भीती आणि विचार

लेखिकेच्या शब्दचित्रातून तिचा अनुभव माझ्यातही साकारला. माझ्या मनावरूनही भीतीची लाट गेली. अशा अनुभवांकडे कसे बघावे, ते कसे घ्यावेत, या पृच्छेवरून तिची या अनुभवामागची प्रक्रिया जाणून घेऊन तो संगणकीय भाषेत भीतीच्या फाईलमधून विचाराच्या ‘फाईल’ मध्ये सामील करण्याचा प्रयत्नही समजला.
मानसशास्त्रीय संस्कारांमुळे माझ्या मनात ‘अतींद्रिय’ असे काही आलेच नाही. मनात आले ते असे : मूल बौद्धिक क्षमता असलेल्या मेंदूसकट जन्मते. त्यावर मुळाक्षरे उमटवतात पालक, शिक्षक, मित्रमंडळ, पुस्तके, प्रसारमाध्यमे आणि एकूण वातावरण ! त्यातून बऱ्या-वाईटाचे भान येते. धोक्यांची जाणीव होते. बचाव कसा करावा, समजू लागते. ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संदेशांची पटापट उकल होऊन रोजच्या व्यवहारावर पकड येते. अत्यावश्यक अशा आत्मसंरक्षणाचे महत्त्व तर कानीकपाळी ओरडून बालमनात ठसवले जाते. सावधता, धोक्याचे सिग्नल कुठले, काळजी कशी घ्यावी, याचे इशारे वाचनातूनही मिळतात. उदा.
अज्ञात ठिकाण, निःशब्द वातावरण, आत्यंतिक सौदर्याने पडणारी भूल !
गोष्टीतली राजकन्या सुगंधाच्या, सुस्वरांच्या मागे जाऊन राक्षसाच्या तावडीत सापडते. वनवासातल्या सीतेचे सुवर्णमृगाच्या मोहामुळे सावधगिरीचे भान सुटले आणि रामायण घडले. ही सांगड तर आपल्या जाणिवेत रुतलेलीच आहे. लेखिलेलाही वरील तीन धोक्यांचे सिग्नल्स येतात. पण तिचा विचार करणारा मेंदू भोजनामुळे थोडा सुस्तावलेला, गुंगीतच होता. त्यामुळे त्याने त्यांची दखल घेतली नाही. तेथे मरणालय आहे, तो रस्ता रहदारीचा नाही, ही पूर्वमाहिती असती तर तिच्या वैचारिक मेंदूने (Cerebral Cortex) वेळेवारीच लक्ष्मणरेषा ओढून तिला आत्यंतिक आपुलकीने धोक्याचे इशारे दिले असते. अशात धीट पद्मजाने धोक्याच्या घंटा ठणाणू लागताच जिवाच्या भीतीने पळ काढला, हे योग्यच होते. अखेर ‘सबसे प्यारी जान’ वाचवणे, हेच प्राणिमात्राचे स्वतःविषयीचे आद्य कर्तव्य असणार,पुढे शांतपणे तिने या अनुभवाची कारणमीमांसा केली. ती पळण्याऐवजी, जमले असते तर ती तशीच निसर्गसौदर्य आस्वादत पुलापलीकडे गेली असती. तिच्या वडिलांप्रमाणे ‘झुरका’ घेता आला नसता, तरी तिच्या तोंडून गाण्याची लकेर तरी उमटली असती! एकीकडे शहानिशाही झाली असती.
ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संदेशाचा सारासार विचार करून त्यानुसार कार्यवाही आखणारी व त्याप्रमाणे निरनिराळ्या अवयवांना आज्ञा देणारी उशपीरश्र छीी ड्रींशा कार्यान्वित झाली नाही तर खालच्या पातळीवरचे अधिकारी आणीबाणी जाहीर करतात आणि शारीरिक-मानसिकदृष्ट्या धोकादायक परिस्थितीतून जिवाचे रक्षण करणारी Sympathetic Nervous System ताबा घेते. अशा वेळी Flight or Fight अशा दोनच प्रतिक्रिया अपेक्षित असतात. माणसाला हल्ला करण्यासाठी किंवा पलायन करण्यासाठी हाता-पायांना रक्ताची कुमक, अॅड्रेनलिन इ. पुरवले जाते व तो आपला बचाव करू शकतो. जैविक पातळीवरची आणीबाणी संपली की, वैचारिक मेंदू कारणपरंपरेचा शोध घेऊ लागतो. भूतबाधा अशा प्रकारचे स्पष्टीकरणही वेगळे नाही. वैचारिक पातळीवर शोध घ्यायची प्रवृत्ती नसते तेव्हा काहीशा गाजवण्याच्या हौसेतूनही अशा अनुभवांवर पटकन ‘अतींद्रिय’ असा शिक्का मारला जातो. दुसरी पद्धत अनुभवांना कुचेष्टापूर्वक कचरापेटीत जमा करणे! त्याऐवजी अशा छोट्या-मोठ्या अनुभवांचे तळहातावर घेऊन विश्लेषण केल्याने भीतीचा प्रदेश कमी होऊन आपल्या यंत्रणांवरच ताण कमी होईल. प्रक्रिया समजल्याने अशा अनुभवांची तीव्रताही कमी होईल. हिस्टेरिया होण्यामागची कारणे समजल्यावर तशा रुग्णांचे प्रमाणही संख्येने रोडावले, हे एक उदाहरण पुरावे,
पायवा
आजचा सुधारकच्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’ मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील. आजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.