हिंदू! एक शिवी!

काही महिन्यापूर्वी आ.सु.च्या काही वाचकांनी ‘हिंदू म्हणजे नेमके काय’ असे प्र न विचारले होते. भल्याभल्या विद्वानांना नेमक्या हिंदुत्वाची परिभाषा करता आली नाही. एक विचार असाही वाचायला मिळाला, ज्यात ‘हिंदू नावाचा कोणी धर्मच नाही’ असे मांडले होते. प्रत्येक धर्मपंथाला एखादा संस्थापक असतो, ग्रंथ असतो, ठराविक तत्त्वज्ञान, कर्मकांड असते, तसे हिंदूधर्माचे नाही.
जैन-बुद्ध धर्माच्या वैचारिक आक्रमणानंतर आर्य पुरोहितशाहीची बरीच पिछेहाट झाली. त्यांनी मग पडते घेतले. गोमांस, पशुपक्षीमांसभक्षक यज्ञ बंद केले. यज्ञातील अ लील प्रकार बंद केले. भरतखंडात पसरलेल्या अनार्यांच्या देवदेवता स्वीकारल्या, मंदिरे, मूर्तिपूजा स्वीकारल्या. त्यापूर्वी आर्यांत मंदिरे, मूर्तिपूजा नव्हती. एका प्रकारचा ‘सर्वसमावेशक सहजीवनाचा विचार’ व त्यातून स्ढी निर्माण झाली. अनार्याच्या शिव-पार्वती, लिंग-पिंड, भेरवी-भैरव वगैरे देवदेवता स्वीकारल्या. आर्य ब्राह्मणांनी आपले पौरोहित्य लादले व यज्ञसंस्था मोडकळीस आल्यामुळे पुरोहितांच्या पोट-प्रतिष्ठांचा प्र न उपस्थित झाला होता, तो मंदिरातील पौरोहित्यामुळे मिटला. बुद्ध-चार्वाकांचा जोर कमी झाल्या नंतर पुरोहितशाहीने मनुस्मृती व इतर स्मृतिवाङ्मय लादले. मुळात जन्मावर आधारित नसलेली चातुर्वर्ण्य समाजसंस्था जन्माधिष्ठित केली. वर्ण, वर्ग, वर्चस्व, जातीपातीच्या उतरंडी निर्माण झाल्या. (चातुर्वर्ण्यसुद्धा आर्यांची म्हणजे पा चात्त्यांची देणगी आहे.)
स्वामी दयानंद सरस्वतीप्रणीत आजचे आर्य समाजिस्ट म्हणतात, आम्ही हिंदू नाही, आम्ही आर्य आहोत. आर्यात उच्चनीच जाती प्रथा, अस्पृश्यता, स्त्रीदास्य नव्हते व नाही. आर्यांतील पुरोहितांनी आपल्या पोट-प्रतिष्ठेसाठी उच्चनीचता भेदाभेद, स्त्री-दास्य पा चात्त्य राष्ट्रातून आणले व येथे लादले. आजचे आर्य समाजिस्ट म्हणतात ‘हिंदू’ म्हणजे आक्रमक मुस्लिमांनी येथील पराभूत लोकांना दिलेली एक शिवी आहे.
फारसी शब्दकोश ‘फरंग ए आमिदा’च्या अनुसार हिंदू शब्दाचा अर्थ काफीर, गुलाम, कालाचोर, कालासाप, छछंदर असा होतो तर अरबी शब्दकोश ‘फिरज उल लुगद’च्या अनुसार सौंदर्यवतीच्या चेहेऱ्यावरील सौंदर्य-विध्वंसक काळा डाग, गुलाम, पराभूत असा आहे. उर्दू शब्दकोशाप्रमाणे प्रेयसीच्या गालावरील तीळ, खळी, काली जुल्फे सुंदर भोगदासी असे अर्थ आहेत (विद्वानांनी हे अर्थ तपासून पाहावे व शंका-समाधान करावे.)
प्रेषित महंमद पैगंबराच्या अकराव्या पत्नीच्या एका मुलाचे नाव हिंद किंवा हिंदू होते. तो मुलगा जरा वाह्यात होता.
‘सिंधू’ शब्दावरून परकीयांनी ग्रीक, तार्तर, हूण, शक इ. येथील लोकांना ‘हिंदू’ संबोधले असे आपण समजत आलो. हिंदू शब्द स्वीकारला, ढ केला, शिरोधार्य मानला. ‘गर्वसे कहो हम हिंदू हैं’ अशी गर्वोक्तीही मारत असतो. हिंदू म्हणजे रूढी, धर्म नव्हे.
परंतु आद्य शंकराचार्यही म्हणून गेले की ‘हिंदू हा शब्द सहाव्या सातव्या शतकातील आक्रमक मुस्लिमांनी येथील पराभूत लोकांना निंदावाचक म्हणून वापरला, रूढ केला. त्यापूर्वीच्या संस्कृत वाङ्मयात हिंदू हा शब्द सापडणार नाही.’
सुधारक संत महंत आणि महात्म्यांनी तात्त्विक हिंदुत्वाला मान्यता दिली परंतु पुरोहितशाही (ब्राह्मण्यवाद किंवा मनुवाद) ह्या विचारांना हिंदुत्वाचेच नव्हे तर मानवतेचे मारेकरी मानले. म्हणजे हिंदुत्व हा बुद्धकाळातील ‘सर्वसमावेशक सहजीवनाचा विचार’ असे मान्य केले तर त्या काळात ‘हिंदू’ हा शब्द नव्हता. ‘भारत’, भारतीय हे शब्द मात्र होते. सध्याचे हिंदुत्व पुरोहितशाही किंवा ब्राह्मणवाद किंवा मनुवादाने व्यापून टाकल्यामुळे बदनाम झाले आहे. त्यामुळे ‘गर्व से कहो हम भारतीय हैं’ ही घोषणा कशी वाटते? (सुज्ञांनी भाष्य करावे.)
१७४ तारांगण, विवेकानंद नगर, वर्धा रोड, नागपूर — ४४० ०१५

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.