जैसे थे!

वास्तव परिस्थितीलाच आदर्श मानणे ही फार स्वार्थी क्रिया आहे, कारण बहुतेक वेळा वास्तव अन्यायाने खचाखच भरलेले असते. वास्तव परिस्थिती कायम राखण्याने ज्याचा स्वार्थ साधला जात असेल, तोच फक्त वास्तवाला आदर्शवत् मानतो. असे मानणे थेट गुन्हेगारी स्वरूपाचे असते. त्याचा अर्थ असा होतो की सर्व अन्याय कायमच राहायला हवेत, कारण एकदा ठरलेली व्यवस्था कायमस्वरूपी असायला हवी. हा दृष्टिकोण सर्व नीतितत्त्वांना छेद देतो. सदसद्विवेक बाळगणाऱ्या कोणत्याही समाजाने हा दृष्टिकोण स्वीकारलेला नाही. उलट इतिहास दाखवतो की जे काही चुकीच्या तत्त्वांवर ठरवले गेले असेल ते जसेच्या तसे मान्य न करता नेहेमीच नव्याने मांडायला हवे. असे केल्यानेच माणसामाणसांतील आणि वर्गावर्गांतील व्यवहार सुधारण्यात प्रगती होऊ शकेल.
[ दासशूद्र कोण होते?, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथातून. (इंग्रजीतून मराठीकरण आ. सु. चे). ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.