नीरक्षीरविवेक?

ख्रिस्ती धर्माच्या उदयाच्या आधी यूनानी लोकांची मतेही हिंदूंच्या (सध्याच्या) मतांसारखीच होती. सुशिक्षित यूनानी लोक आज हिंदू करतात, तसाच विचार करत. सामान्य यूनानी लोकही हिंदूंसारखेच मूर्तिपूजक होते. पण यूनानींच्यात दार्शनिकही होते, आणि त्यांनी आपल्याच देशात राहून अंधविश्वासाला थारा तर दिला नाहीच, पण वैज्ञानिक तत्त्वांची पर्यायी मांडणी करून त्यांच्यावर समाधानकारक उत्तरे काढली.

हिंदूंमध्ये वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये परिपूर्णता आणायची क्षमता व इच्छा असलेले लोक नव्हते. यामुळेच हिंदूंमध्ये बहुशः असे दिसते की वैज्ञानिक प्रमेये तार्किक क्रम न लावता अस्ताव्यस्त झालेली आहेत. शेवटी तर अशी प्रमेये जनसमूहाच्या हास्यास्पद धारणांशी गल्लत झालेल्या स्पात दिसतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे गणित व खगोलशास्त्राचे ज्ञान ठिकऱ्यांमध्ये मिसळलेल्या शिंपल्यांसारखे, किंवा शेणात पडलेल्या मोत्यांसारखे, किंवा खड्यांमध्ये पडलेल्या रत्नांसारखे आहे. त्यांच्या नजरेला दोन्ही प्रकारच्या वस्तू सारख्याच वाटतात, याचे कारण म्हणजे त्यांना शुद्ध वैज्ञानिक निगमनाची पद्धत झेपत नाही.

[अल-बिरुतीच्या भारतावरील ग्रंथावरून. (ग्रंथाचा निर्माणकाल इ.स. १०३०च्या आसपासचा मानला जातो. वरील अवतरण कयामुद्दीन अहमद यांनी डॉ. ए. सी. सखाऊ यांच्या इंग्रजी भाषांतराच्या केलेल्या हिन्दी संक्षेपातून घेतले आहे. १९९२ नॅशनल बुक ट्रस्ट)]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.