केला होता. त्यातल्या अनेक बोगस (फक्त कागदावरच) होत्या भरपूर पैसा मिळतो. काम, किती, कसे केले जात आहे हे तपासायला कुणीही येत नाही हे या संस्थांना चांगले माहीत आहे. क्वचित् चुकून माकून कुणी आलेच तर सफाई देऊन सुटका करून घेता येते.
या संस्था कामे तरी कशी करतात? कुणी फक्त पोस्टर्स चिकटवण्याची कामे करतात. कुणी निरोध वाटप करते कुणी सर्व्हे, कुणी प्रदर्शने भरवणे वर्कशॉप्स किंवा शिबिरे घेणे, रस्त्यावर नाटके (पथनाट्य) करणे, या सर्व गोष्टींमुळे फारसा वागणुकीत बद्दल किंवा क्रांती घडू शकत नाही. डॉ. विजय ठाकूर यांनी ‘मूल्यमापन’. (Assessing realities of HIV Intervention) (AIDS Research & Review 1999 Vol 2.no4) म्हटले आहे—-“गेल्या ७ ते १० वर्षांच्या एड्स प्रतिबंधात्मक प्रयत्नांमधून भारतात, फारसे विश्वासार्ह मूल्यमापन अहवाल निघू शकले नाहीत. कार्यक्रम अयशस्वी होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणारी एकही अहवाल नाही. मिळणारे पैसे आणि मानसिकता सत्याचा अफ्लाप करीत आहे. म्हणून प्रकल्प यशस्वी करणे हा निकष न ठेवता, एड्सच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न सतत हवे, अंतिम यश येईल किंवा नाही, हे तत्त्व समजून चालले तरच काही यशस्वी होऊ शकेल.” पंचतारांकित हॉटेलात जेवणावळी, फॅशन-शोज सिने-अभिनेत्यांचा झग-झगाट व चमचमाट, मॅजिक शो, नाटके एवढ्याने एड्स ‘अवेझरनेस’ येतो का?
१ डिसेंबर हा जागतिक ‘एड्सदिवस’ म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केला आहे. त्यादिवशी वरील संस्थाच्या कार्यक्रमांबरोबरच—-भाषणे, तपासण्या, शाळा व कॉलेजातील मुलामुलींच्या ज्ञानवृद्धीत एड्सची भर टाकण्याचे कार्यक्रम स्पर्धा छोट्या मुलामुलींच्या रॅलीज काढून त्यांना नको ते, अनाकलनीय सांगण्याचा प्रयत्न केला जातो. Slogans, Posters, स्पर्धा—-या सर्व कार्यक्रमांच्या बातम्या फोटोंसकट अहमिहकेने वृत्तपत्रातून छापून येत असतात. बरेच लेखही छापून येतात. बोलले जाते, विचारले जाते. भीती वाढत जाते राष्ट्रीय गुन्हेगारांचा रेकॉर्ड ठेवणाऱ्या ब्यूरोचा अहवाल सांगतो की—-एड्सची व गुप्तरोगाची भीती वाढल्यापासून—-त्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात २०९% टक्के वाढ झाली. आहे. एड्स रोगावर बरे होण्याची औषधे सध्या तरी प्रायोगिक अवस्थेत आहेत. अतिशय महागडी अशी या औषधांची योजना आहे. या औषधाचे उप-परिणाम इतके भयानक आहेत की त्यामुळेही रोगी दगावू शकतो. आपल्या देशात ही औषधे आयात करावी लागतात. रोग्याचे आयुष्य लागण झाल्यापासून. ८ ते १० वर्षांत संपते, असे मानले जाते.
A — Acquired —- उत्पन्न झालेली किंवा उद्भवलेली I — Immuno —- प्रतिकारक शक्तीची
D — Deficiency —- कमतरता S– Syndrome —- या कमतरतेमुळे असे शरीर अनेक बॅक्टिरिया, फंगस,
व व्हायरस या जंतूच्या प्रादुर्भावाने पीडित होते. म्हणजेच हा काही एक रोग नाही “अवस्था आहे” त्यामुळे होणारे अनेक रोग—-त्यांवर रोगाप्रमाणे उपचार करावा लागतो. त्यांत प्रामुख्याने टी. बी., फंगल (बुरशी) न्युमोनिया, हगवण/अतिसार, वजन कमी होणे इतर गुप्तरोगांचा प्रादुर्भाव होणे, काही हीज व चर्मरोग व वेगल्या प्रकारचे कॅन्सर होणे वगैरे गोष्टी येतात. जेव्हा एखाद्या रोगावर निा िचत, खात्रीलायक उपाय नसतो तेव्हा अनेक पाथीज त्यावर प्रयोग करून पाहतात, आणि जेवढे रोगी तेवढेच उपचारही निघू शकतात. मग अमेरिकेत New York ला चालू असलेली Retrovirus औषधांची Cocktail जर प्रायोगिक तर मग तमिळनाडूत खात्रीचा एड्सचा उपाय अशी वर्तमानपत्रात जाहिरात आली, आणि आपले रोगी तिथे धावले तर त्यात नवल ते काय?
या रोगाच्या साथीच्या प्रादुर्भावाबद्दलही संशयास अनेक जागा आहेत. १९८६ मध्ये डॉ. रॉबर्ट गॅलो या नॅशनल कॅन्सर संस्था —- Bethdesa Maryland U.S.A., यांनी HIV व्हायरसमुळे एड्स होतो असे जाहीर केले. त्यामुळे एक समज सर्वत्र पसरला HIV = AIDS = Death. वास्तविक ही व्हायरस जुनीच
HTLVIII व्हायरस होती. नंतर डॉ. गॅहोंवर दोषारोपही ठेवण्यात आले. अनेक व्हायरॉलॉजिस्टनी आणि शास्त्रज्ञांनी जगभरातून यावर प्रयोग केले. परन्तु एकाच HIV व्हायरसमुळे AIDS होत नाही तर अनेक कारणे एकत्र आल्याने असा परिणाम होतो असेच प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या मते—-(Intoxication) विषबाधा होणे—-निरनिराळ्या नशिल्या अंमली पदार्थाचे सेवन, इंजेक्शने घेणे, नस ओढणे उदा.—- हिरॉइन/कोकेन/इक्टॅसि/फेंक/पॉपर्स/MDA—-वगैरे त्यांबरोबर दारू काही औषधे AZT/ddl/DUT आणि प्रतिबंधात्मक किंवा उपचारांसाठी दिलेली Septrin सारखी औषधे जास्त दिवस, जास्त डोसमध्ये दिली जाणे, इतर जास्त अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके) घेणे, कुपोषण, अनेक वर्षे अन्नाची कमतरता असणे, घाणेरडी, अस्वच्छ राहाणी व चुकीचा डायाग्नोसिस—-यामुळे AIDS होतो.
‘Psycho-Neuro Immunology’ चे शास्त्र हेच सांगते की भीती, दडपण, चिंता व सतत चे ताणतणावही आपली प्रतिकारक्षमता कमी करतात.
एड्सच्या प्रादुर्भावाची सुरवात १९७९–८२ मध्ये California & Newyork इथे झाली. तो तरुण समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये, विकृत संबंधांमुळे व अनेकजणांशी संबध ठेवणाऱ्यांमध्ये आढळला. हे जवळपास सर्व व्यसनी, नशील्या, उत्तेजना देणाऱ्या औषधांचे सेवन करण्याऱ्यांमध्येच अधिक आढळले. व हे सर्व टाळल्यानंतर रोगाचा प्रादुर्भावही आटोक्यात आला.
डॉ. गॅलोंच्या- “HIV मुळेच एड्स होतो’ अशा प्रतिपादनानंतर पुन्हा गोंधळ वाढला. तो म्हणजे समलिंगी संबंध, हे जर HIV Virus या रोगाला कारण असेल तर तो मग भिन्नलिंगी संबंधांतून पुढे वरखाली सर्वस्तरातून पसरत जाईल व एड्स हा सर्वांत मोठा—-सर्व जगाला हादरवून सोडणारा साथीचा रोग ठरेल. आणि म्हणून ही साथ पसरू नये, आटोक्यात यावी म्हणून मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर युद्धस्थिती सारखे प्रयत्न करण्यात आले.
HIV ची रक्तपरीक्षा करताना १९९२ पर्यंत असे वाटले की ही साथ खरेच फार झपाट्याने पसरत आहे. परंतु अमेरिका, इंग्लंड, उत्तर युरोप येथे Positive HIV Test फक्त समलिंगी + भिन्नलिंगी संबंध ठेवणाऱ्यांमध्ये व नशीली द्रव्ये घेणाऱ्यांमध्ये आढळून आली व त्यांनाच एड्स रोग दिसला. इतरांमध्ये असे झाले नाही. म्हणून मग एड्स रोगांच्या गटामध्ये बऱ्याच इतर रोगांचाही समावेश करण्यात आला. त्यात इतर गुप्तरोग, कुपोषण, टी. बी. व न्यूमोनिया सारखे भयानक आजार सामील करण्यात आले. हे सर्व करीत असताना भारतासारख्या देशांमध्ये (जे इतर पा चात्त्य देशांकडून येणाऱ्या संशोधनावर अवलंबून राहतात व त्यांचे अनुकरण करतात त्यांनी दिलेल्या गोष्टी रोगांच्या संदर्भात पाळतात) सर्व्हे करणे कठीण झाले, गोंधळाचे झाले व अर्धवट होत गेले. अनेक प्र न त्यामुळे अनुत्तरित राहिले किंवा संदेह, शंका बळावण्यास कारणीभूत ठरले. म्हणून मग HIV Positiveटेस्ट आल्याबरोबर रोग्याला एड्स झाला असे सांगणे व यातून आत्म-हत्येची वाढती प्रवृत्ती बळावली. ही टेस्ट कितपत ‘सेन्सिटिव्ह’ आहे? हा प्र न कोणी कोणाला विचारायचा?
मी स्वतः एड्सच्या संदर्भात अधिक माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी आमच्या संस्थेतर्फे पुण्याच्या राष्ट्रीय व्हायरॉलॉजी संस्थेत ३ वर्षांपूर्वी मुद्दाम जाऊन आले. HIV हे Biohazard आहे. दवाखान्यातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज व आया, बाई झाडूवाले यानी काय काय दक्षता घ्यावी, एड्स टाळण्यासाठी ऑपरेशन नंतर, ऑपरेशन थियेटर व उपकरणे कशी निर्जंतुक करावी वगैरे प्र नांना उत्तरे मिळवणे, दवाखान्यातील कचऱ्यानी व घाणीची कशी विल्हेवाट लावावी, रोग्याची टेस्ट (HIV) केव्हा करावी, त्यांचे (काऊन्सेलिंग) समुपदेशन कसे व केव्हा करावे असे अनेक मुद्दे या भेटीमुळे समजण्यास मदत झाली. NIV बरोबरच मी, ससून हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल, Inlacs हॉस्पिटल व काही खाजगी हॉस्पिटल्सनाही भेटी दिल्या व चर्चाही केली. परत आल्यावर
आमच्या (CIIMS) सिम्स संस्थेत सर्वांना भाषणे दिली व सर्व समजावून सांगितले. काही चाटू बनवले सर्व सूचना पाळण्याची कटाक्षाने खबरदारी घेतली. तरी देखील माझ्या मनातही संदेह होतेच.
१. HIV Positive दात्याच्या रक्तदानानंतर, रक्त मिळालेल्या ९५% टक्केच रोग्यांना एड्स होऊ शकतो—-उरलेल्या ५ टक्क्यांना कसा व का होत नाही? कारण व्हायरस—-तर त्यांनाही मिळेलच ना?
२. एकदा HIV Test Positive आल्यावर आणखी एकदा दुसऱ्या किटवर परत टेस्ट करणे जरूरी असते. दोन्ही Positive आल्यास Weston Blot नावाची लंबी वेळखाऊ रक्तपरीक्षा व तदनंतर CD4 काऊंटर नावाची रक्तपरीक्षा—-या सर्व-परीक्षा Positive आल्यास रुणाला एड्स असल्याचे घोषित करण्यात येते. प्र न —- समजा पहलीच HIV निगेटिव्ह आली तर? दुसरी करण्यातच येत नाही. पण २ री Positive येऊ शकते तर मग असे कसे?
३. Window Period —- HIV ची लागण झाल्यापासून ३ महिनेपर्यंत HIV ची रक्तपरीक्षा Positive येत नाही. त्यानंतर Positive येते. म्हणजे Window Period मध्ये असलेल्या रक्तदात्याचे रक्त Negative समजून खुशाल रोग्याला दिले जाऊ शकते, दिले जाते. असे कसे?
४. रक्तदाता जर HIV Positive निघाला तर असे रक्त नष्ट करण्यात येते. रोग्याला दिले जात नाही. परन्तु रक्तदात्याला मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही. म्हणजे तिने/त्याने आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आणखी कोणाला तो रोग दिला तर सरकारला चालते? साथीला अशा रीतीने आळा कसा घालता येईल? वेश्या व्यवसायाला तरी आळा घालण्याचे कुठे प्रयत्न झाले.
५. कुठल्याही साथीच्या रोगाचे निदान करताना, त्या रोगाचे जीवाणू निदर्शनास आणता आले पाहिजेत असे तत्त्व असते. एड्सच्या बाबतीत—-एड्स झालेल्यांमध्ये HIV नसते त्याला Idiopathic CD4-T Cell
Lymphopema म्हणतात, तर बऱ्याचशा HIV Positive व्यक्तींना पुढे जाऊन एड्स होत नाही.
६. रक्ताच्या HIV test मध्ये HIV antibodies सापडतात. व्हायरस सापडत नाही. रक्कातल्या Antibodies प्रतिकारशक्ती दर्शवणाऱ्या असतात इथे मात्र त्या रोग दर्शवणाऱ्या कशा ठरतात?
७. अँटिबॉडीज—-एका विशिष्ट रोगाच्या स्पेशल नसतात. अशी टेस्ट ‘साधारण’ असते. False Positive tests पण येऊ शकतात. अशा ७० इतर स्थितीमध्ये HIV Test Positive येऊ शकते—- त्यात टी.बी., मलेरिया, कुपोषण, flu, गर्भावस्था वगैरे असू शकते. गेल्या वर्षी ३० व ३१ जानेवारी २०००—- मध्ये आपल्या नागपुरात आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स झाली. International Conference on Validity of HIV/AIDS Programme, Including methods of testing. डॉ. शांतिलाल कोठारींच्या (विरोध पत्करून केलेल्या) परिश्रमांमुळे हे साध्य होऊ शकले, जोडीला मिनिस्ट्री ऑफ हेल्थ व फॅमिली प्लॅनिंग—- भारत सरकार आणि डायरेक्टरेट ऑफ हेल्थ व फॅमिली प्लॅनिंग—-महाराष्ट्र सरकार.
मी दोन्ही दिवस पूर्ण वेळ ही कॉन्फरन्स ऐकली. चर्चेतही भाग घेतला. त्यात बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. डॉ. रॉवर्टो गिराल्डो-न्यूयॉर्क येथील फिजिशियन आणि Tropical & Infectious Diseases चे स्पेशलिस्ट फार मुद्देसूद व तिडिकेने बोलले. HIV मुळे एड्स होत नाही व फक्त शरीरसंबंधामधून तो पसरत नाही, अशा दोन्ही मुद्द्यांवर त्यांनी सखोल व अभ्यासपूर्ण भाषणे दिली. तसेच HIV लागणीचे निदान करताना करण्यात येणाऱ्या रक्तपरीक्षा या फारच चुकीच्या आहेत असे प्रतिपादन केले. अतिशय मुद्देसूद मांडणी व दाखले दिल्याने त्यांचे मुद्दे पटणे कठीण नव्हते, परन्तु आधी मानलेल्या संकेतांना व समजुतींना धक्का बसलेल्यांना ते मानून घेणे, पटवून घेणे कठीण होते. जोडीने फ्रान्सचे डॉ. E. D. Harven, Em. Prof. of Pathology, Canada,
Retrovirus च्या मुद्द्यावर बोलले. डॉ. क्लॉस कोहनलेन हे जर्मनीचे शास्त्रज्ञ यांनीही HIV व्हायरस असण्याची शक्यता आणि त्यामुळे एड्स होत असण्याची शक्यताही नाकारली. भारतातून आलेले शास्त्रज्ञ NIV चे डॉ. गडकरी ICMR चे एक शास्त्रज्ञ काही पॅथॉलॉजिस्ट वगैरे व महाराष्ट्र सरकारचे FP & Welfare चे डॉ. गुप्ता यांच्याकडून या सर्व लोकांना विरोध केला गेला. चर्चेच्या शेवटीही काही विशेष निष्कर्ष निघू शकला नाही. त्याच २-३ दिवसांत येथे नागपुरातच डॉक्टरांचीही एक–एड्सवर कॉन्फरन्स झाली होती. त्यात एड्सचे भय, व्हायरसवर पूर्ण विश्वास व जागतिक प्र नाचे कसे उत्तर शोधावे यावर विचार झाले.
वर्तमानपत्रांनी संपूर्ण वृत्ताना डॉक्टरांच्या कॉन्फरन्सचा दिला. परन्तु या जागतिक कॉन्फरन्सवर अन्याय केला. महाराष्ट्र टाइम्समध्ये श्रीराम शिधये यांनी “HIV व्हायरस नाही असे म्हणून लोकांमध्ये एडसची खोटी विधाने करू नका व जनतेला फसवू नका’ अशा अर्थाचा लेख छापला. स्वतः कॉन्फरन्सला न येता असे लिहिलेले वाचून मला सात्त्विक संताप आल्याने मी त्याला उत्तरही लिहिले. तेही महाराष्ट्र टाइम्सने छापले.
आपल्या देशात अभिजात संशोधन फार क्वचित् होते. बहुधा आपण सगळेच रेडिमेड ज्ञान, संशोधन पटकन आयात करतो आणि आपलेच म्हणून त्यावर विश्वास ठेवतो, विसंबून राहतो. मग ते डळमळले, डगमगले तर आपले काय होते? स्वतंत्र विचार करणारे किती मेंदू अशा गोष्टींना टकरावतात, प्र नांचा पाठपुरावा करतात? ते अभावानेच होते. आपल्याला सर्वच पा चात्त्य गोष्टी जशाच्या तशा गिळण्याची सवयच लागली आहे म्हणा ना!
डॉ. शांतिलाल कोठारी बोलतात ते—-स्वतंत्र विचार करतात म्हणून. जरी ते व्हायरसचे शास्त्रज्ञ नसले तरी “Continuum’ नावाच्या मासिकाशी मिळते जुळते विचार त्यांचे आहेत; कारण त्यांच्या ठिकाणी “Common Sense” अमाप आहे. इतरांनी दिलेले ज्ञान जसेच्या तसे गिळत नाहीत. Continuum या मासिकात सतत संशोधनात्मक विचार प्र न, उत्तरे चर्चा घडत असतात. त्याशिवाय जगभरातले शास्त्रज्ञ मते मांडतात. नुकत्याच ‘दर्बान’ला झालेल्या तेराव्या जागतिक एड्स अधिवेशनात साऊथ आफ्रिकेच्या प्रेसिडेन्टनी थाबो मबेकी नी एकच प्र न विचारला तो असा “फक्त सुरक्षित संभोग, निरोध, आणि रेट्रोव्हायरस प्रतिबंधात्मक औषधे यांचा वापर ढासळत्या आरोग्याला पुरेसा होईल का?”
एक वाक्य कुणीसे लिहिले आहे —-
“If you stand for something
There will be samebody for you & somebody against you! If you stand for nothing There will be nobody for you & nobody against you!!”
आजची ९० टक्के जनता दुसऱ्या प्रकारात मोडते. नुसते बघ्याचे काम करत. मग काय होणार?
५५२/२ पुनर्नवा, जुनी रामदासपेठ, नागपूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.