भरवशाच्या म्हशीला . . . !

२३ जानेवारीला माझ्या भावाचे काही कागद घ्यायला आयायटीत (पवई) गेलो. ते तयार होत असताना समजले की एक तंत्रवैज्ञानिक उत्सव होणार होता. आयायटीच्या ‘मूड इंडिगो’ या उत्सवासारखाच हाही उत्सव विद्यार्थीच साजरा करतात. २६ ते २८ जानेवारीला उत्सव होता, आणि मला २७ ला त्या भागात काम होते. उत्सव पाहायचे ठरवले. हा उत्सव विद्यार्थ्यांसाठीच होता.. उद्योग आणि शिक्षकवर्गाचा त्यात सहभाग नव्हता.. तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम, प्रदर्शन वगैरे बरेच काही होते.. २७ ला दुपारी गेलो, तर रस्त्यात डॉट कॉम कंपन्यांच्या खूप जाहिराती दिसल्या, ऑन लाईन व्यवहार, इ कॉमर्स, बरेच काही. प्रदर्शन नव्हते, पण दूरनियंत्रित विमानांच्या प्रतिकृतींचा एक कार्यक्रम सुरू होता. माझ्या एका मित्राचे व्याख्यानही कार्यक्रमात दिसले. एका नोटीस बोर्डावर लेव्हिटेशन, टेलेकायनेसिस (‘आत्मबळाने’ स्वतः उडणे व वस्तूंना हलवणे) असे शब्द दिसले. फार लक्ष न देता मित्राच्या व्याख्यानाला गेलो,.
नंतर माहिती केंद्रावर चौकशी केली. मला वाटले होते की चुंबकीय क्षेत्र वापरून वाहने रस्त्यांच्या-स्ळांच्या जरा वर धावायला लावतात, तसा मॅग्नेटिक लेव्हि-टेशनचा कार्यक्रम असावा. पण तसे नव्हते. एका दीपक राव नावाच्या ‘जीनियस’ ने १९ जानेवारीला केलेला फाऊंटन पेन हवेत तरंगायला लावणे वगैरे प्रकारचा कार्यक्रम पुन्हा होणार होता. माहिती केंद्रावरच्या विद्यार्थ्याला झाल्या प्रकाराचे विचारी (वैज्ञानिक) स्पष्टीकरण सुचत नव्हते. आणखी चौकशी करता कळले की डॉ. मॉरिस या परदेशी शास्त्रज्ञाचे परामानस शास्त्रातील फसवाफसवीवरचे भाषण कार्यक्रमाच्या जरा आधी होणार होते. डॉ. मॉरिसना अशा ‘सायकिक’ क्षमता विश्वसनीय वाटतात का, असे विचारता उत्तर मिळाले की ते संशोधन करताहेत,.
मी संयोजकांना (नाव: नि चय) सांगितले, की सर्व चूक आहे आणि दीपक राव बहुधा ढोंगी, फसवणूक करणारा असेल. असले कार्यक्रम तंत्रोत्सवात ठेवणे ही संयोजकांची चूक आहे. (मी माजी आयायटियन असल्याने मला वाद घालण्याचा अधिकार होता.) एव्हाना आमच्या भोवती गर्दी झाली होती. मी नि चयला बजावले, की मी येऊन आव्हान देईन. तो म्हणाला की लवकर यावे, कारण गर्दी होणे अपेक्षित आहे. मी अतिथिगृहात डॉ. मॉरिसना भेटायला गेलो, पण ते तिथे नव्हते. त्याच दिवशी उत्तरा (माझी पत्नी) सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांवर ठाण्याला भाषण देणार होती. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) ठाणे आणि डोंबिवली शाखांची सभा रविवारी (२८) सकाळी घेण्याचे ठरवले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या १० नव्हेंबर २००० च्या अंकात दीपक राव उरी गेलरच्याच ‘ट्रिक्स’ कशा करून दाखवतो, यावर बातमी सापडली. राव म्हणतो, “मी गूढविद्या जाणणारा आध्यात्मिक गुरू नाही. माझा बुवांवर विश्वास नाही. मी माझ्या मानसिक शक्ती वापरून लोकांची करमणूक करतो —- आणि असे मला करत राहता येईल अशी मला आशा आहे”.
रविवारी सकाळी डोंबिवलीला मच्छिंद्र मुंडेकडे अंनिसची सभा झाली. आयायटीच्या विद्यार्थ्यांना एक खुले पत्र लिहायचे, आणि दीपक रावला आव्हान द्यायचे ठरले. मसुदे ठरवणे, पत्रके छापून घेणे, वगैरे फार घाईगर्दीने करावे लागले. आम्ही आमचे माजी अध्यक्ष जादूगार इंद्रजित यांना गाठले, पण त्यांना इतर कामे होती. त्यांनी सांगितले की जादूच्या सामानाच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या अदृश्य लवचीक धाग्यांनी असे प्रयोग करता येतात. आशिष कोरडे हा माझा मित्र, दीपक रावला जादूगार म्हणून ओळखत होता! ह्या जादूगारानेही फारशा साधनांशिवाय करता येणाऱ्या ‘जादू’ सांगितल्या.
विद्यार्थ्यांसाठीचे पत्र असे होते —- “आयायटी तंत्रोत्सव ही वर्षातील महत्त्वाची तंत्रवैज्ञानिक घटना असते. तुम्ही ह्या देशाच्या आणि जगाच्या तंत्रोद्धारात रस घेता, ही आनंदाची बाब आहे. ह्या उत्सवाचा भाग म्हणून मानसिक शक्तींच्या विज्ञानाचे प्रयोग आणि त्यावर भाषणे आयोजित केली आहेत. डॉ. मॉरिस आणि भारताचे ‘उरी गेलर’ ह्या इंद्रियातीत शक्तींच्या संशोधकांचे आणि अशा शक्ती वापर-णाऱ्यांचे स्वागत असो. इतर मार्गांनी न सुटणाऱ्या प्र नांसाठी आपण इंद्रियातीत शक्तींचा तंत्र-वैज्ञानिक उपयोग करायलाच हवा. एक इमारती कोलमडल्या. हजारो लोक आजही मलब्याखाली दबले आहेत, पण इतर लाखो लोक वाचलेही आहेत. ह्यांना त्यांच्या नातलगांशी व बाकीच्या देशाशी संपर्क साधता येत नाही आहे, कारण तंत्रज्ञानाधारित पारंपारिक व्यवस्था जायबंदी झाली आहे. इंद्रियातीत शक्ती असणाऱ्यांनी यावेळी मदत करायला हवी. त्यांनी आपत्तीतून वाचलेल्या लोकांशी संपर्क साधून आम्हाला इंद्रियातीत ई-मेलने त्यांच्याबद्दल माहिती कळवायला हवी. हे घडत नाही आहे, कारण इंद्रियातीत शक्तींचे विज्ञान अजून उमगलेले नाही. काही संशयात्म्यांनी ह्या नव्या अब्रूनुकसानीचे दोन दावेही हरला. त्याच्या एके काळच्या मदतनिसांनी त्याच्या युक्त्या जाहीर केल्या. बहुतेक विद्यापीठे आज त्यात रस घेत नाहीत. ही सर्व माहिती लेख, पुस्तके व माहिती-महाजालावर उपलब्ध आहे., ह्या विषयावरील सर्व संशोधन नियंत्रित आणि साशंक वातावरणातच व्हायला हवे. जे प्रयोग यशस्वी होतील, ते स्वतंत्र संशोधकांकरवी तपासले जायला हवेत. त्यावर शोधनिबंध लिहून ते मान्यवर विज्ञान-नियतकालिकांमध्ये प्रकाशित व्हायला हवेत. आणि शेवटच्या टप्पा म्हणूनच निष्कर्ष जाहीर व्हायला हवेत. वैज्ञानिक वातावरणात असेच घडत असते. अशा तपासणीशिवाय दावे प्रकाशित करणे वैज्ञानिक वृत्तीच्या विरुद्ध आहे. माजी आयायटियन या नात्याने मला असे वाटते, की ही ‘प्रदर्शने’ करताना अशी काळजी घेतली गेलेली नाही.
प्रमोद सहस्रबुद्धे” सोबतचे आव्हान असे होते —- “सायकिक शक्ती सिद्ध करा आणि पाच लाख रुपये मिळवा. १० नव्हेंबरच्या टाईम्स ऑफ इंडियात श्री दीपक राव असे म्हणाल्याचा उल्लेख आहे, की त्यांचा केवळ मानसिक शक्तींवर विश्वास आहे आणि त्यांच्यापाशी भौतिकीच्या कक्षेबाहेरील सर्व भौतिक परिणाम मानसिक सामर्थ्याने घडवून आणण्याची तंत्रे आहेत. आम्ही भौतिकीच्या सामान्य नियमांपलिकडे जाण्याच्या, लेव्हिटेशन, टेलेपथी आणि सायको कायनेसिस करण्याच्या ह्या दाव्यांना आव्हान देतो —- प्रमोद सहस्रबुद्धे”
मी व उत्तरा सहा वाजताच्या दीपक रावच्या प्रयोगासाठी चांगली जागा मिळावी म्हणून लवकरच निघालो. सव्वाचारला अंनिसचे मुंबईभरचे कार्यकर्ते व काही पत्रकार आम्हाला आयायटीत भेटणार होते. माझ्या माहितीप्रमाणे पाचला डॉ. मॉरिसचे भाषण व नंतर दीपक रावचा कार्यक्रम होता. संयोजकांनी सकाळीच दीपक रावच्या कार्यक्रमाच्या प्रवेश–पत्रिका वाटल्या होत्या. गर्दी खूप असल्याने कार्यक्रमाचे दूरदर्शन प्रक्षेपण दीक्षांत समारंभ दालनातही (क्षमता— -हजारावर माणसे) करण्यात येणार होते. आमचे कार्यकर्ते ह्या दालनात होते. मला वाटले होते की कालच्या चर्चेनंतर मला तरी मुख्य दालनात प्रवेश मिळेलच. आम्ही चारही दरवाज्यांवर पत्रके वाटत होतो. संयोजक विद्यार्थ्यांनी मला सांगितले की पत्रके वाटू नयेत, कारण कार्यक्रम ‘बिघडेल’. लोक मात्र पत्रके घेण्यास उत्सुक होते. मी वाद घातला, की मी कार्यक्रमानंतरही पत्रके वाटू शकेनच, पण आयायटीसारख्या ‘मुक्त समाजात’ माझ्यावर हे बंधन का लावले जावे! आदल्या दिवशी ज्याचे भाषण मी ऐकले होते त्या माझ्या मित्राने येऊन वादाचा निर्णय माझ्या पक्षाला दिला. मी आयोजकांना सांगितले की मला मुख्य दालनात जाऊ द्यावे. आ चर्य म्हणजे, त्यांच्यापैकी काही जणांचा याला विरोध होता. माझ्या मित्राने माझ्या सद्वर्तनाची हमी दिली, आणि मगच मला आत घेतले. नाहीतरी मी गोंधळ घालणारच नव्हतो, तर फक्त आव्हान देणार होतो.
बाहेर माझ्या एका मित्राने पत्रक दीपक रावलाच दिले, कारण आम्ही कोणीच त्याला ओळखत नव्हतो. दीपक राव ‘गोष्टी घडवू’ लागला. त्याने संयोजकां-करवी मला बोलावून घेतले, आणि विचारले, “मी आपल्यासाठी काय करू शकतो?” मी म्हणालो, “आव्हान स्वीकारा”. याला उत्तर देण्याऐवजी त्याने संयोजकांना सांगितले की माझ्यासमोर तो कार्यक्रम करणार नाही. माझ्या मित्राने या अटीचे कारण विचारले, व सांगितले की हा त्याच्याशी झालेल्या कराराचा भंग आहे. ह्यावर दीपक रावने करार झाल्याचेच नाकारले, आणि तत्क्षणी निघून जाण्याची धमकी दिली. तो असेही म्हणाला की तो केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम करतो, त्यातून शिक्षण देतो आणि चमत्कारी बाबांना विरोधही करतो. तो असेही म्हणाला की त्याचा मला विरोध नव्हता, पण मी कार्यक्रमास थांबल्यास इतरांना परिणाम भोगावे लागतील. मी म्हटले की मी दुसऱ्या दालनात कार्यक्रम पाहीन, पण त्याने हेही करण्यास नकार दिला. माझे सहकारी मात्र दुसऱ्या दालनात होतेच.
`मी व उत्तरा आयायटी परिसर सोडून बाहेर गेलो. नंतर मला सांगितले गेले की दीपक रावने बरेच प्रयोग ‘घसा बिघडल्यामुळे’ केलेच नाहीत. त्याने मानसिक (व अतींद्रिय) शक्ती वापरल्याचा दावाही केला नाही. त्याने सभागृहातून प्र न आल्यास उत्तरे देणार नाही, असेही सांगितले. त्याच्या कार्यक्रमानंतर माझे मित्र मच्छिंद्र मुंडे आणि राजू देशपांडे यांनी मानसिक शक्ती न वापरता तेच प्रयोग कस्न दाखवतो असे सांगितले. आयोजकांनी यावर उत्तर दिले नाही, पण त्यांचा भारतीय उरी गेलरवरचा विश्वास कायम राहिला. प्रेक्षकांपैकी बहुतेकांना प्रयोग कमकुवत आणि अविश्वसनीय वाटले, असेही संभाषणांतून कळले.
ह्यानंतर १५ दिवसांनी टाईम्स ऑफ इंडियाने दीपक रावचा फोटो छापला व “मी तुमची मने वाचू शकतो’, हा दावा छापला. आयायटीतल्या कार्यक्रमाचा त्यात उल्लेख होता पण आमच्या प्र नांवर मौन होते. दीपक रावने झाल्या प्रसंगाचा फायदा करून घेतला होता!
[विज्ञान-तंत्रज्ञानाच्या ‘गाभाऱ्यात’ही अंधश्रद्धा संपत नाहीत. बरे, कोणी वैज्ञानिक-विवेकी शिस्तीने वागायचे सुचवले तरी ते आपमतलबीपणाने डावलले जाते. कुशिक्षित प्रसारमाध्यमे तर ‘सनसनीखेज’ बातम्यांच्या मोहाने भलतीच बाजू उचलून धरतात.
मागे रमर पिल्ले (पाण्याचे पेट्रोल) या भोंदू माणसानेही एका आयआयटीला असेच आपल्या दावणीला जुंपले होते. माध्यमांचे एक जाऊ द्या, पण उच्च-तंत्रनिकेतनांनीही असल्या ‘टोणग्यांना’ थारा द्यावा?
संपादक बी ४/११०१ विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कॉम्पाउंड, (पा चम) ठाणे — ४०० ६०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.