निवेदन

आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाने आता बारा वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचे अंदाजे एक हजार वर्गणीदार आहेत. हिंदी द्वैमासिकाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या वर्गणीदारांची संख्या दीडशेच्या घरात आहे. आजचा सुधारकचे बारा वर्षे अविरत प्रकाशन केल्यामुळे मासिकाच्या आयुष्याचा एक टप्पा गाठला गेला आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. असा टप्पा गाठल्याचे प्रतीक म्हणून आणि आपल्या संस्थापक संपादकांचे स्वास्थ्य तितकेसे बरे नाही म्हणून आपल्या मासिकांच्या प्रकाशनाची एक वेगळी व्यवस्था करण्याचे योजिले आहे. विवेकवादाला वाहिलेल्या ह्या दोनही मासिकांचे स्वामित्व आता एका अनौपचारिक विश्वस्तमंडळाकडे सोपवावयाचे आहे.
विश्वस्तमंडळाची स्परेषा
हे विश्वस्तमंडळ एकूण ७ (सात) व्यक्तींचे राहील. प्रारंभीचे मंडळ खालीलप्रमाणे असणार आहे.
(१) प्रा. प्र. ब. कुळकर्णी —- (नागपूर) (२) डॉ. सुनीती नी. देव —– (नागपूर) (३) श्री. नंदा खरे —- (नागपूर) (४) श्री. भरत मोहनी —- (नागपूर) (५) श्री. ताहिरभाई पूनावाला —- (पुणे) (६) डॉ. सुभाष आठले —- (कोल्हापूर)
(७) श्री. लोकेश शेवडे —- (नाशिक)
ह्या विश्वस्तमंडळाचा कार्यकाळ दोन वर्षांचा राहील. दर दोन वर्षांनी त्यांतील दोन सभासद निवृत्त होतील. निवृत्त सभासद पुनर्नियुक्तीला पात्र राहतील. नवीन सभा-सदांची नियुक्ती विश्वस्तमंडळच करील. कोणत्याही विश्वस्ताने १० वर्षांच्या वर सलगपणे विश्वस्तमंडळावर राहू नये असा संकेत निर्माण व्हावा. अर्थात् अंतिम निर्णय विश्वस्त मंडळाचाच राहील.
विवेकवादाच्या धोरणाला अनुसरून मासिकांचे संचालन होत आहे हे पाहणे व त्या हेतूच्या पूर्तीसाठी आणखी काही प्रकल्प हाती घेणे व त्यांच्या योजना राबविणे ही कामे विश्वस्तमंडळाची राहतील.
कार्यकारी संपादकाच्या कार्यकाळापुरते सल्लागारमंडळ निवडणे कार्यकारी संपादकाचे कार्य राहील. सल्लागारमंडळ कार्यकारी संपादक बदलल्याबरोबर आपोआप विसर्जित होईल. —- संपादक मंडळाच्या वतीने दिवाकर मोहनी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.