गांधीवाद विरुद्ध नथुरामवाद

संदर्भ : आ.सु. डिसेंबर 02 मधील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हा लेख एप्रिल 03 मधील श्री. शांताराम कुळकर्णी यांचा ‘हे चित्र पहा,’ हे पत्र:
कोणत्याही संत-महात्म्याच्या किंवा महापुरुषाच्या संदर्भात जनसामान्यात प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक असतात. (1) द्वेषी (2) प्रेमी (3) कुंपणावरचे. रा.स्व.संघ, म.गांधी, पं.नेहरूंचा द्वेषी होता. ‘प्रेमी’ मध्ये दोन प्रकारचे लोक असतात. भक्त आणि वादी. भक्त आपल्या प्रिय संतमहंताचे गुणगान, आरत्या, भजने, भाषणे जोशात करतील, पण आचरण करीत नसतात (थोडेसे अपवाद वगळता). आचरणाच्या वेळी त्यांचा स्वार्थ उफाळून येतो. उदा. पित्याने दिलेले वचन राखावे म्हणून श्रीराम राजसिंहासन सोडून वनवास पत्करतो. आणि रामभक्त? मातापित्याला वृद्धाश्रमात टाकणाऱ्यात किंवा पर्वा न करणाऱ्यांत सुशिक्षित-अशिक्षित रामभक्त फार असतात. श्रीरामाने आदिवासी शबरीची उष्टी बोरे खाल्ली, ही गोष्ट रामभक्त चघळून चघळून सांगतील, पण आचरणात मात्र आपली उष्टी बोरेही शबरीला देणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज खचलेल्या मशिदीची सुद्धा दुरुस्ती करीत असत. तुकाराम व रामदासांप्रमाणेच मुस्लिम याकूत बाबालाही गुरुस्थानी मानत असत. मुस्लिम, ख्रि चन स्त्रीलाही मातृतुल्य मानत असत. आजचे शिवाजी भक्त कसे वागतात? (स्पष्टीकरणाची गरज नाही) तसेच आहेत गांधी भक्त! गेल्या वीस पंचवीस वर्षातील स्वार्थी काँग्रेसवाल्यांनी ‘मी गांधी बोलतोय’ नावाची नाटकेच केली, करीत आहेत. आजचा रा. स्व. संघ, गांधी-आंबेडकरांना प्रातःस्मरणीय समजतो. त्यांच्या जयंत्या मयंत्याही साजऱ्या करतो—-त्याचेही ते ‘मुख में राम बगल में रामपुरी’ नावाचे नाटकच असते. मुळात काय, ते आजचे अनेक नथुराम हाती पिस्तूल-त्रिशूळ-तरवारी हातात घेऊन सांगत सुटले आहेत.
‘वादी’ थोड्या बहुत प्रमाणात आचरणशील असतात. अर्थात आपापल्या सोईप्रमाणे. श्री. शांताराम कुळकर्णीचा महत्त्वाचा प्र न म्हणजे ‘गांधींचा एखादातरी सच्छिष्य आज पाहायला तरी मिळतो का?’ श्री. शांतारामांनी नथुरामाचा चष्मा न वापरता स्वतःचा वापरला तर त्यांना आजही गांधीवादी विभूती दिसतील. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावर पंचा, चष्मा टक्कल वगैरे आणि गांधींसारखेच आचरण करणारेही आहेत. मध्यप्रदेशात, विदर्भात आहेत. आज मला त्यांची नावे गावे सांगता येणार नाहीत, परंतु गांधीवादी शब्दाचा नीट अर्थ लक्षात घेतल्यास आज हयात असलेले विदर्भातील बाबा आमटे यांचे चिरंजीव, ठाकुरदास बंग, अभय बंग, राणी बंग वगैरे आहेत. प िचम महाराष्ट्रातही भरपूर आहेत. गांधीवादी चष्यातून पाहिल्यास अण्णा हजारे, डॉ. श्रीराम लागू सुद्धा दिसतील.
‘मी नथुराम बोलतोय’ नाटक पाहताना नथूरामच्या संवादावर टाळ्या वाज-विणारे गांधीद्वेषी, नथुराम विरुद्ध दंगा करणारे गांधीभक्त असतील. गांधीवादी गोंधळ करीत नाहीत. त्यांचे विधायक कार्य सुरू असते.
‘कुंपणावरचे’ फक्त नाटक पाहातात. दोन्ही बाजूने मान डोलावतात. मी स्वतः गांधीविचाराचा असूनही ‘मी नथुराम बोलतो’ चे प्रयोग व्हावेत या विचारांचा आहे. त्यावर प्रेक्षकांची जी बरीवाईट प्रतिक्रिया उमटते त्यांचेही स्वागत प्रयोगकर्त्यांनी करायला हवे. युतीच्या राजवटीत माझ्या ‘क्रांतीबा क्रांतीमा’ (म. फुले, सावित्रीबाई) नाटकाला प्रखर विरोध झाला होता. शासकीय रंगभूमि
परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र, जे अडीच-तीन महिन्यांत मिळते, ते अडीच वर्ष मिळाले नव्हते. तरी प्रयोग रेटलेच. शिव्या खाल्ल्या, दिल्या. यातून फुलेंचे कार्य उजळत गेले. 1989 मध्ये पुण्याच्या डॉ. बाळ गांगल यांनी म. फुलेंवर बीभत्स शब्दांत शिवराळ लेख लिहिले होते. त्यावेळी महाराष्ट्रभर गदारोळ उठला होता. डॉ. बाळ गांगल व सोबतकार बेहेरे यांची पाठराखण हिंदुमहासभा, रा. स्व. संघ व शिवसेनेने केली होती. पण वृत्तपत्रीय वादळ इतके उठले होते की गांगलांना क्षमा मागावी लागली होती. दुसरीकडे म. फुले, सावित्रीबाई वर इतके लेख, संशोधन झाले की फुले दांपत्य अधिकाधिक उजळत गेले. ज्यांना फुलेंविषयी काहीच माहिती नव्हते त्यांनीही फुले अभ्यासला. राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश या कर्मठ आणि अंधश्रद्धाळू राज्यातही फुले-आंबेडकर पोचले. याबद्दल डॉ. गांगल यांचे मी लेखातून आधी अभिनंदन केले व नंतर सावरकर, स्वामी विवेकानंदांनीही फुलेंवर मात करून पुरोहितशाही व ब्राह्मण्यवाद्यावर कसे घणाघाती आरोप केले होते याचे दाखले दिले होते.
‘मी नथुराम . . .’ च्या नाट्यप्रयोगानंतर असेच काही घडले असते, म. गांधींची, गांधीवादाची झाकोळलेली प्रतिमा उजळली असती तर बरे झाले असते. परंतु गांधीभक्तांनी फक्त गोंधळ घातला गांधीवाद्यांनी दुर्लक्ष केले म्हणून गांधीद्वेष्ट्यांची सरशी झाली, गेल्या पन्नास वर्षांत नथुरामभक्तंची संख्या वाढली असे भास शांताराम कुळकर्णीना झाले असल्यास ते चूक नव्हे. ही संख्यावाढ म्हणजे बाळसे नव्हे, सूज आहे. त्यांचे त्रिशूळ त्यांचीच आतडी बाहेर काढतील तेव्हा सूज उतरेल. लाठ्या उठल्या, भीमाच्या गदा उठणार आहेत.
कारण मूळ गांधीवाद मरू शकत नाही. गांधीवादाला मारायचे असल्यास आधी महावीर, बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु नानक, कबीर वगैरे अहिंसावाद्यांना मारावे लागेल. कारण ह्या महात्म्यांनी सर्वसामान्य जनास आकृष्ट करणाऱ्या पण सहजासहजी न पचणाऱ्या गोळ्या दिल्या आणि मनुवाद उर्फ ब्राह्मण्यवादाची मस्ती उतरवली.
फुले, गांधी, डॉ. आंबेडकर इत्यादी मानवतावाद्यांचा द्वेष करणारे मनुवादी-ब्राह्मण्यवादी आहेत. हिंदुत्ववादी मुळीच नव्हे. सर्वसमावेशक विशालहृदयी हिंदुत्वावर संकुचित वृत्तीच्या मनुवाद्यांनी नेहेमीच आघात केले आहेत. परिवर्तनवाद्यांनी ब्राह्मण्य-वादाची चौकट खिळखिळी करून टाकली होती. टिळकांनी काँग्रेसची धुरा खांद्यावर घेऊन मनुवादही सावरण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यांच्या निधनानंतर कोणीतरी टिळकपंथी आरूढ होईल असे वाटत असताना अनपेक्षितपणे गुजराथमधील ब्राह्मणेतर पुरोगामी बॅ. मो. क. गांधी आरूढ झाला. तेव्हापासूनच गांधीद्वेष सुरू झाला. गांधींनी द. आफ्रिकेप्रमाणेच भारतीय मुस्लिम, ख्रि चन, बहुजन, दलितांना काँग्रेसच्या झेंड्याखाली ओढणे सुरू केले. काँग्रेसमधील कर्मठांचे धर्ममंडळ डळमळू लागले. त्यांनी मुस्लिमद्वेषाचा बागुलबुवा उभा केला. मुस्लिमद्वेष दुय्यम स्थानीचा देखावा होता. मुस्लिमविरोधी एखादी सेना त्यांनी कधी उभी केली का? ख्रि चन मिशनऱ्याप्रमाणे एखादे हिंदूमिशन आजवर उभे केले कां? मुळीच नाही, कारण मनुवादात ह्या गोष्टी बसत नाही. गांधी मिशन, रामकृष्ण मिशन वगैरे सुरू झाले. गांधीद्वेष, मुस्लिमद्वेष, मनुवादाचे पुनरुज्जीवन दररोजच्या बौद्धिकात होत असल्याचे मी अनुभवले आहे. गांधी नेहरू फुले आंबेडकरांना उघडउघड शिव्या देणे हे मुख्य सुकर्म होते. 1936 मध्येही गांधीहत्येचा प्रयत्न झाला होता. त्या कटातही नथुराम गोडसे होता. त्यावेळी कोणते दंगे, कोणती फाळणी होती? परंतु लांडग्याच्या मनात कोकराला मारायचेच होते. त्याने अनेक बहाणे रचले. 1948 पूर्वीचे विवेक व पांचजन्य शोधा, पुरावे सापडतील किंवा गोळवलकर गुरुजींचे प्रकाशित वाङ्मय चाळावे. “. . . प्रत्येक प्राणिमात्रात आत्मा एकसारखा असल्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या हिंदूत ऐक्य आहे. . . . वास्तवात जी विषमता आढळते ती ईश्वरनिर्मित, निसर्गनिर्मित असल्यामुळे अपरिवर्तनीय आहे . . . समतेच्या कल्पनेभोवती ज्या राजकीय प्रणाल्या बांधल्या गेल्या आहे, त्या भारतीय संस्कृतीत बसत नाहीत. कोणत्याही अर्थाने ‘समता’ अस्तित्वात नसते . . . समाजात असलेली विषमताही खरी आहे असे समजून डॉ. आंबेडकर व म. गांधी यांनी समाजात अलगपणाची भावना निर्माण केली . . .” इति गुरुजी. ख्रि चन-मुस्लिमांनी (1) हिंदुधर्म स्वीकारावा (2) हिंदुस्थान सोडून जावे (3) हिंदुस्थानात त्यांनी कोणतेही अधिकार, सोयसवलती, नागरिकत्वाचे हक्क मागू नये. असे पर्याय गुरुजींनी दिले आहेत. हिंदू धर्माला अस्पृश्यता मान्य नाही असेही त्यांचे मत होते. तरीही त्यांच्यादेखत संघस्थानावर पंक्तिभेद होत असे. संघस्थानावर, शाळेत, भर रस्त्यात गांधी, नेहरू, आंबेडकरांना अ लील शिव्या देणे, जातीवरून धेड्या, मांगट्या, माळगटा अशा शिव्या देणे सर्रास चालत असे. 1948 पूर्वी संघस्वयंसेवकांची खुलेआम मग्रुरी चालत असे. गांधीहत्या झाल्यानंतर पेढे वाटणे, बँड लावून सण साजरा करणे वगैरे कार्यक्रम 30 जानेवारीला संध्याकाळी, रात्री आम्ही पाहिले आहेत. दुसऱ्या दिवशी गांधीहत्या कळल्यानंतर दंगा झाला. त्यात ब्राह्मणांची घरे लुटली पेटवली. हत्या झाल्या हे मधुकर देशपांडेंचे म्हणणे ऐकीव असेल. खरे नव्हे. संघ स्वयंसेवकांचीच घरे शोधून लुटली. मारझोड झाली. महाराष्ट्रात एकही हत्या झाल्याचे मी वाचले नाही. त्या काळात सुधारणावादी ब्राह्मणसुद्धा कट्टर गांधीवादी होते. आजही आहेत.
त्यागी, देशभक्त, गांधीवादी लोकांवर उभारलेली काँग्रेस इमारत, स्वार्थी, भ्रष्ट लोक शिरल्यामुळे चाळीस वर्षांत डळमळू लागली. गांधीद्वेष्ट्यांना संधी मिळाली. त्यांनी रामरथ काढून बहुसंख्य हिंदूंच्या भावना चाळविल्या. परंतु 1925 पासून आजवर जन-सामान्यांची मने जिंकण्याकरिता कोणतेही मिशन काढता आले नाही. कारण तळामुळाशी असलेला भ्रष्ट मनुवाद! भाजपाचा
पाया पक्का होण्यापूर्वीच भ्रष्टाचार दिसू लागला. संघाच्या चिंतन-राजधानीत नागपूर विदर्भात नगर सेवक, सहकारी बँका, ठेवी योजनात भाजपा संघ स्वयंसेवक भ्रष्टाचाऱ्यांची रीघ लागली.
भाजपाच्या कमळाच्या तळामुळाशी हा असा चिखल आहे. त्यामुळे विहिंपचा त्रिशूळ त्यांचाच कोथळा बाहेर काढण्यास वेळ लागणार नाही.
174 तारांगण, विवेकानंद नगर, नागपूर — 440015

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.