करायला गेलो एक !

ज्ञानाचा आग्रह जेवढा हिंदुधर्मात धरण्यात आला तेवढा विचार इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु अज्ञानी जन जेवढे हिंदु धर्मात आहेत तेवढे इतर धर्मांत नाहीत.
इमानदारीचा जेवढा आग्रह इस्लाम धर्मात आहे तेवढा इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु बेइमानीच्या जेवढ्या गोष्टी मुस्लिम राजकारणात आहेत तेवढ्या इतर कोणत्याही धर्मात नाहीत.
अपरिग्रहाचा जेवढा आग्रह जैन धर्मात आहे तेवढा इतरांचे ठायी आढळणार नाही; परंतु परिग्रहाच्या मूर्ती जेवढ्या जैनांमध्ये आहेत तेवढ्या इतरत्र दिसत नाहीत.
प्रेमाचा आग्रह जेवढा ख्रि चन धर्मात आहे तेवढा इतर धर्मांत नाही; परंतु धर्माच्या नावावर जेवढी युद्धे ख्रि चन धर्मीयांनी केली तेवढी अन्यत्र झाली नाहीत.
मूर्तिपूजेचा विरोध भगवान बुद्धांनी केला; परंतु भगवान बुद्धाच्या जेवढ्या मूर्ती जगात निर्माण झाल्या तेवढ्या दुसऱ्या कोणत्याच एका व्यक्तीच्या झालेल्या नाहीत.
अशी विसंगती आपणांत आहे.
— म. गांधी
[ हा उतारा मालती देऊळगावकर, 2, चंद्रमौळी, सरस्वती नगर, लातूर – 413 531 यांनी आम्हाला पुरवला. ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.