सनातन भूल

पृथ्वीवरील इतर देशांबद्दल मला फारशी माहिती नसल्याने त्यांच्या बाबतीत काही विधान करीत नाही. पण भारत या माझ्या देशाची मला जी माहिती आहे तीवरुन माझी अशी समजूत झाली आहे की या देशाच्या प्राचीन रहिवाशांवर एक मोठी भूल पडली. प्रारंभी यांची संख्या थोडी होती. पण कालांतराने ती वाढत गेली. लेखनकला भारतीयांना अवगत झाल्यापासून या भूलग्रस्तांची संख्या वेगाने वाढत गेली आणि मुद्रणकला अवगत झाल्यानंतर तो वेगही वेगाने वाढत गेला असावा. १९ व्या व २० व्या शतकात त्या वेगावर थोडी मर्यादा पडली पण एकूण भारतीयांची संख्याच वेगाने वाढू लागल्याने त्या सनातन भुलीच्या प्रभावाखालील जनलोक वाढतच राहिले. अलीकडच्या काही वर्षांत त्या भुलीतून मुक्त होणाऱ्या भारतीयांची संख्या अल्प प्रमाणात का होईना पण वाढत आहे असे वाटते.

सर्व ऐहिक सुखे व सुखदायक गोष्टी, (कोणत्या तरी) एका अज्ञात शक्तीला प्रार्थना करून, तिचे प्रतीक ठरवलेल्या मूर्ती, चित्रे, दगड यांचे दर्शन व यांची पूजा करून, यज्ञ, तप चर्या, व्रते, अनुष्ठाने, नामजप, मंत्रजप, पुर चरण, अभिषेक, प्रदक्षिणा, नमस्कार, यात्रा, वाऱ्या, तीर्थप्रसादभक्षण, नैवेद्य, नवस, ध्यानयोग, हठयोग इत्यादि करून मनुष्याला प्राप्त होतात असे दृढपणे वाटणे ही ती भूल होय. असंख्य भारतीय बांधवांना वाटते की उपर्युक्त गोष्टींपैकी जमतील तेवढ्या किंवा अगदी एखादीही गोष्ट मनापासून केली व त्यामुळे त्या शक्तीची कृपा झाली तर विवाह, स्त्रीसुख, पतिसुख, पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती, स्वर्गप्राप्ती, नोकरीत वा परीक्षेत व इतरत्र यश, दीर्घायुष्य, मनःशांति यांपैकी इच्छित कामना पूर्ण होतील तसेच दुःख, शत्रू, रोग, अपमृत्यू वगैरे अनिष्ट गोष्टी टळू शकतील. ती शक्ती सर्वश्रेष्ठ मानली जाते. ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, देव वगैरे हजारो नावे दिलेल्या एका काल्पनिक अज्ञात वस्तूजवळ ती शक्ती असते किंवा त्या शक्तीचीच ही नावे आहेत असे भूलग्रस्त लोक मानतात. ती वस्तू ही शक्ती काही अवतार, संत, भक्त वगैरेंना प्रदान करू शकते व ही मंडळीसुद्धा त्यांच्या पूजकांच्या, भक्तांच्या कोणत्याही कामना पूर्ण करायला समर्थ बनतात असे हे लोक मानतात.

या शक्तीमुळे देवाला व ह्या मंडळीना निसर्गनियमांच्या विरुद्ध, भौतिक नियमांना झुगास्न कोणतीही घटना घडवून आणता येते, चमत्कार करता येतात अशी भूलग्रस्तांना खात्री वाटते. असे चमत्कार महाराज, बाबा, स्वामी, महंत वगैरे नावांनी ओळखल्या जाणाऱ्या माणसांनाही करता येतात अशी त्यांची दृढ समजूत असते. अशांपैकी एखाद्या माणसाला बरेच लोक गुरु ठरवून भजू लागतात. त्याला दक्षिणा, देणग्या, वस्त्रालंकार वगैरे द्यायला तयारच नाही तर अधीर असतात. कारण त्यामुळे गुरुदेव प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करतील, कृपादृष्टी ठेवतील आणि आपले ऐहिकच नव्हे तर पारलौकिक (समजले जाणारे) कल्याण करतील अशी (भ्रामक) आशा बाळगतात.

त्या मुलीच्या पायी बहुसंख्य आणि अगदी सुशिक्षित उच्चवर्णीय भारतीयही सदैव याचकाची भूमिका बजावत राहिले. अगदी वेदकाळापासून त्यांना ही सवयच पडली. ऋग्वेदाच्या शेकडो, हजारो ऋचांत काल्पनिक शक्तीकडे अनेक वस्तूंची, ऐहिक सुखांची याचना केलेली आढळते. या प्रकाराचा कडेलोट कृष्णयजुर्वेदाच्या ‘स्वाध्याय’ नामक भागात दिसून येतो. या भागाच्या विविध वर्णनात्मक नावे असलेल्या पूर्वविभागात कोणा स्ट्र नामक शक्तीला वारंवार नमस्कार केले आहेत व उत्तर विभागात शेकडो ऐहिक गोष्टींची मागणी केली आहे. अगदी आजही अनेक भूलग्रस्त नुसत्या नमस्कारांच्या मोबदल्यात अन्नापासून साम्राज्यापर्यंत विविध गोष्टींच्या मागण्या स्वाकडे नोंदवीत असतात. ज्यांना वेदपठण करता येत नाही ते कोणा पाठकाला थोडे द्रव्य देऊन यच्चयावत् वस्तूंची मागणी करवितात. एवढ्या सोप्या उपायाचा भारतात खूप कालापूर्वी शोध लागूनही शेकडो भारतीय दरिद्री, दीन आणि दुःखीच का राहिले आहेत याचे पटेलसे कारण कोणी देऊ शकेल का? स्वहिताच्या आशेने बरेच लोक या भुलीच्या खूप आहारी जात असलेले भारतात दिसून येतात. दुःखांनी व संकटांनी गांजलेले, थोड्याफार तरी हिताची आशा बाळगणारे जनलोक, तिच्या पायी अनेक प्रिय वस्तूंचा त्याग करायलाही तयार होतात. जमीन, घरदार, इतकेच काय, प्रसंगी पुत्र, कन्या व पत्नीही देवाला अथवा गुरुला अर्पण करायला कचरत नाहीत—-दुसऱ्याचा अथवा दुसऱ्याच्या नकळत त्याच्या पुत्रकन्येचा बळी द्यायलाही मागे पुढे पाहात नाहीत. कोंबडे, मेंढे किती मारले जातात त्यांची गणतीच नाही. या याचकांपैकी एकालाही केवळ प्रार्थनेने किंवा कोणत्याही उपासनेने अज्ञात शक्तीकडून मागणी केलेली एकही गोष्ट मिळाल्याचा ठोस पुरावा नाही. अनेक उच्चवर्णीयांना सर्व ऐहिक सुखे फारसे कष्ट न करता मिळत गेली याला, त्यांचे कनिष्ठांवरचे वर्चस्व आणि कनिष्ठांचे श्रम हीच प्रमुख कारणे होती असे समाजशास्त्रीय पुराव्याने दाखविता येईल. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात कनिष्ठ हे वंश-परंपरेने कनिष्ठ व श्रमिक राहिले व त्यामुळे कायम विद्येपासून दूर राहिले. आजही भारतात निरक्षर लोकांचे प्रमाण कीव करण्याइतके अफाट आहे.

आजही दूरदर्शनवर, मुंडासे बांधलेला ट्रॅक्टरचालक एका महंताकडे ‘इंजिन ऑईल’ची मागणी करतो व तो महंत ‘अत्यंत आसान’ म्हणून हवेतूनच तेलाचा डबा काढतो अशी जाहिरात दाखविली जाते ती, भारतीयांची भूल व याचकी वृत्ती लक्षात घेऊनच असावी असे म्हणावेसे वाटते.
वर उल्लेखिलेला ठोस पुरावा—-कोणाचीही खात्री पटवून देणारा पुरावा—-कोठेही, कधीही कोणाजवळही उपलब्ध नव्हता व नाही. पूर्वी कधी चमत्कार घडल्याच्या कल्पित कथा, गोष्टी, काव्ये, महाकाव्ये, चरित्रे, वर्णने व पुराणे या भूलग्रस्त अभागी जनांच्या कानांवर पडलेल्या असतात, पडतही असतात. वाचनातही येतात. आपली भूल दाट, खोल करून घेण्यासाठी असे लोक तश्या कथा मोठ्या आवडीने ऐकत, वाचत व ऐकवीत असतात. सर्व काही केवळ सांगोवांगी चालत असते, त्यासाठी पुराणातले दाखले दिले जातात. समर्थक तत्त्वज्ञानही सांगितले जाते.

काल्पनिक, कार्यकारणभावहीन शक्तीने निसर्गनियम कशा प्रकारे उल्लंघिले जातात असा प्र न भूलग्रस्त लोकांना कधी पडत नसतो. तो त्यांच्या मनात उभा राहतच नाही. एखादी भिंत लीलया हवेतून घेऊन जाण्यासाठी किती शक्ती आवश्यक आहे, ती कशी कार्यवाहीत आणता येते; एखाद्या व्यक्तीने नुसते मनात आणताच कोणत्या माध्यमाच्या प्रभावाने व गणिताने ती भिंत जागा सोडते असले भौतिक प्र न सोडविण्याचीच नव्हे तर विचारण्याची सुद्धा बौद्धिक कुवत नसताना लोक अमक्या संताने भिंतीवर बसूनच ती गतिमान केल्याची चमत्कारकथा चवीने वर्णितात. शेकडो लोक ज्यामधून प्रवास करीत होते असे विमान स्वतःच प्रवाश्याची इच्छा समजून घेऊन आकाशातून वायुवेगाने गेल्याचे काव्यातील वर्णन श्रोत्यांना रसाळपणे ऐकवतात. मृताला जिवंत केल्याच्या, स्वयंचलित चक्राने शत्रूचा शिरच्छेद केल्याच्या, तीर्थ देऊन अथवा स्पर्श कस्न रोग नष्ट केल्याच्या, वैभवसंपन्न नगर इच्छामात्रेकस्न निर्माण करविल्याच्या, गुप्त होऊन इतरत्र प्रकट होण्याच्या, वर देऊन धनवान वा पुत्रवती केल्याच्या, जिवंत माणसाला दृष्टिक्षेपाने भस्मसात् केल्याच्या, वांझेला पुत्र प्रदान केल्याच्या, अग्नीतून जिवंत व्यक्ती निर्मिण्याच्या, मंत्रजपपूर्वक बाण सोडून शत्रूवर अग्नी, पर्जन्य इत्यादींचा वर्षाव करण्याच्या व इतर शेकडो चमत्कारांच्या कथांची भूलग्रस्त भारतीयांच्या मनावर जबरदस्त मोहिनी आहे. अशा घटना घडविण्याचे सामर्थ्य माणसाला प्राप्त होऊ शकते असे असंख्य भारतीयांना मनःपूर्वक वाटते. ज्या देशात सत्यसाईबाबाने राष्ट्रपतीला हवेतून अंगठी काढून दिली असे सांगितले जाते त्या देशाला, भांडारातले सोने, तो बाबा हयात असतानाही परदेशात गहाण का ठेवावे लागले याचे समाधानकारक उत्तर कोणी बाबाभक्त देईल का?

ती अज्ञात शक्ती निर्गुण, निराकार, निर्लेप, निरिच्छ, निष्पक्ष, निष्काम, स्थितप्रज्ञ वगैरे आहे असे काहीतरी भ्रामक तत्त्वज्ञान काही भारतीय अहमहमिकेने मांडतात तर तीच शक्ती अत्यंत दयाळू, न्यायी, सर्वशक्तिमान, झाडाचे पान हलविण्यापासून अवकाशातील प्रचंड गोलांच्या टकरी घडवून आणू शकणारी, प्रत्येक मानवाचे प्रत्येक कृत्य निरखून पाहणारी, लक्षात ठेवणारी व त्या त्या कृत्याचे यथायोग्य फळ देणारीही आहे असेही तिचे गुण तेच व इतरही भारतीय गात असतात. जगातील इतर देशांतही असंख्य लोक हे करीत असावेत. पण भारतीय लोक जेवढ्या आंधळेपणाने हे करीत असतात त्याला तोड सापडेल असे मला वाटत नाही.

आजच्या जगात जो कोणी स्वामी, महाराज, बाबा, गुरू, महंत, माता, आई, एखादी छोटी-मोठी, निसर्गनियम उल्लंघिणारी, उदाहरणार्थ एखादा गव्हाचा दाणा कसल्याही दृश्य उपकरणाचा वापर न करता, भौतिक शास्त्रज्ञांचा उपस्थितीत एक सेंटिमीटर उचलणे यासारखी घटना घडवून आणू शकत असेल, त्याने आव्हानपूर्वक तसे करून दाखवावे. त्यासाठी त्याने फक्त आपल्या आत्मशक्तीचा, मंत्रशक्तीचा वा दैवी सामर्थ्याचा उपयोग करावा. अशी घटना कोणी घडवून आणली तर मी आजन्म त्याचा दास होऊन तो सांगेल ती साधना, तपस्या, सेवा करण्यास प्रारंभ करीन. असंख्य लोक त्याचे अनुयायी होतील. भूलमुक्त झाल्याचा दावा करणारे त्याच्या भजनी लागतील. या अभागी, आंधळ्यांच्या माळा असलेल्या भारतात आजही कोट्यवधी, सुशिक्षित म्हणविणारी माणसे तर्काचा, बुद्धीचा उपयोग न करता सुखाच्या, दुःखमुक्तीच्या आशेने, या भुलीमुळे निरर्थक गोष्टींच्या मागे लागून दगडाधोंड्यांची, नद्यावृक्षांची, चित्रांची, भोंदू साधूंची पूजाअर्चाप्रार्थना करीत असतात. ते या भुलींतून बाहेर येऊन प्रयत्नवादी बनतील तर आणि तरच भारताला उज्ज्वल भविष्याची आशा बाळगता येईल. नाहीतर तो अधिकाधिक दुर्गतीकडेच वेगाने धावत राहील.

भारतात भौतिक शास्त्रे फार थोड्या प्रमाणात विकसित झाली कारण ऐहिक गोष्टी ऐहिक प्रयत्नांनीच साध्य होतात हा विचार त्या सनातन भुलीमुळे फारसा कोणाला सुचलाच नाही. रथाची कार्यक्षमता व वेग त्या रथाची बनावट, घोड्यांची कार्यक्षमता, सारथ्याचे कौशल्य, मार्गाची सुगमता अशा संबंधित गोष्टीवरच अवलंबून असते हे ज्ञान अनेकाना झाले असेल. पण सर्वोत्कृष्ट रथ अज्ञात शक्तीकडूनच मिळू शकेल अशी भूल पडलेली असल्याने, अग्नीकडून रथ मिळाला, इंद्राने रथ पाठवला अशा कथा प्रसृत केल्या गेल्या. कोणाचे काही कर्तृत्व दिसले तर लगेच त्याला दैवी शक्तीने युक्त ठरविले गेले व त्याच्याभोवती चमत्कारांचे वलय निर्माण कस्न त्याची पूजाअर्चा करण्याची पद्धत पडली. अशा व्यक्तींवर अलौकिक कर्तृत्वाच्या कथा व पुराणे रचली गेली. पुढील शेकडो पिढ्यांवर यांचा फार मोठा प्रभाव पडून भूल गडद होत राहिली. त्यांवर तत्त्वज्ञानेही निर्माण केली गेली आणि हळूहळू सर्व समाज भौतिकशास्त्रपराङ्मुख होत गेला. यज्ञ करून पाऊस पडतो, तप चर्या कस्न दैवी शक्ती साध्य होते, जप करून पुण्य व दैवी साहाय्य मिळविता येते अशा (भाकड) कथा कानावर आल्या तरी कोणीही ‘हे कसे काय शक्य आहे’ हा विचारही मनात आणीनासा झाला. भौतिक प्रयत्नांची कास न धरता आत्मशक्ती नामक काहीतरी वाढवण्याचे (निष्फळ) प्रयत्न होत राहिले आणि निदान उच्चवर्णीयांत तरी प्रयत्न व श्रम यांची प्रतिष्ठा लोप पावली. आजही निसर्गनियमांची फारशी ओळखच झाली नव्हती. सृष्टीतील व मानवव्यवहारातील घटना कशा घडतात याचे फारच थोडे ज्ञान त्यांच्याकडे होते. पण गेल्या तीनचारशे वर्षांत भौतिक शास्त्रांची काय प्रगती झाली, शास्त्रज्ञांनी कोणते निसर्गनियम शोधून काढले, मानवाच्या जीवनात विविध आ चर्यकारक नव्या वस्तू कशा आल्या, पूर्वी चमत्कारात गणल्या गेल्या असत्या अशा घटना काही लोक प्रत्यक्ष व पुन्हा पुन्हा कशा घडवून आणीत आहेत, त्यांच्या जोरावर काही देश भौतिक दृष्ट्या कसे संपन्न झाले आहेत आणि भारत मात्र त्यांच्याकडे याचक म्हणून जात आहे हे प्रत्यक्ष दिसत असून सुद्धा त्याचा काही एक विचार न करता असंख्य भारतीय आपल्या सनातन भुलीत गुंग राहून गंगापूजन, तीर्थयात्रा, उत्सव वगैरेत द्रव्य आणि काळ यांची नासाडी करीत आहेत याचे आ चर्य वाटते. त्यांच्या दृष्टीने आपल्या भावना आणि धर्मप्रेम फार श्रेष्ठ दर्जाचे आहे; बुद्धीपेक्षा भावना श्रेष्ठ आहेत; भौतिक दृष्ट्या आम्ही फार कनिष्ठ वाटत असलो तरी भावनिक व आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही फार पोचलेले आहोत. मात्र सांस्कृतिक दृष्ट्या आम्ही किती हीन झालो आहेत, भ्रष्टाचारात कसे बरबटलेले आहोत आणि माणुसकीला कसे पारखे होत आहोत हे रोजच्या वृत्तपत्रांतून व व्यवहारांतूनही दिसत असताना त्यांची भूल मात्र उतरताना दिसत नाही.

भौतिक शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचा उपयोगही असंख्य भारतीय आपली भूल वाढवण्यासाठी विकृतपणे करताना दिसतात. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात ध्वनिवर्धकांवरून प्रार्थना, आरत्या, भक्तिगीते प्रसारित करतात, विविध वेगवान वाहनांचा उपयोग करून तीर्थयात्रा करतात. दूरदर्शनवस्न देवांच्या असंभाव्य कथा घराघरांतून मुलाबाळांना दाखवून बालपणापासूनच त्यांना भूल देण्याचा आरंभ करतात.

मानवाला बौद्धिक व शारीरिक श्रम करून (व त्याबदली द्रव्य मिळवून) बऱ्याच गरजा भागवता येतात हे मान्य व्हायला हरकत नाही. मात्र त्याचबरोबर हेही मान्य करावे लागेल की अनेक माणसांना फारसे श्रम न करता किंवा कधीकधी काहीही श्रम न करता संपत्ती, आरोग्य, सांसारिक सुखे मिळालेली व मिळत असलेली दिसतात. कोणाला पुरलेले धन सापडले, कोणी संपन्न कुळात जन्मला, कोणाला नावलौकिक मिळाला, कोणाला सुंदर, सद्गुणी, सुशील पती मिळाला अथवा पत्नी मिळाली, कोणाला कर्तृत्ववान संतती मिळाली. कोणाला दत्तक गेल्याने राजपद मिळाले, विशेष कर्तृत्व नसतानाही चांगली नोकरी, व्यापारात अमाप द्रव्य, दूरच्या नात्यामुळे वैभवशाली वारसा अशा अनेक घटनांची खरीखुरी उदाहरणे घडली आहेत आणि याच मुख्य कारणाने ती भूल पडत व वाढत असावी. मानवाला अशा ऐहिक गोष्टी कोणतीतरी अज्ञात शक्तीच देत असावी ही कल्पना दृढमूल व्हायला अशा घटना कारण होत असाव्या. मात्र याचबरोबर मानवांनी हेही लक्षात घ्यायला हवे की असंख्य माणसांना सामान्य जीवन कंठावे लागत असतेच आणि तितक्याच माणसांना अत्यंत यातनामय जीवन जगण्याचीही वेळ येत असतेच. ही दुसरी गोष्ट केवळ सामाजिक कारणांनीच घडत असावी हे थोडासा खोल विचार केल्यास सिद्ध होईल; सिद्ध करता येईल. विनाश्रम अकल्पित लाभ होणे हेही सामाजिक कारणांनी घडते असे सिद्ध करणे मात्र फार कठीण, जवळजवळ अशक्य म्हणता येईल. पण म्हणून त्याचे कर्तृत्व कोणा अज्ञात शक्तीला देणे व ती शक्ती आपल्यावरही प्रसन्न होईल अशी आशा बाळगणे हे बुद्धिमांद्याचे लक्षण म्हणावे लागेल. त्या अज्ञात, काल्पनिक शक्तीच्या उपासनेत मानवजात जी ऐहिक शक्ती, जो वेळ, व जे द्रव्य खर्च करीत असते ते सर्व जर विचारपूर्वक, नियोजनपूर्वक मानवाच्या कल्याणासाठी खर्च या आपल्या सृष्टीचा एक स्वभाव म्हणजे वैशिष्ट्य असे दिसते की कोणतीही गोष्ट घडण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. अगदी स्वस्थ राहून विचार करण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. विचार न करता गाढ झोपलेल्या माणसालाही शरीर जिवंत राहण्यासाठी शक्ती हवीच. क्षुल्लक भासणाऱ्या घटना माणूस सहज व नकळतही घडवितो तेव्हा ही जाणीव होत नाही. पण थोडी कठीण घटना घडविताना जाणीव होते. कावळ्याला उडवून लावण्यासाठी एखादा छोटा दगड खाली वाकून, उचलून फेकण्यासाठी शक्ती लागतेच. तसा नुसता अभिनय केला तरी कावळा उडतो. पण तो अभिनय करायलाही शक्ती खर्च करावी लागते. एखाद्या वृद्ध अशक्त माणसाला तेवढीही शक्ती नसते. पण वाटेत आडवे पडलेले मोठे झाड बाजूला करायला एखादा तरुण सशक्त माणूस समर्थ होणार नाही. त्यासाठी काही माणसांची शक्ती एकत्रित-पणे कामी आणावी लागेल हे स्पष्ट आहे. एकच माणूस यांत्रिक शक्ती वापरून ते झाड फेकून देऊ शकेल. पण त्या यंत्रालाही कोणत्यातरी पद्धतीने पुरेशी शक्ती पुरवावी लागेलच.

आता ही शक्ती म्हणजे नेमके काय हे जरी सहज व थोडक्यात सांगता येत नसले तरी ती पूर्णतः अज्ञात समजण्याचे काहीच कारण नाही. तिचे काही मापन करता येते. तिचे काही भौतिक नियमही सांगता येतात. तिची जी उष्णता, प्रकाश, ध्वनी, चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण, वीज, वगैरे रूपे आहेत त्यांची काही वर्णने करता येतात. एका प्रकारातील शक्तीचे दुसऱ्या प्रकारात रूपांतरणही साधता येते. शक्ती हीन होत जातात. विशिष्ट मर्यादेपर्यंत तरी जेवढे जास्त व पौष्टिक अन्नग्रहण केले जाईल तेवढी शक्ती वाढत जाईल. निर्जीव वस्तूंना स्वतःची शक्ती नसते. त्या अन्नग्रहण करू शकत नाहीत. कोणाला कदाचित असे वाटेल की ज्या अर्थी काही उंचीवरून खाली पडणारी शिला, खाली असणाऱ्या एखाद्या वस्तूचा चुराडा करू शकेल त्या अर्थी निर्जीव वस्तूत शक्ती असू शकते. पण हे खरे नाही. ती शिला प्रथम त्या उंचीवर न्यावी लागेल अथवा तिच्या बाजूला एखादा खोल खड्डा करून ती शिला त्या खड्ड्यात ढकलावी लागेल व त्या कामासाठी आधी शक्ती वापरावी लागेल. ती शिला जमिनीवरच राहिली तर एखाद्या मुंगीलाही चिरडू शकणार नाही. कोणाला असे प्रतिपादन करावेसे वाटेल की सजीवांच्या ठिकाणी आत्मा असतो; त्याची इच्छाशक्ती किंवा आत्मिक बल काहीही करू शकेल. पण हे प्रतिपादन मागे म्हटल्याप्रमाणे, कोणीही इच्छाशक्तीने, आत्मबलाने, मंत्रबलाने, पिशाच्च (म्हणतात ते) वश करून घेऊन, कोणतेही भौतिक साधन न वापरता एखादा गव्हाचा दाणाही वर उचलून दाखवावा. ज्ञाने वराने भिंत चालवली, अर्जुनाने मंत्रोच्चारपूर्वक बाण सोडून वादळ, अग्नी, पर्जन्य वगैरे निर्मिले इत्यादि चमत्कार केवळ कविकल्पना आहेत. या सृष्टीत चमत्कार घडविणे केवळ अशक्य आहे. कोणीही आव्हानपूर्वक प्रत्यक्ष चमत्कार करून दाखवावा. पुराणातील उदाहरणे देऊ नयेत. अलीकडे काही साधू बाबा वगैरेनी अंगठी, भस्म, फळ अशा वस्तू नुसता हवेत हात फिरवून भक्ताच्या हातावर ठेवल्या अशा अफवा पसरवल्या जातात. त्यांमागे फक्त हातचलाख्या असतात. या सर्वांचा अर्थ एवढाच की पुराणातील व ऐकिवातील एकूण एक, चमत्कार म्हणून सांगितल्या जाणाऱ्या घटना असंभव, अशक्य म्हणून खोट्या मानल्या पाहिजेत. केवळ बरेच लोक सांगतात म्हणून, भीती–आशा इत्यादीमुळे काही लोक त्या खऱ्या मानतात. त्यांच्या मनावर एक सनातन भूल सत्ता गाजवीत असते. काही सामाजिक संस्कार, अगतिकता, दुर्बलता, दैववाद आणि अज्ञान यातून ती भूल टिकून रहाते. आणि पुढे तिच्यामुळेच दास्यही येते.

ज्या अर्थी या विश्वात साध्यासुध्या तशाच प्रचंड शक्ती आवश्यक असणाऱ्या घटना पूर्वी घडल्या, आताही घडताहेत आणि पुढेही घडतील त्या अर्थी या विश्वात कोणत्यातरी स्वरूपात अमाप शक्ती कार्यरत आहे असे समजायला हरकत नाही. पण ती शक्ती बुद्धिमान आहे, मानवाप्रमाणे भावनाशील आहे, कोणतीतरी योजना आखून कार्य करीत आहे, ती प्रसन्न किंवा क्षुब्ध होऊ शकते असे गुण तिला चिकटवायला मात्र हरकत घ्यावी लागते. आणि तिचा विचारही न करता आपण मुंग्या अथवा मधमाश्या प्रमाणे सहकार्यपूर्वक प्रयत्न करून सुखी व्हावे हेच योग्य वाटते.

चमत्कार आणि आत्मिक शक्ती यांच्याकडे पाठ फिरवून भारतीयांनी भौतिक शास्त्रांचा अभ्यास आणि प्रयत्नवाद यांचा अंगीकार केला तर उज्ज्वल भविष्यकाळ साध्य करणे त्यांना अशक्य नाही. निसर्गाने त्यांना इतर अनेक देशांतील लोकांपेक्षा अधिक नैसर्गिक संपत्तीची देणगी बहाल केली आहे. प्रदीर्घ सामाजिक जीवनात होऊन गेलेल्या अनेक विचारी भारतीयांनी उत्कृष्ट जीवनमूल्यांच्या कल्पनाही निर्माण करून दिल्या आहेत.

खेड, जि. रत्नागिरी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.