संपादकीय

विज्ञान विशेषांकासाठी आलेल्या दोन लेखांचे उत्तरार्ध जागेअभावी या अंकात येत आहेत.
आजचा सुधारकचे स्नेही व सल्लागार डॉ. विश्वास कानडे यांचे नुकतेच निधन झाले. प्रा.प्र.ब. कुलकर्णीचा पुढील अंकातील लेख वाचकांना कानड्यांची ओळख करून देईल. कानड्यांनी आसुमधून विचारलेला प्रश्न, “प्राचीन भारतीय साहित्यात समाजरचनेबाबत काही चिंतन आढळते का?’ हा मात्र आजही अनुत्तरित आहे.
मोहन कडू व मधुसूदन मराठे या आमच्या लेखक-वाचक स्नेह्यांचेही नुकतेच निधन झाले. कडूंचे इट कांट हॅपन हिअरचे परीक्षण आम्हाला एक नवा, सक्षम लेखक मिळाल्याचा आनंद देत असतानाच अवघ्या 50 च्या वयात कडू वारले.
येत्या काही अंकांमधून खालील लेख/लेखमाला प्रकाशित होणार आहेत. 1) टी. बी. खिलारे ह्यांचा बालकांमधील नैतिक मूल्यांच्या विकासाबाबतचा लेख. 2) प्राथिमक शाळांमध्ये गणित हा विषय कसा शिकवावा यावर भास्कर फडणिसांची लेखमाला. 3) देशाच्या पाणी-व्यवस्थापनेमागे कोणते विचार असावे यावर चिं.मो.पंडितांचा लेख. 5) बौद्धधर्मावरील हल्ल्यांबाबत मधुकर कांबळे यांचा लेख. 6)नियतवाद (determinism) व ईहा (free will) यांवर स्टीफन हॉकिंगच्या लेखाचा सुधाकर देशमुखांनी केलेला अनुवाद. 6) वरील विषयाबद्दलच्या जीवशास्त्रीय मतांची ओळख करून देणारा सुधाकर देशमुख यांचा लेख. 7) विचारवंतांची हिम्मत (हिम्मतीचा अभाव!) यावर ह. आ. सारंगांची दोन टिपणे. 8) वैज्ञानिक विश्वसंकल्पनांपैकी एकीचा मागोवा घेणारे जयंत फाळके यांचे लेख 9) प्रतिभा रानडे यांच्या ‘व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम?’च्या निमित्ताने या अनुभव जानेवारी 2004 मधील लेखाचा संक्षेप.
हे सर्व लेख प्रकाशित होईपर्यंत आम्ही पृष्ठसंख्या वाढवून 48 करीत आहोत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.