‘काश’ राष्ट्रवाद: तिथेही तेच! 

पाकिस्तानातील प्रस्थापितांना वर्षांनुवर्षे एक काल्पनिक इतिहास शिकवला गेला आहे. तरुणांना स्वतःच्या राष्ट्राची महत्ता सांगणारी गुळगुळीत घोषणावाक्ये तपासायला शिकवले जातच नाही. पर्यायी दृष्टिकोन सुचवलेच जात नाहीत. यामुळे कार्ये आणि कारणे यांच्याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. आणि शिवाय याने ‘काश! वृत्ती रुजते. काश! इंग्रजांनी दक्षिण आशियात हिंदूंची बाजू घेतली नसती, तर!’ किंवा ‘काश. अमेरिकेने आपली वचने पाळून आपल्याला काश्मीर मिळवून दिला असता तर!’ असल्या सुलभीकृत विचारांमुळे विश्लेषणच थांबते. 

जोवर पाकिस्तानातील भडकावू घोषणा आणि ‘ब्रेनवॉशिंग’ संस्कृतीची जागा खऱ्याखुऱ्या वैचारिक विविधता येणार नाही, तोवर पाकिस्तान हे आधुनिक, कार्यप्रवण राष्ट्र होणार नाही. ‘वरून’ सांगितलेला धार्मिक राष्ट्रवादच जर राष्ट्राचा ‘चेहरा’ घडवून राष्ट्रहित कशात आहे ते सांगत असेल आणि टीकाकारांना परकीयांचे हस्तक मानत असेल तर एखादे दिवशी कोण्या अतिरेक्याने प्रस्थापितांनाच वैचारिकदृष्ट्या ‘कलंकित’ मानले तर आश्चर्य वाटायला नको! 

[हसेन हक्कानी वॉशिंग्टनमधील ‘कैंब्रिज एन्डावमेंट फॉर इंटरनॅशनल पीस मध्ये अभ्यासक आहेत. ते बेनझीर भुत्तोंचे सल्लागार व श्रीलंकेतील पाकिस्तानचे राजदूतही होते. त्यांच्या हिस्टरीज वॉरियर्स’ (इंडियन एक्सप्रेस, 3 जून 2004) या लेखातील हे अंश] 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.