ग्रीटिंग कार्ड

ग्रीटिंग कार्ड
शुभेच्छा व्यक्त केल्याने शुभ झाले असते
तर कुत्रे कशाला फिरले असते
भोंगळे अन् हराममौत मरणाऱ्या
कुत्र्यासारखे हे आयुष्य कोणत्याही वेळी येऊ शकते
भरधाव वाहनाखाली कुठल्याही z
राजमार्गावर कावळ्याच्या शापाने
जशा मरत नसतात गाई
तितकीच असते शुभेच्छाही वांझ
जेथे शुभेच्छा कशाशी खातात
हेच नसते ठाऊक कवडीमोल असते
पसायदान अन् कविता तर नसते त्यांच्या गावी ही
[गेले काही दिवस नैवेद्य,पूजाअर्चा वगैरेंचे ‘सुपरिणाम’ सांगणारे काही लेख येत आहेत. त्यांचा फोलपणा दाखवणारी ही श्रीकृष्ण राऊतांची कविता, संक्षिप्त स्यात. (‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’. अकोला २००१)]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.