पुस्तक-परिचय

कुंपणापलिकडचा देश – प्रमोद सहस्रबुद्धे
भौगोलिक प्रदेशमानाप्रमाणे संस्कृती बदलत राहते.पण हा बदल बहुधा हळू हळू घडत जातो. शेजारच्या किंवा जवळच्या भूभागातील संस्कृतीत साम्यस्थळेच अधिक असतात. विविध कारणांसाठी बऱ्याच जणांना हे सत्य पटत नाही, किंवा ते अशी परिस्थिती बदलवू इच्छितात. बहुतांशी ही कारणे धार्मिक वा राजकीय असतात. असे लोक मग ठिकठिकाणी आपल्या कुवतीनुसार सांस्कृतिक बेटे तयार करू लागतात. अर्थात अशा गोष्टी अनैसर्गिकच असतात, आणि त्यामुळेच की काय, संस्कृतीचे विभाजन करू इच्छिणाऱ्यांना भयाचे किंवा लाचलुचपतीचे कुंपण घालावे लागते. दोन देशांतील संस्कृती-साठी मात्र हेच कुंपण ‘प्रत्यक्ष’ असू शकते. त्यामुळे लोकांच्या जाण्यायेण्याला, विचारांना प्रतिबंध करता येतो. याशिवाय नेहमीचे भयाचे व लाचलुचपतीचे कुंपण असतेच. या सर्वांना न जुमानता संस्कृतीचा वर्षानुवर्षे चाललेला प्रवाह वाहतच असतो. मात्र त्याची जाणीव कुंपणापलीकडच्या आणि अलिकडच्या व्यक्तींना होतेच असे नाही. कुंपणाचा हा हेतू तरी काही अंशी सफल होतो, असे म्हणायला हरकत नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील कुंपणाची हीच स्थिती आहे. हे कुंपण राजकीय व धार्मिक कारणांनी अधिकच उंच झाले आहे. तरीही खूप लोक इकडून तिकडे व तिकडून इकडे जात असतात. ही जा-ये नातेसंबंधामुळे किंवा आर्थिक व्यापारामुळे जास्त होते. थोड्या प्रमाणात खेळाडू, कलाकार, बातमीदार हे यात सहभागी असतात. पण या सर्वांचा दृष्टिकोण हा मर्यादित असतो. म्हणूनच की काय, अशा सर्व जणांच्या अनुभवाचा फारसा लाभ इतरांना होत नाही.
मनीषा टिकेकर ह्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. पाकिस्तानातल्या राजकारणाचा अभ्यास करण्यास त्या पाच महिने तेथे जाऊन राहिल्या. याच काळात ११ सप्टेंबरची घटना घडली. पाकिस्तानातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना त्या भेटल्या. त्यांच्या मुलाखती घेतल्या. यावरूनच त्यांनी केलेला अभ्यास व शोधनिबंध त्यांच्या क्षेत्रात नावाजले गेले. याशिवाय त्यांची आपल्या अनुभवांवर आधारित असे ‘कुंपणापलीकडचा देश, पाकिस्तान’ या नावाचे पुस्तक लिहिले. एवढी ओळख या पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यास पुरेशी असायला हवी, पण ही ओळख पुरेशी नाही हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते.
लेखिकेने हे पुस्तक तीन भागांत लिहिले आहे. पहिल्या भागाची रचना प्रवास-वर्णनासारखी आहे. इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, पेशावर, कराची आणि तक्षशिला या शहरांची माहिती, लोकांची जीवनपद्धती, इतिहास आणि प्रत्यक्ष अनुभव सांगितले आहेत. दुसऱ्या भागात पाकिस्तानच्या पन्नास वर्षांच्या राजकारणाचा वेध घेतला आहे. तर तिसऱ्या भागात सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. हे सर्व सांगताना अलिप्तता राखली आहे. त्यामुळेच त्यास एक प्रकारची खुमारी लाभली आहे. पुस्तकातली रेखाटने छायाचित्रांच्या पर्यायाची आहेत. सजावटीपेक्षा ती लेखनास पूरक असून, पाकिस्तानातील प्रत्यक्षाचे जास्त प्रत्ययकारी रूप आहेत. एक विषयसूची, संदर्भसूची वगैरे नसणे सोडले, तर पुस्तकाची निर्मितिमूल्ये चांगली ठेवली आहेत. हे पुस्तक लेखिकेचे पहिलेच मराठी पुस्तक आहे. शब्दांचा योग्य वापर, फापटपसारा न वाढवता थोडक्यात पण पूर्णपणे लिहिणे हे त्यांना व्यवस्थित जमले आहे. अजून जास्त लिहिले पाहिजे होते, हा म्हटला तर दोष आणि खरोखर गुण आहे, हे या पुस्तकातून कळते.
पाकिस्तानी राजकारण हे प्रामुख्याने लष्करी प्रभाव असलेले राजकारण आहे. या लष्करी राजकारणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकशाहीस चिकटून आहे. त्यातले लष्करशहा हे फारशी रक्तरंजित क्रांती करीत नाहीत. वारंवार लोकशाहीची आमिषे दाखवत ते आपला कारभार हाकतात. आणि जेव्हा काही कारणाने निवडून आलेले सरकार आले असते, त्यावेळेस राज्यकारभारावर प्रभाव राहील याची सोय करतात. लोकांनाही या गोष्टीत फारसे वावगे वाटत नसावे असे दिसते. या मागची कारणमीमांसा या पुस्तकात वाचायला मिळते. पाकिस्तानातील बराचसा भाग हा शतकानुशतके आक्रमणा-खाली असायचा. भारतात शिरायची सोयीची अशी वाट आजच्या पाकिस्तानातूनच होती. त्यामुळे तेथील रहिवाशांचे लष्करीकरण झाले. याच गोष्टीचा परिपाक म्हणजे आजचे लष्करयुग. मग लोक लष्कराकडे एक चांगले उत्पन्नाचे साधन म्हणून बघतात. निवृत्त सैनिकास जमीन तर निवृत्त अधिकाऱ्यास सरकारात (नोकरशाहीत व राजकीयरीत्या), शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदे दिली जातात. त्यामुळे लष्कराला प्रतिष्ठाही मिळाली आहे.
पाकिस्तानातली वृत्तपत्रे बऱ्यापैकी स्वतंत्र आहेत. लष्करी राजवटींमध्येही त्यांनी हे स्वातंत्र्य राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्यावर सरकार व अतिरेकी गटांचा भरपूर दबाव असतो, हे मात्र सांगायला नको. लेखिकेने इंग्रजी वृत्तपत्रांची भरपूर माहिती दिली आहे. त्याबरोबरच भाषिक वृत्तपत्रांचीही थोडीफार माहिती आहे. या वृत्तपत्रात भडक मजकूर असतो. पण गमतीची गोष्ट म्हणजे रोजची तारीख देताना ती हिंदू महिन्यांनुसारही दिली जाते (चैत्र, वैशाख, ज्येष्ठ ….. ) याचे कारण सामान्य शेतकरी मौसमाची ओळख त्यांच्यावरून ठरवतो!
पाकिस्तानात स्त्रिया बुरखा कमी वापरतात. संस्कृतीच्या इस्लामीकरणाने ही प्रथा वाढीस लागते आहे. एकंदरीत स्त्रियांची स्थिती फारशी चांगली नाही. स्त्रीपुरुषांचे प्रमाण, साक्षरता, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण, ह्या सर्वांतून ही स्थिती समोर येते. ही सर्व आकडेवारी त्या भारतापेक्षाही मागासल्या आहेत, हे दर्शविते. पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न, आर्थिक प्रगतीही भारतापेक्षा कमी. तरीही लेखिकेला तेथे भारतासारखी दैन्यावस्था आढळली नाही, हे विशेष.
पाकिस्तानी संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा (म्हणजे या दोन वेगळ्या गोष्टी असे धरले तर) मोठा प्रभाव आहे. भारतीय चित्रपट व चित्रवाहिन्यांद्वारे तो भरपूर पसरला आहे. लाहोर मध्ये ‘बसंत’ उत्सव साजरा केला जातो, तो आता इतरत्रही पसरला आहे. लोकांचे या प्रसारमाध्यमातून आलेल्या प्रथांचे अनुकरण करण्याकडेही कल असतो. अशा गोष्टींमुळे नव्याजुन्या प्रथांचे संकरीकरण होत असते. या सर्वाला विरोध मात्र मोठ्या प्रमाणात दिसतो. विशेषतः शिक्षणाच्या माध्यमातून हा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो. अशाच गोष्टी आपल्याकडेही होतात याचे नवल वाटायला नको. त्यामुळे तेथील ‘इतिहास’ हा विषय विचित्र पद्धतीने सांगितला जातो. जुन्या म्हणजे इस्लामपूर्व वास्तूंचीही तशीच परिस्थिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तेथील हिंदूंनी केलेले सामाजिक योगदान अनुल्लेखित राहते.
पाकिस्तानातील सुशिक्षित वर्गास याची जाण आहे. हे सर्व बघून असे दिसते की एक तर मूलतत्त्ववादी (दोन्ही देशांतील) आणि दुसरे म्हणजे राजकीय हेतूंनी प्रेरित असे गट सोडल्यास भारत-पाकिस्तानात तणावाचे कारण नाही. लेखिकेला भेटलेले सामान्य लोकही अशा खून-खराब्याच्या विरुद्ध आहेत. पण हे चित्र तेवढे खरे नाही. पाकिस्तानी बुद्धिजीवी वर्ग ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीला बघू शकतो, तो जसा स्वतःच्या देशातील इस्लामीकरणाच्या विरोधात आहे, तसा तो भारताच्या विरोधातही आहे. या विरोधाचे मूळ कदाचित बांगला देश निर्मिती व काश्मीर प्रश्नात असेल. पण ती टाळता येण्यासारखी बाब नाही. आणि म्हणूनच भारत-पाक संबंध हा एक तिढा झाला आहे. त्याची उकल होण्यास ताठरतेपेक्षा सहिष्णुताच जास्त मदत करू शकेल.
बी ४/११०१ विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कॉम्पाउंड, (प िचम) ठाणे – ४०० ६०१

हे चित्र पहा आणि हे चित्र पहा !- श्रीराम गजानन केळकर
आ.सु.चे ब्रीद आहे. “सुधारणा’– सु — म्हणजे “शोभन’–‘सम्यक्” — किंवा “सुष्ट’–धारणा म्हणजे “विचार’ : विचार हे मानवाचे इतर प्राणिसृष्टीपासून वेगळी ओळख करून देणारे लक्षण आहे. विचार, “वाणी’ व “वर्तन’ यांची सुसंगतता, हीच मानवाच्या (श्रेष्ठतेची किंबहुना थोरपणाची) खूण आहे. अशा सुसंगततेचा अभाव म्हणजे तो झाला “पोरखेळ’ : एका इंग्रज नाटककारानं (सध्या नाव आठवत नाही) म्हटले आहे “Look at this picture …….. and that.” (हे चित्र पहा आणि हेही चित्र पहा) : (प्रथम हे चित्र “THIS”.)
महाभारत हा आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा “पुराण’ ग्रंथ आहे. त्यांत एका प्रसंगी “कौरव’ ह्या नावाने ओळखली जाणारी “माफिया मंडळी’ आपल्याच कुलातील एका ‘सन्नारी’ला दरबारात (म्हणजे चव्हाट्यावर) ‘अदर्शनीय’ अवस्थेत वस्त्रहरण करण्याच्या नीच उद्देशाने खेचून आणतात. त्यांचे ‘दरबारात’ काही विद्वान, आढ्य, बलाढ्य, यशोमान, पराक्रमी मंडळी हजर असतात पण ही सर्व मंडळी खाली मान घालून – मूग गिळून चूप बसून राहतात. त्यांचेपैकी, एक सुज्ञ, चाणाक्ष, वंदनीय — ज्यांना “भगवंत’ अशी संज्ञा आहे, असा श्रीकृष्ण आपल्या “दैवी’ चमत्काराच्या बळाने त्या सन्नारीला अखंड वस्त्रे पुरवितात व तिची लाज राखतात : (त्यांची मानवीय आयुधे व पराक्रमाची कुवत कदाचित तोकडी पडली असेल.) आता काही (म्हणजे बरीच-शेकडोशे) वर्षे लोटल्यावर आपल्या भारतातील हेही चित्र पहा (“THAT’).
“एक रूपगर्विता महिला आपल्या (अर्धनग्न) अंग प्रदर्शनाच्या जोरावर आपला चरितार्थ चालविते व ‘रिद्धी सिद्धी’ ही प्राप्त करते माध्यम (ग्डड्डठ्ठ) नावाच्या क्षेत्रात असाधारण नावलौकिक मिळविते. माध्यम, गड्डड्डत्वट हा शब्द एका दुसऱ्या अर्थानेही चलनात आहे हेही वाच-कांनी ध्यानात घ्यावे अर्धनग्नता हेच या प्रसिद्धीचे मुख्यलक्षण : आता ही महिला एका ‘न्यायालयात’ धाव घेते व तिच्या ‘चित्रणा’ मुळे तिच्या ‘अब्रू’ला धोका निर्माण झाल्यासंबंधित ‘दाद फिर्याद’ मांडते. आणि न्यायालय हे प्रकरण ‘सुनावणी’साठी स्वीकारतेही (न्यायालयात ती महिला कोठल्या अवस्थेत आली ते मात्र कळलेले नाही).
रसिकजन हो–जरा विचार करा–(आपण शुद्धीवर असाल तर). टीप —- पुढे या नाटकाचा आणखी एक अंक झाल्याचे वर्तमान आहे —- पण त्या संबंधी विवरण पुन्हा केव्हातरी.
४ वसन्तनगर को. ऑप. हौ. सोसा., भैरवनाथ रोड, मणिनगर, अहमदाबाद — ३८० ००८

पुस्तक परिचय
मुंबई आणि कापड गिरण्यांचे विरलेले वस्त्र [रिपिंग द फॅब्रिक : द डिक्लाइन ऑफ मुंबई अँड इट्स मिल्स, लेखक — डॅरिल डिमाँट]
सुलक्षणा महाजन
डॅरिल डीमाँट या प्रतिथयश वृतपत्रकाराचे, मुंबई कापड गिरण्यांना आणि गिरणगावाला आज लागलेली उतरती कळा, यासंबंधीचे विवेचन करणारे हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. मुंबईला जागतिक महत्त्वाची व्यापारनगरी हे पद मिळवून दिले दोन उद्योगांनी. एक आहे बंदर उद्योग आणि दुसरा आधुनिक औद्योगिक क्रांतीचा पाया घालणारा कापड उद्योग. या गोष्टींमुळे विसाव्या शतकात, ब्रिटिश राजवट असतानाच, मुंबईला भारतातील आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. स्वातंत्र्यानंतरच्या पंचवीस तीस वर्षानंतरही मुंबईचे हे आर्थिक स्थान अबाधित राहिले होते; पण १९७० च्या दशकापासून कापड उद्योगाला उतरती कळा लागली. पगारवाढ, बोनस यासाठीचे संप नेहमीचे बनले होते. त्यातूनच राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही काँग्रेसप्रणीत गिरणी कामगारांची युनियन बलशाली झाली होती; पण कामगारांचा मात्र तिच्यावरचा विश्वास कमी झाला होता. या संघटनेला डावलून ८२ साली कामगारांनी डॉ. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक संप केला. तो मात्र संपूर्ण अयशस्वी ठरला. त्यानंतरच या धंद्याचे आणि मुख्यतः गिरणी कामगारांचे तर कंबरडेच मोडले. एके काळी मुंबईत क्रांतिकारी कामगिरी करणारी संघटित कामगार चळवळही त्यानंतर पार निष्प्रभ झाली.
मोठ्या संख्येने या धंद्यात असलेल्या कामगारांचे हित लक्षात घेऊन, पार डबघाईला आलेल्या काही गिरण्या राष्ट्रीय कापड महामंडळाने ताब्यात घेऊन चालविण्याचा केलेला प्रयत्नही असफल झाला. कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान असूनही महामंडळ तोट्यातच गेले. मुंबईच्या कापडधंद्याच्या या स्थितीला असंख्य कारणे होती. जुन्या यंत्र-सामुग्रीचे वेळेवर आधुनिकीकरण न करणे, गिरणी मालकांची बेपर्वाई, भारताच्याच इतर विभागांत नव्याने आलेल्या गिरण्यांमुळे वाढलेली स्पर्धा, यंत्रमागांमुळे निर्माण झालेली स्पर्धा, बदललेले तंत्रज्ञान, गिरणी कामगारांचा असहकाराचा पवित्रा, भांडवल गुंतवणुकीचा अभाव, अशा असंख्य कारणांनी खरे तर या धंद्याची काही काळ होत असलेली वाताहत गेल्या वीस वर्षांत पूर्ण झाली आहे. मुंबईचा कापड-कामगार देशोधडीला लागला. गिरण्यांच्या जमिनीला सोन्यापेक्षाही अधिक किंमत आल्याने, मालकांचा गिरणी-धंद्यातला रस संपला. जमिनीसंबंधी कोणतेच धोरण अंमलात न आल्याने कोंडी झाली. त्यातच कामगार, मालक संघटनांमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा उठविण्यासाठी माफियांच्या टोळ्या, गुंडपुंड यांचीही मदत घेण्याच्या प्रयत्नांतून घडलेल्या खून-मारामाऱ्या यांनी तर प्र न अधिकच कठीण बनला. राजकारण फोफावले. आजही हा प्र न सुटण्याची काहीही चिन्हे नाहीत. त्या काळातील परिस्थितीचे आकलन करण्यात खरे तर सर्वांच्याच मोठ्या चुका झाल्या असाव्यात, असे हे पुस्तक वाचताना तीव्रपणे जाणवत राहते.
या सर्व काळात गिरणगाव मात्र अधिकच कंगाल आणि बकाल झाले. मध्य मुंबईमधील हा नागरी, जुना भाग अनेक लोकांच्या काळजीचा आणि अभ्यासाचा तसेच चिंतनाचा विषय बनला आहे. गेल्या दहा वर्षांत तर मुंबई परिक्षेत्रातील इतर अनेक कारखाने बंद पडायला लागले आहेत आणि गिरणी कामगारांच्या अनुभवामुळे एकूणच औद्योगिक मुंबईचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना झाली आहे. ती अवास्तव मात्र नाही. उद्योगधंदे बंद पडल्यावर औद्योगिक मुंबईचे भवितव्य काय, हा प्र न साहजिकच उभा राहतो. गिरणी धंद्यांप्रमाणेच मुंबई जीर्ण होऊन विरून तर जाणार नाही ना, अशी भीती लेखकाने व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईचे रूप पालटले आहे. मोठ्या संख्येने सेवा-क्षेत्रात, तसेच सरकारी क्षेत्रात रोजगार उत्पन्न झालेला दिसतो; पण हा ‘सफेद कॉलर’ कामगार मध्यमवर्गीय आहे. जागतिक आर्थिक सेवा उद्योगाच्या आधारे मुंबईला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न हे काही श्रीमंत वर्गातील लोकांचे स्वप्नरंजन आहे आणि ते यशस्वी होणार नाही, याची मीमांसा लेखकाने, लंडन आणि मँचेस्टरचे केले नाही, तर मुंबईचा -हास होण्याची भीती लेखकाने व्यक्त केली आहे. गिरण्यांची जमीन आणि हा विभाग यांचे आर्थिक पुनरुज्जीवन करावे, म्हणून अनेक तज्ज्ञ आणि मुंबईचे वास्तुरचनाकार प्रयत्नशील आहेत. अनेक प्रस्ताव त्यांनी मेहनत घेऊन तयार केले; पण कोणत्याच प्रस्तावावर एकमत होऊ न शकल्याने, ते तसेच धूळ खात पडून आहेत. कोणतीही बाजू घेतली, तरी सरकारला विरोधाला तोंड द्यावे लागते. अस्थिर राजकीय परिस्थितीत गेल्या पंचवीस वर्षांत कोणत्याही सरकारला या प्र नाची सोडवणूक करण्याची हिंमत झालेली नसल्याने त्रिशंकू अवस्थेत तो लटकत पडला आहे. यातही सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे, या मोक्याच्या किमती जागेत सर्वांचे गुंतलेले हितसंबंध. आणि तोच तर भांडणाचा गाभा आहे.
येईल, ही आशा लेखकाला, तसेच इतर अनेक कामगारांच्या हितचिंतकांना वाटते; पण ती कितपत व्यवहार्य ठरेल याची शंका आहे. शिवाय या कामगारांना यंत्रमाग देण्याची कल्पना लेखकाला आकर्षक वाटते; पण त्यासाठी सूत पुरवठ्याची आणि विक्रीची जबाबदारी मात्र कापड-धंद्यातील भांडवलदारांनी घ्यावी, ही अपेक्षा म्हणजे पुन्हा कामगाराला भांडवलदारांच्याच दावणीला बांधून ठेवण्याचा विचार ठरतो. शिवाय भांडवलदारांनी किती काळ ही जबाबदारी उचलावयाची आणि का उचलायची आणि ते तसे उचलतील का, हे प्र न अनुत्तरितच राहतात. कामगार तरी याला तयार आहेत का, किंवा त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे का, याचा खुलासा लेखकाने केलेला नाही.
एके काळी दोन लाख असलेली कापड कामगारांची संख्या, आता खूपच रोडावली आहे. अनेक गिरण्यांत विभागलेला हा कामगार काही काळ मोठ्या संख्याबळावर एकछत्री कामगार-संघटनेच्या जोरावर यशस्वी झाला होता; पण त्या वेळी मुंबईच्या कापडाला मोठी वाढती बाजारपेठ होती. त्यामुळे मालकांनी मागण्या मान्य करणे साहजिकच होते; पण आक्रसत्या बाजारपेठेत, वाढत्या स्पर्धेच्या काळात जो मोठा संप कामगारांनी केला आणि फसला त्यामागे परिस्थितीचा अंदाज घेण्यात चूक तर झाली नसेल? तसेच सर्व गिरणी-मालकांची धंदा चालविण्याची क्षमता काही सारखी नसते. त्यामुळे एकत्र समान तोडग्याचा कामगार-पुढाऱ्यांचा हट्ट तर अनाठायी ठरला नसेल? कदाचित वेगवेगळ्या गिरण्यांत, क्षमतांनुसार वेगळे करार करून काही काळ तरी, काही गिरण्यांतील कामगारांचा रोजगार वाचविता आला असता का? कामगार-संघटनांनी रोजगार कमी होण्याच्या भयाने आधी आधुनिकीकरणाला केलेला विरोध तर नंतरच्या काळात झालेल्या वाताहतीला जबाबदार ठरला नसेल? आणि आजही एकच एक सर्वसमावेशक तोडग्याचा हट्ट, हाच या समस्येच्या सोडवणुकीत अडथळा ठरत असेल का, असे प्र न लेखकाने उपस्थित केले असते, तर हे पुस्तक काही वेगळा दृष्टिकोण देण्यात यशस्वी ठरले असते, असे वाटते. कारण आजपर्यंत झालेल्या घटनांचेच फक्त अभ्यासात्मक वर्णन, इतकेच या पुस्तकाचे स्वरूप आहे. आज जर या संबंधातील हितसंबंधांपैकी कोणाचाही कोणावर विश्वास उरलेला नसताना, कोणताही तोडगा निघणे अशक्यच आहे, असे असताना सर्व संबंधितांना या प्र नाच्या सोडवणुकीला एकत्र कसे आणावयाचे, हा विचार सर्वप्रथम करावयाला हवा. पण त्यासंबंधी लेखक काहीही सूचना करीत नाही. म्हणूनच ही मुंबई कोणाची, हा लेखकाचा प्र न म्हणजे निराशेतून आलेला त्रागा वाटतो. सर्व हितसंबंधांचा विचार व्हावा, ही इच्छा योग्य असली, तरी प्र न इच्छेचा नसून, तडजोडीसाठी सर्व संबंधितांनी शकते; मुंबईच्या अवनतीबद्दलचे विवेचनही समाजवादी वळणाच्या पारंपारिक पद्धतीच्या साहाय्याने लेखकाने केले आहे. लेखक काही नगर-विकास-शास्त्राचे तज्ज्ञ नव्हेत; पण ज्या जेन जेकब या पा चात्त्य विदुषीच्या लिखाणाचे दाखले लेखकाने दिले आहेत, त्यांचे नागरीकरणासंबंधीचे आकलन यापेक्षा खूप वेगळे आहे; पण लेखकाने ते नीट समजावून घेतलेले नाही, असेच म्हणावे लागेल. या लेखिकेच्या दृष्टीने शहरे ही नेहमीच प्रवाही, गतिशील रचना असतात. असंख्य प्रकारचे प्रवाह काही कारणाने एकत्र येतात, म्हणून विशिष्ट काळात, विशिष्ट भौगोलिक ठिकाणी शहरे उद्भवतात, वाढतात, बदलतात आणि लयालाही जाऊ शकतात. मोठ्या उद्योगांपेक्षा ज्या शहरात असंख्य प्रकारचे लहान, मध्यम उद्योगधंदे, व्यापारी प्रवाह, उद्योजक कुशल माणसे उभे करतात, तेथे विविध माल वाहतूक, आयात-निर्यात, स्थलांतरित यांचे असंख्य प्रवाह शहरांना नवा आकार आणि रूप देतात. संख्येने मोठे पण आकाराने लहान, असे विविध नवे उद्योग सतत निर्माण करणारी शहरे दीर्घायुषी असतात. ही शहरे त्यातील मोठे उद्योग हळूहळू शहराबाहेर गेले तरी नष्ट होत नाहीत. लंडनमधील बंदर-व्यवसाय गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत नाहीसा झाला;
कार्यकारण संबंधांच्या ठोकळेबाज पद्धतीने करता येत नाही. म्हणूनच गिरण्यांचा -हास झाला आणि बंदर-धंदा आटला, तरी मुंबईचा हास आपोआप गृहीत धरणे योग्य ठरत नाही. संघटन होणे, विघटन होणे आणि अधिक विस्तृत भूभागांवर पसरणे, पुन्हा नव्या स्वरूपात संघटित होणे ही निसर्गातील सर्वसामान्य उत्क्रांतीची प्रक्रिया मानवाच्या सर्व प्रकारच्या रचनांना लागू पडते. समाज, अर्थव्यवहार,
औद्योगिक तसेच राज्यसंस्था, शहरे, देश या सर्व रचना असे सर्व नियमितपणे या चक्रातून जातात. या प्रवाहीपणातच मानवाचे, तसेच निसर्गाचे, विकासाचे रहस्य दडले आहे, हे जर लक्षात घेतले, तर वेगळ्या दृष्टिकोणातून प्र न सोडवायला मदत होऊ शकते; पण त्यासाठी परंपरा बाजूला ठेवून, नवा दृष्टिकोण समजावून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
९ संकेत अपार्टमेंट, उदयनगर, पांचपाखाडी, ठाणे.

बंद गिरण्या —- वाढत्या दंगली
डॅरिल डिमाँटे
इतर जगातल्याप्रमाणेच भारतातही शहरे वेगवेगळ्या वर्गांच्या लोकांपासून घडतात, आणि प्रत्येक वर्ग आपापल्या विशिष्ट त-हेने शहराला काहीतरी देत असतो. नव्या खुल्या धोरणामुळे होत असणाऱ्या आर्थिक-सामाजिक बदलाच्या काळात मुंबईच्या गोदीकामगारांच्या आणि औद्योगिक कामगारांच्या गरजांकडे दुर्लक्ष करता येत नाही. कमीत कमी त्या कामगारांना त्यांची रोजी गमावण्याचा मोबदला तरी मिळायलाच हवा. इतर शहरांमधील (विशेषतः न्यू यॉर्क) अनुभव दाखवतो की औद्योगिक क्षेत्रातील बेकारांना सेवा उद्योग पुरेशा प्रमाणात सामावून घेऊ शकत नाही.
ह्या तथ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मुंबईतील १९९२-९३ मधील धार्मिक दंगलीसारख्या सामाजिक उलथापालथी होणारच. लेखक त्या काळात टाइम्स ऑफ इंडियाचा मुंबईतील निवासी संपादक होता. बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या दंग्यांची तीव्रता आणि बर्बरता अकल्पनीय होती. मुंबईची आधुनिक कॉस्मॉपॉलिटन प्रतिमा या पूर्वी कधीही न घडलेल्या बर्बरतेने भंगली. दोन्ही समाजांमधील तरुणांचे बेरोजगारीतून उद्भवलेले वैफल्य हे या दंगलींचे कारण होते, हे उघड आहे. आपल्या वडलांना मिळत होत्या तशा नोकऱ्या न मिळाल्याबाबत व्यवस्थेला दोष न देता ‘दुसऱ्या’ समाजाला दोष दिला गेला. व्यवस्थेचा या समस्येबद्दलच्या आंधळेपणातून अपार प्राणहानी आणि वित्तहानी करणाऱ्या दंगली उपजल्या. मुंबईच्या ‘तळातला’ हा अंगार हा मुंबईच्या प्रशासकांना इशारा होता —- दुर्बलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष कराल तर वणवा पुन्हा सहजी भडकू शकेल.
आणि हे सुटे उदाहरण नाही. जॅन ब्रेमन हा उप समाजशास्त्रज्ञ अनेक वर्षे गुजरातेतील कामगारांचा अभ्यास करत आहे. त्याच्या मते १९८५ नंतर गिरण्या बंद पडू लागल्या आणि सांप्रदायिकता वाढीला लागली. १९९५ पर्यंत मुसलमान हे ‘नवे अस्पृश्य’ झाले. मुंबईप्रमाणेच अमदाबादेतही याचसोबत राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले. ब्रेमन म्हणतो, “गिरण्यांच्या घसरणीने समाजाचे वस्त्र फाटले.”
अमदाबादेतील गिरण्या बंद होऊ लागल्या तेव्हाच दलित कामगार मुलांना शाळांमध्ये पाठवू लागले होते. गिरण्या बंद होण्याने या मुलांचा जातपातीमुळे होणाऱ्या अन्यायातून बाहेर पडण्याचा मार्ग पहिल्या पावलालाच खुंटला. दलित विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि विधि–महाविद्यालयांमध्ये राखीव जागा दिल्या गेल्याचे निमित्त होऊन १९८५ च्या दंगली घडल्या, आणि परिणामी गुजरातेतील काँग्रेस राजवट संपली. इथे इतिहासातील एक विचित्र संदर्भही नोंदतो — — अमदाबादेतील पहिलावहिला १८७८ चा संप घडला तो दलितांनी चहाची दुकाने सुरू केल्यामुळे.
गिरण्यांचा व इतर कारखान्यांचा हास जातीय व धार्मिक तणाव वाढवतो, हे आजही दिसत आहेच. [डरिल डिमाँटे यांच्या ‘रिपिंग द फॅब्रिक : द डिकलाइन ऑफ मुंबई अँड इट्स मिल्स’ (ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००२) या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.]

मधुकर देशपांडे
नुकताच “मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिरात पाहिला. हे नाटक स्टेजवर येण्यापूर्वी त्याच्या विवाद्य प्रतिपादनावरून उठलेले वादळ, ते स्टेजवर आल्यावर काही लोकांनी नाटक बंद पाडण्यासाठी नाट्यगृहाबाहेर घडविलेला हिंसक उद्रेक, त्यानंतर नाटकावर आलेली बंदी, आणि बंदी उठल्यावर आता होत असलेले नाटकाचे हाउसफुल्ल प्रयोग हे सारे नाटकाच्या संदर्भात घडलेले नाटकाबाहेरचे नाट्य मला परिचित होते. जेव्हा नाटकावर बंदी आली तेव्हा लेखकाच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर बंदी घालण्याच्या शासकीय बालिश मानसिकतेची चीड आली होती. नथुरामच्या कृत्याबद्दल माझ्या मनात तीव्र घृणा असली आणि त्याच्या तत्त्वज्ञानाबद्दल कणभरसुद्धा आत्मीयता नसली तरी त्याच्या भक्तांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंदी आणणे मला के व्हाच पटणारे नव्हते. यापूर्वी सलमान रशदीच्या “सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर असो अगर दीपा मेहता यांच्या “फायर’ या पडद्यावर न येऊ शकलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणावर असो, झुंडशाहीने बंदी आणणाऱ्या मानसिकतेशी मी कधीच सहमत होऊ शकलो नाही. कदाचित बंदीचे नाट्य झालेले नसते तर मला मी नथुराम बोलतोय हे नाटक आवर्जून पाहणे जमलेच असते असे नाही. पण बंदीमुळे प्रसिद्धी पावलेले हे नाटक सवड मिळताच मी पाहिले. हे नाटक प्रेक्षागृहात बसून पाहण्याचा अनुभव मला बराच बोचला आणि या विषयावर आपले मत लिहावे वाटण्याइतका अंतर्मुख करून गेला.
नाटक खरे तर जवळजवळ एकपात्री आहे. शरद पोंक्षे यांनी नथुरामचे काम छानच केले आहे. त्यांची बोलण्याची लकब आणि आवाजाची फेक तर उत्तम आहे. तसे नाटक विचारप्रधान (अगर अविचारप्रधान म्हणणे जास्त योग्य), सूत्र-कथनात्मक आणि नथुरामच्या मानसिक बैठकीविषयी (तिचे उदात्तीकरण करणारे) असल्यामुळे त्यात नाट्यगुण कमी आणि भाषणे जास्त आहेत. पोंक्षे पाठ केलेली भाषणे चांगली म्हणू शकतात हे या नाटकावरून समजले. ते कदाचित चांगले अभिनेते असतीलही, पण त्यांच्या अभि-नयाला निदान या नाटकात फारसा वाव नाही, त्यांच्या राणा भीमदेवी भाषणांना आहे. त्यांची भाषेवरील पकड आणि त्यांचे ठसकेबाज वक्तव्य नाटकात जागोजाग दिसून येते. नाटकात इतरही बरीच किरकोळ पात्रे आहेत पण त्यांचे काम नथुरामच्या भूमिकेस उठाव देण्यापुरतेच मर्यादित आहे. त्यातल्या त्यात इन्स्पेक्टर शेख यांना नाट्यगुण दाखविण्यास थोडा वाव आहे पण ते काम अभिनयाच्या बाबतीत यथातथाच झालेले आहे. त्यामुळे नाटकाच्या नाट्यगुणाविषयी फारसे लिहिण्यासारखे नाही.
नाटक सुरू झाल्यावर केवळ पाच मिनिटांच्या आत मला जाणवले ते असे, की बहुतांशी सर्व प्रेक्षक हे नथुरामचे भक्त आहेत. नथुरामच्या प्रत्येक आवेशपूर्ण वाक्यास ते मनापासून टाळीची दाद देत होते. त्याच्या गांधीविषयी उपहासात्मक वाक्यांवर हशाची दादही त्याला मिळत होती. (“मीही ब्रह्मचर्यपालन केले. पण ब्रह्मचर्याची कधी शपथ वगैरे घेतली नाही, अर्धनग्न निर्वासितांना वस्त्रे पुरविली पण त्यांच्याजवळ वस्त्र नाही म्हणून स्वतः उघडा फिरलो नाही”, इ.इ.) नथुरामच्या तोंडी काही गांधींविषयी आदराची वाक्ये आहेत (नथुरामचे थोरपण वाढविण्यासाठी ते आवश्यकच). पण जे काही गांधींविषयी आदराने तो बोलतो तेथे प्रेक्षक स्तब्ध असत. नाही म्हणायला खुद्द गांधींच्या तोंडी नाटकात काही सत्य, अहिंसा, निर्भयता इत्यादींबद्दलची वाक्ये होती त्याही वाक्यांना टाळ्या पडल्या. पण त्या एवढ्या क्षीण होत्या की त्यावरून नाट्यगृहात सगळेच नथुरामचे भक्त नसावेत एवढे जुजबी अनुमान,
नथुरामबरोबर पुन्हा एकदा गांधींची हत्या (किंवा “वध’ म्हणा हवे तर) करीत होते, आणि टाळ्यांमधून जणू कंठरवाने ओरडत होते, “नथुराम, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’. नथुरामच्या कृत्याला जेवढा पाठिंबा १९४८ मध्ये होता. त्याहून जास्त आज २००२ मध्ये असावा हीच मन सुन्न करून टाकणारी भावना अनुभवीत मी ते नाटक पहात होतो आणि तीच भावना घेऊन नाटक संपल्यावर सुन्न अवस्थेत बाहेर पडलो.
ज्या ज्या व्यक्ती नाटकात नथुरामच्या सहवासात येतात त्या सर्वच नथुराम-पूजक होतात, किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाने अतिशय प्रभावित होतात असे लेखकाने दाखविले आहे. गांधींच्या खुनाच्या दिवशीच गांधींचे पुत्र मणिलाल गांधी यांनी नथुरामला भेटायला जाणे, त्याच दिवशी अद्याप पुरावा हातात नसताना सावरकरांना ताब्यात घेण्याचा दिल्लीहून मुंबई पोलिसांना इन्स्पेक्टर शेखने फोन करणे, सावरकरांच्या घरावर देखरेखीसाठी नेमलेल्या सामान्य अधिकाऱ्याने दिल्लीहून आलेला उच्च अधिकाऱ्याचा आदेश धुडकावून सावरकरांना ताब्यात घेण्यासाठी त्यांची झोपमोड करणे नाकारणे, नारायण आपटे यांचा खुनाच्या कटाशी काहीच संबंध नव्हता, फक्त बडगे यांनी माफीचा साक्षीदार बनून खोटी साक्ष दिल्यामुळे त्यांना फाशी झाली असे सूचित करणे, देवदास गांधी यांनी नथुरामची परवानगी न घेताच त्याचे वकीलपत्र घेण्याचे कागद तयार करणे, त्यांनी नथुरामच्या हुषारीने आणि युक्तिवादाने भारून जाणे व तो स्वतः उत्कृष्ट वकील होऊ शकला असता असे त्याला प्रशस्तिपत्र देणे, इन्स्पेक्टर शेखचे नथुरामच्या धैर्याने दिपून जाणे आणि स्वतः भावाकुल होऊन नथुरामसाठी अश्रु ढाळणे, त्याच्या गर्भवती मुलीने चालवत नसताना दर्यापर्यंत जाऊन ज्याला कधी पाहिले नाही अशा नथुरामच्या आयुष्यासाठी अल्लाला साकडे घालणे, सावंत या पोलिस अधिकाऱ्याने दिगंबर बडगे यास माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष बदलण्यास सूचित करणे व त्यासाठी त्याची नथुरामशी भेट घडवून आणणे, अशा काही धादांत असत्य तर काहीची सत्यता अशक्य कोटीतली वाटावी, अशा घटनांची नाटकात रेलचेल आहे. मात्र ज्या गोष्टींबद्दल चर्चा व्हावी अशी अपेक्षा केली त्या गोष्टींचा नाटकात उल्लेखच नाही. उदाहरणार्थ, नथुरामला गांधीहत्येनंतर पुण्यात आणि इतरत्र महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळली गेली आणि त्यात बरेच लोक मेले हे कळले असणारच. गांधीहत्येनंतरची ही जाळपोळ त्याला अपेक्षित होती की नव्हती, याचा नाटकात उलगडा होत नाही. त्यावर त्याची टिपणी ऐकायला मला आवडले असते. त्या घटनेनंतर तरी आपण चूक केली असे त्याला वाटले का? या जाळपोळीस आपणच जबाबदार असे त्याला वाटले काय? हे नाटकात हवे होते.
त्याने गांधींचा खून केला नसून शिवाजीने अफझलखानाचा जसा केला तसा तो “वध’ होता (या वाक्यावर भरत नाट्यमंदिरात प्रचंड टाळ्या!) हा लेखकाचा आवडता सिद्धान्त. तसा हा सिद्धान्त नवा नाही. नाटकात नथुराम निदान तीन वेळा म्हणतो “हा वध राजकीय, आणि फक्त राजकीय हेतूनेच प्रेरित होऊन केला होता. यात वैयक्तिक हेवादावा नाही.” याचा अर्थ राजकारणात “वध’ ही एक शिष्टसंमत, नैतिक आणि सुसंस्कृत क्रिया आहे असे त्याला दिल्लीतल्या शिखांचा, अगर गोध्रा येथे कारसेवकांना जाळणारांच्या जातभाईंचा गुजरातेतला) “वध’च होता का? “वध’ या संकल्पनेची अशी चर्चा नाटकात हवी होती. “वध” फक्त हिंदूंनाच करता येतात असे नथुराम सारख्या “बुद्धिमान” माणसाला वाटत नसणार. “वध” फक्त व्यक्तीचाच असतो की समुदायाचाही असू शकतो यावर नथुरामचे (किंवा लेखक दळवी यांचे) मत माहीत नाही. पण तसे असल्यास ब्रिटिशांनी जालियनवाला बागेत सर्व वधच केले असे म्हणावे लागते. कारण त्यांचे कुठल्याच मृताशी वैयक्तिक वैर नव्हते. तो राज्य शाबूत ठेवण्यासाठीचा आणि जरब बसविण्याचा लष्करी व राजकीय निर्णय होता.
गांधी मरताना “हे राम’ म्हणालेच नाहीत, फक्त “अ—-” असा अस्पष्ट उच्चर त्यांनी केला या विधानाला लेखक श्री दळवी यांनी नाटकात बरेच महत्त्व दिले आहे. गांधी “हे राम’ म्हणाले अशी “खोटी’ वदंता पसरविणे हा गांधींचा त्यांच्या भक्तंनी केलेला पराजय असे दळवी म्हणतात. गांधींचा त्यांच्या भक्तांनी किती तरी वेळा आणि भक्तांनी गांधींचा केलेला पराजय फार महत्त्वाचा वाटत नसावा. त्याला हे सिद्ध करायचे आहे की गांधी मृत्युसमयी रामनाम तोंडी येण्याइतके थोर अगर पुण्यशील नव्हते. खरा पुण्यशील तर नथुराम होता, जो खून केल्यावर पळून जाण्याची संधी न घेता पोलिसांकरवी स्वतःला अटक करून घेतो. निर्भयपणे मरणाला कवटाळताना हातात भगवा झेंडा आणि अखंड हिंदुस्तानचा नकाशा धरून उभा असतो. त्यालाही सामान्य माणसासारखी मरणाची भीती वाटली असणे हे जास्त स्वाभाविक आहे. पण ती वाटलीच नाही असे सूचित करणे हा नथुभक्त दळवींचा पराभव आहे जसा गांधीभक्तंचा “हे राम’ चा (खरा की खोटा हे फक्त नथुराम आणि गांधींच्या बरोबर प्रार्थनेस निघालेल्या सोबत्यांनाच माहीत) प्रचार करण्यात झाला आहे. आपल्याला पूज्य असणाऱ्या व्यक्तीचे त्याच्या मरणोत्तर फक्त मोठेपणच उरावे आणि त्याचे सामान्यपण झाकून न्यावे असेच गांधींच्या, नथुरामच्या, अगर इतर कोणाच्याही भक्तंना वाटते एवढेच यातून सिद्ध होते. वास्तवात गांधी “हे राम’ म्हणण्याने आहेत त्याहून जास्त मोठे होत नाहीत आणि “अ——–” म्हणण्याने सामान्यही होत नाहीत.
नाटक पाहून बाहेर पडल्यावर मी विचार करू लागलो. प्रेक्षागारात काही तरुण होते जे गांधीहत्येच्या वेळी जन्मलेलेही नव्हते. त्यांना कुणी गोडसेभक्त बनविले? त्यातले जे १९४८ मध्ये सजाण होते तेही त्याकाळी गांधींच्या मृत्यूने निदान चकित झाले असणार. त्यातल्या काहींना गांधी पटत नसले तरी नथुरामचा मार्ग त्यांना मान्य नसणार. पण आज त्यांचा गांधीद्वेष वाढला असेल काय? प्रेक्षागारात ब्राह्मणांची संख्या बरीच असावी असा माझा अंदाज आहे. त्यातल्या काहींची जाळपोळीत आणि दंगलीत वैयक्तिक हानी झाली असणार. जे १९४८ मध्ये जहाल गांधीद्वेष्टे नव्हते ते त्या अनुभवातून गेल्यावर गांधीद्वेष्टे झाले असतील काय? १९४८ साली नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते, लोक अद्याप ध्येयवेडेपणाची धुंदी अनुभवत होते. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांत जे अनुभवले त्यामुळे लोक आज सांप्रदायिकतेच्या मागे लागून गांधींची आणि त्यांच्या तत्त्वाची टवाळी करण्यात धन्यता मानीत असतील काय? आज शिवसेना हा सर्वांत सबळ पक्ष आहे यात शंका नाही. बाळ ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी एका भाषणात असे म्हटल्याचे मला स्मरते की सार्वजनिक ठिकाणच्या गांधींच्या सर्व मूर्ती हलवाव्यात आणि त्या जागी नथुराम गोडसेच्या मूर्ती लावाव्यात. असे म्हणणारे ठाकरे जर “हिंदुहृदय सम्राट” हे विशेषण खेचून घेऊन मिरवू शकतात (जसा नथुरामचा आत्मा “सिंधु नदी अखंड भारतात खेचून आणल्याखेरीज’ शांत होणार नाही असे नाटककारास वाटते) तर मग २००२ मध्ये “मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे भरत नाट्य मंदिरातील प्रेक्षक एवढे गांधीद्वेष्टे का याचा काहीसा उलगडा होतो का? गोडसे यांचे मोठेपण स्थापित करण्याचा पुण्यात पस्तीस वर्षांपूर्वी झालेला प्रयत्न माझ्या लक्षात आहे. त्यांचा जन्मदिन अगर मृत्युदिन साजरा केला होता. पण ही बातमी वृत्तपत्रात आली त्यावेळी त्यांचे भक्त चूप झाले होते. असे आणखी दोन चार वेळा झाले होते. गोपाळ गोडसे यांच्या मुलाखातीत व पुस्तकात नथुरामची थोरवी आलेली आहेच. पण आज नथुरामचे भक्त निदान महाराष्ट्रात तरी बहुमतात असावेत असे मानण्यास जागा आहे. गांधींच्या मूर्ती हटविल्या जाणार नाहीत कदाचित, पण नथुरामची एखादी मूर्ती पुण्यात दिसणारच नाही अशी गांधींसारख्या नादान नेत्यांनी मध्ये पडून पाकिस्तानची निर्मिती केली.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.