सांप्रदायिक दंगे: एक अभ्यास

विभूति नारायण राय यांनी ‘सांप्रदायिक दंगे और भारतीय पुलिस’ नावाचा एक प्रबंध लिहिला आहे. हैदराबादच्या पोलीस अकादमीने श्री रायना यासाठी विद्यावृत्ती दिली होती. राय यांचा अभ्यास इंग्रजी राजवट येण्याआधीच्या काळापासून सुरू होतो. राज्यसत्ता पोलिसांकरवी दंगे हाताळत असते. दंगेखोरांविरुद्ध बळाचा वापर, अहवालांमधून सत्य परिस्थिती नोंदणे, दंगखोरांना पकडणे, तुरुंगात ठेवणे, न्यायासनापुढे उभे करणे, अशा साऱ्या व्यवहारात पोलीस किती निःपक्षपणे वागतात, हा प्रबंधाचा विषय आहे.
सांप्रदायिकता आणि त्यातून उपजणारे दंगे केवळ ब्रिटिश साम्राज्यवादामुळे सुरू झाले असे रायना वाटत नाही. असे मत त्यांना अतिसुलभीकृत वाटते. हिंदू आणि मुसलमान मध्ययुगापासून एकमेकांच्या संपर्कात येत होते आणि त्यातून धर्मासारख्या अनेक मुद्द्यांवर संघर्षही होत होता. ह्याच्याही आधी ब्राह्मण-बौद्ध, शैव-वैष्णव असे अनेक तीव्र संघर्ष झालेले आहेत. ब्रिटिशपूर्व काळात असे संघर्ष सवयीचे झाले होते, पण ज्याला सांप्रदायिक दंगा म्हणता येईल, अशी एकच घटना नोंदलेली आहे. हा १७१३ साली अमदाबादेत झालेला हिंदू-मुस्लिम दंगा होता.
ब्रिटिश आणि स्वातंत्र्योत्तर काळातले सर्व महत्त्वाचे दंगे तपासताना लेखकाने धर्माशिवायचे मुद्देही नोंदले आहेत. शेतीसंबंधांचे विस्तृत वि लेषण करून राय दाखवून देतात की मोपल्यांचे बंड साम्राज्यवादाविरुद्ध असूनही सुरुवातीपासून सांप्रदायिकच राहिले. एकोणिसाव्या शतकातील गोरक्षा आंदोलनही सामंती वर्गाने राजसत्तेच्या मदतीने स्वतःचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हेतू साधणारेच राहिले. मुंबई, बिहार, उत्तरप्रदेश वगैरे जागी भडकलेले हे आंदोलन राय विस्ताराने तपासतात.. सांप्रदायिक दंग्यांच्या मानसशास्त्राचेही वि लेषण राय करतात. भारतीय सरकार आणि आर्थिक विकासाचे स्वरूप, राजकीय पक्षांची वागणूक, माफियासंघटित गुन्हेगारी टोळ्यांचा उदय, ह्या सर्व बाबी कधी सुट्या तर कधी एकत्रितपणाने दंगे घडवून आणतात. सध्याच्या स्थितीबद्दल लेखक नोंदतात की हिंदू मध्यमवर्ग अत्यंत सांप्रदायिक झालेला आहे आणि हिंदुत्ववादी शक्ती या वर्गाचा वापर कस्न रामजन्म-भूमीसारखी आंदोलने पद्धतशीरपणे चालवत आहेत. सरकार या प्रकाराला ठामपणे विरोध करत नसल्याने ह्या आंदोलनाची परिणती असंख्य दंग्यांमध्ये होत आहे.
दंगे घडवायची बरीच पूर्वतयारी केली जाते. ताण वाढत जाऊन अखेर एखादा दगडही उद्रेक घडवतो. सरकारी तक्ते व आकडेवारी वापस्न लेखक नोंदतात की दंग्यात मरणाऱ्यांच्या संख्येत मुसलमान हिंदूच्या तिपटीने आहेत. दंगेखोर म्हणून पकडले जाणाऱ्यांच्यात मात्र नव्वद टक्के अल्पसंख्यक असतात. एका जमातीचे लोक जास्त प्रमाणात मेले तर दुसऱ्या जमातीचे लोक दंगेखोरीत पुढे असायला हवे. प्रत्यक्षात या तर्काविरुद्ध प्रमाण आहे. पोलीस तंत्राच्या कक्षेत राहून सखोल अभ्यासातून घडलेले श्री. राय यांचे संशोधन पथदर्शक ठरावे. त्यांच्या प्रबंधाच्या काही भागांचा गोषवारा पुढे देत आहोत.
सांप्रदायिक दंग्यांचे मानसशास्त्र:
प्रत्येक संप्रदाय आपण केलेल्या हिंसाचाराच्या समर्थनासाठी काही युक्तिवाद घडवत असतो. हा युक्तिवाद समुदायाच्या घटकांमध्ये इतका खोल रुजवला जातो की ती त्या समुदायाची सांस्कृतिक ओळखच बनते. ‘दुसऱ्या’ समुदायाबद्दलचे पूर्वग्रह ह्या युक्तिवादातून घडवले जातात. ‘आपण’ अहिंसक, उदार, सहिष्णु आणि धर्मभीरु. ‘ते’ क्रूर, कट्टर, धूर्त आणि भरवसा ठेवण्यास नालायक. हे पूर्वग्रह कधीच तपासले जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल चर्चा होत नाही. कधी कधी एखाद्या संप्रदायाच्या वागणुकीची सफाई देणे अशक्यच असते. अशा वेळी विरुद्ध पक्षाच्या वागणुकीतला टीकास्पद भाग पुढे केला जातो. (इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचे शिखांचे शिरकाण ‘वैध’ ठरावे म्हणून शिखांनी मिठाई वाटली अशा अफवा पसरवल्या गेल्या. अशा एकाही अफवेत तथ्य आढळलेले नाही.) या ‘त्यांच्या’वर आरोप करण्यात उदार लोकही सामील होतात.
‘आपली’ हिंसा वैध ठरवायला ‘त्यांच्या’ क्रौर्याचे अतिरंजन केले जाते. (१९४६ साली बिहारमध्ये ३०,०मुसलमान मारले गेले. बिगर-सरकारी आकडे ४०-५०,००० आहेत. हे नोआखलीतील हिंदूच्या हत्येचे ‘उत्तर’ आहे असे सांगितले गेले. नोआखलीत सरकारी अहवालात १३९ हिंदू मेल्याचे नोंदले गेले. गैर-सरकारी आकडाही २०० च आहे.)
दंगे आधी डोक्यात घडवावे लागतात आणि मगच ते रस्त्यांवर येतात. लोकांना हिंसा करायला तयार करताना ती हिंसा वैध तर ठरवावी लागतेच, पण हिंसा न करणे हा भेकडपणा आहे असेही ठसवावे लागते. (पाकिस्तानी हिस्टॉरिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या ‘द हिस्टरी ऑफ द फ्रीडम मूव्हमेंट’च्या दुसऱ्या खंडात शरीफ अल् मुजाहिरचे लेख मांडतात की सांप्रदायिक दंगे ही हिंदूंच्या पाशवी वृत्तीची आणि मुस्लिमांच्या शांतिप्रियतेची उदाहरणे आहेत.)
आर्थिक, भाषिक, सांस्कृतिक व भौगोलिक भेद विसरून समुदाय एकजिनसी आहे असे दाखवायला धर्म वापरला जातो. ‘आपले’ हित एकसंध आहे, आणि ते साधायला ‘त्यांचे’ अहित साधायला हवे असा दृढविश्वास उत्पन्न करावा लागतो. भारतात सांप्रदायिक शक्तींकडून होणारी या विश्वासाची मशागत स्पष्ट दिसते. मुस्लिम लीग देशभरातील मुस्लिमांना पटवून देऊ शकली की हिंदू आणि मुस्लिम ही दोन भिन्न राष्ट्रे आहेत. आपापली सांस्कृतिक बेगमी, भाषा, अन्नवस्त्र वगैरेंमधील विविधता विसस्न भारतभरातले मुसलमान फक्त धर्माच्या निमित्ताने स्वतःला ‘एक राष्ट्र’ मानू लागले. धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना किती फोल होती हे १९७१ मध्ये बांगलादेशाच्या जन्माच्या वेळी उघड
झाले.
असाच गेली काही दशके हिंदुत्ववाद्यांकडून राष्ट्राच्या मुख्य प्रवाहाचा मुद्दा मांडला जात आहे. त्यांना मुसलमान या मुख्य प्रवाहात सामील होऊन हवे आहेत. पण ही मुख्य धारा म्हणजे काय यावर कोणतेही ठोस उत्तर त्यांच्याकडे नाही. जर ही ‘हिंदू’ धारा आहे, तर नेमकी कोणत्या हिंदूंची? ब्राह्मण की शूद्र, मल्याळी की पंजाबी? एखाद्या बहुजिनसी समाजात जेवढे काही अंतर्विरोध शक्य असतील, तेवढे सगळे भारतीय आणि हिंदू समाजात आहेत. आणि हे अंतर्विरोध संघर्षापर्यंत पोचतात. पण ‘जो हिंदूहित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ असा नारा दिला, की हिंदू म्हणवणाऱ्या सगळ्यांचे हित एकच आहे असे मत जनमानसात रुजवता येते—-मग निवडणुकीत एकगठ्ठा मतेही मागता येतात.
हिंसेच्या मानसिकतेचे तर्क कालसापेक्ष असतात. मध्ययुगात हिंसा धार्मिक प्रतीकांच्या आधाराने होत असे. क्रूसेड, जेहाद, ब्राह्मण-बौद्ध व शैव-वैष्णव विवाद, या सर्वांमध्ये धर्मस्थळे तोडणे, धर्मांतरे घडवून आणणे, असे प्रकार होत. ह्या धार्मिक ‘जबाबदाऱ्या’ पार पाडणाऱ्यांना मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीचे आश्वासन असे. टोळीवर आधारित किंवा सामंती व्यवस्थेत हे पुरेसे होते. भांडवलशाही आणि गुंतागुंतीचे उत्पादनसंबंध घडल्यावर हे पुरेनासे झाले. धर्म ढोबळमानानेच मानवी प्र नांना उत्तरे पुरवू शकत होता हे या नव्या आर्थिक व्यवहाराने स्पष्ट झाले. विज्ञान आणि वैचारिक देवाणघेवाणीने विकसित झालेल्या उदात्त मानवी चेतनेने धर्मयुद्धांसारख्या कल्पना नाकारल्या. ह्यामुळेच आजही पॅन-इस्लामिझम ही कल्पनाही फारशा अनु-यायांना चेतवू शकत नाही. अफगाणिस्तान, काश्मीर, बोस्निया हर्जेगोवायना वगैरे ठिकाणी ‘इस्लाम खतरे में है’ या नाऱ्याला मध्ययुगात मिळाला असता तसा प्रतिसाद मिळत नाही.
सध्याचे जग विशुद्ध धार्मिक आधारापेक्षा लौकिक आधारांवर जास्त बेतलेले आहे. शेकडो वर्षे चालत आलेले सामाजिक संतुलन उत्पादनपद्धती आणि लोकशाही यांच्या दुहेरी माऱ्याने ढळते आहे. भांडवलशाही उत्पादनपद्धतींनी शहरे सुधारली, दळणवळण वेगवान केले, शिक्षणाला सार्वभौम केले आणि स्त्री-पुरुष समतेची पाया-भरणी केली. पण जगाने याचीच दुसरी बाजूही पाहिली, जिच्यात वसाहतवाद, शोषण, युद्धे, असमानतेवर आधारित समाजव्यवस्था, अशा बाबी आहेत. यामुळे ताण वाढले. आता समाजाचे (उच्च) कुलीन घटक वंचित, पीडित, शोषित जनतेला त्यांच्या दुःखांची कारणे पारलौकिक आहेत असे सांगू शकेनासे झाले. ईश्वर, भाग्य, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक अशा कल्पनांऐवजी लोक आपल्या प्र नांची लौकिक उत्तरे शोधू लागले. लोकशाहीने विषमतेचे धार्मिक आधार रद्द ठरवले. प्रत्यक्षात आज अभिजनवर्ग सांप्रदायिकतेच्या माध्यमातून आपले सामाजिक स्थान टिकवू पाहत आहे. वंचित वर्गांना त्यांचे लौकिक प्र न सोडवायला अशी चलाख चित्र-मांडणी दाखवली जाते की ते आपसात भांडतात आणि अभिजनवर्गाशी भांडायला उभे राहत नाहीत.
लौकिक प्रतीकांमधून व्यक्त होणारे ताण भारतात इंग्रजाच्या आगमनानंतरच दिसतात. शेती आणि हस्तकौशल्यावर आधारित सामंती समाजाची जागा इंग्रज-प्रणीत भांडवलशाही घेऊ लागली. आधीच्या धार्मिक ताणांपेक्षा नवे ताण वेगळे होते. इंग्रजी शिक्षणाबद्दल तीव्र नावड असल्याने मुसलमान नोकऱ्यांमध्येही मागे पडत गेले. प्रौढ मतदानावर बेतलेल्या राज्यात मुस्लिम नेहेमीच राज्यशासनात कनिष्ठ भागीदार राहिले असते. मुस्लिम नेतृत्वाने ह्या प्र नांवर उत्तर शोधले ते मुस्लिमांचे वेगळेपण, वेगळी ओळख ठसवण्याचे. स्वातंत्र्यपूर्व हिंदू आणि मुस्लिमांचे नेतृत्व उच्चवर्णीय, जमीनदार, असे सामंतीच होते, आणि हे स्वाभाविकच होते. या सामंतांनी हिंदू आणि मुस्लिमांमधील सर्वहारा वर्गाने एक होऊ नये म्हणून सांप्रदायिक दंगे हे प्रभावी हत्यार वापरले.
आकडेवारी:
सांप्रदायिक दंग्यांमागचे हिंदूंचे पूर्वग्रह असे — (१) दंगे मुसलमान सुरू करतात, आणि त्यांच्यात हिंदू जास्त मरतात. (२) सरासरी हिंदूला मुसलमान कडवे, हिंस्र, क्रूर आणि विश्वासघातकी वाटतात. दंग्यांना सुरुवात कोण करते यावर वाद होऊ शकतो, पण मृतांची संख्या मात्र सरकारी अहवालांमध्ये येते. बरे, सरकारी अहवाल मुद्दाम मुसलमानांची संख्या फुगवून सांगणार नाहीत, कारण आपल्या देशात अल्पसंख्य सुरक्षित नाहीत, असे दाखवणे सोईचे नाही.
वर्ष सांप्रदायिक दंग्यांची संख्या मृतकांची संख्या एकूण
हिंदू मुसलमान
1968 346 24 99 133
1969 519 66 558 674
1970 521 68 176 298
1971 321 38 65 103
1972 210 21 45 70
1973 242 26 45 72
1974 248 26 61 87
1975 205 11 22 33
1976 169 20 19 39
1977 188 12 24 36
1978 219 51 56 108
1979 304 80 150 261
1980 427 87 278 375
——- —— ——— ———
3949 530 1598 2289

हे आकडे गृहखात्याचे आहेत. हिंदू-मुसलमानांच्या बेरजेपेक्षा एकूण संख्या जास्त आहे. यात पोलीस, अन्यधर्मीय वगैरे येतात. ह्या वर्षवार आकड्यांसोबत काही सुट्या दंग्यांची आकडेवारी अशी.

मृतांची संख्या
स्थान हिंदू मुस्लिम अन्य एकूण
अलीगढ़ (1961) 1 12 — 13
राँची/हटिया (ऑगस्ट 1967) 20 156 1 177
अहमदाबाद (सप्टेंबर 1969) 24 430 58 512
भिवंडी (मे, 1970) 17 56 2 75
जळगाव (मे, 1970) 1 42 — 43
फिरोजाबाद (1972) अलीगढ (1979) 3 16 2 21
मुरादाबाद (ऑगस्ट-सप्टें. 1980) 18 142 6 166
मेरठ (ऑक्टोबर 1982 पर्यंत) 6 21 2 29
बेरीज 96 8 97 74 1067
(अपूर्ण)
[(१) हा लेख आधी ‘सुधारक’ या आमच्या हिंदी भावंडाने प्रकाशित केला. आम्ही संक्षिप्त भाषांतर देत आहोत.
(२) रामजन्मभूमि-बाबरी विध्वंसानंतरची आकडेवारी शोधायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. इतर कोणाजवळ ती उपलब्ध असली तर तिचे स्वागत आहे.
संपादक सी-४३, सी.एम.पी.डी.आई., जरीपटका, नागपूर — ४४० ०१४

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.