‘आहे’ आणि ‘असायला हवे’

‘सोशिओबायॉलजी’च्या वापरातला एक धोका मात्र सतत सावधगिरी बाळगून टाळायला हवा. हा धोका म्हणजे जे ‘आहे’ (is) ते ‘असायलाच हवे’ (ought) असे न तपासताच मानण्याचा नीतिशास्त्रातील निसर्गवादी तर्कदोष. मानवाच्या स्वभावात जे आहे ते बवंशी (अठरा लक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या) प्लाइस्टोसीन काळातील शिकारी-संकलक राहणीतून आलेले आहे. त्यात कुठे जीन-नियंत्रित वृत्ती दिसल्या तरी आजच्या किंवा भविष्यातल्या रूढींच्या समर्थनासाठी त्या वृत्तींचा आधार घेता येणार नाही. आज आपण मूलतः वेगळ्या, आपणच घडवलेल्या परिस्थितीत जगतो. त्यामुळे जुन्याच पद्धती वापरणे हा जीवशास्त्रांचा अनर्थकारी वापर ठरू शकतो.
[निसर्गदत्त’ किंवा ‘जीन-नियंत्रित’ गुणविशेषांना कितपत महत्त्व द्यावे याबद्दल ई. ओ. विल्सनने न्यू यॉर्क टाईम्सच्या मासिकात ‘ह्यूमन डीसेन्सी इज अॅनिमल’ या नावाचा लेख लिहिला (12 ऑक्टो. 1975). मुळात माणसांचे सामाजिक व्यवहार खूपसे जीन-नियंत्रित असतात, असे सांगणाऱ्या विल्सननेच स्वतःचे तत्त्व वापरण्याबाबत वरील सावधगिरीचाइशारा दिला!]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.