विश्व म्हणजे निसर्ग

आता थोडक्यात असे म्हणता येईल की प्रत्यक्षप्रमाणाच्या आवाक्यात जे जे येऊ शकेल ते ऐहिक; प्रत्यक्षाच्या आणि प्रत्यक्षाधिष्ठित अनुमानाच्या आवाक्यात. प्रत्यक्षप्रमाणाने वस्तूच्या अंगी असलेल्या ज्या गुणधर्मांचे आणि शक्तींचे ज्ञान आपल्याला होणे शक्य आहे तेवढेच काय ते गुणधर्म आणि शक्ती वस्तूंच्या ठिकाणी असू शकतात. जे काही अस्तित्वात आहे त्याचे संपूर्ण स्वरूप फक्त अशा गुणधर्मांचे आणि शक्तींचे बनलेले असते. ह्या स्वरूपाच्या वस्तूंचा समग्र समुदाय म्हणजे निसर्ग असे जर म्हटले तर इहवादी सिद्धान्त असा मांडता येईल : विश्व म्हणजे निसर्ग. निसर्गापलि-कडचे असे विश्वात काही नाही.
(प्रा. मे. पुं. रेगे यांच्या इहवाद आणि सर्वधर्मसमभाव या पुस्तकातून, वाई १९९८)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.