लेखक परिचय

सुलक्षणा महाजन: वास्तुविशारद, मुंबई व मिशिगन विद्यापीठात अध्ययन. नागरी, तांत्रिक व पर्यावरणशास्त्रीय नियोजनाच्या क्षेत्रात संशोधन. भाभा अणुविज्ञान केंद्र व अनेक मान्यवर कंपन्यांमधील सखोल अनुभवानंतर सध्या रचना संसदेच्या कला अकादमीत व ‘जे.जे.’ मध्ये अभ्यागत म्हणून अध्यापन. (ग्रंथ: जग बदललं व अर्थसृष्टी: भाव आणि स्वभाव, ग्रंथाली २००३, २००४) ८, संकेत अपार्टमेंट, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०

विद्याधर फाटक: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये १९७६ ते २००४ पर्यंत नगरनियोजक होते. त्याच काळात ते राष्ट्रीय नागरीकरण आयोगाचे व अन्य शासकीय समित्यांचे सदस्य होते. जागतिक बँकेने साहाय्य दिलेले मुंबई व तामिळनाडूतील नगरविकास प्रकल्प व मुंबई वाहतूक प्रकल्प यांसाठीही त्यांनी काम केलेले आहे. १ / ३०४, कैरव, जीइ लिंक्स् राममंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम),मुंबई – ४०० १०४

प्र. ल. बोंगिरवार: स्थापत्यशास्त्रज्ञ, महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव (सार्वजनिक बांधकाम खाते), व्यवस्थापन संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सहआयुक्त मुंबई महानगर विकास प्राधिकरण. निवृत्तीनंतरही अनेक सरकारी समित्यांचे सल्लागार.
बी-१०२, पाटलीपुत्र सोसायटी, प्लॉट नं. ५ अंधेरी (प.), मुंबई – ५३.

हेमंत नाईकनवरे: स्थापत्यशास्त्रज्ञ व विधिज्ञ. गृहनिर्माण आणि बांधकाम व्यावसायिक, कारखानदार, प्रोमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन, पुणे या संस्थेचे ९ वर्षे व्यवस्थापकीय सदस्य आणि आता सचिव या नात्याने स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विकासविषयक धोरणांसाठी पाठपुरावा. नाईकनवरे असोसिएट्स, घोले रोड, डेक्कन जिमखाना, पुणे – ४११ ००४

रमोला नाईक-सिंगरू: वास्तुविशारद, नागपूर व मुंबई, यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे आचार्यपदासाठी संशोधन करीत आहेत. [Department of Geography & Environment, London School of Economics, Konghton Street, London WL 2 A 2 AE e-mail: r.n.naik-singru@se.rc.uk ]

चि.मो. पंडित: स्थापत्यशास्त्रज्ञ, वाई, अहमदाबाद व स्टुटगार्ड येथील शिक्षणानंतर भारतात स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणून सल्लागार.
६, सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई ४०० ०५७.

सुजाता खांडेकर: विद्युत अभियांत्रिकी तज्ज्ञ, एम.ए. (लंडन), मॅकार्थर फाऊंडेशनच्या फेलो, म.रा.वि.म.मधून स्वेच्छानिवृत्ती, कोरो साक्षरता समिती, मुंबई, तर्फे झोपडपट्ट्यांमध्ये काम व संशोधन. (आशेविण आशा आणि इतर पुस्तके), १, मधु पार्क, घाटला व्हिलेज, बोरला रोड, चेंबूर, मुंबई ४०० ०७१

उल्हास राणे: वास्तुविशारद, मुंबई. पर्यावरणविषयक संशोधन व कृती. माहीम नेचर पार्क, मुंबई आणि ऋतुचक्र, ठाणे या दोन नागरी उद्यानांचे नियोजक. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे माजी सचिव. सध्या वास्तव्य बंगलोर. ९१-८०–३४७२८३, वृंदावन, २२२, राजमहल विलास एक्सटेंशन, II फर्स्ट मेन, बंगलोर – ५६० ०९४.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.