“सुलभ’ भारत

१)तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग अजूनही हाताने विष्ठा साफ करतात का ? जर ‘हो’, तर हे स्वतःच्या घरात करता की नगरपालिकेच्या स्वच्छतागृहात ?

२) तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग घरी संडास नसल्याने उघड्यावर जाता का ? जर ‘हो’, तर हे गावात होते की खेड्यात ?

३) तुमच्या शाळेत संडास आहे का, की नसल्याने त्याची गरज पडल्यास तुमची गैरसोय होते? जर ‘हो’, तर तुम्ही हा प्रश्न कसा हाताळता?

४) तुमच्या टप्प्यात येणाऱ्या रेल्वे, बस स्थानकांवर, बाजारांत, धार्मिक व पर्यटनाच्या स्थळांमध्ये संडास आहेत का ? जर ‘नाही’, तर तुम्ही हा प्रश्न कसा हाताळता ?

५) तुम्हाला उघड्यावर शौचास जाताना स्त्रियांवर गुन्हेगारी हल्ले झाल्याच्या घटना माहीत आहेत का ? जर ‘हो’, तर कृपया तपशील द्या. * ६३.०६% घरांमध्ये ( ७८.०१% ग्रामीण व २६.०३% शहरी) आजही संडास नाहीत. एकूण सोय नसलेल्या घरांची संख्या १२,२०,७८,१३६ अशी आहे. * आजही भंग्यांची प्रथा सुरू आहे व ६०% काम स्त्रिया करतात. * दरवर्षी डायरियाने व डीहायड्रेशनने सात लक्ष मुले दगावतात. * ग्रामीण स्त्रियांना सूर्यास्त ते सूर्योदय या काळातच शौचास जावे लागते. * नद्यांचे प्रदूषण बहुतांशी मलनिस्सारणानेच होते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.