भाकीत

“मानसशास्त्रज्ञांनी…. सांगोपांग अभ्यासातून अधिकारशाही व्यक्तिमत्त्वाविषयी काही दंडक निश्चित केले, लक्षणे…. कसोट्या ठरवल्या. (नरेंद्र मोदी यांना जवळपास त्या साऱ्याच कसोट्या लागू पडतात… अत्यंत कडक सोवळेपणा, संकुचित भावनात्मक जीवन, स्वतःच्या भावनावशतेची भीती असल्यामुळे — आत्म-नकारी वृत्तीमुळे — स्वतःच्या अहंच्या रक्षणार्थ दुसऱ्यावर दुष्ट हेतू लादणे अशा सर्व लक्षणांचे मिश्रण त्यांच्या मुलाखतीमध्ये प्रत्ययास आले. त्यातून त्यांच्या डोक्यात कपोलकल्पित हिंसाचाराची भुते थैमान घालीत होती हेसुद्धा स्पष्टपणे दिसले. एवं सर्व लक्षणांना कोंदण होते ते एका नादिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे. भारताविरुद्ध साऱ्या जगात सर्वत्र एक कट रचला जात आहे याबद्दल मोदी यांना बालंबाल खात्री वाटत होती. भारतातील प्रत्येक मुस्लिम हा देशद्रोह्याची संशयास्पद भूमिका पार पाडील असेही धरून चालायला हवे असा मोदी यांचा…. आग्रह होता. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम हा भावी दहशतखोर बनू शकेल असा मोदी यांचा अभिप्राय होता…. ही मुलाखत संपवून बाहेर पडलो तेव्हा मी चांगलाच हादरलो होतो…. मी म्हटले की, मी आयुष्यात प्रथमच फॅसिस्टाची अगदी क्रमिक पुस्तकात वर्णिलेली अभिजात केस आताच पाहिली. हा माणूस (मोदी) भावी काळात नमुनेदार खुनी बनू शकेल. इतकेच नव्हे तर एखाद्या समाजाची पुरी कत्तलही त्याच्या हातून कदाचित घडू शकेल.
इ. आशिष नंदी मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ आहेत. त्यांनी दहाएक वर्षांपूर्वी मोदींची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना जाणवलेले ‘गुणावगुण’ त्यांनी ‘सेमिनार’ जून २००२ च्या अंकात नोंदले. हा उतारा आम्हाला भास्कर लक्ष्मण भोळे ह्यांनी उपलब्ध करून दिला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.