काही वर्षांपूर्वी काझीरंगा अभयारण्याला गेलो असता, एक गंमतीची गोष्ट पाहिली. गेंड्याच्या लीदीचे चारपाच ढिगारे पाहिले. त्यांनी मर्यादित केलेली जमीन दोन-अडीच हेक्टर होती. कर्मचाऱ्यांशी चौकशी करता असे कळले की हे काम कर्मचाऱ्यांनी केले नसून गेंड्यानेच तसे ढीग घातले आहेत. आपल्या जागेचे स्वामित्व दाखवण्यासाठी गेंड्याची ती युक्ती होती. हत्तीप्रमाणे गेंडा कळपात रहात नसल्यामुळे एका गेंड्याला जगण्यासाठी किती जमीन लागते हे सिद्ध झाले. आ.सु.मधील संपादकीयात (१२.१२) सुरुवातीच्या परिच्छेदात उत्क्रांतीचा आधार घेऊन जमिनीचे परिमाण ठरवले आहे, त्या पद्धतीत व गेंड्याच्या रांगड्या पद्धतीत थोडेफार साम्य आहे. माणसामाणसांमध्ये फरक करण्याची त्या समाजामध्ये गरज नव्हती. पण पुढे मानवी संस्कृती विकसित झाली (भाषा, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यांतील घोडदौड, श्रमविभागणी, वस्तू व सेवा यांची चलनाधारित देवाणघेवाण वगैरेची प्रगती) त्यावेळी एक माणूस दुसऱ्या माणसासारखा राहू शकला नाही. उदा. अभियंता, गवई, खेळाडू यांच्या जमिनीच्या गरजा व शेतकऱ्यांच्या गरजा यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे एका माणसाला जमीन किती लागते हा प्र न गैरलागू ठरतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही हे तर खरेच पण जमीन कशाकरता हा प्र न उपस्थित होतो. शिवाय जमीन ही एकविध वा एकजिनसी नाही. जमीन फक्त जगण्यासाठीच का? इतर प्राणिमात्राची जमिनीची आणि पाण्याची गरज जगण्यासाठी व वंशसातत्यासाठी असते. मानवाचे जीवन नुसते जगण्यासाठी नाही तर त्याला सांस्कृतिक, धार्मिक, बौद्धिक गरजा असतात. Not by bread alone हा वाक्यांश सुपरिचित आहे. अशा स्थितीत माणसाला किती जमीन अथवा पाणी लागते, या प्र नाऐवजी मानवी समूह, गट, गाव, शहर येथे राहणारा जनसमूह असा व्यापक अर्थ घेतला पाहिजे. प्र न व्यापक झाल्यावर उत्तराची घनता वाढणे साहजिक आहे.
उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. पन्नाससाठ मजली इमारतीत राहणा-या व्यक्तींची जमिनीची गरज माणशी ३ ते ३.५ वर्गमीटर असेल. घनफळात विचार करावयाचा झाल्यास (एकावर एक मजले असल्यामुळे असा विचार करावा लागेल) १० ते ११ घनमीटर माणशी लागेल.
एखादा अभियंता, वास्तुविशारद किंवा डॉक्टर यांची कार्यालयाची व राहण्याची गरज साधारणतः १००० घनमीटरमध्ये भागेल. पण दोन-अडीच हेक्टर जमीन पिकविणाऱ्या शेतकऱ्याला तर काही कोटी घनमीटर क्षेत्र च्द्रठ्ठड्ड्ड लागेल. शिवाय जमीन ही एकजिनसी वा एकविध वस्तू नाही. त्यामुळे निरनिराळ्या प्रदेशांत अवकाश या प्र नाचे उत्तर निरनिराळे येणार. जमिनीची मागणी माणसापुरती किंवा मानवसमूहापुरतीच नाही. दुसऱ्या महायुद्धाचे बीज या मागणी (हाव) पोटी होते. जर्मनी व जपान या राष्ट्रांचे म्हणणे होते की आम्हाला च्छुड़ड्ड द्वदड्डड्डद्ध द्यण्ड्ड द्मद्वद पाहिजे. इंग्लंड, फ्रान्स वगैरे राष्ट्रे साम्राज्ये धरून आहेत. अमेरिकेकडे भरपूर जमीन आहे. आम्हालाही त्याची गरज आहे. या भूमिकेत दुसरे महायुद्ध पेटले. बदलत्या परिस्थितीत, प्र नांचे स्वरूप माणसाला संपन्न जीवन जगण्यासाठी किती पैसा लागतो असे ठेवावे लागेल. अर्थात या प्र नाचे उत्तरही तितके सोपे नाही. स्थूलमानाने असे म्हणता येईल की संपन्नतेच्या ज्याने त्याने केलेल्या व्याख्येवर ज्याला जेवढा पैसा पाहिजे असे वाटते व तो मिळवण्याचे कष्ट करण्याची तयारी असेल, तर तेवढा पैसा एका माणसाला लागेल. थोडक्यात उत्तर सापेक्ष आहे. ग्रामीण भागात प्राथमिक शाळेतील शिक्षकाला त्याच्या सर्व गरजा (त्याला वाटणाऱ्या) पुऱ्या करायला आजच्या रुपयांच्या भाषेत वर्षाला चाळीस-पन्नास हजार लागतील, तर अमिताभ बच्चन वा सचिन तेंडूलकर आदि नामवंत मंडळींना वार्षिक पंचवीस-तीस लाखही अपुरे पडतील.
कदाचित माणसाला किती जमीन लागते हे विचारण्यात, त्याहूनही जास्त जमीन वापरणे हा ‘चंगळवाद’ झाला असे विधान अनुस्यूत असावे. हल्ली काही विशिष्ट विचारवंत चंगळवाद बोकाळला आहे अशी तक्रार करतात पण चंगळ म्हणजे नेमके काय याची व्याख्या कुठे सापडत नाही. माझे एक मित्र आहेत, ते ७/८ वर्तमानपत्रे घेतात. एका दृष्टीने ही चंगळ आहे. त्यांचे म्हणणे ‘मला कोणतेही व्यसन नाही, वाचण्याचा छंद आहे.’ आता त्यांना चंगळवादी म्हणावयाचे का? एखाद्या संगीतशौकिनाने अत्याधुनिक साऊंड सिस्टिम व हजारो कॅसेट विकत घेतल्या तर त्याला चंगळवादी म्हणावयाचे का? आजची सामाजिक-आर्थिक चौकटच तथाकथित चंगळवादाला हातभार लावते त्याला काय करणार?
वस्तुतः पसायदानामध्ये ज्ञानेश्वराने ‘जो जे वांच्छील, तो तें लाहो’ असे म्हटले आहे, ते चंगळवादाला प्रोत्साहन देणारे नाही का? चंगळ याचा अर्थ वैपुल्य, लयलूट, भरपूर असा आहे. या अर्थाने समाजवादाचे अंतिम साध्य सर्वांना वस्तुचे वैपुल्य मिळावे हाच आहे. एक जुनी गोष्ट आठवते. स्वातंत्र्य मिळणार याची खात्री पटल्यावर नेहरूंच्या पंतप्रधानकीत काँग्रेस-मुस्लीम लीग सरकार केंद्रात आले. त्यावेळी एका गरीब भटजीने उद्गार काढले की बेट्याची आता चंगळ आहे, दररोज शिरापुरी खाणार. तेव्हा चंगळ शब्दाचे क्षुद्रीकरण करणाऱ्या विचारवंतांनी त्यांना अभिप्रेत असणाऱ्या संकल्पनेचे स्पष्टीकरण केले पाहिजे.
दुसरे असे की तथाकथित चंगळवादाला सरकारच प्रोत्साहन देते. उदा. ज्याचे वार्षिक उत्पन्न चार-पाच लाखांवर आहे, अशांना रेल्वेचा फुकट गोल्डन पास देणे कितपत योग्य आहे? सचिन तेंडुलकर याने महागडी मोटार आयात करण्याचे ठरवले तर त्यावरली आयातशुल्क (जवळपास एक कोटी रुपये) माफ करणे, बरोबर आहे का? वैयक्तिक चंगळवादाला खतपाणी घालणाऱ्या सार्वजनिक धोरणांना विरोध करणे जरुरीचे आहे. सारांश, जगण्याला जमीन व पाणी किती लागते यापेक्षा असलेल्या संसाधनांतून होणाऱ्या उत्पन्नाची वाटणी न्याय्य पद्धतीने होते का यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
१२, अबोली अपार्टमेंटस, लॉ कॉलेज मार्ग, पुणे – ४११ ००४