कोटिच्या कोटि अज्ञाने!

संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच एक पाहाणी केली. जगभरातल्या लोकांना प्र न विचारला होता, “कृपया शेष जगातल्या अन्नाच्या तुटवड्याबद्दलचे तुमचे मत सांगाल का?”
पाहाणी ठार अयशस्वी झाली, कारण अफ्रिकेत कोणालाच ‘अन्न’ म्हणजे काय ते माहीत नव्हते. प िचम युरोपात कोणालाच ‘तुटवडा’ ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. पूर्व युरोप ‘तुमचे मत’ हा शब्दप्रयोग ओळखत नव्हता. दक्षिण अमेरिकेत ‘कृपया’ हा शब्द अनोळखी होता, आणि अमेरिकन संघराज्यात कोणालाच ‘शेष जगा’ची ओळख नव्हती.
[टाईम्स ऑफ इंडिया, १३ मार्च २००१]