खरेच देवा तू असशील तर . . .

खरेच देव असता तर जग असे राहिले नसते, हजारो प्राण्यांची कत्तल होऊन त्यांच्या चमचमीत डिशेस बनल्या नसत्या. हिंदू-मुसलमान-शीख-इसाई सगळे गुण्या-गोविंदात नांदले असते, विश्व-व्यापार केंद्राच्या टॉवर्सवर अल-कैदाने हल्ले केले नसते. भ्रष्टाचारी, पाखंडी आणि चोर लोकांना आम्ही नेते केले नसते, पृथ्वीवरच्या काश्मीर नावाच्या स्वर्गात रक्ताचे पाट वाहिले नसते. दुःख, यातना, अन्याय, शिक्षा हे शब्द आपल्या शब्दकोषात नसते, कोवळ्या बालिकांवर थेरड्या नराधमांनी बलात्कार केले नसते. आम्ही कोणाचे चोरले नसते, कोणी आमचे चोरले नसते, रावण, कंस, दुर्योधन, बाबर, औरंगजेब, हिटलर, मुसोलिनी, ओमर, लादेन असले दुष्ट जन्मले नसते. स्वतःच शैतान जन्माला घालायचे नंतर त्यांना मारायला अवतार घ्यायचा, हा कसला खेळ? खरेच देवा तू असशील तर एकदाचे काही तरी ठरवून टाक जमत नसेल व्यवस्थापन जगाचे तर स्वेच्छानिवृत्ती घेऊन टाक
१३१, अभ्यंकर नगर, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.